रॉजर फेडरर- एक संयमी झंझावात
अवघ्या टेनिस विश्वाला भुरळ पाडणारा नजाकतदार खेळाडू. गेल्या २० वर्षांत, जे लोक नियमित टेनिस पाहतात किंवा जे लोक केवळ ग्रँडस्लॅम पाहतात त्यापैकी बहुतांश लोकांचा आवडता खेळाडू कोण असे विचारल्यास नक्कीच फेडरर हे उत्तर मिळेल.
अवघ्या टेनिस विश्वाला भुरळ पाडणारा नजाकतदार खेळाडू. गेल्या २० वर्षांत, जे लोक नियमित टेनिस पाहतात किंवा जे लोक केवळ ग्रँडस्लॅम पाहतात त्यापैकी बहुतांश लोकांचा आवडता खेळाडू कोण असे विचारल्यास नक्कीच फेडरर हे उत्तर मिळेल.
पुणे वार्ताहर: दि. १४ सप्टेंबर.
रस्त्यातील असलेले खड्डे दुरुस्ती करणे किंवा त्या जागी नवे रस्ते करणे सरकारला लगेचच अशक्य आहे. भारतावर चीन ने राज्य केले तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांत असलेले खड्डेच वाहनचालकांच्या मदतीस येतील, कारण असल्या खड्ड्यांतूनच वीजनिर्मिती भविष्यात करू अशी घोषणा रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी काल पुण्यात केली. गणपती विसर्जन झाल्यानंतर आलेल्या पावसाच्या पुराची पाहणी पुण्यात केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ही परिषद रात्री ११ वाजता शासकीय विश्रामगृहात झाली.
ऐक.. दरवाजा उघडू नकोस!
(गूढकथा)
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं.
कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले...
X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.
सकाळी फिरायला जातो ते महात्मा सोसायटीजवळ असलेल्या डीपी रोडपर्यंत. तिथे रस्त्यावर दामलेकाकांची एक मोफत व ओपन लायब्ररी आहे. लोक पुस्तके नेतात व आणतात. अनेकांनी पुस्तके भेटही दिली आहेत. काही जण उपक्रमासाठी स्वयंसेवक म्हणूनही मदत करतात. दामले काका जगन्मित्र व नर्मदा परिक्रमा केलेले. त्यामुळे ग्रंथालायचे नाव ही नर्मदे हर! मी थोडावेळ गप्पा मारायचो. माझे यंदा कर्तव्य आहे हे पुस्तक ही ग्रंथालयाला भेट दिले.मग गप्पांमधून त्यांना व तेथील स्वयंसेवकांना, माझ्या व्यत्किमत्वाचा परिचय होत गेला. शिरिष नावाचे एक गृहस्थ माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकायचे.पण त्यांच्या बोलण्यात मला अस्वस्थता जाणवायची.
बायोलॉजीत जसे स्पेसिज-फायलम-सब फायलम असं वर्गीकरण असतं तसेच सेवानिवृत्त काकांचे फायलम असतात.त्यापैकी सहज आढळणारा म्हणजे - फायलम पासबुकीया ! या फायलममधले काका विविध देशी-विदेशी -सहकारी नागरी बँकांची पासबुकं सक्काळपासून अपडेट करण्यासाठी फिरत असतात. म्हणजे त्यांच्या खात्यात पैशाचा पूर आलाय वगैरे असं काहीच नसतं. दोन चार लाभांश-एखादा अॅन्युइटी प्लॅन - मासिक व्याज इतकंच काय ते जमा होत असतं पण त्यानिमित्ताने 'मेरीआवाज सुनो'हा कार्यक्रम त्यांना करता येतो. या पासबुकीयांच्या छळवादाला कंटाळून बँकानी पासबुकं छापायचं मशिन लावल्याची अशीही एक अफवा आर्थिक जगतात आहे.
सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले.
अरे तुझी पहीली भजी अजून संपली नाही? आईने गरमागरम कांदाभजीचा दुसरा घाना काढून माझ्या प्लेट मध्ये टाकताना प्रश्न केला. मी प्लेट फ्रिजवर ठेवून कांदाभजीचा एकच तुकडा खाऊन भजांमध्ये बोट फिरवत होतो. अरे कसला विचार करतोय ? तब्येत ठीक आहे ना? आईने विचारले. अगं आई अमिषा सोडून गेली. आई एकदम गोंधळून गेली.
हातातील झारा ताटात ठेवला आणि गॅस बंद केला. काय झालं नेमके तुमच्यात सोडून जाण्यासारखे?
कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यापासून नेहमी त्याच्या वाट्याला साईड हिरोचीच भूमिका आली. त्याने कसोटी पदार्पणात क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ९५ धावा काढल्या पण दुर्दैवाने सौरव गांगुलीची पण ती डेब्यू (debut) मॅच होती आणि गांगुली ने त्या सामन्यात १३१ धावा केल्या... 2001 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ दिवस मैदानावर तग धरून त्याने ३५३ चेंडूत १८० धावा केल्या पण दुर्दैवाने त्याच सामन्यात व्ही. व्ही. एस लक्षमणने २८१ धावा काढल्या.. १९९९ च्या विश्वचषकात त्याने १२९ चेंडूत १४५ धावा काढल्या हीपण खेळी कुणाच्या लक्षात राहिली नाही कारण त्या सामन्यात गांगुलीने १८३ धावा काढल्या होत्या.