||राधायन.. एक सांगीतिक कथादर्शन|| (निमंत्रण)

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
1 Apr 2022 - 8:48 am

नमस्कार मिपाकर्स
या गुढीपाडव्याला, 2एप्रिल, रात्री 8.30 वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात " राधायन .. एक सांगीतिक कथादर्शन" हा कार्यक्रम घेऊन येतोय. त्याचं हे आग्रहाचं आमंत्रण.
नवीन कथा, गीते, संगीत व नृत्ये, आणि या सा-यांच्या जोडीला चित्र साकारण्याचे प्रात्यक्षिक, असा अनोखा मेळ साधणारा कार्यक्रम, "राधायन- एक सांगीतिक कथादर्शन, गुढीपाडव्याच्या शुभदिनी,
'राधा-कृष्ण' हा म्हटलं तर परिचित विषय; पण कल्पनेला, प्रतिभेला सतत आवाहन करणारा! राधेच्या वृंदावनातील वास्तव्याच्या आणि कृष्णसहवासाच्या अनेक आख्यायिका आहेत. परंतु कृष्ण वृंदावनातून बाहेर पडल्यानंतरच्या राधेबद्दल आपणास फार माहीत नाही. राधेच्या आयुष्याच्या या अपरिचित पर्वात जर आपल्याला डोकावायला मिळालं तर?
"राधायन" हा असाच एक प्रयत्न ज्याच्या पूर्वाधात आणि उत्तरार्धातही राधा आहे. श्यामध्यास, श्यामस्वप्न, श्यामरंग ल्यायलेल्या राधेच्या कृष्णापर्यंत पोचणा-या एका कल्पनेतील प्रवासाचे वर्णन साकारणारा अविष्कार म्हणजे राधायन.
"राधायन" म्हणजे राधा आणि अयन (अयन म्हणजे प्रवास).

Radhayan

कथा व कथन- डॉ. प्राची जावडेकर
संगीत- डॉ. आश्विन जावडेकर
निवेदन- मंजुषा अमीन
कला - शिल्पा बेंडाळे
प्रकाश- अतुल जोशी, आकाश पांचाळ
लाईव्ह पेंटिंग- शिल्पा बेंडाळे
गायन- श्रीराम नरसुळे, वृशाली देढे, डॉ.आश्विन जावडेकर
नृत्य- अनन्या गोवित्रीकर, चिन्मय जोशी. प्रिया समर्थ, प्रतिक्षा फडके, यशश्री जोशी, तन्वी घनवटकर.
गीते- संत एकनाथ, पु. शि. रेगे, प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, मनोहर नाईक, संगीता जोशी, प्रदीप कुलकर्णी, डॉ प्राची जावडेकर, डॉ आश्विन जावडेकर
साथसंगत- डॉ. हिमांशू गिंडे, गौरव मूरकर, अभिजित करंजकर, अभिषेक प्रभू, श्रेयस कांबळे
समूह गायन- डॉ श्रद्धा नाटेकर काळे, रमा अमीन, ओवी जावडेकर उक्ती जावडेकर.
रंगमंच साहाय्य- वर्षा ओगले, मानसी जोशी,
ध्वनी- यतीश पाटील
ध्वनिमुद्रण- गणेश पोकळे, ऑडिओ आर्ट्स.
छायाचित्रे- आमोद घैसास, मंगेश खानविलकर
संयोजन व मार्गदर्शन- श्री. सुमुख वर्तक

तिकिटे नाट्यगृहावरती तसेच www.ticketkhidakee.com येथे उपलब्ध आहेत.
नक्की या आणि प्रोत्साहन द्या.
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्षेत आहोत.

नाट्यसंगीतकथास्थिरचित्र

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

1 Apr 2022 - 8:51 am | प्राची अश्विनी

नेहमी प्रमाणे फोटो डकवण्याच्या बाबतीत अनपढ गवार असल्याने तो टाकता येत नाहीये. :)

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2022 - 12:20 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तच !
राधायनास हार्दिक शुभेच्छा !

फोटो मला chautha.konada@gmail.com ला पाठवल्यास मी इथे पोस्ट करीन.

प्राची अश्विनी's picture

1 Apr 2022 - 6:07 pm | प्राची अश्विनी

खूप खूप धन्यवाद. मी तुमचा रिप्लाय पहाण्याआधी फोटो आला सुद्धा...

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2022 - 8:59 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारीचग्रेट !

तुषार काळभोर's picture

1 Apr 2022 - 2:42 pm | तुषार काळभोर

भारतीय संस्कृतीतील कदाचित सर्वाधिक मनमोहक युगल...
कार्यक्रम सुंदर होईलच!

शुभेच्छा!

प्राची अश्विनी's picture

1 Apr 2022 - 6:08 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद सर! कुणी ठाणैकर ओळखीचे असतील तर नक्की कळवा त्यांना.

सौंदाळा's picture

1 Apr 2022 - 3:00 pm | सौंदाळा

सुंदर फोटो
कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा

प्राची अश्विनी's picture

1 Apr 2022 - 6:08 pm | प्राची अश्विनी

मनापासून धन्यवाद. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Apr 2022 - 6:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त,
कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा
इकडे वृत्तांत लिहायला विसरु नका
पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

1 Apr 2022 - 6:17 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद बुवा. नक्की लिहीन

गामा पैलवान's picture

1 Apr 2022 - 8:55 pm | गामा पैलवान

प्राची अश्विनी,

कार्यक्रमास शुभेच्छा. कलाकारी बघायला आवडेल.

व्यासांच्या बहाभारतात राधा हे पात्र नाही ( ऐकीव माहिती ). तर मग राधायनाचा स्रोत काय आहे? कुतूहल म्हणून विचारतोय. कथाकार तुम्हीच आहात असं गृहीत धरतोय.

आ.न.,
-गा.पै.

प्राची अश्विनी's picture

29 Apr 2022 - 5:25 pm | प्राची अश्विनी

व्यासांच्या महाभारतात राधा नाही. राधायन मध्ये त्याचा उहापोह केला आहे.:)

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2022 - 9:01 pm | चौथा कोनाडा

आणखी एक पोस्टर !

RAdhatayn

कर्नलतपस्वी's picture

1 Apr 2022 - 10:16 pm | कर्नलतपस्वी

राधा की आँखें तरसी होंगी,
जब कान्हा मथुरा गये होंगे,
दिल भी बहुत रोया होगा,
जब वो रूक्मिणि के भये होंगे।

प्राची अश्विनी's picture

29 Apr 2022 - 5:28 pm | प्राची अश्विनी

वाह)!

सुंदर कल्पनेसाठी (थीम) अभिनंदन आणि शुभेच्छा!

प्राची अश्विनी's picture

29 Apr 2022 - 5:28 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद!
(खूप दिवसांनी मिपावर आले म्हणून रिप्लाय करायला उशीर झाला.)

धर्मराजमुटके's picture

1 Apr 2022 - 10:34 pm | धर्मराजमुटके

आत्ताच तीन हात नाक्याला जाहिरातीचा फलक पाहिला. कार्यक्रमाला येणे शक्य नाही मात्र कार्यक्रमास शुभेच्छा ! जमल्यास कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाची ओळख म्हणुन एखादा ५-१० मिनिटाची चित्रफीत येथे प्रदर्शित करावी.

जव्हेरगंज's picture

7 Apr 2022 - 12:51 pm | जव्हेरगंज

अभिनंदन आणि शुभेच्छा!

प्राची अश्विनी's picture

29 Apr 2022 - 5:27 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2022 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वाह ! अभिनंदन आणि शुभेच्छा.!

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

7 Apr 2022 - 4:54 pm | धर्मराजमुटके

कार्यक्रम होऊन गेल्यावर शुभेच्छा द्याव्यात काय असा एक प्रश्न पडला :) अर्थात त्यांची गरज माणसाला केव्हा ही पडू शकते ब्वॉ !

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2022 - 5:30 pm | चौथा कोनाडा

प्राडॉ सर दुरदर्शी आहेत, नक्कीच पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या असणार !
😎

प्राची अश्विनी's picture

29 Apr 2022 - 5:25 pm | प्राची अश्विनी

सर तुमच्या मुखी साखर पडो. :)

सरिता बांदेकर's picture

9 Apr 2022 - 8:45 am | सरिता बांदेकर

प्राची अश्विनी अभिनंदन.
आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये तुमच्या प्रयोगाबद्दल चांगलं लिहून आलं आहे.
ठाण्यात नाहीय त्यामुळे प्रयोगाला येऊ शकले नाही.पण पत्र वाचून खूप आनंद झाला.

प्राची अश्विनी's picture

29 Apr 2022 - 5:26 pm | प्राची अश्विनी

खूप खूप धन्यवाद!