डेली सोप.... एक कथा वाचन -१

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
17 Aug 2016 - 5:03 am

रघु: ओके मन्या. काय म्हणालास? कोण येतंय?
मन्या: ( फोनवर) अरे तो कास्टिंग डिरेक्टर येतोय. बालाजी फिल्म्स चा
रघु: कास्टिंग डिरेक्टर? कशाला?
मन्या: अरे वहिनीना त्यांच्या सिरीयल साठी घेतोय म्हणे.
रघु: पण ती इथे कुठे आहे.
मन्या : तेच तर म्हणतोय मी. सुप्रिया मॅडम घरी नाहीत म्हणून मी सांगितलय. तो मॅडमच्या सेक्रेटरीशी बोलायला येतोय.
रघु: मग. मी काय करु?
मन्या: हे बघ मी पण आज बाहेर आहे. त्यामुळे तू त्याला सुप्रिया मॅडमचा सेक्रेटरी म्हणून भेट.
रघु: मी मॅडमचा सेक्रेटरी?
मन्या: हो रे ....आजच्या पुरता तरी बन.
रघु: आणि सेक्रेटरी म्हणून काय करायचे?
मन्या: काहीही कर. टाईम पास कर. पण त्याला अटेन्ड कर.
रघु:म्हणजे?
मन्या : अरे त्याच्याशी बोल. मॅडम बिझी आहेत म्हणून सांग.
रघु: ओके ओके काहिही बोलायचे. म्हणजे आमच्या नव्या मायक्रो क्रेडीटची कोन्सेप्ट सांगु?
मन्या: अरे नको. त्याला तू मॅडमचा सेक्रेटरी वाटायला हवास. त्यांचा तु नवरा आहेस अशी शंकाही त्याला येवू देवू नकोस.
असे कर त्याला मॅडमचा रोल विचार, सिरीयल ची स्टोरी विचार. सगळे ऐकून घे. मॅडम बिझी आहेत म्हणून सांग
पण ही ऑफर त्यांच्यासाठी महत्वाची आहे. ही सिरीयल मिळाली की मॅडम एकदम टॉप च्या स्टार होतील हे विसरू
नकोस. ही ऑफर काहीही करून आपल्याला मिळवलीच पाहिजे.
रघु: किती वाजता येणार आहे तो माणूस?
मन्या: साडे दहा.
रघु: साडे दहा? हे तु आत्ता सांगतो आहेस? आत्ता साडे दहा वाजताहेत. मला अकरा वाजता बाहेर जायचे आहे.
मन्या: सॉरी मित्रा.... मला एक इमर्जन्सी आहे नाहीतर मी हे तुला सांगितलेच नसते, खरच रे. प्लीज आज माझ्यासाठी
अ‍ॅडजस्ट कर.
रघु: ठीक आहे. पण अकरा वाजे पर्यन्तच हं. मला बाहेर जायचंय.
मन्या : हो रे. मी पण येतोच आहे. इकडे एका मिटींगमधे अडकलोय. इथून सुटलो की आलोच तिकडे. तू तोपर्यन्त किल्ला
लढव. फक्त ऑफर घालवू नकोस. त्याची स्टोरी ऐक. तू एन्जॉय करशील. येतच असेल बघ तो.
रघु: हो.
मन्या: आणि हो. घर मॅडमचे आहे असे वाटायला हवे असे ठेव.
रघु: म्हणजे. ...... घरचे काही नाही रे... इथे सगळे व्यवस्थीत आवरुन ठेवलय मी मघाशीच.
मन्या: ओक्के. येतच असेल तो. त्याचे नाव. निर्दालन कपूर.
रघु : काय निर्दालन कपूर? असले कसले नाव? आणि कुणाचे निर्दालन करणार तो?
मन्या: ते सोड रे.... हल्ली या इंडस्ट्री मधली नावे अशीच असतात. अनुष्टूभ सिन्हा , रामगोपाल वर्मा,अदूरगोपाल कृष्णा ,
रतन थियाम , वगैरे.. येईलच तो. आणि हो सगळ्यात महत्वाचे त्याला तू पण बिझी आहेस असे दाखव.
रघु: ओक्के.... डोन्ट वरी ( बेल वाजते) आला बहुतेक. बेल वाजतेय. डोन्ट वरी. मी बघुन घेतो सगळे. तू बिंदास रहा. ठेव
फोन..... ( फोन कट) आपण बिझी आहोत हे दाखवायला हवं . बीझी दाखवायला म्हनून फोनवर बोलत राहुया.
या दरम्यान कुणाचा फोन येवू नये म्हणजे मिळवले.......... वाजू दे बेल अजून तीन चार वेळा ( बेल वाजत
रहाते रघु दार उघडतो फोन वर बोलत रहातो मधेच रघु दार उघडायला बाहेर जातो येताना एकजण विग/मिशी/
गॉगल घालून, मॉडर्न कपडे हातात ब्रीफकेस घेवून येतो ) नो नो नो....सुप्रीया मॅडम ना वेळ नाहिय्ये. अहो किती
वेळा सांगु ... त्या शुटिंग बधे बिझी आहेत. येत्या महिन्यातल्या सगळ्या डेट्स बुक्ड आहेत. ... नो नो नो.... सप्टेंबर
मधे त्या मलेशियाला निघाल्यात.....आं... त्यांचा नम्बर.... नाही हो.... देता येणार नाही.... का म्हणजे ?
मॅडम डायरेक्ट कोणाशी बोलत नाहीत. तुम्हाला त्यांच्या सेक्रेटरी थ्रु च जायला हवं.
सगळे व्यवहार आम्हीच बघतो. ( आलेला ग्रुहस्थ एक दोनदा रघुच्या खांद्यावर थोपटून तो आल्याची सूचीत करतो.
रघु झटकून टाकतो ) (रघु मन्याला ) काय आहे ?.... ( फोनवर बोलत रहातो) ओक्के ओक्के
ठीक आहे तुम्हाला सप्टेंबर नंतरच्या डेट्स हव्या असतील तर विचार करता येतील तसे असेल तर सांगा ओक्के... ठीक
आहे . ठेवा फोन.... ( मन्या रघु ला पुन्हा खाम्द्यावर थापटी मारुन तो आल्याचे सांगतो) कोण आहे?.. आणि आत
कसे आलात
निर्दालन: नाचीज को निर्दालन कपूर कहते है.
बालाजी का कास्टिंग डिरेक्टर. आपको बताया होगा ना मन्याजी ने. के हम आ रहे है
रघु: हो हो हो मन्या ने बताया था.....निर्दालन कपूर...ओ होहोहोहहो....या या या बसा बसा बसा.
निर्दालन: या या या..... ना ना ना ऐसा नही चलेगा.... हमारे सिरीयल मे ये अंग्रेजी नही चलेगी.
रघु: अहो या या म्हणजे मराठीत्लं या... म्हणजे आईये. आईये....
निर्दालन: ओ ऐसा ऐसा.... मै समझा "या" मतलब येस... क्या है ना अंग्रेज देश छोडकर गये मगर अंग्रेजीके गुलाम बनाकर
तो क्या सोचा फिर आपने?
रघु: हा अंग्रेजो को ऐसा नही करना चाहिये था.
निर्दालन : अरे मै वो नही पूछ रहा था.
रघु तो फिर किस बातके लिये?
निर्दालन: अरे आप तो सब जानते हो. मन्याजी ने हमारे प्रोजेक्ट के बारे मे आपको बताया होगा ना .
रघु: हा थोडासा बताया था. कुछ हिन्ट दी थी.
मन्या : हिन्ट? ,,, क्या बताया था
रघु: यही की आप आ रहे है.
निर्दालन :और?
रघु : और क्या? आप आ रहे है ये तो बताया था मगर किस लिये ये नही बताया?
निर्दालन: हम बालाजी के कास्टिंग डिरेक्टर है. मॅडम के लिये हमारे सिरीयल क्युंकी बहु भी सास थी मे रोल है.
रघु: मॅडम के लिये रोल?
निर्दालन: हा...डेली सोप है...
रघु: नही मॅडम सोप नही यूज करती... शाम्पु यूज करती है.
निर्दालन: डेली सोप मतलब वो टी वी सीरीयल होते है ना रोज मै उस की बात कर रहा था.
रघु : वही तो बोला मै भी... आज कल के सिरीयल्स इतके लांबवलेले असतात की त्याला सोप म्हणायच्या ऐवजी शाम्पू
म्हणावेसे वाटते.
निर्दालन: हा हा हा .... वा ह वा. क्या आप मजाक अच्छा कर लेते हो.
रघु: हा हा हा
निर्दालन : तो फिर हम क्या समझे? आगे कैसे करे...
रघु: करना क्या... आतापर्यन्त केलंत तसंच करा
निर्दालन: अरे हम सिरीयल की बात कर रहे ना?
रघु: हो हो हो......
निर्दालन: क्या?
रघु: हो हो हो....
निर्दालन: काय सांगा ना?
रघु: मै क्या बोलु?
निर्दालन: अजी मै पुछ रहा था मॅडम करेगी ना ये सिरीयल? बालाजी की है.
रघु: असं कसं काय सांगता येईल.... सिरीयल मधे त्यांचा रोल काय आहे ते कळायला हवं.
निर्दालन: मॅडमचा रोल... आहे ना चांगला रोल आहे.
रघु: कोणता रोल आहे?
निर्दालन : रोल म्हणजे .... वो ऐसा है ना.....
रघु: हां सांगा. कैसा है....
निर्दालन: वो ना मॅडम ना..... स्म्रीती जी की बडी बहन का रोल कर रही है
रघु: बडी बहन.म्हणजे.
निर्दालन: म्हणजे वैसे छोटी बहनच आहे. पण सिरीयल मधे ती बडी बहन म्हणून वावरते. छोटी बहन ला बडी बहन म्हणतात .
आणि बडी बहनला छुटकी म्हणतात असा ट्विस्ट आहे कथेत.
रघु: कथेत ट्विस्ट आहे? अरेच्चा तुम्ही कपूर असूनही मराठी चांगले बोलताय.
निर्दालन: त्याचं असे आहे की माझे आडनाव कापरे.... एकता मॅडमने माझे आडनाव बदलून कापरे चे कपूर ठेवले.
रघु : बरे ते जाऊदे कथा काय आहे सिरीयल ची.
निर्दालन: कथा म्हणजे बघा..... कथा अशी आहे.... डेली सोप आहे हो.... कथा बदलत असते.
रघु : म्हणजे?
निर्दालन: म्हणजे बघा..... कथा सांगायलाच हवी का?
रघु: हो तुमच्या सिरीयलची कथा मला कळाली आणि ती मला आवडली तरच मग तुमची मॅडमची भेट होऊ शकेल.
निर्दालन: पण म्हणजे... डेली सोप आहे हो...... डेली सोपची कथा सांगायचे म्हणजे.... बरेच वेगवेगळे फॅक्टर्स असतात हो....
रघु: तरी पण काही तरी कथा असेलच ना....
निर्दालन : कथा म्हणजे बघा....म्हणजे बघा.... पण म्हणजे तसा काही इथे नियम वगैरे आहे का? की कथा
सांगितल्याशिवाय मॅडमची भेट होत नाही.
रघु: मी त्यांचा सेक्रेटरी आहे.मॅडम चे व्यवहार मीच बघतो. मला कथा आवडली तरच पुढे बोलणे होईल.
निर्दालन: म्हणजे बघा... आता आली का पंचाईत.... कथा सांगायला हवी.
रघु: पंचाईत म्हणजे?
निर्दालन: पंचाईत नावाचे गाव आहे.
रघु: ओके
निर्दालन: म्हणजे बघा एक मुलगा असतो. आणि एक बाप असतो
रघु: ओ बाप एकच असतो. पुढे सांगा
निर्दालन: तर काय सांगत होतो. की हा हीच्या प्रेमात असतो.
रघु: हा म्हणजे
निर्दालनः म्हणजे मुलगा? हा हिच्या प्रेमात आहे याची याला कल्पनाच नसते.
रघु: आता ही कोण?
निर्दालनः म्हणजे त्याची प्रेयसी.
रघु : आणि कोणाला कल्पना नसते.
निर्दालनः मुलाच्या बापाला.
रघु: अरे मघाशी म्हणालात की हा म्हणजे मुलगा.
निर्दालनः हो हो म्हणजे मगाचा हा म्हणजे मुलगा पण आत्ताचा म्हणजे यावेळचा हा म्हणजे त्याचा बापच होणार की नाही
रघु: पुढे सांगा.
निर्दालनः म्हणजे बघा हा हीच्या प्रेमात आहे याची याला कल्पनाच नसते. हा झोपलेला असतो तेवढ्यात हा आणि ही दोघे
मंदीरात जातात . ही गोष्ट ही बघते ती एकदम चोंबडी आहे आणि याला सांगायला फोन करते. याला फोनवर हे
समजल्यावर ह म्हणतो की आमच्या हे असे होतच नाही. कारण याने हीच्या बरोबर हे असे करायला याची परवानगी
घ्यावे लागेल. आणि हा हीला ती परवानगी तीच्या सम्मती शिवाय देवूच शकत नाही. म्हणजे बघा. हा ही हा आणि ती
यांच्या तीच्या वरुन वाद होतात आणि तीच्या परवानगीशिवाय याचे आणी तीचे ते शक्यच नाही असे तो तीला सांगतो.
म्हणजे बघा तीच्या परवानगीवर त्याचे आणि तीचे पुढचे सगळे ते अवलंबून आहे याची जाणीव तो तीला करून देतो.
त्यात गंमत काय होते की या दरम्यान एक नवीनच समस्या उभी रहाते. याला ती स्वतःच्या पायावर उभा रहा असे
सांगते. म्हणून हा सैन्यात जातो सैन्यात तो नौदलात क्यापटनच्या हुद्द्यावर जॉईन होतो आणि तीला सांगतो की तो
कर्नल झाला की लग्न करेल. इकडे काय होते की युद्धाची शक्यता निर्माण होते. आणि याला हीची चिंता वाटते. यातच
आपले सौख्य सामावलेले आहे
रघु: ओ ओ ओ ओ ... भाऊ........ हा ही याला याची हीला हीची त्याची त्याला........ बाराखडी झाली माझ्या डोक्याची.
जरा समजेल असे काही सांगता का?
निर्दालन : समजेल असे...... अहो डेली सोप असेच असतात.
रघु: असे असतात?
निर्दालनः तुम्ही नाही बघत? संध्याकाळी साडे आठ ते रात्री साडे दहा पर्यन्त यांचच राज्य असते.
रघु: मी बघत नाही तेच बरे आहे. डोक्याची अगोदरच बाराखडी झाली आहे या अशा सिरीयल पहात राहिलो तर
बाराखडीच काय पार अंकलपी होऊन जाईल डोक्याची.
निर्दालनः बाराखडी ? म्हणजे मी नाही समजलो.
रघु: बाराखडी म्हणजे ते नाही का मुलाना शाळेत शिकवतात... क का कि की कु कू ...ह हा हि ही हु हू हे है हो हौ हं हः
ती बाराखडी .... जाऊ दे तुम्हाला नाही कळायचे ते.... तुम्ही इंग्लीश मिडीयम मधे शिकलेले असाल.
निर्दालनः म्हणजे....
रघु: ते जाउ दे हो.... पण ही कथा मी मॅडमला कशी सांगु? मला नीट समजावून सांगा.
निर्दालनः नीट समजावून सांगायचे? ओक्के .... हे बघा .... हे बघा.... अगदी सोप्पे आहे... मी आणखी सोप्पे करुन सांगतो.
(टेबला वरचे फळांच्या ट्रे मधील फळ घेतो ) हे बघा हे हे .... हे काय आहे.
क्रमशः

संस्कृतीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

17 Aug 2016 - 6:48 am | झपाटलेला फिलॉसॉफर

माफ कीजिये बरखुरदार

मगर बात कुछ जमी नहीं ......

मी-सौरभ's picture

17 Aug 2016 - 12:50 pm | मी-सौरभ

ऊगीच काही दिवाळि अंकात विनोदी लेख पाहिजे म्हणुन जो टाकतात त्याची आठवण झाली आणि विजु भाऊ हा आय डी पण हॅक झालाय अशी शंका आली.

क्षमस्व's picture

17 Aug 2016 - 7:46 am | क्षमस्व

चांगला प्रयत्न।
पु.ले.शु

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2016 - 2:11 pm | प्रभाकर पेठकर

भाग २ च्या प्रतिक्षेत आहे.