कविता

अहेवपण ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
14 Nov 2017 - 3:56 pm

कातरवेळी अस्वस्थ मनाला
दुरच्या दिव्यांची वाटे आस
स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा
कितीक स्मरती हळवे भास

उगाच ओठी शब्द अडकती
दूर कोणी कोकिळ बोलतो
तुडुंब मनाचे आगर भरतां
उद्रेकाला मग वाट शोधतो

नाद खगांचे, स्वर समीराचा
कातळडोही अनाम खळबळ
विजनवास व्रतस्थ मनाचा
गर्द सावल्या सावळ सावळ

पैलतीरी उभे दुत प्रकाशी
कुणी छेडले सनईचे सूर
अहेवपण सजले सरणावर
प्रिया मनी हे कसले काहूर?

© विशाल कुलकर्णी

करुणकविता

*बालदिन *

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
14 Nov 2017 - 10:42 am

*बालदिन *

हासूया खेळूया नाचूया गाऊया
आनंद घेऊया मुलांसवे
कोवळ्या निरागस मुलांपासून
मिळते आम्हा सुख नवे

पंडित नेहरूंचा जन्मदिवस आज
म्हणती त्यास बालदिन
मुले असती फुले देवाची
होऊ त्यांच्यात तल्लीन

मातीच्या गोळ्यासम बालमनावर
संस्कारांची नक्षी काढू
सद्विचारांचे शिंपण करूनी
उद्याचे आदर्श नागरिक घडवू

--शब्दांकित (वैभव दातार )
१४ नोव्हेंबर २०१७

कविता

प्रतिभेचे देणे

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
13 Nov 2017 - 2:54 pm

ती ठिणगी होऊन येते
अन वणवा होऊन छळते
ती लकेर लवचिक होते
अन गाण्यातून रुणझुणते

ती कधी निखारा होते
विझुनी मग होते राख
उमलविते त्यातून फूल
मग तिचीच फुंकर एक

ती उल्केसम कोसळते
उखडून दिशांचे कोन
धगधगत्या चित्रखुणांची
ती लिहिते भाषा नविन

जे तरल नि अक्षर ते ते,
जे अथांग, अदम्य ते ते,
जे दूर असूनही भिडते,
जे जटिल तरी जाणवते,
ते तिचेच देणे असते….
…..किती घ्यावे? तरीही उरते !

कविता माझीकवितामुक्तक

सांज

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
13 Nov 2017 - 2:41 pm

अंग पेटून सांज जीव चिरते
पापण्यांच्या पंखातून हळूच पाणी फिरते

सय येता हुंदका कंठात फुटतो
गहिवरलेल्या क्षितीजातून उदास रंग गळतो

प्राणाच्या ओघळीत व्याकूळ शीळ तडफडते
काळोखाच्या काठावरती दिवसाचे बन विझते

खोल खोल गात्रात पिरतीचा मोहोर जळतो
उरात आसवांचा झरा उचंबळुनी वाहतो

कविता माझीकविता

काही सांगायचे आहे

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
11 Nov 2017 - 11:06 am

काही सांगायचे आहे, सांगावया जमेल का?
ज्यांनी ऐकायचे, त्यांना ऐकावया जमेल का?

अनुभव टिपताना, मन शब्दबंबाळले
शब्द त्यातला शहाणा, वेचावया जमेल का?

रेष असो ललाटीची, वा असो तळहाताची
नसणार सरळ, हे मानावया जमेल का?

चित्रमय जग सारे, काय सोडू? काय भोगू?
मयसभा कोणती ते, ओळखाया जमेल का?

हाती लागला परीस, सर्वांच्याच हाती सोने
धूर पिऊन सोन्याचा, जगावया जमेल का?

तोल साधता साधेना, हातवारे झाले कैक
हात हाती घेउनीया, सावराया जमेल का?

लख्ख प्रकाश दिवसा, पहाटेस स्वप्नाधार
अंधारून येता, धीर धरावया जमेल का?

कविता

नवी मैत्री

तृप्ति २३'s picture
तृप्ति २३ in जे न देखे रवी...
9 Nov 2017 - 12:22 am

मी ही कविता माझा नवीन झालेल्या मैत्रिणीवर केली आहे. तुमाला ही कविता कशी वाटली ही कंमेंट देउन जरूर सांगा.

नवी मैत्री

कविता माझीमाझी कविताकविता

नोटबंदी

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
8 Nov 2017 - 11:22 am

नोटबंदी

नोटाबंदी नोटाबंदी झाले की हो एक वर्ष
आला का बाहेर काळा पैसाझाला का हो तुम्हा हर्ष? .१

संध्याकाळी बातमी प्रसृत झाली
हजार पाचशे नोट बुडाली
कपाटे तिजोरी भरभर रिकामी
मोदींनी योजिली युक्ती नामी .२

काळ्यापैशाच्या भीतीमुळे तेव्हा
धनदांडगे झाले वेडे पिसे
व्यवस्थापन नीट नसे योजनेचे
सुरुवातीला जनता त्रास सोसे .३

नोटबंदी निर्णय जाहला
कोणास आवडे कोणा नावडे
भ्रष्टाचार काळापैसा नष्ट होऊ दे
नको फक्त नोटांचे नवे रुपडे .४

- शब्दांकित (वैभव दातार )
८ नोव्हेंबर २०१७

कविता

सरी

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
7 Nov 2017 - 11:39 pm

बेभान होऊन उठलं सभोवार काहूर
अंधुक झाली डोंगराची लांब किनार

बुंध्यातला पालापाचोळा विस्कटला गगनी
सर्वञ माळरान आले अंधारूनी

डोईवर मावळली अस्मानाची निळीभोर काया
मातीत विरघळल्या सुकलेल्या काळ्या छाया

माथ्यावर पांघरली गरजत मेघांनी शेज
ऐन ज्वानीनं बहरली ढगांत वीज

चिंब घनातून कोसळू लागल्या सरी
ओले थेंब पाऊल हलकेच घुटमळले दारी

कविता माझीकविता

|| गणेश पूजा ||

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
7 Nov 2017 - 6:52 pm

आज अंगारकी चतुर्थी निमित्त गणेशाची पूजा करू ..

|| गणेश पूजा ||

चला करू गणेशाचे आज पूजन
नवविधा भक्तीने आपण करू त्याचे अर्चन || धृ.||

दहा इंद्रियांनी करू मानस पूजा
नसे तुजवीण भाव दुजा ||१ ||

दुग्ध घृत मधु दही शर्करा स्नाने
अभिषेक करतो मी मनोभावाने ||२ ||

दुर्वा जास्वदीं फुले अर्पूनि चरणी
आरती करूया धूप दीप लावूनी ||३ ||

निनादति मंगल वाद्ये ताल मृदूंग वीणा वाजे
वैभव नमितो गणेशा रूप सुंदर साजे ||४ ||

कविता

|| अंगारकी ||

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
7 Nov 2017 - 9:38 am

आज अंगारकी चतुर्थी निमित्त मी केलेली कविता....

टिप :- ही कविता कोणाची टिंगल टवाळी किंवा भावना दुखावण्यासाठी लिहिलेली नसून "अंगारकीच्या या पवित्र दिनी" माझ्या मनःपटलावर उमटलेले तरंग आहेत. तोच शुध्द सात्विक भाव कवितेतून वाचकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रामाणीक प्रयत्न केला आहे. या मधून कोणताही इतर अर्थ जर कोणत्या वाचकास दिसला तर तो केवळ माझ्या प्रतिभेचा दोष समजून वाचकांनी उदार मनाने मला क्षमा करावी. गजाननाची आसिम कृपा सर्वांवर सदैव राहो...

श्री गणेशायनमः

आज अंगारकीच्या सणा
चापून खाउ साबुदाणा
घंटा बडवू घणाघणा
स्पिकर लावूया ठणाणा

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडकविता