वाट वेगळी तिथेच नक्की झाली

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
15 Aug 2016 - 9:56 am

जगात साऱ्या ओळख पक्की झाली
या देशाची खूप तरक्की झाली

हाती मोठे घबाड आल्यावरती
नियत आपली चोरउचक्की झाली

दोन दिशांनी आलो होतो आपण
वाट वेगळी तिथेच नक्की झाली

दाणादाणा जमवीत आली जनता:
पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली

पाउल माझे तेव्हा चुकले आहे
नजर तुझी जेव्हाही शक्की झाली

डॉ. सुनील अहिरराव

gazalहे ठिकाणकलाकवितागझल

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

15 Aug 2016 - 10:35 pm | चांदणे संदीप

हे एक कळत नाही आपल्याला. दोन शेर असतात, पण एकमेकांकडे पाठ करून! का?

म्हणजे पहिला, दुसरा आणि चौथा एकमेकांशी तारतम्य बाळगून आहेत, पण तिसऱ्या आणि पाचव्याच प्रयोजन नाही कळाल. :(

डॉ.साब जनता जबाव चाहती है! (जनता म्हणजे मीच, आणि जवाब-बिवाब काही नाही, असंच गरिबाला जरा उलगडून सांगितलत तर बरं होईल! ;) )

(डॉ. साहेबांच्या गझलेचा जरा बंद पडलेला पंखा)
Sandy

संदीप चांदणे, प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार!
गझलेचा प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविता असते.तिचा आधीच्या वा नंतरच्या शेरांशी संबंध असतोच असे नाही.ज्यात एकच विषय पहिल्या शेरापासून शेवटच्या शेरापर्यंत उलगडत नेला जातो तिला मुसलसल गझल म्हणतात. या गझलेत एक विषय शेवटपर्यंत हाताळलेला नाही.त्यामुळे प्रत्येक शेर स्वतंत्र समजावा लागेल.