छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र. १ मानवनिर्मित स्थापत्य
**********************
नमस्कार मंडळी! छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसद देऊन यशस्वी करण्यात तुमचा सर्वांचा हातभार लागला आहे. आलेली सर्वच छायाचित्रे अतिशय सुरेख होती आणि डावे-उजवे करणे फारच कठीण. म्हणूनच सर्व सदस्यांना चित्रे निवडायची विनंती केली होती. एकूण २८ स्पर्धकांची ७९ छायाचित्रे आली. निकाल लावताना ४० सदस्यांनी आपल्या पसंतीची चित्रे निवडली. ३३ जणांनी धाग्यावर तर ७ जणांनी व्यनिद्वारे मत दिले. एकूण ४४ छायाचित्रांना लोकांच्या पसंतीचे गुण मिळाले. तर ९ छायाचित्रांना १० पेक्षा जास्त गुण मिळाले. या सर्वांनाच अगदी थोड्या थोड्या फरकाने क्रमांक दिले गेले आहेत.
सदस्यांनी दिलेल्या क्रमांकानुसार चित्रांना पहिल्या क्रमांकाला ३ दुसर्या क्रमांकाला २ तर तिसर्या क्रमांकाला १ असे गुण देऊन सगळ्यांची बेरीज केली. त्याप्रमाणे
१) Kohalea चित्र क्र. २४
२) समर्पक चित्र क्र. ४९
३) वल्ली चित्र क्र. ६
यांची छायाचित्रे सर्वाधिक पसंतीची ठरली.
यानंतर
४) समर्पक चित्र क्र. ४८
५) बोका चित्र क्र. ३१
६) इस्पीकचा एक्का चित्र क्र. ३६
यांचे क्रमांक आहेत.
स्पर्धेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे लगेच पुढची स्पर्धा जाहीर करत आहोत, यावेळी काही बदल करण्यात येत आहेत.
प्रत्येक स्पर्धकाला फक्त एक छायाचित्र सादर करता येईल. गुण देण्याची पद्धत पहिल्या स्पर्धेप्रमाणेच राहील. स्पर्धेचा विषय "आनंद" हा राहील. आणि यातील विजेती चित्रे मिपा दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात येतील. त्याशिवाय पहिल्या ३ स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके देण्यात येतील.
स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका स्पर्धेसाठीच्या खास धाग्यात अपलोड कराव्यात ही विनंती. तिथे अन्य प्रतिक्रिया पोस्ट करू नयेत. त्या चित्रांबद्दल चर्चा, मते यासाठी दुसरा स्वतंत्र धागा काढण्यात येईल.
पहिल्या स्पर्धेत ज्यांची चित्रे विजेती ठरली नाहीत त्यांनी निराश न होता या स्पर्धेत पुन्हा चांगली छ्याचित्रे सादर करावीत ही विनंती. प्रत्येकाचा आवडता विषय वेगवेगळा असतोच! पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!
प्रतिक्रिया
4 Sep 2014 - 2:13 pm | सौंदाळा
'विजेत्यांचे अभिनंदन आणि परिक्षकांचे आभार' म्हणुन मी माझे २ शब्द संपवतो.
विजेते फोटो याच भागात परत असते तर मजा आली असती असे वाटते. किंवा आधीच्या धाग्याची लिंक तरी ईकडे असु देत म्हणजे भविष्यात खोद्काम करायला बरे पडेल :)
4 Sep 2014 - 2:14 pm | किसन शिंदे
विजेत्यांचे बहुत अभिनंदन!!
4 Sep 2014 - 2:16 pm | मधुरा देशपांडे
विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धक आणि आयोजकांचे आभार.
4 Sep 2014 - 2:18 pm | स्पा
सर्व विजेत्यांचे कचकून अभिनंदन __/\__
4 Sep 2014 - 2:21 pm | मदनबाण
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way
{We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com
4 Sep 2014 - 2:26 pm | सूड
विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार !! :)
4 Sep 2014 - 2:33 pm | प्रभाकर पेठकर
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
प्रत्येक विजेत्याच्या नांवा पुढे त्याचे विजयी छायाचित्र टाकले असते तर ते नक्कीच उचीत ठरले असते.
पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं. असे केल्याने मतदात्यांच्या मनावर स्पर्धकांच्या नांवाचा भला-बुरा प्रभाव असणार नाही आणि मतदान 'छायाचित्रालाच' होईल.
4 Sep 2014 - 2:38 pm | पिलीयन रायडर
+१... विजेती चित्रे इथे टाकावीत,... आणि पुढची स्पर्धा अॅनोनिमस असावी..
4 Sep 2014 - 2:48 pm | नंदन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
सहमत आहे. कौलाच्या व्यवस्थेप्रमाणे मतदान घेता येईल का?
4 Sep 2014 - 2:59 pm | शिद
असेच म्हणतो.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
4 Sep 2014 - 3:19 pm | आतिवास
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
या निमित्ताने अप्रतिम फोटो पाहायला मिळाले आणि बरंच शिकता आलं याबद्दल 'मिपा' आणि सहभागी 'मिपाकरांचे' आभार.
4 Sep 2014 - 4:01 pm | शिद
विजेती छायाचित्रे डकवल्याबद्दल संमंचे धन्यवाद.
4 Sep 2014 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
4 Sep 2014 - 3:20 pm | मृत्युन्जय
३ पैक्की २ क्रमांक माझ्या क्रमांकाशी अगदी जुळले :). अगदी त्याच नंबरात. वेल्लाभट यांच्या छायाचित्राला पारितोषिक न मिळाल्याचे बघुन थोडे आश्चर्य वाटले. पण अर्थात समर्पक यांचेही छायाचित्र उत्तमच होते.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
4 Sep 2014 - 3:23 pm | Mrunalini
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! :)
4 Sep 2014 - 3:33 pm | चिगो
सर्व विजेत्यांचे अभिनंदन..
4 Sep 2014 - 3:56 pm | संजय क्षीरसागर
आणि सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!
4 Sep 2014 - 4:03 pm | पैसा
सर्वच विजेते आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन!
ही चित्रे आता पाहताना एक गोष्ट सहजच लक्षात आली की तिन्ही चित्रांत अंतराची कल्पना काही प्रमाणात येत आहे.
इथे काहीजणांनी छायाचित्रकारांची नावे दिसू नयेत अशी सूचना केली आहे. आदर्श परिस्थितीत ते तसे करता येईल. मात्र सध्या इतका वेळ देणे कोणाच संपादकाला वैयक्तिक रीत्या शक्य नाही. दिवाळी अंकाचेही काम आहे. पहिल्या धाग्यात सगळी छायाचित्रे पुन्हा कॉपी पेस्ट करून धागा तयार करावा लागला होता. ते वाचवण्यासाठी आता फक्त चित्रांचा एक आणि प्रतिक्रियांचा एक असे २ धागे करूया अशी कल्पना अंमलात आणली आहे.
माझे वैयक्तिक मत विचाराल तर छायाचित्रे चित्रकाराच्या नावाने देण्यात फार काही बिघडते असे नव्हे. आताही मत देणार्यांवर ओळखीचा काही परिणाम झाला आहे असे वाटत नाही. त्यामुळे Kohalea आणि समर्पक या रोज रोज न दिसणार्या/नवीन आयडींची चित्रे एक व दोन क्रमांकावर आली आहेत. (समर्पकची सुरेख लेखमालिका चालू आहे हे मी विसरलेले नाहीये! :D)
त्यातूनही इतरांना आपले मत कळू नये असे वाटल्यास सदस्य व्यनि करू शकताच. म्हणजे छायाचित्रे निनावी देण्यापेक्षा मते निनावी राहतील. फारसा फरक पडत नाही. यावेळीही ७ जणांनी आपापली मते व्यनि ने दिली आहेत. मिपा सदस्य नि:पक्षपातीपणे मते देतात यावर माझा विश्वास आहे, आणि तो बहुतांशी सार्थ ठरला आहे.
मात्र संपादक मंडळात या सूचनेवर पुढच्या स्पर्धेपर्यंत अवश्य विचार होईल. आणि शक्य असेल, बहुमताचा निर्णय असेल तर नियम बदलले जातीलच! तोपर्यंत पुढच्या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
4 Sep 2014 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
या स्पर्धेमुळे अनेक अप्रतिम चित्रे बघायला मिळाली... त्यासाठी आयोजकांना धन्यवाद !
4 Sep 2014 - 4:24 pm | जेपी
सर्व विजेत्यांचे आणी मिपाचेही अभिनंदन.
4 Sep 2014 - 4:25 pm | अजया
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
4 Sep 2014 - 4:29 pm | नि३सोलपुरकर
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!
आयोजकांचे आभार.
4 Sep 2014 - 4:30 pm | वेल्लाभट
उत्तमोत्तम छायाचित्र बघण्याची, त्यातून शिकण्याची संधी मिपाने उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मिपा संपादकांना सलाम.
जी जबर छायाचित्र इथे विजयी ठरली आहेत त्यांच्यासाठी टाळ्या!
आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा !
जय कॅमेरा ! जय क्लिक !
4 Sep 2014 - 4:46 pm | सुहास झेले
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा :)
4 Sep 2014 - 5:09 pm | श्रीरंग_जोशी
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या उपक्रमासाठी संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार.
4 Sep 2014 - 5:33 pm | सर्वसाक्षी
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचेही अभिनंदन. अनेक सुरेख चित्रे पाहायला मिळाली. नव्या स्पर्धेचा विषय फारच कल्पक आहे.
4 Sep 2014 - 5:37 pm | रेवती
अरे वा! अभिनंदन!
4 Sep 2014 - 6:08 pm | अनिता ठाकूर
सर्वांचे अभिनंदन आणि आयोजकांना धन्यवाद! घरबसल्या उत्तम फोटो पहायला मिळाले. पुढेहि असेच घडो! *clapping*
4 Sep 2014 - 6:44 pm | सानिकास्वप्निल
सर्व विजेत्यांचे अभिनंदन :)
4 Sep 2014 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वच छायाचित्रे अप्रतिम होती.
-दिलीप बिरुटे
4 Sep 2014 - 8:04 pm | जुइ
सर्व विजेत्यांचे हार्दि़क अभिनंदन!! संपादक मंडळ आणि मिपाचे स्पर्धा आयोजित केल्याबद्द्ल आभार! सर्व सहभागी स्पर्धाकांचे ही आभार खुप छान फोटो टाकल्याबद्दल.
4 Sep 2014 - 8:18 pm | एस
अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त यशस्वी ठरलेली स्पर्धा! संपादकांनी घेतलेल्या कष्टांबद्दल खास आभार. सर्व छायाचित्रकारांचे आणि प्रतिसादकांचेही आभार!
4 Sep 2014 - 9:03 pm | प्यारे१
+२ ऐसेच बोलताय.
5 Sep 2014 - 9:20 am | प्रमोद देर्देकर
मी ही तेच म्हाणतो वेळात वेळ काढुन हि स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. विजेत्यांचे अभिनंदन.
4 Sep 2014 - 9:05 pm | कवितानागेश
पहिल्या क्रमाम्काचं चित्र खरोखरच फार सुंदर आहे. मी ते पहिल्यांदा पाहिल्यापासून चोरलंय आणि डेस्कटॉपवर लावलंय. :)
त्यातले आकाश, पाणी, डोन्गरकडा आणि पूल हे सर्व एक्मेकांत अगदी सहज मिसळून गेलंय.
4 Sep 2014 - 9:05 pm | प्यारे१
पण मुलांनो ;) एक लक्षात आलं का?
तिन्ही पारितोषिक प्राप्त छायाचित्रांमध्ये कुठून तरी कुठं तरी जाण्याचा मार्ग आहे, गतिमानता आहे, थंडपणा नाही.
कदाचित मिपाचं उत्साहाचं गतिशील हॅपनिंग प्रतिबिंबच दिसतंय म्हणा ना!
- प्यारेण दवणे
4 Sep 2014 - 9:09 pm | प्रचेतस
सर्व विजेत्यांचे अभिनंदन (मी सोडून).
4 Sep 2014 - 11:11 pm | किल्लेदार
टाळ्या..टाळ्या..टाळ्या..आणि टाळ्या..
5 Sep 2014 - 9:09 am | अनुप कोहळे
उसगावातुन मायदेशी परतण्याचा घाई गडबडीत ईथे येवुन निकाल बघायला उशीर झाला. सर्व मिपाकरांना माझा मनःपुर्वक धन्यवाद.
19 Aug 2017 - 9:14 pm | श्रीरंग_जोशी
सर्व मिपाकरांना जागतिक छायाचित्रण दिवसाच्या शुभेच्छा!!
आजपासून तीन वर्षांपूर्वी मिपावर छायाचित्रणकला स्पर्धा हा उपक्रम सुरु झाला होता. आजही 'छायाचित्रणकला स्पर्धा' या दोन शब्दांनी इमेज सर्च केल्यास केवळ मिपावरच्या धाग्यांमधले फोटो दिसतात :-) .
सोळा महिन्यांपूर्वी मिपावरची सतरावी छायाचित्रणकला स्पर्धा पार पडली.
या लोकप्रिय उपक्रमाचे पुनुरुज्जीवन करावे ही विनंती मी साहित्य संपादकांना करतो.
या दिवसानिमित्त छायाचित्रणाशी संबंधीत मी काढलेला एक फोटो
तसेच आजचा बिंगच्या होमपेजवरचा फोटो
![](https://www.bing.com/az/hprichbg/rb/KingPhoto_EN-US12664061376_1920x1080.jpg)
हे स्थळ आहे St. Andrews Bay, South Georgia (अर्जेंटिना व अंटार्क्टिकादरम्यानचे एक बेट).
19 Aug 2017 - 11:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
गेल्या स्पर्धांच्या त्सुनामीनंतर (हघ्याहेवेसांन) खूप वेळ केवळ ओहोटी आहे. एक मस्तं स्पर्धा आयोजित करून मिपाकरांमध्ये चैतन्य जागवायची वेळ झाली आहे. :)
20 Aug 2017 - 4:18 am | एस
श्रीगणेश लेखमाला झाली की एक स्पर्धा घेऊयात दिवाळी अंकाआधी.
20 Aug 2017 - 5:43 am | श्रीरंग_जोशी
तत्त्वतः मान्यतेची अपेक्षा असताना काळवेळेसकट योजना जाहीर झाल्याने आनंद वाटत आहे.