ईट्स माय लाईफ

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
2 Apr 2022 - 6:53 am

हे तुटलेल्या हृदयासाठी गाणे नाही
विश्वासाने निघून गेलेल्यांसाठी मूक प्रार्थना नाही
आणि मी गर्दीत फक्त एक चेहरा बनणार नाही
जेव्हा मी मोठ्याने ओरडतो तेव्हा तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल
हे माझे जीवन
आहे ते आता आहे किंवा कधीच नाही
पण मी कायमचे जगणार नाही
मला फक्त मी जिवंत असताना जगायचे आहे
(हे माझे जीवन आहे)
माझे हृदय एका मोकळ्या महामार्गासारखे आहे
जसे फ्रँकीने सांगितले, "मी ते माझ्या पद्धतीने केले"
मी फक्त मला जिवंत असेपर्यंत जगायचे आहे,
हे माझे जीवन आहे

( flying Kiss )कविता

शिशिर

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
1 Apr 2022 - 10:27 pm

थंडीने पूर्ण शहर धुक्यात विसावलेलं असत.तेव्हा बालभारतीची बा.सी.मर्ढेकरांची “पितात सारे गोड हिवाळा “ ही कविता मला आठवते.अशा धुक्यात हरवलेली रम्य पहाट आनंद देते.

मुक्तकआस्वाद

शिशिर

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
1 Apr 2022 - 10:22 pm

थंडीने पूर्ण शहर धुक्यात विसावलेलं असत.तेव्हा बालभारतीची बा.सी.मर्ढेकरांची “पितात सारे गोड हिवाळा “ ही कविता मला आठवते.अशा धुक्यात हरवलेली रम्य पहाट आनंद देते.

मुक्तकआस्वाद

फर्मी साहेबाची ऐसी तैसी

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
1 Apr 2022 - 8:42 pm

तुम्ही कधी रात्री आकाशाकडे बघितले आहे काय? अर्थात पुणे मुंबई सारख्या शहरांतून अशी अवस्था आहे की फक्त ठळक ठळक तेजस्वी दहा पंधरा तारे आणि चंद्र उगवला असेल तर तो, एवढेच आपण बघू शकता. जरा शहराच्या बाहेर दूर जाऊन आकाश पहा. आकाशगंगा अगदी स्वच्छ दिसेल.हे आकाश पाहून तुमच्या मनात काय विचार येत असतील. ते तुमच्या मूडवर अवलंबून आहे. मी जेव्हा अश्या आकाशाकडे बघतो तेव्हा मला माझ्या क्षुद्रपणाची प्रकर्षाने जाणीव होते.

कथा

||राधायन.. एक सांगीतिक कथादर्शन|| (निमंत्रण)

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
1 Apr 2022 - 8:48 am

नमस्कार मिपाकर्स
या गुढीपाडव्याला, 2एप्रिल, रात्री 8.30 वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात " राधायन .. एक सांगीतिक कथादर्शन" हा कार्यक्रम घेऊन येतोय. त्याचं हे आग्रहाचं आमंत्रण.
नवीन कथा, गीते, संगीत व नृत्ये, आणि या सा-यांच्या जोडीला चित्र साकारण्याचे प्रात्यक्षिक, असा अनोखा मेळ साधणारा कार्यक्रम, "राधायन- एक सांगीतिक कथादर्शन, गुढीपाडव्याच्या शुभदिनी,

नाट्यसंगीतकथास्थिरचित्र

काशिद किनारा व कोर्लई किल्ला -२०२२

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
1 Apr 2022 - 12:12 am

गेल्या शुक्रवारी रात्री जावई आणि मुलीचा फोन आला. आम्हाला शनिवार-रविवार सुट्टी आहे, काशिदला जायचा विचार आहे तर येणार का? छोटीलाही सुटी होती, यांनाही निघण्यास काही अडचण नव्हती आणि मला तर भटकंतीसाठी निमित्तच हवे होते. लगेच होकार दिला.

दंतकथा

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
31 Mar 2022 - 12:05 am

कुठलाही प्रवास मला आवडतो. अगदी कमी अंतरावरचा रिक्षातला सुद्धा. काय एक एक नमुने दिसत असतात. पण फक्त नमुनेच पाहिले पाहिजेत असं नाही. आत्ताच मेट्रोने (पुण्यातली नाही, आधीच स्पष्ट करतो) प्रवास करताना एक खूपच गोड म्हणता येईल असं एक कुटुंब सोबत होतं. त्यात एक सर्वात गोड अशी मुलगी होती. वय असेल अंदाजे 5-6 वर्षे. इथे हैदराबादला परकर पोलकं घालणाऱ्या मुली सर्वत्र असतात. त्यामुळेच की काय छान दिसत होती. तिचा दादा असेल 10-12 वर्षाचा. तर तो तिला सारखं मास्क लावण्याविषयी टोकत होता. पण ह्या मुलीचे वरचे 4 दात पडले होते आणि त्याचा कोण आनंद तिला झाला होता!

मुक्तकविरंगुळा

भिंतीवरचा चिवट पिंपळ

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
30 Mar 2022 - 11:19 pm

भिंतीवरचा चिवट पिंपळ
-----------------------------------------------------------------------------------------------------------

kathaa

पंचमीतले रंग सांडले........

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
30 Mar 2022 - 1:56 pm

पंचमीतले रंग सांडले
झाडांनी ते बघा झेलले
डोक्यावरती तुरे गुलाबी
धुंद होऊनी फाग नाचले

लुसलुशीत ही कवळी पाने
मोहरून गेली सर्वच राने
आंबोळ्या निंबोळ्या सवे खेळती
ओढून नुतन वस्त्रे गर्द पोपटी

कोण चितारी चित्र काढतो
रंगांची रागदारी मांडतो
कोकीळ मंजुळ कुजन करते
मन मुदित हिंदोळ्यावर झुलते

कसरत
२९-३-२०२२

निसर्गमुक्तक

राजधानीची सफर (भाग-३)

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
30 Mar 2022 - 11:52 am

भोपाळ जंक्शनवर गाडी थांबल्यावर मी खाली उतरून जरा फलाटावर रेंगाळलो. इथे आमच्या ‘राजधानी’चे चालक, गार्ड, तपासनीस, पोलीस बदलले गेले. भोपाळ जं.वर नियोजित वेळेच्या दोन मिनिटं आधी दाखल झालेली आमची ‘राजधानी’ सुटली मात्र नियोजित वेळेच्या 4 मिनिटं उशिरा म्हणजे मध्यरात्री 2:09 वाजता.