नाशिकचा औद्योगिक इतिहास : १
बॉलपेनच्या टाचणी सारख्या छोट्या तोंडापासून विमानापर्यंत हजारो उत्पादने बनवणाऱ्या नाशिकची एक औद्योगिक नगरी म्हणून जगभर आज ख्याती आहे. नाशिकमध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमधून मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या जवळ जवळ सगळ्या उत्पादनाची निर्मिती आज नाशिक मध्ये होते. गंमत अशी आहे की देशांतर्गत जवळपास सगळ्या महत्वाच्या शहरांना रस्ते रेल्वे यांनी जोडलेल्या नाशिकची मुख्यत्वे उद्योगामुळेच अखिल विश्वाशी जरी अलगद नाळ आता जोडली गेली असली तरी नाशिकने आपलं गावपण छान जपलंय. त्यामुळे नाशिकचा आजवरचा औद्योगिक इतिहास आणि भविष्याकडे होणारी वाटचाल हा एक छान चिंतनाचा, अभ्यासाचा विषय होऊ शकतो.