.

सल्ला पाहिजे मुंबई दिल्ली प्रवास ७५+ वय

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in भटकंती
8 Jan 2021 - 8:59 am

सल्ला पाहिजे, विनंती
मुंबई दिल्ली ७५ वर्षाच्या च्या पुढील माणसे विमानाद्वारे प्रवास करणार असतील ( जानेवारी अखेरी) तर काय काळजी घायवी, काय परिस्थितीती आहे याचा सध्याचं अनुभव असेलल्या मंडळींकडून सल्ला मागू इच्छितो ..
- कोविद टेस्ट झाली आहे
- मुंबई उपनगरातून विमानतळावर जाताना? ओला वैगरे किंवा स्थानिक माहितीतील टॅक्सी वाला ? कसे करावे ?
- विमानतळावर, चेक इन करताना काय कागदपत्रे ? आणि इतर काळजी घेणे
- सर्वात महत्वाचे विमान प्रवासात ( २ तासाचे उड्डाण असल्यामुळे खाणे पिणे वैगरे महत्वाचे नाही .. फक्त एकदा कदाचित टॉयलेट )
- दिल्ली विमानतलवार ( काय कागदपत्रे दाखववाई लागतील )
- दिली विमानतळ ते घर नातेवाईक येणार आहे घ्यायला त्यामुळे ती काळजी नाही

प्रतिक्रिया

विशेष, वेगळी काळजी अशी नाही. जी सध्या सगळे घेत आहेत तीच घ्यावी लागेल.
एकाहून अधिक ७५+ व्यक्ती आहेत असे दिसते. अगदी गरज असेल तरच प्रवास करावा. विमानतळावर कर्मचारी मदत करतात. न्यायला येणारा मनुष्य उशीरा आला किंवा येऊ न शकल्यास ओला किंवा महागडी प्री पेड टॅक्सी वगैरेची तयारी ठेवा.

कानडाऊ योगेशु's picture

8 Jan 2021 - 2:09 pm | कानडाऊ योगेशु

>- विमानतळावर, चेक इन करताना काय कागदपत्रे ? आणि इतर काळजी घेणे
सर्वच प्रवाश्यांना तिकिटासोबत फोटो असलेले एखादे सरकारी ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे.त्याशिवाय विमानतळाच्या आत सोडत नाहीत.
>- दिल्ली विमानतलवार ( काय कागदपत्रे दाखववाई लागतील )
जनरली तिथे काही कागदपत्रे दाखवण्याची गरज पडणार नाही.पण बोर्डिंग पास कायम जवळ बाळगा.कधीकधी तो दाखवण्याची आवश्यकता पडते.
बाकी कोविडमुळे काही अन्य कागदपत्रे दाखवण्याची गरज असल्यास ती ही जवळ बाळगा.

सिरुसेरि's picture

8 Jan 2021 - 2:14 pm | सिरुसेरि

मोबाईलवर आरोग्य सेतु अ‍ॅप असल्यास बरे .

जास्तीत जास्त 48 तास अगोदर covid test करणे सक्तीचे आहे
जसे गोवा , दिल्ली मधून महाराष्ट्र मध्ये प्रवेश करण्यास टेस्ट ची सक्ती आहे.

कारण की जाण्याचे निघण्याचे ठिकाण स्टेशनला जवळ असेल तर अंगतपासणी,दोन तास लवकर हजर होणे इत्यादी वगळून राजधानीची रेल्वे तिकिटे अवेलेबल आहेत. शिवाय दिवसाची वेळ.
एक पर्याय.

अनिरुद्ध प's picture

8 Jan 2021 - 3:39 pm | अनिरुद्ध प

६० वर्षे वरिल व्यक्तिना प्रवास करण्यास परवानगी दिलि आहे का? माहिती साठि विचारत आहे.

अनिरुद्ध

चलत मुसाफिर's picture

8 Jan 2021 - 7:36 pm | चलत मुसाफिर

1. तिकीट व बोर्डिंग पास यावौयतिरिक्त कोणतीही कागदपत्रे आवश्यक नाहीत.
2. फारतर दिल्ली विमानतळावर शरीर तापमान तपासणी होईल
3. दिल्ली विमानतळावर कोविड चाचणी सुविधा उपलब्ध आहे

सल्ला: त्यापेक्षा राजधानी गाडीने आरामात झोपून का जात नाही? सध्या अख्खा पहिला एसी वर्ग रिकामा असतो. दुसऱ्या व तिसऱ्या एसी वर्गातही प्रवासी तुरळकच असतात. पहिल्या एसी वर्गाचे तिकीट विमानाएवढेच आहे. फक्त उशी- पांघरूण व जेवण स्वतः न्यावे लागेल.