अलक
अलक 1
"करावं तसं भरावं", या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेलं वाक्य. सहजच बसस्टॉपवर पुस्तकं विकणार्या मुलाकडून चार पुस्तकं घेतली. माझ्या घरी मी एकटाच. कामवाल्या मावशीच्या मुलांना देऊन टाकली. दोन दिवसांनी त्याच्याकडून फुगे घेतले,ऑफिसमधल्या मैत्रिणीला दिले. अशीच ओळख वाढत राहिली. काही विशेष करत नव्हतो मी. दोन दिवस ताप आला. कामवाल्या मावशी कपडे भांडीच काय दोन वेळचं जेवण पण करून गेल्या. ऑफिसलातली मैत्रिण येऊन डाॅक्टरकडे घेऊन गेली. आणि तोच बसस्टॉपवरचा मुलगा, घर शोधत आला. आज तो फुलं विकत होता. चौकशी करून जाताना चार फुलं टेबलावर ठेऊन गेला. मी करत गेलो, ते माझी ओंजळ भरत गेले.