ग म भ न ....
सकालधरन॓ माय लय आटवत हुती
उनात बसून बिडी वडताना तिची कूस याद आली
बिडीच्या धुरानं बी आसल, डोल्यात पानी पानी आलं
आन येकदम म्होरं हुबी दिसली गोरी-चिट्टी मास्तरीन
सूध भाशेत म्हनली ,” बारा वर्षांचा ना रे तू?
आजपास्न॓ बाराखड़ी शिकायला रोज दुपारी भंगार-डेपोच्या समोर येत जा. आणि बर॓ का,
रोज तास झाल्यावर दूध-पाव मिळेल”
मी सिकाया गेलो. काल्याकूट पाटीवर सफेत सफेत आक्षरा फटाफट लिवाया सिकलो.
मास्तरीन बोल्ली,” मुला, हुशार आहेस रे तू”
लय बेश वाटलं
मास्तरीन झकास, दूद पाव फसकलास