रात्रीस भेळ चाले

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
16 Feb 2016 - 12:43 pm

रात्रीस भेळ चाले ही मूठ कुरमुर्‍याची
संपेल ना कधीही ही भेळ पण्डीतान्ची

हा कन्द (बटाटा) ना दग्दभू, मिठा-तिखा (रस) वाहतो हा
मिश्रणात रगड्याच्या अभिशाप भोगतो (डास) हा
पुरीस होई साक्षी हा दूत चिलटान्चा

खाण्यास पाणीपुरी ही असते खरी चटक
जे सत्य भासती ते नसते खरे टोपात
पुसतात बुडवूनी ते बोट धोतराला

या साजिर्‍या भैयाला का गाठावे खिण्डीत
मिटतील सर्व शंका (पाहून ) न्हाऊन या मिठीत (मिठी नदी :फिदी:)
परतेल का तरीही आजार हा क्षणाचा

चु भू द्या घ्या

मूळ गीत

रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू, रवी-तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा

आभास सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
हसतात सावलीला हा दोष आंधळयांचा

या साजिर्‍या क्षणाला का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर अपुल्या या धूंद जीवनाचा

हास्यविनोद

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

16 Feb 2016 - 1:03 pm | चांदणे संदीप

याक कविता! ;)

Sandy

स्पा's picture

16 Feb 2016 - 1:56 pm | स्पा

ओके

बोका-ए-आझम's picture

17 Feb 2016 - 2:18 pm | बोका-ए-आझम

;)

प्रसाद को's picture

16 Feb 2016 - 1:59 pm | प्रसाद को

विडम्बन छान
आवडलय

पैसा's picture

16 Feb 2016 - 2:05 pm | पैसा

:D

पिके से पिके तक..'s picture

16 Feb 2016 - 2:27 pm | पिके से पिके तक..

रायता फैल गया...
जमल..

मूखदूर्बळ's picture

17 Feb 2016 - 10:59 am | मूखदूर्बळ

धन्यवाद :)

बाजीगर's picture

22 Feb 2016 - 12:13 pm | बाजीगर

विडंबन झकास,खुष झालो.

उगा काहितरीच's picture

23 Feb 2016 - 10:04 am | उगा काहितरीच

ओरीजनल गाणं क्लास आहे राव! विडंबनही जमलेय !

उपयोजक's picture

23 Feb 2016 - 9:01 pm | उपयोजक

या मूळ गाण्याच्या नावावरुन कालपासून सिरियल चालू झालीये त्याची फुकटात जाहिरात