विनोद
मी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)
कुकुचकू - रुपये १२,०००/- फक्त !
थोड्या दिवसांपूर्वी आमच्या ऑफिसमधली ज्येष्ठ (आणि श्रेष्ठ!) पार्शिण बरेच दिवस गायब होती. पारशी लोक हे तसे खुशालचेंडू आणि स्वच्छंदी असल्यामुळे ऑफिसातल्या कोणालाच तसं तिचं नसणं खटकलं नाही. मात्र बरेच दिवस होऊनही ती ऑफिसला न आल्यामुळे तिच्याविषयी थोडी चर्चा हळूहळू सुरु झाली. अखेर एक दिवस बाईसाहेब उगवल्या ती एक चित्तथरारक कहाणी घेऊनच ! तो अख्खा दिवस ती प्रत्येकाला वेगवेगळे गाठून तीच गोष्ट सांगत होती. खास लोकाग्रहास्तव तिने पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांसाठी ती हकीकत साभिनय करून दाखवली ती अशी :
मी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)
मी आणि शाळेचे Reunion - (भाग २)
भाग १
___________________________________________________
मी आणि शाळेचे Reunion - (भाग १)
जिमला जायला सुरुवात करून एक महिना होऊन गेला होता. डोंबिवली उत्सव होऊन गेला होता. नूतन वर्षारंभ देखील झाला होता. वाढलेल्या थंडीने सकाळी लवकर उठून जिमला जायला कंटाळा येऊ नये म्हणून मी मुलांच्या आवाजातील "उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान, निबोधत… बाबा उठ… जिमला जायचंय ना तुला….उठा राष्ट्रवीर हो…. सुसज्ज व्हा उठा चला …" अशी वाक्ये फोनमध्ये रेकोर्ड करून त्यांचा अलार्म लावून ठेवला होता. रोज जिमला जात होतो. घाम गाळत होतो. आरशाकडे बघणे टाळत होतो. लिफ्ट सोडून जिने चढत उतरत होतो. बटन स्टार्ट असूनही बाईकला किक मारून चालू करीत होतो.
..
..मोकलाया दिशा दाही मठाधीपती.... तांब्या s मठ्ठा .... sपकॉर्न...पकॉर्न ... पाsपकॉर्न...पापकॉर्न....पॉपकॉर्न झाडाची फांदी ....संस्कृती ...विडंबन अमेरीकन स्त्रीवाद.... ... जिलेबी... जिलेबी...जिलेबी... नेलपॉलीश..टिंगलटवाळी ....व्यव व्यव व्यवच्छेद लक्षण...आरक्षण .. स्त्री पुरुष.. लाळ... गळत्येय...
'आनंदाचा प्रसंग आहे, दोन थेंब घे....
किलर खंडया....
अं हं खंडया किलर...
रोहिथ वेमुला.... जात.... लदाख सायकलने बापरे! श्रध्दा की अंध श्रध्दा?
माहिती बघुन गार....
संदिप नको रे ते मेगाबायटी प्रतिसाद, हु र्र र्र ,
फेसबुकी सुंद्री आणि नवकवी
मधुरा सुंद्रीकर ला फेसबुकवर जबरदस्त फॅन फॉलोइंग होतं. ती काही रोजच आपले फोटो अपलोड करत होती असे नाही. एखादे दिवस गॅप देखील घ्यायची. तिच्या फोटोंमुळे घायाळ झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. ती जेव्हां जेव्हां लॉगिन करीत असे तेव्हां ९०० + फ्रेण्ड रिक्वेस्टी पेंडींग असलेल्या दिसत. त्या वेळीच क्लिअर केल्या नाहीत तर मात्र हा आकडा फुगत जऊन एक दिवस प्रोफाईलचं काही बरं वाईट होईल असं वाटून ती आपल्या कोमल बोटांनी अनेकांच्या रिक्वेस्टींवर कात्री चालवत असे. स्त्री प्रोफाईल्सकडून तिला कमीच रिक्वेस्टी येत.
माझी दंतकथा (अर्थात My Experiments with Tooth)
सध्या बायकोला , पत्रिका वाचन आणि त्यांचा अभ्यास करणे हा एक छंद जडलेला आहे. त्यामुळेच, मिळेल त्याची पत्रिका घेवून तिचं ती dissection करत असते. अर्थात माझी पत्रिका हि किती किचकट आहे, आणि माझा स्वभाव देखील, हे ती मला दिवसातून चार वेळेला तरी नक्कीच ऐकविते , आणि त्यात तिचे ग्रह-तारे माझ्या ग्रह-तार्यांची कशी युती ठेवून आहेत, हे देखील सांगायला विसरत नाही!
बाब्या
गावापासुन पुण्यापर्यंतचा प्रवास त्यानं रेल्वेनं केलेला. पुण्याला उतरल्यावर थोडा चेंज म्हणुन, पुढचा प्रवास बसने करायचा त्यानं बेत केला. लग्नाचे वय झाल्यापासून त्याचा असा 'चेंज'चा उत्साह फारच वाढलेला. रेल्वेचं कल्याणपर्यंतच तिकीट सोडून एशियाड गाठली. रेल्वेत अंग पार ताठरुन गेले होते, इथे मस्त मऊ मऊ सिट मिळालं.
शेजारी एक गृहस्थ म.टा. वाचत बसलेले. मुख्य पान ते वाचत होते आणि बाकीची पानं त्यांनी मांडीवर ठेवलेली.
त्यानं, न विचारताच त्यातलं एक पान घेतलं आणि वाचत बसला. गृहस्तांनी चष्म्याच्यावरून एक तिरकस कटाक्ष टाकून त्याला न्याहाळले आणि परत पेपर वाचन्यात मग्न झाले.