दिवाळी विशेष लेख- बोगी-वोगी रेस्टॉरंट

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
4 Nov 2021 - 8:01 am

अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईला गेलो असताना तिथे एका नव्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पदार्थ चाखण्याचा आनंद घेता आला. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील त्याच माझ्या वेगळ्या अनुभवाविषयी...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 18 क्रमांकाच्या फलाटाच्या बाहेरच्या बाजूला Bogie-Wogie हे अनोखे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू झालेले हे मध्य रेल्वेवरील पहिलेच चाकांवरील रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट चालवण्याचे कंत्राट Bogie-Wogie या रेस्टॉरंट चालकाला मिळाले आहे. हे रेस्टॉरंट लोकांच्या सेवेत 24x7 सुरू असते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील रेस्टॉरंट ऑन व्हिल्ससाठी रेल्वेच्या सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या डब्याचा वापर करण्यात आलेला आहे. त्या डब्यातील मूळच्या सर्व सीट आणि बर्थ काढून टाकून त्या जागी 10 टेबल बसवण्यात आलेली आहेत. तिथे खाद्यप्रेमींच्या मागणीनुसार पदार्थ बनवून दिले जातात.

या डब्याचा अंतर्गत भाग अतिशय आकर्षक बनवण्यात आलेला आहे. मुंबईतील रेल्वे वाहतुकीच्या इतिहासातील काही महत्वाच्या घटनांशी संबंधित चित्रे, छायाचित्रे इथे लावलेली आहे. या रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, इटालियन, दक्षिण भारतीय अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. या पदार्थांचा दर्जा, चव अतिशय चांगली असून त्यांचे दरही किफायतशीर ठेवण्यात आलेले आहेत.

रेल्वेच्या जुन्या डब्यात रेस्टॉरंट सुरू करण्याची संकल्पना लोकप्रिय होऊ लागल्यामुळे देशातील अन्य बऱ्याच ठिकाणीही असे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स येत्या काही दिवसांमध्ये सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्रातीलही अनेक ठिकाणांचा यात समावेश आहे. रेल्वेच्या डब्यात रेस्टॉरंट सुरू करण्याची ही संकल्पना लवकरच लोकप्रिय होईल, यात शंका नाही. मी जेव्हा या रेस्टॉरंटमध्ये पोहचलो, तेव्हा तिथे बसायला जागाच नव्हती. काही वेळ वाट बघितल्यावर मला तिथे जागा मिळाली होती.

या रेस्टॉरंटच्या म्हणजेच डब्याच्या प्रवेशद्वाराजवळ सेल्फी-पॉईंटही करण्यात आलेला आहे. मी या डब्याजवळ पोहोचलो होतो, तेव्हा या रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन समाधानाने बाहेर पडत असलेल्यांचे फोटो सेशन सुरू असलेले पाहिले. त्यांच्याही चेहऱ्यावरील समाधान न लपणारे होते.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2021/11/blog-post_2.html

शाकाहारीआस्वादसमीक्षालेखबातमीअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Nov 2021 - 8:31 pm | मुक्त विहारि

पदार्थांचे दर काय आहेत?

तुम्हाला कुठला पदार्थ आवडला?

पराग१२२६३'s picture

4 Nov 2021 - 10:35 pm | पराग१२२६३

दक्षिण भारतीय पदार्थ 50-60 रुपयांपासून सुरू आहेत. पंजाबचे दरही साधारण 150 पासून आहेत. मी उत्तप्पा घेतला. किमतीच्या मानानं मोठा वाटला. चविष्टही होता.

जेम्स वांड's picture

5 Nov 2021 - 9:25 am | जेम्स वांड

यु-ट्यूबवर ह्यासंबंधी एक विडिओ बघितला होता, आता अजून उत्सुकता चाळवते आहे, एकदा जाऊन यायला हवं तिकडं. गेटवे वरून फेरीने अलिबाग अन येताजाता कधीतरी बोगी वोगीला जेवण असा काहीसा कार्यक्रम आखावा लागेल.