धारावाहिक भयकथा : तृष्णा - भाग १
रात्रीचे २ वाजले होते. संदीप आपल्या गाडींत कुडकुडत बसला होता. समोरील रस्ता सुनसान असला तरी एक श्वान पथदिपाच्या खाली शेपूट हलवत पडले होते. आजूबाजूच्या छोट्या इमारती अगदी मृतवत शांत होत्या. चुकूनच एखाद्याने गॅलरीतील दिवा चालू ठेवला होता. संदीपच्या हृदयाची धकधक वाढत चालली होती. डाव्या बाजूच्या स्मशानाची गेट बंद होती. त्याने हातातील फोन कडे पहिले. चित्राला पुन्हा एकदा फोन करू का ? तिच्या कडे बोलताच त्याच्या मनात अवसान उत्पन्न झाले असते. उजव्या बाजूला पर्वतावर वाहने अजून चालू होती.त्यांचा उजेड इतक्या दुरून काजव्यांच्या शिस्तबद्ध हालचालीपरामें वाटत होता.