नकोसा (भाषांतर)
"मला वाटतं, तुला खरंच वेड लागलं असलं पाहिजे. अशा हवेत फिरायला जायचंय तुला? गेले दोन महिने बघतोय, काहीतरी विचित्र कल्पना येताहेत तुझ्या डोक्यात. माझ्या इच्छेविरुद्ध मला समुद्रकिनाऱ्यावर आणलंस. आपल्या लग्नाला चव्वेचाळीस वर्षं झाली, पण इतक्या वर्षांत कधी असली लहर आली नव्हती तुला! त्यातून गाव कोणतं निवडलंस, तर फेकाम्प. कसलं बेक्कार कंटाळवाणं आहे हे गाव. मला विचारायचंस तरी आधी. आता काय तर म्हणे, गावात फिरायला जाऊ. एरव्ही कधी पायी चालत नाहीस ती! दिवस तरी कोणता निवडला आहेस? वर्षात कधी नसतो इतका उकाडा आहे आज. जा, त्या द अप्रवॅलला विचार . तू सांगशील ते करायला तयार असतो तो.
