मकाण्णाचे सोने - जलजला
भगवान शंकराने आपला तिसरा नेत्र उघ्डला तर त्यातून निघणार्या अग्निज्वाळांनी संपूर्ण सृष्टी भस्मसात होईल हे लहानपणी वाचलेलं बहुतेकांना आठवत असेल. परंतु विनोद शहा आणि हरीश शहा या दोन महान विभूतींनी पूर्वापार चालत आलेली ही समजूत खोटी आहे आणि शंकराच्या तिसर्या डोळ्यातून अग्निज्वाला न निघता फक्त लेसरबीमच निघतो, या लेसरबीममुळे फक्त भूकंप होतो आणि त्यात फक्त खलप्रवृत्तीचे व्हिलन लोकच मरतात आणि सत्प्रवृत्तीचे हिरो लोक सुखरुप निसटून जातात हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं आहे! स्वत:च्या मूर्तीकडून करुन घेतलेले हे चमत्कार पाहून साक्षात शिवशंकरालाही संतापाने तांडव करावसं वाटलं असेल.