ती पहाट ओली(झालेली! ;) )

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
17 Mar 2018 - 1:28 pm

पेर्ना:- 1) आणि 2)
सांज काळी ती येते का
हळूच तांब्या घेऊन

गुपचूप एकटी जाते येडी
घरामागील वावरातून

मधूनच कुत्रा मागे लागता
सांडे तांब्या हातीचा

हातानेच गच्च धरावा
पाचोळा आजू बाजूचा

टोचती अशी गवता गवतातूनी
ती हुळहुळती पाने ओली

वरून गवताच्या काडया
वैतागली ती साली

कधी एकदा उठू म्हणुनी
उभी राहिली पहा

छपून बसलेले कुत्रे
करी अचानक भॉ भॉ

फेकुनी मारी दगड त्याला
नुकताची टाकलेला

पळे पळे हा कुत्रा म्हणे
कसला दगड आला

गेला कुत्रा दूर पळुनी
जीव झाला मोकळा

सुटली बिचारी बया म्हणे
चला ,तांब्या उचला .. पळा!

झटकनकाम सोडगे,वावरोदा
Pahatgandha(पहाट"गंधा).blogspot.com
prshuramsondge.blogsopt.com

अनर्थशास्त्रआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढजिलबीटका उवाचफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीभयानकहास्यवावरकविताओली चटणीखरवसग्रेव्ही

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

17 Mar 2018 - 2:05 pm | प्रचेतस

असा काही विषय असला की तुमची रसवंती अगदी भरभरून वाहू लागते. काय लिहू, कसं लिहू, किती लिहू असं होऊन जातं बघा तुम्हाला आणि आम्ही रसिकही तुमच्या काव्यानंदात बुडून जाऊन त्रुप्त होतो.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2018 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा

@

असा काही विषय असला की तुमची रसवंती अगदी भरभरून वाहू लागते. काय लिहू, कसं लिहू, किती लिहू असं होऊन जातं बघा तुम्हाला

}~ आखीर एक विडम्बक ही दुसरे विडम्बक को पेहेचाण सकता हैं ।। http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Mar 2018 - 3:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

वा वा बुवांनी आपल्या आवडत्या विषयात परत एकदा हात घातला आणि त्या वर्षावात रसिक तृप्त झाले.
पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2018 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

प्रचेतस's picture

17 Mar 2018 - 6:47 pm | प्रचेतस

हात घातला

अरारारारा

गामा पैलवान's picture

17 Mar 2018 - 7:16 pm | गामा पैलवान

बरबटवलान् मेल्यानं!

-गा.पै.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2018 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा

@अरारारा - ढिशुम!
http://www.sherv.net/cm/emo/angry/whipping.gif प्र"चेतस उर्फ काडीलाव्या आगोबा डुक्कर!

नाखु's picture

17 Mar 2018 - 11:07 pm | नाखु

ओघवती काव्ये, तर काही ओघळती काव्ये

अखिल मिपा "दरवाजा बंद तर आजार बंद "अभियानांतर्गत जन हितार्थ जारी

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2018 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/raspberry-smiley-emoticon.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2018 - 11:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

तांब्याधिपतींचा मठ परत कामाला लागला ! छान झाले ! =))

तांब्या भरला, पाणी वाहते झाले. =))

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2018 - 9:15 pm | अत्रुप्त आत्मा

सुडुक आला आणि प्रतिपादन सुरू झाले!

ही खरी कविथा. सामाजिक समस्या, कुचंबणा यांना वाट करुन देणारी.

टवाळ कार्टा's picture

20 Mar 2018 - 1:11 pm | टवाळ कार्टा

गुर्जी ईज ब्याक विथ ब्याअंग

दुर्गविहारी's picture

22 Mar 2018 - 6:53 pm | दुर्गविहारी

काय हे बुवा!!! लई भारी जमलयं. ;-)

प्रचेतस's picture

22 Mar 2018 - 7:20 pm | प्रचेतस

त्यांना हे असल्या प्रकारचे लेखन नेहमीच भारी जमते.
तरी त्यांच्या सुवर्णकाळातील लेखनाच्या मानाने हे लेखन काहीसे निम्न दर्जाचे झालेय.

स्पा's picture

22 Mar 2018 - 7:46 pm | स्पा

हो ना

तुम्ही आलात, अता त्यांचा आनंद गगनात माईना होईल.

नाखु's picture

22 Mar 2018 - 8:16 pm | नाखु

आहे

स्पा's picture

22 Mar 2018 - 9:36 pm | स्पा

ह्ही ह्ही ह्ही

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2018 - 6:26 pm | अत्रुप्त आत्मा

@ह्ही ह्ही ह्ही - पांडू रे पांडू,चल खेळू विट्टी दांडू!

प्रचेतस's picture

23 Mar 2018 - 6:29 pm | प्रचेतस

विट्टी दांडू शब्द पाहून सातारला तुम्ही म्हटलेल्या एका अजरामर संवादाची आठवण झाली. =))

सूड's picture

2 Apr 2018 - 1:47 pm | सूड

सहमत!!

त्यांचा आनंद पोटात माईना असं हवं खरं!! कारण आनंद पोटात माईना झाला रे झाला की माणूस लोटा धरुन वावरात शिरतं. =))

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2018 - 1:26 pm | अत्रुप्त आत्मा

@

22 Mar 2018 - 8:16 pm | स्पा
हो ना

---- http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif पांडुब्बाSsssssss ! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2018 - 1:27 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-meme-smiley-emoticon.gif

सालदार's picture

22 Mar 2018 - 7:54 pm | सालदार

भीगी भीगी सडको पे मै, तेरा इन्तजार करू... (कशांनं भिजलय ते आज कळलं)
असं काहीसं हिंदी गांणं आहे. त्याची आठवण झाली

सतिश गावडे's picture

22 Mar 2018 - 9:50 pm | सतिश गावडे

बरेच दिवसांनी बुवा तांब्या घेऊन त्यांच्या हक्काच्या वावरात घुसले.

हही हही हही

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2018 - 1:18 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

मला एकदा घुसू द्या ,धनाजी संगे बसू द्या!
त्याच्या म्हशी माझा तांब्या अश्शी जोडी जमू द्या,
मला एकदा घासू द्या! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

प्रचेतस's picture

23 Mar 2018 - 6:30 pm | प्रचेतस

म्हशी, तांब्या, तुम्ही आणि घासू =))

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2018 - 7:53 pm | अत्रुप्त आत्मा

आं Sssss http://www.sherv.net/cm/emo/angry/angry-smiley-face.gif तो घुसू चा टायपो आहे ना!

नाखु's picture

27 Mar 2018 - 7:10 pm | नाखु

म्हण आता नव्या टोपड्यात

अरे अरे तांब्या, मला कुठे नेशी !!!!

खुलासा ते खालसा एक वैचारिक चुळबुळ

गामा पैलवान's picture

3 Apr 2018 - 12:25 pm | गामा पैलवान

चुळबूळ की बुळबूळ?

-गा.पै.

किसन शिंदे's picture

3 Apr 2018 - 5:15 pm | किसन शिंदे

बुवा, तुम्ही 'टॉयलेट - एक प्रेम कथा' हा चित्रपट पाह्यला नाही का?

सस्नेह's picture

3 Apr 2018 - 5:30 pm | सस्नेह

खूप दिवसांनी बुवांना मोड..., नव्हे मूड आला आहे, तांब्याचा ! =))

चौकटराजा's picture

3 Apr 2018 - 7:34 pm | चौकटराजा

त्या तोडफोड करणार्या अजो'ड धाग्यांचा कंटाळा आला होता . आस्तिक नास्तिक अज्ञेय वाले सर्वानाच अपरिहार्य असणार्या तांब्याचा विजय असो !