मनाचं प्लॉटिंग

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
22 Jan 2018 - 12:43 pm

माझ्या मनात आहेत असंख्य Non Attached प्लॉटस
गुंतत नाही मी सहसा कशात
प्लॉटिंग करून ठेवलंय मी
काटेरी तारेच्या कुंपणाने बंदीस्त
लहान होतो तेव्हाही होतेच हे प्लॉट
पण त्याला असायच काटेरी ठेवाच कुंपण
त्यावर काटे असले तरी फुलही फुलायची अधूनमधून
आता मात्र मनाचे प्लॉट
रुक्ष व्यवहारांच्या काटेरी तारेने वेढलेले
हल्ली कुंपणावर वाढवलेला वेल
दिसायला सुंदर दिसतो
मात्र त्याखालीअसतेच व्यवहारांचा पहारा
कुणाशीही मोकळंढाकळ बोलावं
असं नाही राहिलं अंगण
प्रशस्त गेटमधून कुणी आलं बोलायला
तरच बोलावं हेच झालंय आमचं हाय स्टॅंडर्ड

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

23 Jan 2018 - 7:58 am | प्राची अश्विनी

छान!
NA चं पुन्हा agriculture करुन घ्या की. :)

फुंटी's picture

23 Jan 2018 - 1:06 pm | फुंटी

अग्रीकल्चर प्लॉटला भाव कवडीमोल येतो.आणि कुणी येऊन शेतीच करेल याची खात्री नाही ना... ;-)