कविता

मुका मार अनवरत झेलुनी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
5 May 2018 - 6:54 pm

काव्यतडागी जलपर्णीसम
प्रतिभा पसरत असते
पाहू न शकतो रवी, सकल ते
कवीस दावुनी जाते

कवी लेखणी सरसावून मग
मांडी ठोकुनी बसतो
इथे मोडुनी तिथे जोडुनी
कविता पाडुनी जातो

पामर रसिकांच्या तोंडावर
कविता मग आदळते
मुका मार अनवरत झेलुनी
इथे तिथे हुळहुळते

काव्यदेवते- एक विनंती
ऐक जरा रसिकांचे
काव्यप्रपाती बुडवू नको गे
आवर कढ प्रतिभेचे

इशाराकविता

असाही ऊपदेश

शाली's picture
शाली in जे न देखे रवी...
2 May 2018 - 4:43 pm

फार पुर्वी माबो वर टाकली होती ही कविता. आता हे परत वेगवेगळे विषय घेऊन पुढे वाढवावे असे वाटतेय. ही कविता मित्राचे लग्न ठरले होते तेंव्हा त्याला सल्ला देण्यासाठी लिहिली होती. नंतर सासरे मंडळींची बाजू घेऊनही याच कवितेचा दुसरा भागही लिहिला होता. हळू हळू पुढेही लिहिलच. (गमतित घ्यावे)

काव्य शक्तीची कराया जोखणी | कैक दिसांनी स्पर्शली लेखणी |
मित्र लज्जेची मात्र राखणी | हेतु इतुकाची असे ||

नृपाविन जैसा प्रदेशू | यौवनाविन आवेशू|
पात्रता नसता उपदेशू | तैसाची जान ||

हा विषयू अवघा अगम्य | बाष्फळ तरीही सुरम्य |
गर्दभापुढील गीतेशी साम्य | उपदेशाचे तुम्हाप्रती ||

कविता

माझ्या महाराष्ट्राचं गाणं

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 Apr 2018 - 10:47 pm

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या अभिमानास्पद वैशिष्ट्यांना एकत्र गुंफण्याचा माझा प्रयत्न :
===================

बेलाग कातळ कड्याची कपार
त्यातून खुणवी गरुडाचे घर
घाटाचे वेटोळे माळती डोंगर
माडा पोफळीशी खेळतो सागर

पाटाच्या पाण्याची खळाळ लकेर
घामाच्या खताने फुलते शिवार
शेताच्या बांधाशी चटणी भाकर
कष्टाच्या घासाला तृप्तीचा ढेकर
खिलारी जोडीला पोळ्याचा शृंगार

भारूडा भुलवी लावणी शृंगार
ओवीच्या अंतरी शांतीचा सागर
अभंग झंकारे झेलून प्रहार
भक्तीने भिजतो चंद्रभागातीर
दिंडीच्या रिंगणी विठूचा गजर

कविता माझीसंस्कृतीकविता

कविची गाडी

प्रदीप's picture
प्रदीप in जे न देखे रवी...
28 Apr 2018 - 11:56 am

कवि गाडीत बसून आहे
गाडी सुसाट धावते आहे

गाडी माणसांना तुडवते आहे
हाडांच्या चिंध्या करते आहे
शब्द हवेत फेकते आहे
कल्पनांचे भुंगे सोडते आहे

कवि गाडीत बसून आहे
गाडी सुसाट धावते आहे

'शब्द बापुडे केवळ वारा'
म्हणून गेला एक येडा
त्या येड्याला काय ठावी
जालाची किमया नाही गावी
आता वाराही न दवडावी
फुकटात 'काव्ये' प्रसिद्ध व्हावी

कवि गाडीत बसून आहे
गाडी सुसाट धावते आहे

अविश्वसनीयकविता

हा असा राम की ज्याच्या हजार सीता

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
28 Apr 2018 - 9:43 am

मुखवटे त्याचे दिखाऊ, प्रिय तुला प्राणाहुनी
मात्र तो अपुलाच चेहेरा बघू न धजतो दर्पणी !
 
मृगजळाचे भरुनी  पेले पाजले त्याने तुला
स्वार्थ अन भोगात त्याचा जीव पुरता गुंतला 

प्रेषिताचे पाय कसले? मातीची ती ढेकळे !
पूज्य तो बनतोय केवळ आंधळ्या भक्ती मुळे

अजुनी नाही वेळ गेली, सोड त्याची संगत
सोड ते हतवीर्य जगणे,  सोड उष्टी पंगत 

आतला आवाज सांगे, ऐक मग ते सांगणे
"कवडीमोले विकू नको तू लाखमोलाचे जिणे"  

........(स्वयंघोषित बाबा, बापू, महाराज, माताजी यांच्या अंधभक्तांस समर्पित)

कविता

असं वाटतं !

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in जे न देखे रवी...
25 Apr 2018 - 11:19 am

असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं...............
निळंभोर आभाळ सगळं कवेमध्ये घ्यावं......................

गडबडीची सकाळ अन ठरलेलं रुटीन
सोबत भाजी-पोळीने भरलेला टीफीन
साडेआठची लोकल कधीच चुकवून चालत नाही
इकडे तिकडे पाहायला मुळी वेळच मिळत नाही
कशाला मग पहाटेची किलबिल ऐकू येईल?
फुलणाऱ्या फुलांसोबत मनही फुलुन येईल?
म्हणून वाटतं पहाट बनून आपणच उजळून यावं...................
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं ............................

कविता माझीकविता

हो मी अर्जुन आहे..

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
24 Apr 2018 - 2:27 pm

हो मी अर्जुन आहे..
तोच तो अचूक लक्ष्यवेध करणारा
गुणवत्तेने भरलेला

नव्या चक्रव्यूहात अडकलेला
न लढताच पराभूत झालेला

हो मी अर्जुन आहे..
या महाभारतात कृष्ण शोधतो आहे

जगण्याचे सर्व संदर्भ बदललेल्या
या महाभारतात कृष्ण कोठे शोधायचा
जरी सापडला तरी
माझ्या वाटणीला किती यायचा
ईथे अवती भवती सारेच अर्जुन
दिशा हरवलेले...

तो कृष्ण..
सखा गुरू ज्ञाता
परिस्थितीची जाणीव करून देणारा
ध्येयाची जाणीव करून देणारा

कविता माझीमाझी कवितामुक्त कविताकवितामुक्तक

दिवसातून छप्पन वेळा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
22 Apr 2018 - 10:48 am

दिवसातून छप्पन वेळा
माझा चेहेरा बदलत असतो
अस्थिर अचपळ पारा माझ्या
नसानसात दौडत असतो

दोन देतो दोन घेतो
चेहेरा तेव्हा निब्बर होतो
अचाट ऐकतो अफाट बघतो
तेव्हा चेहेरा कोकरू होतो

कोsहं प्रश्न छळतो तेव्हा
मुमुक्षूचा होतो भास
टपरी चहा भुरकताना
मीच टपोरी टाईमपास

जुनी गाणी, जुने छंद,
वार्‍यासंगे विस्मृत गंध,
दर्वळतात भोवती जेव्हा
चेहेरा कवळा होतो तेव्हा

तोच लोलक, तिरीप नवी
जुना पडदा, हुरहूर नवी
अनंतरंगी अद्भुत खेळ
बघायचा तर हीच वेळ

मुक्त कविताकविता

शीर्षक नाही

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
21 Apr 2018 - 5:31 pm

कृष्णा करु आता काय
लागे अबलांची हाय
शील प्राण आता जाय
नका करु आता गय दुर्जनांचे

पुन्हा कौरव मातले
कृष्णे करीतसे धावा
देवा आता तरी पावा
ज्योतिलाही तेल आता आसवांचे

पुन्हा देवा घे अवतार
कर पुन्हा चमत्कार
तूच देशी न्याय भार
आण तुला आता आहे रगताचे

काहीच्या काही कविताकविता

आत्मताडनाची कविता.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
21 Apr 2018 - 4:26 pm

आत्मताडनाची कविता लिहू नये...
यात होते असे,
कि आत्मा सोडून
बाकी सगळे दुखावतात
यात काय हशील आहे, सांग!

काय कामाची असली कविता?
माणूस जोडत नाही, ती कविता नाही
ही घे चिकन बिर्याणी,
तुला सांगतो,
कविता म्हणजे बिर्याणी
मसालेदार, स्वादिष्ट!
बोन प्लेट तयार ठेवायची

कविता माझीकाणकोणकालगंगामुक्त कविताकवितामुक्तकसाहित्यिकसमाज