मुक्तक

अश्वत्थामा

सुयशतात्या's picture
सुयशतात्या in जे न देखे रवी...
31 Mar 2013 - 1:53 am

या अश्वत्थामम्याला कुठे शोधू

तो एक पुण्यश्लोक माणूस

निर्दयी राजकारणी म्हणून हिणवलेला
एक न्यायी म्हणून नावाजलेला
मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या संधीशोधू राजकारण्या लोकांन मध्ये

ऊराशी खोल जखम झालेला
एकटे पणाशी नाते जोडून विरक्त झालेला
मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या विरक्ततेच्या पांघ्ररूणात लपलेल्या ढोंगी लोकांन मध्ये

रक्तपाताशी जवळचे नाते सांगणारा
कठोर म्हणून नावाजलेला
मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या संरक्षणाशी नाते असलेल्या ढोंगी लोकांन मध्ये

अमरतेचा शाप असणारा
भळभळणारी जखम बाळगणारा

करुणमुक्तक

रात्रीच्या पावसाने

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
28 Mar 2013 - 8:41 pm

काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
तुझ्या घरातील काही
गळक्या कौलांना वाहून
घेऊन आला
वाहत वाहत त्या कौलांनी
माझ्या घराशी आधार घेतला
त्यांनी माझ्या मनाचा
नकळत ठाव घेतला
.
.
पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही?
.
काल रात्रीच्या पावसाने
खूपच गोंधळ केला
.
सारे अंगण मनासारखेच
भिजवून गेला
भिजल्या मनाने भिजल्या अंगणात
जीव कासावीस झाला
अंगणातून कुंपणाजवळ
धावाधाव करत राहिला
.
.
घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही?
.

करुणकविताप्रेमकाव्यमुक्तक

तो हसत होता

निमिष ध.'s picture
निमिष ध. in जनातलं, मनातलं
27 Mar 2013 - 9:53 am

मी चालत होतो. भोवताली अंधार पडायला सुरुवात झाली होती. दिव्यांची लखलख होती पण हा भाग तसा अंधाराच होत. वातावरणात चांगलाच गारवा होता. थोड्यावेळापूर्वी पडलेल्या पावसामुळे पायवाट ओली होती. अंदाजे मैलावर असलेली प्रकाशाने न्हाहून निघालेली इमारत माझी मंझील होती. तिच्याकडे पाहत कशाचीही परवा न करता मी चालत होतो.

मुक्तकजीवनमानप्रवासदेशांतरप्रकटन

कोलाज

चावटमेला's picture
चावटमेला in जनातलं, मनातलं
25 Mar 2013 - 10:48 pm

शनिवारी सकाळी सहा चा गजर वाजतो. मी डोळे किलकिले करत उठतो, आज गावाला जायला निघायचंय. आई नेहमीप्रमाणे माझ्याही आधी उठलीये. गाडी साडेनऊला आहे. मी तोंड धुवून नेहमीप्रमाणे ग्राऊंड वर जायचा विचार करतो आणि बूट चढवून निघतो.

"लवकर ये रे..", आई जवळजवळ ओरडतेच.

मुक्तकविरंगुळा

जेम्स बाँडच्या ललना..

नानबा's picture
नानबा in काथ्याकूट
25 Mar 2013 - 9:09 am

जेम्स बाँड आणि त्याच्या चित्रपटांचा स्वतःचा चाहतावर्ग आहे. थंड डोक्याचे गुंड, "क्यू" ची भन्नाट उपकरणे, वेगवान गाड्या आणि मदमस्त बाँडबद्दल सगळीकडेच चर्चा होते. पण काही चाहत्यांचं बाँड बघण्याचं मुख्य कारण असणार्‍या बाँड ललनांबद्दल फारसं कोणी बोलत नाही. किंबहुना चित्रपटांमध्येसुद्धा त्या दिसतात काही ठराविक कारणांसाठीच. या धाग्यात आपल्याला आवडलेल्या बाँडललनांबद्दल काथ्या कुटूया. अगदी पहिला बाँडपट डॉ. नो मधल्या उर्सुला अ‍ॅनड्रेस पासून नुकत्याच आलेल्या स्कायफॉल मधल्या निओमी हॅरिस पर्यंत सगळ्यांबद्दल.

शब्द

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जनातलं, मनातलं
22 Mar 2013 - 6:07 pm

त्या दिवशी शब्द भेटले मला, विचारले त्यांना का रे हल्ली जास्त येत नाही तुम्ही माझ्याकडे?
तर म्हणाले, आम्ही तर रोज येतो, पण तूझेच लक्ष नसते आमच्याकडे, तुझी सखी तर अबोली आहे ना ,
पाहावे तर रोज असते तुझ्या ओठावर विसावलेली, मग आम्ही कुठे राहणार ? मग हळूच तुझ्या डोळ्यात विसावतो,
पण तू पण अशी आहेस ना, तुला उमजतच नाही, कोणी सोबत असताना शब्दांनी बोलतच नाहीस.
मग हळूंच आम्हाला वाट करून देतेस, एकटी असताना …
किती वेळा पहिले आम्ही स्वतःला आसवात बदलताना …

मुक्तक

नौदलातील आयुष्य -२

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
22 Mar 2013 - 2:01 pm

ही विक्रांत वरील सत्य गोष्ट आहे.
१९९० सालच्या मे महिन्यातील. आम्ही गोव्याच्या आसपास समुद्रात युद्ध सराव करीत होतो.

मुक्तकलेख

आभार

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
21 Mar 2013 - 1:51 pm

बर्‍याचशा समारंभात, शेवटी एक 'गोग्गोड' असा आभारप्रदर्शनाचा औपचारिक कार्यक्रम असतो. आता वय झाले की जुन्या आठवणी येणारच. अशा आठवणी उगाळत असताना एक विचार चमकून गेला की, आपला शेवट जवळ आला आहे अशी कल्पना केली तर मी देवाचे आणि इतरांचे आभार कसे मानीन? आणि तेही औपचारिक नव्हे तर मनापासून.

१. सर्वप्रथम, या जगांत मनुष्यप्राणी म्हणून जन्माला घातल्याबद्दल आभार.

२. त्यानंतर, एका चांगल्या, मध्यमवर्गीय घरांत, साधे जीवन आणि उच्च विचार करण्याची संवय लावल्याबद्दल त्या स्वर्गस्थ मातापित्यांचे आभार.

सीमारेषा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
20 Mar 2013 - 11:51 am

आहे आणि नाही यांच्या
सीमारेषेवर जगणे तसे
फार अवघड असते गं
------
श्वासाइतकीच सवयीची
झालेल्या तुझ्या आणि
माझ्यातील अंतर
आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे
एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही
आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित....
आहे आणि नाही यांच्या
सीमारेषेवर जगणे
फार अवघड असते गं
-------
सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात
तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात
कटलेल्या पतंगामागे धावण्यार्‍या मुलासारखा
मीही त्यांचा पाठलाग करत राहतो
मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय

करुणकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रश्न?

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जनातलं, मनातलं
18 Mar 2013 - 3:28 pm

खुप दिवसाने आज आरशात स्वतःला न्याहाळले.चेहरावरच्या सुरकुत्या खुप काही सांगून गेल्या. संसारात रमताना विसरलेल्या आठवणी जागवून गेल्या. डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळात माझे मी पण दडपले होत. ते शोधताना डोळ्यातुन एक स्वप्न पटकन निसटून गेल होत. नात्याची अनेक रूपे जगताना स्वताला कधी जगले ते आठ्वु लागले. दाट काळ्या मोकळ्या केसातुन तो एक केस पांढरा स्वतःची अनुभूती करवून देऊ लागला. भरलेल्या घरात असुनही का हि एकटेपणाची सल जाणवली. डोळ्यात हजारो स्वप्न असताना शून्यात गेलेली ती नजर आठवली. कधी घेतला होता मी मोकळा श्वास, कधी स्वताला शोधण्याचा हा केविलवाणा ध्यास. आहे सर्वाची मी, पण माझे असे कोण?

मुक्तकविचार