जाहीर विचारणा आणि आवाहन

घाटावरचे भट's picture
घाटावरचे भट in जनातलं, मनातलं
24 Dec 2008 - 8:51 am

रामराम मंडळी,

मिसळपाववर सध्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........ लैच फार्मात आहे. हा लेख लिहायच्या टैमाला हा धागा उघडून बरोब्बर ७ दिवस आणि ६ मिनिटं झालेली आहेत, त्याची ३१६६ वाचनं झालेली आहेत आणि त्यावर १४३ प्रतिसाद आहेत. आता गम्मत अशी आहे की माझा इतिहास थोडासा कच्चा आहे (आणि संस्थळांचा, विशेषतः मिपाचा इतिहास तर बिल्कूल झीरो) म्हणून मला तुमची मदत हवीये. मला पडलेले प्रश्न खाली देत आहे, कृपया मिपावरील बुजुर्ग आणि ग्यानी पब्लिकने उत्तर द्यावं.

१) मिपावरील आत्तापर्यंत सगळ्यात जास्त प्रतिसाद आलेला लेख कोणता?
२) त्याचा शेवटचा प्रतिसाद लेख लिहिल्यापासून कधी पडला?
3) तो लेख आल्या आल्या हिट शिणुमासारखा प्रतिसाद खेचत होता की शोले पिच्चर सारखा पह्यल्या आठवड्यात तिकीटबारीवर हापटून नंतर गोल्डन जिबली गाठणारा होता (आपला 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........' सध्या त्याच वाटेवर आहे. वाटलं तर आपण त्याला डीडीयल्जे म्हणूया).
४) 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........' सारखा तो लेख इतर काही लेख कवितांसाठी प्रेरणा ठरला होता काय?

जाहीर विचारणा संपली. आता जाहीर आवाहन -

वरच्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील, तेव्हा आपल्याला एक काम करायला काय हरकत आहे? या लेखाला प्रतिसाद देऊन आपण या लेखाला 'मिसळपावच्या इतिहासात सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेला लेख' बनवूया (त्या फायरफॉक्स वाल्यांनी नाही का सगळ्यात जास्त डाऊनलोडचं रेकार्ड केलं, तसं). मिपा नुकतंच नवीन सर्व्हरवर गेलंय असं ऐकंलं, त्यामुळे एवढ्या एका रेकार्डसाठी काही मिपाची जागा कमी पडणार नाही, काय? आणि प्रतिसाद काय, कुठला याच्यावर जास्त विचार करायची काही गरज नाही. आपण सर्वजण पेपर वाचत असालच, तेव्हा आपलं खालील मतांपैकी काही एक मत असेलच

१) गांधी भिकार** होता.
२) संघवाले अंमळ वेड** आहेत.
३) काँग्रेसवाले पैसेखाऊ आहेत.
४) भाजपवाले हरामखोर आहेत.
५) अर्ध्या चड्डीपेक्षा पंचा चांगला.
६) चारचौघांत पंचा सुटू नये म्हणून चामड्याचा पट्टा वापरावा.
७) शेवटी काहीही झालं तरी नोटेवरचा गांधी महत्वाचा, म्हणूनच सगळे भारतीय गांधीवादी आहेत.
८) दादांची पिच्चरं लै भारी.

अशी आणि इतर अनेक मतं असू शकतील. आणि जर काहीही मत नसेल तर चक्क अवांतर प्रतिसाद ठोकून द्या. त्याचं काय आहे, सध्या मिपावरील 'अवांतर प्रतिसाद हटाओ' कार्यक्रम थंडावलेलाआहे (अगदी आपल्या सरकारच्या एकेकाळच्या 'गरीबी हटाओ' कार्यक्रमासारखा. अहो, नायतर न.स.व.मा.... एवढे प्रतिसाद खेचूच शकला नसता, रेकार्ड लै लांब राह्यलं.), सबब चिंता नसावी. पाहा मंडळी, आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या साईडला असताना रेकार्ड का होणार नाही? च्यामायला मिपावरचाच काय पण मराठी संस्थळांच्या इतिहासातला सगळ्यात जास्त प्रतिसाद खेचणारा लेख म्हणून या लेखाची नोंद होईल. चला तर मंडळी पुढचा माऊस क्लिक 'शोले'....आपलं 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........' वर....

मांडणीबालकथाधर्मइतिहाससमाजराजकारणशिक्षणचित्रपटप्रकटनविचारलेखसंदर्भशिफारसचौकशीसल्लामदतमाहितीवाद

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

24 Dec 2008 - 9:10 am | आजानुकर्ण

मिपावरील लेखांची तुलनात्मक लोकप्रियता बघण्यासाठी http://www.misalpav.com/popular/alltime येथे पाहा

आपला
(तौलनिक) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

24 Dec 2008 - 9:12 am | विसोबा खेचर

मिपा नुकतंच नवीन सर्व्हरवर गेलंय असं ऐकंलं, त्यामुळे एवढ्या एका रेकार्डसाठी काही मिपाची जागा कमी पडणार नाही, काय?

हम्म! चालू द्या.. आम्ही पुन्हा पैशे भरू..!

पिवळा डांबिस's picture

24 Dec 2008 - 9:23 am | पिवळा डांबिस

आपण उल्लेख केलेला लेख हे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवण्याचं (आमच्या मते!!!!) आदर्श उदाहरण ठरत नाही....
जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवणारा लेख असा असावा की ते प्रतिसाद वेगवेगळ्या लोकांकडून एकदाच मिळालेले असावेत...
माफ करा, पण आपण उल्लेख केलेल्या लेखावर काही ठराविक लोकंच पुन्हा पुन्हा प्रतिसाद देऊन (आमच्या मते) वितंडवाद घालताहेत...
बाकी समस्त मिपा जनता तिथे प्रतिसाद देण्यापासून अलिप्त राहिलेली दिसतेय असे आम्हाला दिसतेय.....
तेंव्हा तुम्हाला सर्वाधिक प्रतिसाद मिळणारा (पक्षी: लोकप्रिय) लेख निवडायचा असेल तर जरूर निवडा पण वरील उल्लेखित लेखाचा त्यात समावेश करण्यापूर्वी ही बाब विचारात घ्यावी ही नम्र विनंती.....

आपला, कशातच काहीही न कळणारा,
पिवळा डांबिस

अवलिया's picture

24 Dec 2008 - 9:37 am | अवलिया

पुर्ण पणे सहमत

पिडाकाकांचा जै असो

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी