एक दक्खनी कविता - कुतुबमिनार
'परसूंकीच बात है' हा लेख लिहून बरेच दिवस झाले. त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये दक्खनी भाषेबद्दलही काही विचारणा होत्या. मी काही दक्खनी भाषेचा जाणकार नाही. पण त्या भाषेची आणखी ओळख वाचकांना व्हावी म्हणून
म्हणून इथे त्या भाषेतील एक कविता देत आहे. दक्खनी ही मराठीची खूपच जवळची बहिण आहे. (कदाचित 'सख्खी' असे म्हणता येईल.)
दक्खनी भाषेचे एक अभिमानी, उर्दु-हिंदीचे हरहुन्नरी कवी आणि प्रथितयश चित्रकार श्री. नरेन्द्र राय श्रीवास्तव 'नरेन' यांची एक विनोदी दक्खनी कविता वाचनात आली.