प्रारब्ध
आर्यावर्तात कुणा एके काळी एक गरीब शेतकरी होता. त्याची एक सर्वसाधारण मुलगी होती. आई लहानपणातच मेली आणि गावांत साथ येऊन असंख्य लोक मेले आणि शेतकऱ्याला आपल्या पोरीला घेऊन गांव सोडावा लागला. बरोबर एक बैल आणि मोजकेच सामान घेऊन बाप लेक लाचारीने आणि भुकेने सर्वत्र फिरत होते. मुलगी लग्नाची झाली होती, वयात आली होती त्यामुळे तिचे शिलरक्षण हि सुद्धा चिंता होतीच. अश्यांतच बापाला ताप आला. आपण आणखीन जास्त दिवस जगणार नाही हि जाणीव झाली. मुलीचे काय होईल ह्या चिंतेने त्या बापाची घालमेल आणखी वाढली.