माहेर
असे माहेराचे घर
नसे कसली कसर
नुरे कसलाही भार
डोक्यावर
माहेराचे गणगोत
भला नात्यांचा हा पोत
प्रेम बहर भरात
ओतप्रोत
माहेराचे हे सदन
माझे स्वीकारे वंदन
असे माझाही राखून
एक-कोन
अरे माझिया माहेरा
राहो कितीही मी दूरा
फिटे दुःखाचाही भारा
मोदसारा