कविता

दाभोळकरांना श्रद्धांजली (आज पाच वर्ष झाली)

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
20 Aug 2018 - 9:03 am

साधना

नराधम वार करी
नरोत्तम 'देवा' घरी
आता तो नाही उरी
ही अंधश्रध्दा !

शोषीत न रहावं भोळं
म्हणून कोणी कर दाभोळ
झेली आगीचा लोळ
न हो व्यर्थ.

पुन्हा येतील कुंभमेळे
रंगती स्नानाचे खेळे
मात्र नाही या वेळे
तो साधक.

(लिहीली या दिवशी 25/08/2013)

कविता

पावसाचं गीत

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
18 Aug 2018 - 2:41 pm

हिरव्या रानात पाखरांची वस्ती
पावसाचं गीत कंठातून गाती

नभात उतरले रंग सावळे
मेघात लपले आभाळ निळे

पसरला माथ्यावर ढगांचा मांडव
पिसाट झाडांवरती विजांचे तांडव

शिवारात सरकते वाऱ्याची लाट
माती पाहते पाऊसओली वाट

कविता

मन! - २

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
16 Aug 2018 - 9:27 pm

मन दु:खाचा तरंग.. मन सुख, अंतरंग..
जसा फणसाचा गर.. कठीणात मऊसर!

मन अप्राप्य सागर.. अंतहीन कुतूहल..
जसा सुगंध अल्लड..शब्द-रूपाच्या पल्याड!

मन अस्तित्व प्रचिती..मन फक्त विसंगती!
जशी रात, न्हायलेली, चांदण-प्रकाशाच्या ज्योती!!

मन शब्दांची आरास..कल्पनांचा सहवास!
जशी सावली सजग..अव्यक्ताचं व्यक्त जग!!

--

मनी मनाचा विचार.. स्वत्व शोध.. निरंकुश!
मन आनंद केवळ.. डुंबण्याचा अवकाश!!

अदभूतकविता

मिलन

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
11 Aug 2018 - 6:50 pm

अंतरीच्या स्पंदनांची
भावना मी वदतो....
रत्नहार बिंदूंचा....
तव कोमल कंठी शोभतो!

लाजुनि तू शलाकेपरी...
क्षणार्धात लोपसी...
त्या क्षणिक रूपाच्या मोहात;
निळावंति मी गुंतलो....

सागर-नभापरि मी तृषार्त...
तू बरसती नभरेखा...
मिलन आपुले क्षितिजावर...
त्या क्षणास मी आतुरलो....

प्रेम कविताकविता

फूटपट्टी

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
5 Aug 2018 - 9:48 pm

माझ्याकडे ना भेंचोद
एक फूटपट्टी आहे
कायम असते माझ्या सोबत..
विशेषतः चार लोकात जायचं असेल तर,
न विसरता घेतो मी तिला.
.
.
माझ्या फूटपट्टीने
अनेक गोष्टी मोजू शकतो मी
उदाहरणार्थ,
समोरच्याची लायकी...
त्याची अक्कल...
त्याची दांभिकता...
त्याची एकूणच समज...
वगैरे वगैरे.
.
.
फूटपट्टीचा अजून एक उपयोग म्हणजे,
मला माझ्या रेषेशेजारी
दुस-याची लहान रेष काढता येते बरोब्बर
......बरं असतं ते.
.
.
कधी कधी माझी फूटपट्टी
तोकडी वाटू लागते मला
पण डगमगत नाही मी

मुक्त कविताकविता

आरशाला एक पत्र !

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
5 Aug 2018 - 11:44 am

आरशाला एक पत्र !
( आज तुला गेलेला तडा पाहताना , तू विखुरण्याच्या आधी , एवढंच सांगावंसं वाटतं ! )

नेहमीच का सगळ्यांनी माझ्या आधी निघून जायचं ?
आज तू तरी थांब, आणि मी आधी जाते.....
म्हणजे कधीतरी असं होईल कि
कुणाच्यातरी आयुष्यातून, ‘मी’ आधी निघून गेले !

रोज सकाळी तीच स्वप्ने घेऊन तुला पाहताना
स्वतःचे प्रतिबिंब पाहून तुझ्यावरच हसतांना ,
तूझ्या मध्ये दिसलेले पाणीदार डोळे पुसतांना
मी स्वतःला शोधत आहे कि अजून कुणाला
तुला हे कळत असेल सगळं ... म्हणून जरा थांब !

कविता

गर्भार सातव्या महिन्याची

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
1 Aug 2018 - 10:28 am

जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!

मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!

क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!

आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!

- संदीप चांदणे

eggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरसकविताप्रेमकाव्यविनोदमौजमजा

व्हाॅट्स अॅप संन्यास

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
28 Jul 2018 - 7:26 am

"हॅलो"
"तुझे posts फार होताहेत, ते गाणं ग्रुपवरुन delit कर"
"बर,लगेच करतो"
आम्ही तात्काळ ग्रुप्स exit व WA forced stop केले"

मौनातच संयमीत उद्रेक झाला...

व्हाॅट्स अॅप संन्यास

बरे झाले देवा,
WA सोडविला,
पाश तोडविला,
आंतर्जाल ।

अपुलेच सांगती
पोस्ट तुझे फार,
त्यांना होतो भार,
नेटपॅक।

कसे हे आले,
आम्हावरी बंधन
म्हणे करा लंघन,
थोडा वेळ।

आम्हावरी सेंसाॅर,
इतकेच खोकणे,
तितकेच पादणे
ते नै होणे
आम्हा चिये।

अभंगकविता

दोन रुपक कविता

मित्रहो's picture
मित्रहो in जे न देखे रवी...
26 Jul 2018 - 8:20 pm

छत्री
ती रोज सोसते घोंघावनाऱ्या वाऱ्याचा मारा
ती हसत झेलते बरसनाऱ्या पावसाच्या धारा
कधीही, कुठेही, मी तिचीच मदत घेतो एका झटक्यात
घरात मात्र माझ्या मी तिला ठेवतो दूर एका कोपऱ्यात

माती
तो गडगडतो, आवाज करतो म्हणून मग मी घाबरतो
ती कडकडते, चमकते, म्हणून मी घरात लपून बसतो
ती देते हिरवळ, ती देते गंध, ती घेते मला कुशीत
पण साधा चिखल झाला म्हणून मी तिला लाथाडतो

कविता माझीकविता

हट्ट!

मनमेघ's picture
मनमेघ in जे न देखे रवी...
26 Jul 2018 - 7:51 am

हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी.
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे.

'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे.
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात.

कविताहट्टमनमेघ