काही शब्द असतात मुके
उभे उन्हात जणु पोरके मुले
भूतकाळात ना भविष्यात डोकावत
सहज वर्तमानाच्या क्षणांत घुटमळत
वाटते समोरच्या मनी कराव घर
रेंगाळावे उशीशी कोणाच्या रात्रभर
पण होतात ह्रदयी कप्प्यात बंद बंद
हसतात डायरीच्या पानांतून मंद मंद
-भक्ती
११/०१/२०१७
प्रतिक्रिया
11 Jan 2021 - 7:20 pm | पॉइंट ब्लँक
मनाची , माफ करा शब्दांची घालमेल छान मांडली आहे!
11 Jan 2021 - 10:26 pm | Bhakti
_/\_छान प्रतिसाद
11 Jan 2021 - 8:28 pm | अन्या बुद्धे
उन्हातली पोरकी मुले!
सुंदर कल्पना..
11 Jan 2021 - 10:28 pm | Bhakti
धन्यवाद
12 Jan 2021 - 2:33 pm | सरिता बांदेकर
मस्त!!