संगीत प्र(या)वास

लेखनविषय:
अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच (त्याचं ते आडनाव नसलं तरी) तो माझ्यावर खार खायचा. माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला पटकन सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले.

गो केकू गो! -२

लेखनविषय:
“मुरुगन, यू देअर? ऐक तुझ्यासाठी काम आहे. प्लान असा आहे, मुंबई वरून अमेरिका, अमेरिकेतून दुबई, दुबईतून इराक, इराक मधून उझबेकिस्तान. तिकडून अफगाणिस्तान नंतर आउटर मंगोलिया, मधेच एक वेळ ऑस्ट्रेलिया, पुन्हा अफगाणिस्तान...” एव्हढे आढेवेढे, एव्हढा द्राविडी प्राणायाम. ग्रेमॅनचे प्लानिंग हे असं असतं. केकूही आता शिकलाय. किराणा भुसार दुकानात तो हेच डावपेच वापरतो. आधी हवा पाण्याच्या गप्पा. नंतर लक्स, पार्ले-जी, शाम्पूचे सशे अशी सटर फटर स्टेशन घेत गाडी एकदम बासमती तांदुळावर, “बासमती काय भाव?” दुकानदार चमकून खरा भाव बोलून जातो. असो. “ते समजलं. शेवटी कुठे जायचं ते बोला.” “ओके, शेवटी पाकिस्तान.

कथेला नाव सुचवा

लेखनविषय:
लेखनप्रकार
बऱ्याच दिवसांनी टेकडीवर मॉर्निंग वॉक ला आलो होतो. थोडी चढण मग थोडीफार सपाटी, पुन्हा चढण आणि वर पठार. पठारावर तास भर चाललं कि घरच्या वाटेला लागणं हा कोव्हीड आधीचा नित्यक्रम होता. कोव्हीड मध्ये व्हेंटिलेटर वरून सुखरूप आलोय. अजूनही काही त्रास आहेत असे वाटते. आधीचा तोच स्टॅमिना परत कमावण्यासाठी टेकडीवरचा मॉर्निंग वॉक पुन्हा सुरु केला. लोकसहभागातून आधीची माळरान टेकडी भरपूर झाडे लावून फुलवलेली दिसली. लौकर उगवणारी, मोठी होणारी बरीच झाडं नजरेस पडली. निरनिराळे पक्षी त्यांचे मनमोहक आवाज सारं काही सुखावणारं होतं. टेकडीवर, टप्या टप्यावर ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवलेल्या दिसल्या.

गो केकू गो! -१

लेखनविषय:
गो केकू गो! “रावडी केशव कुलकर्णी(केकू)” Fully Configured. Level 3 entered. Scene 1. ready to go. Start New Session. ID No. ID zx 120 2792023 T=00 “Go Keku. Go.” बत्तीसगडचा राजवाडा. राजकुंवर केशव कोचावर पहुडले आहेत. पायाशी एक क्लास वन दासी केशवच्या पायाच्या नखांना पॉलिश करून “सर” आणत आहे. केशव विचार करतोय. काल रात्री तर हीच होती ना. हीचं नाव काय बरं असावं? काही का असेना. दिसायला काही वाईट नव्हती. गोरा पान रंग. चाफेकळी अपरं नाक. कुरळे कुरळे काळे भोर लांबसडक केस. पण केशव अफाट बोअर्ड. सुंदर सुंदर ललना ही नेहमीची गोष्ट झाली होती.

पीए नामा: किस्सा ए साक्षर अशिक्षिताचा

लेखनविषय:
लेखनप्रकार
(काल्पनिक किस्सा) हा दहा बारा वर्षांपूर्वीचा किस्सा. आपल्या देशात बी.टेक + एमबीए केल्यावर ही जर केम्पस सिलेक्शन झाले नाही, तर उत्तम पगाराची नौकरी मिळणे अवघड. याशिवाय सप्लाय ही डिमांड पेक्षा भरपूर जास्त आहे. अधिकांश तरुणांना कमी पगारावर नौकरी करावी लागते. त्याने कमी पगाराची नौकरी करण्यापेक्षा जास्त पगाराच्या सरकारी नौकरीसाठी तैयारी सुरू केली आणि त्याला सरकारी नोकरी लागली. त्याच्या सेक्शन मध्ये साहजिकच तो सर्वात जास्त साक्षर होता. सेक्शन ऑफिसर ही त्याच्या पेक्षा कमी साक्षर होता. सेक्शन मधल्या समस्यांचे समाधान करत कार्य करणे/कर्मचाऱ्यांकडून करवून हे सेक्शन ऑफिसरचे दायित्व असते.

हे वाचा: बगळा

Bagla कटाक्ष- लेखक: प्रसाद कुमठेकर प्रकाशन: पार पब्लिकेशन्स पहिली आवृत्ती: २०१६ पृष्ठे: १५८ किंमत: ₹३०० ओळख- चिंतामणप्रसाद पुरुषोत्तम सरदेशमुख, पाचवी 'क'.

वाईट झालं

लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वतःच्या महागड्या गाडीत बसून, पाणावलेल्या डोळ्यांनी श्रवण चितेकडे बघत होता. माझ्यापेक्षा वयाने थोडासाच मोठा पण परिस्थितीमुळे लौकरच मोठा झालेला. नवऱ्याच्या बेताल स्वभावाला वैतागलेली सासुरवाशीण आपल्या तिन्ही मुलांना घेऊन माहेरी आली. सणावाराला आले की अगदी डोक्यावर घेणारे मामा-मामी आता वेगळे वागताहेत हे पाचवीतल्या श्रवणला लगेच कळले. मामांबरोबर शेतात जाऊ लागला. सगळं शेत, गोठा, गुरं आवरूनच घरी यायचा. अधे मध्ये येऊन तरी काय करणार होता. आई बिगारीवर जायची. घरी आलं कि घरची कामं काही ना काही असायचीच त्यापेक्षा गुरं, झाडं, रोपं त्याला जवळ करायची.

नाईन इलेव्हन - Twin To-Worse: भाग १

लेखनविषय:
लेखनप्रकार

लहानपणापासूनच आयुष्यात अनेक दुःखदायक प्रसंगांना सामोरे गेलेल्या सोफीया डंकवर्थच्या आयुष्यात सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकाला १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मानाचा समजला जाणारा 'नॅशनल बुक अवॉर्ड' जाहीर झाल्या दिवसानंतर उण्यापुऱ्या दहा महिन्यांनी आज आणखीन एक अभिमानास्पद आणि आनंददायी असा दिवस आला होता.

असाही एक वेडपट दिवस.

लेखनविषय:
असाही एक वेडपट दिवस. आज रविवार होता. गेले दहा पंधरा दिवस बायको माझ्या बरोबर अजिबात भांडली नव्हती. माझ्या माहेरच्या मंडळींची तिला एकदाही आठवण झाली नव्हती. आमच्या कुटुंबाच्या सुखाच्या घडाळ्याचे तीनही काटे म्हणजे तास मिनिट आणि सेकंद काटे घडाळ्याप्रमाणे क्लॉकवाईज फिरत होते. एव्हढेच नव्हे तर तासकाटा एका तासाला एक तास, मिनिटकाट एका मिनिटाला एक मिनिट आणि छोटा सेकंद काटा एका सेकंदाला एक सेकंद ह्या गतीने फिरत होते. नाहीतर इतर वेळी तास काटा आणि मिनिट काटा उलट सुलट आणि वाटेल त्या गतीने फिरत असतात. असो असा योग क्वचितच येणार.

तो खून, ती बाई आणि 'ते' पत्र

लेखनविषय:
लेखनप्रकार
सन २०२१च्या जून ते ऑगस्ट या कालावधीत वाचकांना विदेशी साहित्यातील काही गाजलेल्या निवडक कथांचा आणि कथा लेखकांचा परिचय लेखमालेतून करून दिला होता. या लेखातून अशाच एका गाजलेल्या विदेशी दीर्घकथेचा परिचय करून देतो. शतकापूर्वीच्या त्या कथेपर्यंत जायला काही निमित्त घडले. सध्याचे मलेशियातील लेखक Tan Twan Eng या लेखकांचे 'द हाऊस ऑफ डोअर्स' हे पुस्तक बहुचर्चित असून संभाव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी त्याचा बोलबाला झाला आहे.
Subscribe to कथा