मुक्तक

समुद्रावरील पहिला दिवस-पुढे

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
17 Feb 2013 - 7:44 pm

क्षमा करा- . आज मुलुंड येथील स्वर झंकार चा तिसरा दिवस होता त्यात श्री जय तीर्थ मावुंडी यांचे अप्रतिम गायन आणि पंडित विश्वमोहन भट यांचे मोहन वीणा वादन होते म्हणून पहिला भाग घाईघाईत लिहून अर्धवट सोडल्याबद्दल.
असो

मुक्तकप्रकटन

समुद्रावरील पहिला दिवस

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
17 Feb 2013 - 11:52 am

१९८९ च्या पावसाळ्यातील (जूनमधील) हि गोष्ट आहे. मी इंटर्नशिप संपवून कुलाब्याच्या नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात

मुक्तकप्रकटन

शब्दचित्र (व्हॅलेंटाईन डे स्पेश्शल!)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
14 Feb 2013 - 3:57 pm

आजही माझा तिचे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न चालू होता
अगदी नेहमीसारखेच
आजही मी तसाच भांबावून नि:शब्द होतो
अगदी नेहमीसारखेच

कोणी किती गहरे असावे?

किती अलंकार शोधावे उपमांसाठी
किती वृत्ते धुंडाळावी लयीसाठी
कुठून आणावे रंग तुझे भाव रंगवण्यासाठी
कसे जमवावे शब्द तुला मांडण्यासाठी

न कळे हे नेमके माझेचं असे कां व्हावे?

शृंगारकविताप्रेमकाव्यमुक्तक

कागा रे कागा रे

प्रशु's picture
प्रशु in जनातलं, मनातलं
13 Feb 2013 - 10:17 pm

मरणसन्न अवस्थेत 'ती' पडलीय, पतीसह सासरच्या मंडळीनी तीचा त्याग केलाय. का? असा काय गुन्हा केलाय तिने तर तीने प्रेम केलय ते सुद्धा पाटलाच्या पोरावर!!! आणी साधसुधा नाहि हा लोकविलक्षण प्रेम केलय. पण तो तीचा प्रेमी सुद्धा आज तिच्यापाशी नाही. परंतु त्याला फक्त बघण्याची आस तीच्यात उरलीय, शरीराचे लचके तोडायला आलेल्या कावळ्यांना पण 'ती' हेच सांगतेय..
||कागारे कागारे मोरी इतनी अरज तोसे चुन चुन खाईंयो मांस | अरजीया रे खांयो ना दो नैना मोरे, खांयो ना दो नैना मोरे, पिया के मिलन की आस ||

मुक्तकप्रतिभा

जोरात उठते कळ....

अधिराज's picture
अधिराज in जे न देखे रवी...
13 Feb 2013 - 1:19 pm

आतल्या आत ढवळतं
आणि ज्जोरात उठते कळ
पण तिच्या मते आजकाल
मला लागलाय कवी चळ..

मग, ती समोर असली की
करतो थोडी वळवळ
आतली वेदना लपविण्यासाठी
आणतो उसनं बळ..

पण, ती ही अशी चलाख
गाठतेच माझ्या मनाचा तळ
म्हणते, बस्स झालं तुझं नाटक
नाहीतर मी काढीन इथून पळ..

माझे उर्मी दाबून ठेवण्याचे
प्रयत्न होतात निष्फळ
तिच्या ओरडण्याने भानावर येतो
पण जखम वाहत राहते भळभळ..

अरे, कविता म्हणजे नसते
प्रत्येकाच्या हातचा मळ
उगाच लिहावसं वाटलं म्हणून
सोडायचे शब्दांचे नळ..

मुक्तकसमाजजीवनमान

एक विमान हरवलेलं...

चावटमेला's picture
चावटमेला in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 12:48 am

झी मराठीवर दर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मधली सुट्टी नावाचा एक छान कार्यक्रम असतो. सलील कुलकर्णी अँकरींग करतो. वेगवेगळ्या गावांतील शाळांमध्ये जावून तिथल्या विद्यार्थ्यांशी एक सुंदर संवाद साधायचा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. एरवी तो सलील त्याच्या रिअ‍ॅलिटी शोज मधल्या भाषणांनी कधी कधी डोक्यात जातो, पण हा शो मात्र मला मनापासून आवडतो.तर,ह्या आठवड्याच्या भागात, सांगली जवळच्या एका खेडयातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शो होता. सलील चा नेहमीप्रमाणे मुलांशी संवाद सुरू होता.

मुक्तकप्रकटनविचारमत

कन्या रास/ ६ व्या घरातील शुक्र

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
8 Feb 2013 - 3:38 am

डिसक्लेमर - कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेले लोक हे अतिशय व्यग्र व कर्तव्यपरायण असतात. यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती ही "उपयोगी पडण्याकडे" खूप असते. पण ते रुक्ष नसतात, या ज्योतिषशास्त्राच्या समजूतीवर बेतलेला हा लेख असून ज्यांना ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी आताच दुसरा धागा उघडावा.

____________________________________________________________________

मुक्तकअनुभवमत

घर

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
7 Feb 2013 - 10:25 am

या घराला विचारले मी एकदा
असा रिकामा रिकामा असतोस
वाईट नाही वाटत?
क्षणभर विचार करून घर म्हणाले,
नाही, म्हणजे नेहमीच नाही
.
.
म्हणाले या भिंती पाहिल्यास
किती सुंदर रंग लेवून उभ्या आहेत
इकडे ये, या खिडक्या पहा
आपली कवाडे उलगडून उनपावसाला बोलावून आणताहेत
.
.
अन् ते दार बघितलेस
सताड उघडे, सगळे सामावून घ्यायला उत्सुक
येणार्‍याला खिडकीतून आलेला पाऊस विनामूल्य देणारे
वा सोनसळी उन्हाची खुशाल मेजवानी घालणारे
.
.
हे सगळे पहिले कि नाही वाईट वाटत
मी सुखावतो आणि आकंठ भरून जातो

करुणशांतरसकवितामुक्तक

स्वामिनी

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जनातलं, मनातलं
1 Feb 2013 - 7:36 pm

गविंच्या आदेशानुसार थोडं साध ललित लिहीता येत कां ते पाहतोय. किती जमलयं ते तुमच्या प्रतिसादांवरुन कळेलचं.

कवितामुक्तकरेखाटनप्रकटनविचारआस्वाद