लघुकथा
लघुकथा
अलक 1
आजोबांपासून चालत आलेला गाण्याचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेतोय याबद्दल गायत्रीताईना समाधान होते. एवढंच नव्हे तर पंतांची मुलगी अशी ओळख संपून गायत्री दांडेकर अशी ओळख निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो याचा त्यांना अभिमानच होता. पण एक खंत मात्र होती. प्रेमाने ज्याच नाव त्यांनी गंधार ठेवलं होतं, दुर्दैवाने तो मुलगा मुका होता. आपला कलेचा वारसा इथेच संपला या जाणीवेने त्या अस्वस्थ होत. पण वयाच्या तिसर्या वर्षापासून गंधार आई रियाजाला बसली कि समोर बसायचा. खरं तर गायत्रीताईना ते आवडायचं नाही. पण आधीच व्यंग असलेल्या मुलाला आणखी काय बोलणार म्हणून सोडून द्यायच्या.