अभिजात(चारोळी)
छंदात बांधण्याचे,
गेले सखे दिवस ते |
मज अभिजात जे उमजले,
ते मुक्त छंद होते....||
छंदात बांधण्याचे,
गेले सखे दिवस ते |
मज अभिजात जे उमजले,
ते मुक्त छंद होते....||
त्याने 'तुझ्यावर प्रेम आहे' म्हटल
तर ती खळखळुन हसते
हो किंवा नाही काहीही सांगत नाही
फक्त्त् थोडी अबोल होते
ती अबोल झाली की
त्याच्याही जीवाची तगमग होते
त्याची होणारी तगमग पाहुन
ती पुन्हा खळखळुन हसते.
त्याच्या या प्रेमापुढे नेहमी
अस्वस्थ् उदास होते ती
तिचही आहे त्याच्यावर प्रेम्
पण सांगत नाही ती
तिच्या अशा वागण्याने
तो ही हतबल निराश होतो
आता थांबायला हव आपण
अस वाटुनही पुन्हा अडकतो
प्रीती तुझ्यावरी पण,समजे मलाच नाही.
या अनाकलनाचा,मी काय अर्थ घ्यावा?
शब्दात सांगताना,उरते मनात काही.
या गूढ शांततेचा,मी काय अर्थ घ्यावा?
एका किनारी तूही ,दुसय्रास स्पर्श माझा.
मधल्या प्रवाहितेचा,मी काय अर्थ घ्यावा?
मोडून एक काठ,वळते नदी जराशी.
मग शांत त्या तळाशी,कोठून सूर द्यावा?
जमले मनावरी हे, शेवाळ दाट सारे.
गहिरे कसे म्हणू मी?निसटंताचं अर्थ व्हावा!
आता मनावरूनी, सोडून देतं सारे.
दिसली फुले जरी ही,निरं-माल्य अर्थ व्हावा!
सोडून काय देऊ? सारेच क्षणभराचे.
हे रोजचेच आहे, साधाच अर्थ घ्यावा.
अवेळी मोहरावे तू.. ऋतूंना साद घालावी
तुझ्या नाजूक ओठांनी कळ्यांची चुंबने घ्यावी!
फुले वेचून मी सारी तुझ्या हातात देताना
तुझ्या अलवार स्पर्शांनी मला आलिंगने द्यावी!
कपाळी चंद्र कोरावा,चुड्याने चांदणे ल्यावे
तुझा शृंगार होताना,गुलाबी रात्र जागावी!
जरासा तोल ढळला की मला बाहूंत घ्यावे तू
तुझ्या आरक्त डोळ्यांची शराबी धुंद मी प्यावी!
सुगंधी स्पंदने अपुली उराशी खोल लपवू,ये...
फुलांचे देह शिणले की, धुक्याची शाल ओढावी!
—सत्यजित
अंधारा काठी उगवल्या राती
आकाशी पेटते चंद्रदिव्यांची ज्योती
गडद रंगांनी नभ गुरफटते
सावल्यांच्या रानात रेशमी चांदणं उतरते
पानांच्या गर्दीत ओला कवडसा पाझरतो
झाडांच्या कंठात वारा शीळ घालतो
पावला पावलांत मुकी रानवाट मिटते
काळोखाच्या कुशीत चिमण्यांचे गाव हरवते
प्रदूषणचा कर खात्मा
अल्लादीनने आदेश दिला
जिन्नने तत्क्षणी
त्याचाच गळा दाबला।
टीप: अल्लादीन म्हणजे मनुष्य जाती.
जिन्नने अल्लादिनचा गळा का दाबला?
सर्वांना पाश्चात्य नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
(श्री सुभाष स नाईक यांची प्रेरणा घेऊन)
पाऊस
श्रावणात बरसल्या
अमृत धारा
उजळली कोख
धरती मातेची।
श्रावणात बरसल्या
तेजाबी धारा
वांझ झाली कोख
धरती मातेची।
वज्रलेप इतिहासावर उभा आश्वासक वर्तमान?
निळ्या-भगव्या दगडांचे भागधेय सेम
भगव्या-निळ्या डोक्यांवर बिनचूक नेम
खळ्ळ खटॅक- खळ्ळ खटॅक : किडुकमिडुक चक्काचूर
भक्क पिवळा आगडोंब : काळा धूर सर्वदूर
१४४ कलमाच्या निगराणीला खाकी बंदूकदस्त्यांचे कुंपण
पांढर्या बगळ्यांच्या अश्रुंचे इथेतिथे मतलबी शिंपण
आलबेल इतिहासखपली कोण आत्ता खरवडतंय?
सांभाळा, खाली आरपार सडकं वर्तमान वाहतंय
घरी चाललो मी आज
आसावला प्रवास
भर समूद्रात टाकले होडके
किती योजने वाहलो खास
होते काही प्रयोजन अन काही उद्देश
पण तरंगण्याला न लागले सायास
स्वार्थाने जाळे टाकले जीवनी
अनूभवाचे आले मासे त्यात
जेथून आलो तेथेच चाललो
आसावला प्रवास
- पाभे
पोटापाशी चोरखिसा असलेली धुवट पांढरी
अर्ध्या बाह्याची बंडी, तपकिरी स्वेटर..
निळ्या रेघांचा नाडीवाला पायजमा..
नीळ घातलेला स्वच्छ कॉलरचा पांढरा शर्ट..
आतली बाजू बाहेर केलेली काळी पॅन्ट,
भोकाभोकाचं बनियन..
टोकाची शिवण उसवून उंची वाढवलेली गणवेशाची गडद्द निळी पॅंट..
कधीकाळी सफेद पण आता धुऊनही मळकट दिसणारा
शाईचे डाग पडलेला छोटा शर्ट..
चौकड्या चोकड्यांचा, काखेत उसवलेला लाल काळा फ्रॉक..
काळा परकर, पोलका, निळ्या पिवळ्या सिंथेटिक साडीची घडी
इथे तिथे फाटलेले चार पाच पंचे,
त्यांच्या पोटात लपवलेले आतले कपडे