कविता

वादळ

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
2 Apr 2018 - 9:19 pm

आभाळ उरी फुटते
रात्र उठे अंधारी
प्राणात पेटे वादळ
क्षितीजाचे रंग असुरी

शुभ्र चांदण्या जाळून
काळोख पसरे चहुकडे
प्रकाशाच्या तुकड्यासाठी
एक छाया तडफडे

पानांच्या हिरव्या देहातून
हुंकारते वाऱ्याचे काळीज
घायाळ त्या सुरांभोवती
श्वासांचा हलतो आवाज

मंद शुक्राचा भास
भुलते चंद्राची वाट
निद्रेत आज फुलांच्या
उसळते दु:खाची लाट

कविता माझीकविता

गणपत वाणी, सतत मागणी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
2 Apr 2018 - 5:58 pm

गणपत वाणी, सतत मागणी.

विड्या ओढून थकलेला गणपत वाणी
कवितेच्या छपराखाली
अलंकार गोळा करताना मला दिसला.

म्हणाला,
'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता
कोण कवी वापरतो?
तसा एखाद दुसरा हौशी असतो
नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?'

त्याला एकदा मालक म्हन्ले,
'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही
काव्यापेक्षा कवित्व जड
आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात
कवितेला हाणून पाडतात.
गणप्या, आता तुझं काम एकच,
अलंकार काढायचे, अन
कविता वाळत टाकायची.'

'मग काय होईल मालक?'

अदभूतअनर्थशास्त्रकविता माझीकाणकोणकालगंगामाझी कवितामुक्त कवितावाङ्मयशेतीमांडणीसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकभाषाशब्दार्थसाहित्यिकसमाजप्रवास

घरी जायच्य...एक रूपक

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
2 Apr 2018 - 2:59 pm

घरी कधी जायच्य ?
(श्री.संदीप चांदणे यांची कविता )tp://www.misalpav.com/node/42187

सकाळचे सहा वाजावयाचे आहेत. आम्ही दोघे निरव शांततेत, शांतपणे कॉफीचे घुटके घेत आहोत. मी विचारले " एक छान कविता बघायची आहे ? " ती प्रश्नार्थक नजरेने बघते. मी तिला संदीप चांदणेंची."घरी कधी जायच्य ? काढून देतो. ती वाचते. दोघेही गप्प. थोड्या वेळाने मी विचारतो " काय वाटले ? " कॉंप्युटरकडे बघतच ती म्हणते "रूपक कथा..आहे. "

कविताआस्वाद

कोवळे काही ऋतू...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
26 Mar 2018 - 5:13 pm

कोवळे काही ऋतू अंगावरुन गेले...
मोहराने रान सारे बावरुन गेले!

लालिमा चढला कसा शब्दांस आज माझ्या?
गीत माझे कोणत्या ओठावरुन गेले!

राहिले आहेत काटे सोबतीस,बाकी
पाकळ्यांचे झुंड या देठावरुन गेले!

हे कसे आले अचानक या नदीस भरते?
दोन तृष्णे'चे बळी काठावरुन गेले!

वेदनेवर वासना जेथे उभार घेते
शब्द माझे आज त्या कोठ्यावरुन गेले!

—सत्यजित

gajhalमराठी गझलशांतरसकवितागझल

इंद्रधनुष्य

चुकार's picture
चुकार in जे न देखे रवी...
20 Mar 2018 - 1:02 am

रंगआंधळा इंद्रधनुष्य,
शोधतो रंगाऱ्याला.
म्हणे माझे रंगव डोळे,
रंग येऊ दे जगायला.

रंगाऱ्याने मग पांढरा,
रंग लावला कुंचल्याला.
ओढता एकच फटकारा,
रंगारंग कुंचला झाला.

रंगारी मग शोधतो कुप्या,
सप्तरंग साठवाया.
रंगआंधळा इंद्रधनुष्य,
बाहेर पडला जग पहाया.

फ्री स्टाइलकविता

एक गाणे दूरवरुनी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Mar 2018 - 11:46 am

एक गाणे दूरवरुनी, निशिदिनी झंकारते
पैलतीरावरुनी काही ऐलतीरी आणते

हृदयस्पंदी ताल त्याचा, राग त्याचा अनवट
भिनत जातो नाद, मग अनुनाद येतो गर्जत

लय अशी अलवार मजवर प्राणफुंकर घालते
रोमरोमातून काही तरल मग ओसंडते

मुक्तछंदी शब्द, त्यांच्या सावल्या धूसर जरी
अर्थ उलगडती नवेसे ऐकले कितिही तरी

मुक्त कविताकविता

ती पहाट ओली(झालेली! ;) )

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
17 Mar 2018 - 1:28 pm

पेर्ना:- 1) आणि 2)
सांज काळी ती येते का
हळूच तांब्या घेऊन

गुपचूप एकटी जाते येडी
घरामागील वावरातून

मधूनच कुत्रा मागे लागता
सांडे तांब्या हातीचा

हातानेच गच्च धरावा
पाचोळा आजू बाजूचा

टोचती अशी गवता गवतातूनी
ती हुळहुळती पाने ओली

वरून गवताच्या काडया
वैतागली ती साली

अनर्थशास्त्रआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढजिलबीटका उवाचफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीभयानकहास्यवावरकविताओली चटणीखरवसग्रेव्ही

आणखी अपहरणे

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
16 Mar 2018 - 1:19 pm

'ती'ही त्याचा फुटबॉल करते
कधी कधी किंवा बर्‍ञाचदाही,
पण अपहरणांना, 'ती'च्या तर्‍हा अधिक

कधी जन्माला येण्यापुर्वीच अपहरण झालेले असते
आलीच तर 'ती' हा शब्दच अपहरण करतो पहिले
'ती' चे अपहरण करण्याची सवय
आधीच्या 'ती'लाही सोडवत नाही

काहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कविताकरुणकविता

अपहरण

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
16 Mar 2018 - 8:10 am

सूत्रांनी गुणांच्या कट काय केले
नी बंदीगृहांच्या प्रवासास सुरवात काय झाली
स्वतःचेच अपहरण करण्याची दिवा स्वप्ने पहात
सतत अपहरणातूनच तर पुढे सरकतोय .

अपहरणकर्ते फक्त बदलत जातात
अनेकदा अनुमती शिवाय ,
अनेकदा हातातन निसटणार्‍या अनुमतीने

अपहरणांच्या घटनांचे
हे आत्मचरीत्र
अद्याप बाकी आहे,
वाढवेन म्हणतोय
उसंत मिळेल तसे तसे
नव नव्या अपहरणकर्त्यांची
तेवढीच सोय

जुन्या अपहरणकर्त्यांना
जरासा दिलासा

प्रेर्ना

फ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताकवितामुक्तक

आठवणींचा कप्पा म्हणजे...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
15 Mar 2018 - 3:35 am

पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती...
आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती!

काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी...
वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती!

ओळख झाली केंव्हा,कोठे?कधीतरी हे आठवताना...
एकांताचे पडते कोडे... समोर दिसते वर्दळ नुसती!

जेंव्हा जेंव्हा ती आठवते,उगाच स्मरते काही-बाही...
ओठावरती श्रावण फुलतो,उरात होते जळ-जळ नुसती!

मोहरलो होतो तेंव्हाचा..ऋतू मनाने जपला आहे...
घमघमते बघ अजून माझी,फुलावाचुनी ओंजळ नुसती!

—सत्यजित

मराठी गझलशांतरसकवितागझल