मित्रहो, मी नुकतंच गझल लिहिण्याचा एक प्रयत्न केला आहे. मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न केले., पण हवे तसे जमून येत नाहीये, तुम्ही प्रयत्न कराल काय ? जाणवले कि अनुवाद हे नुसते शाब्दिक असून चालणार नाही,
"ऐ ख़ुदा ना कर बेइज्जत इतना "
ऐ ख़ुदा ना कर बेइज्जत इतना
कि ज़ाहिद ही काफिर ना हो जाए
पढता रहा जो ता-उम्र तेरी इबादतें
जहन्नुम का हकदार ना हो जाए
फन जिसका था सिर्फ सच बयां करना
झूठखोरी मे ही मोहारत ना हो जाए
कंगरी कलेजे को रखे गरम बस इतना
कि दिल ही बेचिराख मेरा ना हो जाए
(शब्द संग्रह: ज़ाहिद = भक्त; क़ाफ़िर = नास्तिक ; फन = कौशल्य ; कांगरी = छोटी अशी अंगीठी जी कश्मीरी लोक हिवाळ्यात त्यांच्या पोशाखात धरतात छाती पाशी उष्ण राहावे म्हणून. )
प्रतिक्रिया
14 Sep 2016 - 10:29 pm | नरेंद्र गोळे
ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी ।
की भक्त नास्तिक न होऊन जावो ॥
जीवनभर जो पूजा शिकत आला ।
तो न नरकास पात्र होऊन जावो ॥
कौशल्य फक्त सत्य सांगणे ज्याचे ।
तो न कधी खोटारडा होऊन जावो ॥
कांगडी काळजास ऊब इतकी देवो ।
अंतरही बेचिराख न होऊन जावो ॥
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०९१४
14 Sep 2016 - 10:37 pm | निनाव
भाव अणिक शब्द दोन्हि जपले आहेत तुम्ही. सुन्दरच झाले आहे.
15 Sep 2016 - 12:06 am | संदीप डांगे
गोळे साहेबांचा अनुवादात हातखंडा, सटासट नेमके शब्द पूर्ण अर्थासकट.
.
15 Sep 2016 - 1:36 am | साहना
साष्टांग दंडवत !
16 Sep 2016 - 4:20 am | साहना
> ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी ।
नको ह्या शब्दामुळे हि गझल बनत नाही. हा एक शब्द बदलला तर परफेक्ट गझल होईल.
16 Sep 2016 - 8:24 am | जयन्त बा शिम्पि
ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी । च्या ऐवजी असे हवे
" ईश्वरा, अप्रतिष्ठा न व्हावी इतकी "