ये रे ये रे पावसा
मोरांपासून बेडकांपर्यंत सारे आकाशाकडे डोळे लावून बसलेयत
तुझ्या वर्षावात चिंब व्हायला
अभिजात कवींपासून र ट फ शब्दजुळार्यांपर्यंत सगळे टपलेयत तुझी रिमझिम अन् आपापल्या उबळी
शब्दात कोंबायला
बकाल महानगरातली पाताळधुंडी माणूसगिळी मॅनहोलं कचरतायत
तुझ्या ढगफुटीत तुंबायला.
यंदा तरी भरभरून येशील?
बघ, तुझ्या आशेवर तर पार भेगाळलेला शेतकरी तयार आहे पुढच्या दुष्काळापर्यंत
आत्महत्या लांबवायला.