मी आयफोन-कर
तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर
तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर
बागेत काही 'खारी' अशा येतात, कि त्यांचा धुमाकूळ किंवा खादाडी खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या फळांवर खूप खोल दात मारुन जातात.. कुठे कुठे केर करुन जातात... आणि नंतर तुम्हाला ती फळे टाकून देताना परत-परत आठवत राहतात :/ :/ मी त्या वेळी घराच्या दुसर्या मजल्यावर होते... लोणी कढवून तूप बनवत होते... खिडकीतून 'बदामा'च्या झाडाच्या फांदीवर अशीच 'ती' (खार :/ ) मला नजरेस पडली... ती बहुधा तिथे रोजच येत असावी...इकडेतिकडे पहात होती... बदामवर बदाम फस्त करत होती ती... आमची नजरेला नजर झाली...
हजारांच्या नोटेची चमक पाहीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
बियरला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
पिणार्यांच्या मनांत
असल्या भूक्कड गोष्टी येतच नाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
पिणार्यांना नशा
चढली काय, न चढली काय
पिणार्यांना भरपुर रिचवायची सवयच हाय
मी पण थोडे फार कमवीन म्हणतो
मी बी बियर बार काढीन म्हणतो...!!
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे... गोड मानून घ्यावी.
***********************
तुमचे शेतकरी नेते, तुमच्याच तोंडास पुसती पाने | दोष सगळे मात्र, असंवेदनशील शहरी लोकांचे |
शेतीतून मंत्र्यास होती, कोटींचा फायदा | तुला नाही वावडे, अशा दांभिकपणाचे |
रे गझलाकारा, आवर तुझे दुकान | गेले ते दिवस, फुकट सहानुभुती मिळवण्याचे ||
"चॉकलेट नको मला"
"मग पाच रुपये सुट्टे दया"
"नाहीत माझ्याजवळ"
"मग ठेवा ती साखर अण निघा"
-----------------------------------------------------
डायल 198
डायल 3
डायल 9
"हेलो"
"नमस्कार, मी आपली काय सहायता करू शकतो?"
"मी पन्नासचा रिचार्ज मारला. त्रेचाळीस रुपये चा बॅलेन्स आल्याचा मॅसेज आला. दुकानाच्या बाहेर आलो की दोनच मिनिटांत त्रेचाळीस रुपये उडाल्याचा मॅसेज आला"
"तुमचा इंटरनेट ऑन होता"
"दोन मिनिटांत त्रेचाळीस रुपये? माझ्या 2G फोनला तुम्ही 5G सर्विस जोडली होती काय?"
"हे बघ तोह्याचनी हूत आसन त् नीट कर नै त् दी सोडून"
"तुमिच सांगा आता काय हुकलं बरं भौ मह्याकडून?"
"काय हुकलं मंजी? एक घंटा झालाय साधी पाच पानं छापणं होया ना तुह्याकडनं"
"आता म्या तरी काय करणार भौ? एक त् माही रॉम है उलशिक अण त्याच्यात तुम्ही देता भाराभर फायली सोडून. मंग म्या माह्याचनि होईन तेवढं करतु अण लैच गळ्याच्यावर गेल्यार देतु हात टेकुन"
"जवा तवा नुसतं त्या रॉम चं सांगत बसतु. नीट पानं भाईर काढाय कशाला रॉम लागतिरं तुला? पाच पाच मिंटाला निसती पानं गळ्यात अड़कुन घेतु अण मंग बसतु केकलत"
गांव जन्मल्यापासून म्हणा किंवा मग देशात आमदार-खासदार निवाडायची प्रथा चालु झाल्यापासून म्हणा, पहिल्यांदाच या गावाला कुणी आमदार भेट द्यायला येणार होता. मागचे इलेक्शन झाल्यापासुन जवळपास पाच वर्षात या गावाची लोकसंख्या दोनावरून चारावर गेली. बहुदा त्याचेच गणित बांधुन ही भेट योजिलेली असावी.
" हे बघ चंदू "
" चंदू ? "
" बर बंडू "
" बंडू ? "
" अरे काय चंदू आणि बंडू मध्ये अडकून पडलाय ? पुढे काय सांगतो आहे ते ऐक ना . "
" बर बर सांगा "
" मग काय ते चंदू का बंडू "
" ते राहूद्या हो काय सांगणार होता ते सांगा . "
(अत्रन्गि पाउस यांच्या बाल संगोपनातील एक वास्तव या लेखावरून हे पूर्वी लिहिलेलं काही आठवलं. )
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा
महागाईलाही पूर चढे
विमान उडवीत चहूकडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे
शिक्षण खोटे पदवी खोटी
मंत्रीणबाई तुळशी झाली
केजरीवालची पडता बिजली
दचकून तीचा ऊर उडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे
पैसा काळा आणू म्हणुनी
ठोकूनी भाषण दाही दिशांनी
चाय - गाय पे चर्चा करूनी
मनकी बाता देश बुडे ,
गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे
चीनमध्ये झोपाळ्यावरुनी
दाढीवाले बिंब बघूनी
हसता संघ भगव्या रानी
धर्म अफूचे ऊन पडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे..
= = = = = = = = =