पुण्यात मेट्रो धावू लागली!

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
19 Mar 2022 - 9:34 pm

गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.

धोरणमुक्तकप्रकटनसमीक्षालेखअनुभवमत

मुखवटे

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
19 Mar 2022 - 6:53 pm

घरातून आलो माणसांच्या घोळक्यात
अचंबित झालो पाहून नाना रूपे.
सुख, दुःख, एकांत वेगळे प्रत्येकाचे
मुकी नजर विचारे, "जायचे आहे कुठे?"

आकाश सम, जमीन विषम आहे
हातात हात घ्यायला पूर्वग्रहांची बंदी आहे.
शरीर सारखेच पण पांघरूण 'लायकी'नुसार
माणूसकी सोडून सगळे बाकी जोरदार.

हाव मनात व्यसन, पैसा अन् वासनेची
भूक मिटते रात्रीपुरती, ओढ नाही झोपेची.
कत्तली करण्यात मशगुल रक्तपिपासू
ओळख न सांगता वाहतात कोरडे आसू.

अव्यक्तआयुष्यकविता

ठेचेचा दगड

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
19 Mar 2022 - 10:05 am

दगडाची ठेच लागता
रक्त येई पायात
कशास होता पडला
दगड असा रस्त्यात

कितीतरी असे अडले असती
ठेच लागून पडले असती
परी न कुणी विचार करती
फेकून द्यावा तो दगड कुठती

असाच आला वेडा कुणी
खाली वाकला तो झणी
उचलूनी दगड तो पायी
लांबवर कुठे फेकूनी देयी

- पाषाणभेद
१९/०३/२०२२

शांतरसकवितासमाज

माझी राधा - ३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
18 Mar 2022 - 11:48 pm

भटियार चे स्वर मनामधे रुंजी घालत रहातात. त्यापासून एकदम बाजूला होता येत नाही. स्वरांना असं झट्कून टाकता येत नाही.
आरोह अवरोहाच्या वेलबुट्ट्या मनात गुंजतच रहातात.
बासरी ओठाला लागलेलीच आहे. मी त्यात स्वरांची फुंकर घालतो.
मागील दुवा
सा ध प म , प ग रे सा.

कथाविरंगुळा

१००व्या ईबुकचे लोकार्पण...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
17 Mar 2022 - 10:11 pm

मित्रहो,
ज्या मिसळपावने मला अनेक वाचक दिले. माझ्या लेखनाचा आस्वाद घेतला. त्या संस्थळाला माझे अभिवादन आणि धन्यवाद.
१००वे ईबुक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
निमंत्रण आणि कार्यक्रम पत्रिका सोबत देत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उपस्थित रहा ही आग्रहाची विनंती.
ह्या पुस्तिका रुपातील सादरीकरणात ९० टक्के पुस्तकातील विषय मिपावून आधीच सादर झाले आहेत. अनेक धागे पुन्हा संपादित करून सादर केले आहेत.
ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे असेल त्यांनी ९८८१९९१९४९ वर कळवल्यास आनंद होईल

मांडणीप्रकटन

बुरा ना मानो आज होली है !!

बाजीगर's picture
बाजीगर in जनातलं, मनातलं
17 Mar 2022 - 6:08 pm

थोडं उत्तेजक पण तरीही सवंग नसलेले , किंचीत कलात्मक, जरा वेगळं आपल्याला लिहीता येतं का याचा शोध घेतोय,कृपया हलके घेणे.
मागे एक दोन बालकथा लिहील्या, त्या मलाच आवडल्या, त्यानंतर मोठ्यांनी काय घोडं मारलयं, त्यांच्यासाठी कथा नको का ? असा विचार केला....एक प्रयत्न...

-----------------------------------------------------------------------
समोरची दारात रांगोळी काढत होती,
दोन्ही हातात रंग घेऊन तो गेला.
"ओह रंग....नको म्हणून" ती वळली,
"असं कसं... आज लावायचाच"

कथालेख

परदेशवारी-३

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
17 Mar 2022 - 4:25 pm

पहिला दिवस अविस्मरणीय असतो मग तो कॉलेज मधला,नोकरीतला किवा आणखीन कुठलाही.तशीच माझी या नवीन शहरातली पहिली भ्रमंती.जमकर रॅगिंग झाली.आता वातावरणाची सवय झाली (Acclimatize).भ्रमणध्वनी पण मिळाला व घरातून NOC त्यामुळे भटकंतीचा उत्साह द्विगुणित झाला.

जुमेरात @ अमेरात

सरनौबत's picture
सरनौबत in भटकंती
16 Mar 2022 - 11:47 pm

भारतातून ओमान देशात येतो तेव्हा सर्वप्रथम नजरेत भरतात ते येथील सुबक आणि गुळगुळीत रस्ते. आपल्याइथे
एका किलोमीटरमध्ये शेकडो खड्डे असताना इकडे शेकडो किलोमीटर एकही खड्डा नाही. अर्थात कमी वाहने आणि
पाऊस जवळजवळ नाही; ह्यामुळे देखील रस्ते पटकन खराब होत नसावेत. कुठेही जा, फोटो काढावेत इतके सुरेख
रस्ते. काही वर्षांपूर्वी मस्कतमधील 'अमेरात' ह्या उंच डोंगरावर असलेल्या गावात जाण्यासाठी छान नागमोडी घाट
बांधला. घाट चढून वर गेल्यावर खालचे शहर फार सुंदर दिसते. विमानातून दिसतात तशी छोटी घरे आणि

कायप्पावरील ढकलपात्र

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जनातलं, मनातलं
16 Mar 2022 - 6:48 pm

*लता मंगेशकर यांचे शेवटचे शब्द*
(खरं तर असे सेम टू सेम शब्द मायकल जॅक्सन आणी त्याच्या नंतर देवाघरी गेलेल्यांचेही होते)
*मृत्यूपेक्षा या जगात खरे दुसरे काहीही नाही.*
*जगातील सर्वात महागडी ब्रँडेड कार माझ्या गॅरेजमध्ये उभी आहे.*
*पण मला व्हीलचेअरवर बसवले जाते!*
*या जगात सर्व प्रकारच्या डिझाईन आणि रंग, महागडे कपडे, महागडे बूट, महागडे सामान हे सर्व माझ्या घरात आहे.*
*पण मी हॉस्पिटलने दिलेल्या शॉर्ट गाऊनमध्ये आहे!*
*माझ्या बँक खात्यात खूप पैसे आहेत पण त्याचा मला काही उपयोग नाही.*

आईस्क्रीम