२ महिन्यापुर्वीच मैसूर - ऊटी ला जाउन आलो. तेव्हापसुन मनात होते की तिकडचे फोटु टाकावेत म्हणुन. पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.
हा मैसूरचा प्रसिद्ध राजवाडा. ज्यानी राजस्थानमधले महाल पाहिले असतील त्यांना यात विशेष असे काही वाटणार नाही. पण राजवाडा छान जतन केलेला आहे. आणि इथली सर्वित्तम गोष्ट म्हणजे राजवाड्यातील तैलचित्रे. इतकी जिवंत तैलचित्रे मी आजवर इतर कोठेही पाहिलेली नाहीत. दुर्दैवाने आत कॅमेरा न्यायला बंदी आहे. त्यामुळे छायाचित्रण करता आले नाही. त्यामुळे राजवाड्याची फक्त बाहेरुनच छायाचित्रे काढुन समाधान मानावे लागले
वृंदावनचे पण फोटो टाकणार होतो पण का कोणास ठाऊक, २० वर्षांपुर्वी जे वृंदावन पाहिले होते ते हे नव्हेच असे वाटले. आता ती शान नाही उरली वृंदावनची. गणेशोत्सवात चिंचेच्या तालमीचे कारंजे पण त्याच तोडीचे असते. त्यामुळे असेल कदाचित पण काही विशेष नाही वाटले खरे.
वृंदावनने केलेली निराशा चक्क मैसूरचे प्राणिसंग्रहालय बघुन दुर झाली. आता झू बघुन खुष होण्याचे दिवस गेले खरे म्हणजे. माकड बघुन लहानपणी जे हसु यायचे ते पण येत नाही आता (मि पा ची कृपा. बरीच माकडे आहेत इथे. रोज आरसाही बघतो. त्याचाही परिणाम असेल कदाचित). पण मैसूर चा झू खरोखर अप्रतिम आहे. काही छायाचित्रे:
वरचा फोटो पुर्ण झूम लावुन काढलेला आहे. त्यामुळे क्लॅरिटी थोडी गंडली आहे.
वरच्या फोटोतला मिपाकर कोण हे ज्याचे त्याने ठरवावे ;)
लहानपणापसुन मैसूरचे सर्वात मोठे आकर्षण होते महिषासुराचा पुतळा. त्याचा हा पुतळा बघुन अंमळ थोडी निराशाच झाली. माझ्या कल्पनेतला हा पुतळा चांगला ५० -१०० फूट उंच आणि १०-१२ फूट रुंद होता. प्रत्यक्ष पुतळा बघुन पुतळ्याचा बोन्साय बघितल्यासारखा वाटला. माझ्या बरोबर असलेल्य मित्रांची पण थोड्याफार फरकाने अशीच निराशा झाली. तरी "तु अजुन थोडा जाड असला असतास तर असाच दिसला असतास" असे म्हणुन मित्राने त्यातल्या त्यात त्याचे मानसिक समाधान साधुन घेतलेच
हेच ते चामुंडा देवीचे सुप्रसिद्ध मंदीर
मैसूर मध्ये आमचे सर्वात जास्त निराशा केली मैसूर मसाला डोश्याने. मैसूर मसाला डोसा हवा असे म्हणालो की लोक आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहायचे. हा डोसा पुण्याच्या शेट्ट्यांनी चक्क मैसूरच्या नावावर खपवला आहे. शेवटी या डोश्यावर तडजोड केली. डोसा होता मात्र अप्रतिम
बाकी उटी भाग -२ मध्ये.
प्रतिक्रिया
20 Aug 2010 - 4:32 pm | छोटा डॉन
एक नंबर फोटो अहेत मालक.
भाग-२ पटकन येऊद्यात ( नाहीतर तेवढ्या वेळात मी इथुन झटकन म्हैसुरला जाऊन येईन, त्यावर लेख टाकेन आनि तुमचा टीआरपी खाऊन टाकेन ) ...
दुसर्या भागात थोडे लेखनही वाढवा फोटोबरोबर ...
-छोटा डॉन
20 Aug 2010 - 4:51 pm | परिकथेतील राजकुमार
आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे आमच्या प्राणीराज्याचे फोटु टाकल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद मॄत्युंजय सरकार.
आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या नजरेतुन आमच्या राज्याकडे बघितले. अतिशय सुरेख छायाचित्रे.
कोण आहे रे तिकडे ? मृत्युंजयांना एक शाल आणि दोन श्रीफळे द्या.
(श्रीफळे वाजवुन बघु नयेत)
छिद्रान्वेषी शंका :- मैसूर का म्हैसूर ??
20 Aug 2010 - 5:03 pm | मृत्युन्जय
(श्रीफळे वाजवुन बघु नये)
चिंता नसावी. आम्ही पुणेकर असल्यामुळे ते काम आम्ही घेण्यापुर्वी करुच
20 Aug 2010 - 4:39 pm | मदनबाण
पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही.
वा... ,उत्तम , छान !!! ;)
मैसूरची चित्ररुपी सहल घडवल्या बद्धल धन्स... :)
जाता जाता :--- लेखन विषय आणि लेखन प्रकार फारच कमी निवडलेत तुम्ही... ;)
20 Aug 2010 - 5:30 pm | अमोल केळकर
सुरेख चित्रे
अमोल
20 Aug 2010 - 5:30 pm | अमोल केळकर
सुरेख चित्रे
अमोल
20 Aug 2010 - 5:55 pm | मीनल
हत्तीचे पिल्लू, हाय करणार पोपट, मोर, डोसा मस्त.
खरेतर सर्वच फोटो मस्त. मैसूर च्या ट्रीपची आठवण झाली.
20 Aug 2010 - 5:59 pm | मितान
सुंदर फोटो !
चामुंडा टेकडीवरून मैसूर शहराचा एखादा फोटो काढला असेल तर तो पण द्या की..
20 Aug 2010 - 7:01 pm | मृत्युन्जय
एवढा एकच आहे.
20 Aug 2010 - 7:39 pm | विलासराव
छान......मस्त सफर घडवली.
धन्यवाद.
20 Aug 2010 - 8:03 pm | रेवती
छान फोटो!
खूप वर्षांपूर्वी मैसूर पाहिले होते.
डोश्याचा फोटू उगीच टाकलात.;)
बरेच दिवस झाले डोसे करून आता करायला हवेत.
20 Aug 2010 - 9:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच फोटो रे! पुढचा भाग सोमवारी टाक रे, विकान्ताला बरेच मिपाकर नेटपासून आलिप्त असतात. आणि दुसर्या भागात लिही काहीतरी!!
मैसूरचा राजवाडा जर राजवाडा असेल तर मात्र बकिंगहॅम पॅलेसला सर्व्हंट क्वार्टर म्हणावं लागेल.
21 Aug 2010 - 4:53 am | बेसनलाडू
या जागी जायचा योग अद्याप आलेला नाही. नाही म्हणायला बंगलोरहून कुठेतरी जाताना (की येताना) रात्रीच्या वेळी या दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या या महालाचे दर्शन झाल्याचे पुसटसे स्मरते.
(स्मरणशील)बेसनलाडू
मोराची प्रकाशचित्रे तर निव्वळ अप्रतिम!
(प्रेक्षक)बेसनलाडू
21 Aug 2010 - 4:56 am | आमोद शिंदे
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची काय मस्त सफर करुन दिलीत. शेवटचा फोटो तर एक नंबर!!
(त्या प्रभोची रेसिपी बघून मी आज लंघन करायचे ठरवले होते तुम्ही दिलेला हा फोटो बघून निर्णय बदलला. ;) )
21 Aug 2010 - 10:36 pm | अरुंधती
प्राण्यांचे एकेक फोटो सह्ही आहेत.... पोपट, मोर, हत्ती, वाघोबा सगळेच छान टिपलेत. आणि शेवटचा मसाला डोसा भूक खवळवणारा! :-)
22 Aug 2010 - 4:50 pm | प्राची
अप्रतिम फोटो...
मैसूर भाग २ टाकाच. :)
22 Aug 2010 - 5:22 pm | अविनाशकुलकर्णी
एकदा पाणवठ्यावर बसून सविस्तर चर्चा करुयात..आपणास व्यापातून वेळ मिळाला तर ...फोटो मस्त आहेत...
23 Aug 2010 - 4:23 am | शिल्पा ब
मस्त फोटो...मला आपला मोरच आवडला..पांढरा मोर कसातरीच दिसतो...हत्ती मात्र थोडे अशक्त वाटत होते..असो.
पोपट छान...राजवाडा बराच प्रचंड दिसतोय (आम्ही अजून राजस्थान पहिले नाही)
बाकी जे डोश्याचे तेच म्हैसूर नावाच्या गोड पदार्थाचेसुद्धा का?
14 May 2015 - 12:44 pm | यशोधरा
तिसरा फोटो झक्कास!
14 May 2015 - 3:21 pm | इशा१२३
म्हैसुरचा राजवाडा भव्य आणि अप्रतिम आहेच.बाकी फोटहि सुरेख.मोर तर छानच टिपलाय.