समुद्रावरील पहिला दिवस

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
17 Feb 2013 - 11:52 am

१९८९ च्या पावसाळ्यातील (जूनमधील) हि गोष्ट आहे. मी इंटर्नशिप संपवून कुलाब्याच्या नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात
काम करीत होतो आणि जवळच कमांड मेस मध्ये राहत होतो. रुग्णालयाचे कामाची वेळ सकाळी ७.३० ते १३.३० अशी असे तेंव्हा मला सकाळी ६.३० ला उठण्याची गरज पडे. एकेदिवशी पहाटे ०५.३० वाजता माझ्या खोलीवर टकटक झाले. पहिले तर एक नौसैनिक माझ्यासाठी एक बिनतारी संदेश घेऊन उभा होता. आदल्या दिवशी वादळ झाले होते त्यात बरेच कोळी लोक समुद्रात हरवले होते त्यांच्या शोधासाठी एक नौदलाचे पाण सुरुंग विरोधी जहाज (INS BEDI )बेदी साडे सहाला निघणार होते तेंव्हा मला घेऊन जाण्यासाठी ०६.०० ला नौदलाची जीप येईल तेंव्हा मला तयार राहण्याचा हुकुम होता.कितीदिवस आणि काय हे काहीच माहित नव्हते.मी उठलो, तोंड धुतले, अंघोळ केली आणि गणवेश घालून तयार झालो. तोवर जीप घेऊन नौदलाच एक सैनिक आलाच.
मी एक छोटीशी BAG घेऊन निघालो. म्युझियम जवळ लायन गेट मधून ती जीप आत नौसेना गोदीत शिरली आणि बेदी या जहाज जवळ पोहोचली.तेथे मी जहाजात शिरलो आणि शिडी जवळ उभ्या असलेल्या नौसैनिकाला माझा बिनतारी संदेश दाखवला. त्याने अदबीने मला कमांडिंग ऑफिसर च्या केबिन पाशी सोडले. कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कमांडर खन्ना म्हणून होता. मला पाहताच तो आनंदी झाला कारण ते जहाज फक्त माझी वाट पाहत थांबले होते. खन्ना साहेबाना विचारले कि हि कामगिरी काय आहे?ते म्हणाले कि काल झालेल्या वादळात बरेच मच्छीमार समुद्रात हरवले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी आपल्याला समुद्रात जायचे आहे.
मी विचारले कि बेदी का? त्यावर ते म्हणाले कि बेदी हि पाण सुरुंग विरोधी(MINESWEEPER) नौका आहे . त्यामुळे तिचा तळ अगदी रुंद आणि उथळ असतो( FLAT BOTTOM) त्यामुळे समुद्रात तरंगणार्या वस्तूला जास्त इजा पोहोचत नाही. आणि आपल्याकडे पृष्ठभाग मोजणारेSURFACE MAPPING रडार आहे त्यामुळे पाण्याच्या पृष्ठ भागावर तरंगणाऱ्या गोष्टी दिसू शकतात. कारण किती लोक समुद्रात तरंगत असतील ते आपल्याला माहित नाही. आपले मुख्य काम आहे कि छोट्याछोट्या मच्छीमार नौकांना सुरक्षित परत आणणे आणि समुद्रात तरंगणार्या मच्छीमार लोकांचा शोध घेऊन त्यांची माहिती नौदलाच्या हेलीकोप्टरला देणे म्हणजे ते त्यांना उचलून ताबडतोब किनार्यावर नेतील.डॉक्टर तू आता जाऊन तुझा दवाखाना बघून घे कारण पुढच्या २ते ३ मिनिटात आपण निघत आहोत.
हे ऐकून मी खालच्या डेक वर दवाखाना पाहण्यासाठी गेलो.
तो दवाखाना म्हणजे रेल्वेतील वातानुकुलीत दुसय्रा श्रेणीतील एका विभागा इतका छोटा होता त्यात वर एक आणि खाली एक असे दोन बेड होते आणि समोरच्या बाजूला औषधांची कपाटे होती.
त्यात काहीच पाहण्यासारखे नव्हते. आणि समुद्रातील माझा पहिलाच दिवस होता आणि मुंबई समुद्राच्या बाजूने बघण्याची माझी
पहिलीच वेळ होती म्हणून मी परत ब्रिज(नौका चालवण्याची जागा) वर आलो. तेवढ्या वेळात जहाजाची शिडी काढून घेतलेली होती. आणि आता सगळे दोर सोडून नौका निघण्याच्या तयारीत होती,. सकाळचे पावणे सात वाजले होते.बाहेरचे वातावरण ढगाळ होते आणि बारीक बारीक थेंब पडत होते सुर्य दिसत नव्हता. सूर्योदय झाला होता कि नव्हता हे कळण्यात येत नव्हते. परंतु पूर्वेला प्रकाश दिसत होता आणि पश्चिमेला मुंबई शहराचे दिवे असा फार छान देखावा होता.जहाजाचा खानसामा मला चहा पिण्यासाठी आणि नाश्त्या साठी खाली बोलावत होता. मी त्याला म्हटले कि थोड्या वेळाने येतो. भूक लागलेली होती कारण सकाळपासून काहीच पोटात गेलेले नव्हते परंतु आजूबाजूचा देखावा सोडून जाण्याचा मी विचार सुद्धा करू शकत नव्हतो
मी एकदम उल्हसित होऊन आजूबाजूला पाहत होतो. मुंबई बंदरातील खाडी च्या पाण्यातून जहाज मोठ्या डौलदार रीतीने जात होते. ठाणे खाडीपूल मागे लांबवर दिसत होता उजवीकडे शेअर बाजाराची, रिझर्व बँकेची उंच इमारत, पुढे कुलाब्याची दांडी दिसत होती. असस विहंगम देखावा फारच मनोहारी होता. पुढच्या काही मिनिटात जहाजाने कुलाब्याची दांडी ओलांडली आणि समुद्राचे रौद्र रूप दिसू लागले. लाटा १० फूट उंच होत्या त्यातून आमचे जहाज उथळ बुडाचे तेंव्हा ते डावी उजवी कडे ४५ अंशात डोलू लागले आणि माझ्या पोटात ढवळू लागले.
मी तरीहि थोडा धीर धरण्याचे ठरवले पण ज्या तर्हेने जहाज हलत होते मला तेथे उभे राहणे अशक्य झाले. मी घाई घाईने शिडी उतरून खाली दवाखान्याकडे आलो. तोवर माझ्या पोटात प्रचंड ढवळून आले आणि पूर्ण आतडी बाहेर येतात काय अशी शंका येईल इतकी जोरदार उलटी झाली. उल्तीत पाडण्यासाठी सुदैवाने पोटात काहीच नव्हते पण थोडे फार पोटात तयार झालेले आम्ल बाहेर आले. डोके जोरदार गरगरू लागले होते.आणी काय करावे सुचत नव्हते.
मी दवाखान्याच्या खालचा बेड वर आडवा पडलो आणी माझ्या वैद्यकीय मदतनीसाला अवोमीन(avomine)उलटी प्रतिबंधक) ची गोळी देण्यास सांगितले. ती गोळी मी तशीच जिभेखाली धरली कारण काही गिळले तर परतउलटी होण्याची शक्यता वाटत होती.
थोडय वेळापूर्वी वाटणारे समुद्र बद्दलचे आकर्षण पूर्ण नाहीसे झाले होते.
पुढे काय वाढून ठेवले होते ते काहीच कळत नव्हते.
क्रमश:

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मोदक's picture

17 Feb 2013 - 12:06 pm | मोदक

वाचतोय...

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

तुमचा अभिषेक's picture

17 Feb 2013 - 12:21 pm | तुमचा अभिषेक

येऊ द्या पटापट पुढचाही अनुभव..

रामदास's picture

17 Feb 2013 - 12:43 pm | रामदास

ऊत्कंठा वाढते आहे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Feb 2013 - 1:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे

माझीपण :-)

अमोल खरे's picture

17 Feb 2013 - 5:57 pm | अमोल खरे

कठीण आहे समुद्रावरचे जीवन. लवकर पुढचा भाग टाका.

अन्या दातार's picture

17 Feb 2013 - 6:02 pm | अन्या दातार

और आनदो.

भटक्य आणि उनाड's picture

17 Feb 2013 - 1:44 pm | भटक्य आणि उनाड

sea sickness अनुभवला आहे. येऊ द्या पटापट !!

जरा भाग मोठ्ठे येवु द्यात !

स्पंदना's picture

17 Feb 2013 - 3:28 pm | स्पंदना

सी सिकनेस ! आई ग्ग! अस उडुन पडते की काय झाल होत मला बिनतानला जाताना. डेंजरस फिलींग. सुटका नसल्यासारखे गप बसुन उलटत रहायचे.

पुढचा भाग येउ दे लवकर.

दादा कोंडके's picture

17 Feb 2013 - 3:31 pm | दादा कोंडके

पहिल्या दिवशी डॉक्टरच आजारी पडले की! दुसर्‍या दिवसाची वाट बघतोय.

अग्निकोल्हा's picture

17 Feb 2013 - 6:14 pm | अग्निकोल्हा

फार चान सुरुवात.

शुचि's picture

17 Feb 2013 - 6:36 pm | शुचि

वाचते आहे.

पैसा's picture

17 Feb 2013 - 9:24 pm | पैसा

पुढचा भाग!

रेवती's picture

18 Feb 2013 - 5:01 am | रेवती

वाचतिये

एकदम थरारक अंगाने लेखन जाणार. आम्हाला माहीत नसलेले आयुष्य आहे हे.

अच्छा म्हणजे अ‍ॅवोमिन इथंही प्रसिद्ध आहे तर.

अनन्न्या's picture

18 Feb 2013 - 5:16 pm | अनन्न्या

पुढ्च्या भागाची वाट पाह्तोय.

अनन्न्या's picture

18 Feb 2013 - 5:17 pm | अनन्न्या

पुढ्च्या भागाची वाट पाहतेय, असे टंकायचे होते.

तर्री's picture

18 Feb 2013 - 5:26 pm | तर्री

वेगळ्या विषयावरचे हे लेखन आवडले. पुढे काही थरार , साहस , निसर्ग कोप असणार असे दिसते आहे . म्हणून पु.भा.प्र.

सुबोध खरे's picture

18 Feb 2013 - 8:46 pm | सुबोध खरे

समुद्रावरील पहिला दिवस- पुढे असा दुसराभाग लिहिला आहे