सैल असावी मिठी जराशी...
सैल असावी मिठी जराशी,
हळूच वळुनी तुला बघाया,
अर्ध्या मिटल्या तव नयनांचे,
ओले हळवे चुंबन घ्याया..
रेशीम काळे केस उडोनी,
कुरळ्या लाटा बाहुंवरती,
मऊ मुलायम आखीव रेखीव,
घटद्वयांना व्यर्थ लपवती...
जरा विसावून सिंहकटीवर,
मधूर मादक श्वास फुलावे,
अधीर कोडे या विश्वाचे,
गहि-या डोही उकलून यावे..
पहाटवारा लगबग करतो,
घेऊन येतो थोडे केशर,
स्वर्णीम करतो शर्मिल गाला,
तलम तृप्तीचे शिंपून अत्तर..
( पहिली ओळ रेखोकडून उधार घेतली आहे..)