रविवार आणि खून का बदला खून

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
24 Jul 2022 - 1:04 pm

आज रविवार..
आज कामाचा कंटाळा........... आलाय, आज तु स्वयंपाक बनव ना !
अगं कंटाळा आलाय तर नको करु स्वयंपाक. आज आपण बाहेर जेवायला जाऊया.
नक्को. रविवारी मंदिराबाहेर भिकार्‍यांची गर्दी असते त्यापेक्षा जास्त हॉटेलबाहेर टेबल रिकामं होण्याची वाट बघणार्‍यांची गर्दी असते.
मग आपण पार्सल मागवूया का ?
नक्को. पार्सल पण फार उशीरा येतं आणि ते पदार्थ पण थंड झालेले असतात.
मग काय करायचं ?
तुला जेवायचं असतं तेव्हा मी तुला हॉटेलचा पर्याय देते काय ? घरी जेवण बनवते ना ? मुझे खून का बदला खून से चाहिए |
हट पगली, ऑख के बदले ऑख मांगोगी तो पुरी दुनिया अंधी हो जायेगी !
एवढा वाद घालायच्या वेळात मस्त खिचडी भात बनवून झाला असता.
ठीक आहे. मी खिचडी भात बनवतो. सोबत दही किंवा ताक घेऊ. आणि मी भांडी पण घासतो आज.
मस्तच रे माझ्या राजा. चल मी तुला डाळ, तांदूळ निवडून देते.
बायकोला डाळ, तांदूळ निवडायच्या कामाला लावून मी मस्त बायकोच्या जीवावर मजा मारणार.
रविवारची दुपार डोळ्यांवर झापड घेऊन आलीय.
झोपा आता. गुडनाईट !

(थोडे सत्य आणि थोडे काल्पनिक. नावाला जागून 'नरो वा कुंजरो वा' भुमिका घेतलीच पाहिजे कधी कधी)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

24 Jul 2022 - 5:05 pm | मुक्त विहारि

कधीही आणि केंव्हाही ....

My All Time Favourite

कर्नलतपस्वी's picture

24 Jul 2022 - 6:26 pm | कर्नलतपस्वी

छान आहे,एकमेका साह्य करू.

'खून का बदला' पासून सुरू होऊन 'खिचडी' वर येऊन थांबलेला प्रवास आवडला.

धर्मराजमुटके's picture

22 Sep 2023 - 8:15 pm | धर्मराजमुटके

बापरे ! तब्बल एक-सव्वा वर्षांनी लेखावर प्रतिक्रिया मिळाली :)
कुठे सापडला तुम्हाला हा ? मी तर विसरुनच गेलो होतो.