कथा

जाणीव ,नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
16 Mar 2022 - 4:01 pm

पहाटे म्हणा किंवा सकाळी म्हणा सहा वाजले की तात्याचा मोबाइल तात्याला विसाव्या शतकातील गोड गोड गाणी ऐकवून जागा करतो. तुम्ही काहीही म्हणा पण तात्याला स्वतःला विसाव्या शतकातील गाणी फार आवडतात. त्या वेळी कोणी लता मंगेशकर नावाच्या एक गायिका होत्या त्यांचा गळा गोड होता. त्यांनी गायिलेल्या बऱ्याच गाण्यांचा संग्रह तात्याकडे आहे. हा गाण्यांचा संग्रह तात्याला कसा मिळाला? सगळं सांगत बसलो तर वेळ लागेल. पुन्हा केव्हातरी.

कथा

माझी राधा - २

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
14 Mar 2022 - 11:50 pm

न ठरवताही अचानक कोमल ऋषभ स्वर येवून जातो. जीव कसावीस करणारा हा स्वर.एक तर तन्मय होऊन आसपासाच्या जगाला विसरून उत्कटतेने वाजवत रहावे किंवा सर्वसंग परित्याग करून दूर कुठेतरी निघून जावे अशी काहीशी भावना जागवणारा हा स्वर.

कथाविरंगुळा

B A T A

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
14 Mar 2022 - 1:45 pm

B A T A

बबड्या बाबांच्या कुशीत शिरला. बबड्या दिवसभर न्यूटन, आईनस्टाईन, हायझेनबर्ग, स्क्रोडींजर, नील्स भोर, झेलींजर वा फाईनमन ह्यांच्या बरोबर गप्पा मारण्यात गुंग असला तरी रात्र झाली की त्याला बाबांची कुशी आठवत असे.
“बाबा, गोष्ट सांगा ना.”
“ठीक आहे. ऐक, एक होता राजा-------“ गोष्ट ऐकता ऐकता बबड्या केव्हाच झोपी गेला.

“समोरच्या फ्लॅटमध्ये कोणीतरी रहायला येणार आहे.” रामभाउंनी बोलता बोलता बायकोला म्हणजे पुष्पाला सांगितले.

कथा

माझी राधा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
12 Mar 2022 - 9:00 am

उत्तरात्र झाली आहे. कसल्याशा चाहुलीमुळे मी जागा झालो आहे.
उत्तररात्रीच्या त्या शांत वातावरणात रातकिड्यांच्या आवाजाशिवाय दुसरा कसलाच आवाज नाही. नाही म्हणायला दूरवरून अस्पष्ट ऐकू येणारी समुद्राची गाज ऐकू येतेय.
गवाक्षाबाहेरून येणारा प्राजक्ताच्या फुलांचा गंध वातावरणातील प्रसन्नता आणखीनच वाढवतोय.
इतक्या शांततेची सवय जवळजवळ संपलीच आहे. आजकाल वेळच कुठे असतो शांततेसाठी आपल्या कडे. दिवसभर काही ना काही चालूच असतं. कोणी ना कोणी सोबत असतंच. आपण एकटे असे नसतोच कधी.

कथाविरंगुळा

भटकंती.....

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जनातलं, मनातलं
11 Mar 2022 - 5:56 pm

"घरातून बाहेर पडलास तर तंगड्या तोडून हातात देईन," आईनं दम दिलेला. दम देण्याची तिची ही नेहमीची पद्धत. मला माहित होतं आपल्या तंगड्या बिंगड्या काही तूटणार नाहीत, पण रट्टे पडतील या भीतीने डोळे बंद करून खाटेवर नुसता पडून होतो. डोळ्यासमोर दिसत होते उनाडक्या करत हिंडणारे मित्र. कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नव्हती. दुपार चांगलीच तापली होती.संध्याकाळी झाडांना गदगदा हलवणारा वारा म्हाताऱ्या माणसासारखा कुठेतरी झोप काढत असावा. कूस बदलावी तशी झाडाची पानं मधूनच हलू लागायची अन् वाटायचं वाऱ्याची गार झुळूक अंगाला स्पर्श करून जाईल. पण, तसं होत नव्हतं. खूपच उकडत होतं.

कथाप्रकटनविरंगुळा

कार्नेगी देवाची कहाणी

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
28 Feb 2022 - 9:37 am

ऐका देवा महाराजा कार्नेगी देवा तुमची कहाणी. एक आटपाट मेट्रो महानगर होते. तेथे एक राजा राज्य करत नव्हता. त्याला दोन राण्या नव्हत्या. एक आवडती नव्हती आणि एक नावडती नव्हती. कारण तेथे लोकशाही नांदत होती. त्या लोकशाहीची व्याख्या अशी होती Democracy is a government off the people, buy the people and far from the people.

कथा

मी मोठा झालो.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जनातलं, मनातलं
25 Feb 2022 - 9:44 am

संध्याकाळी शाळेतून आल्यावर, हात-पाय धूऊन चहा पीत होतो, तेवढ्यात संज्या निरोप घेऊन आला..
"गुरं बाहेर काढताहेत, तुला बोलावलंय!
"थांब जरा," मी म्हणालो.
आईला संज्यासाठी चहा आणायला सांगून, जावं कि, न जावं, या विचारात बुडून गेलो. शाळेचा गृहपाठ करायचा होता. तिकडं गेलो तर बराच उशीर होणार. माझं दहावीचं वर्ष, शाळेच्या पहिल्याच दिवशी सरांनी भलं मोठं भाषण दिलेलं,

वाङ्मयकथाप्रकटनलेखविरंगुळा

तू माझा कैवारी.

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
21 Feb 2022 - 8:04 pm

तू माझा कैवारी.

सात साडे सात वाजले असावेत. सावंतांची एस टी फलाटाला लागली होती. पण कंडक्टर ड्रायवर चहा प्यायला गेले होते. साधी लाल गाडीच होती. त्यामुळे कुणाला काही घाई नव्हती. प्रवासी तसे थोडकेच होते. खिडकीपाशी बसायला मिळावे म्हणून सगळ्यांची गाडीत घुसण्याची घाई, पण बसचा दरवाजा काही उघडेना.

“दरवाजा लॉक झाला जणू”. कोणीतरी रिमार्क टाकला.

“अहो उघडेल की. जरा हैय्या म्हणून जोर लावा.”

“सगळा अनागोंदी भोंगळ सरकारी कारभार. साधा एस टीचा दरवाजा...... ”

“रायटिंग मध्ये तक्रार करायला पाहिजे. साल्यांना ##त लाथा घालायला पाहिजेत.”

कथा

संवाद

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
21 Feb 2022 - 12:46 am

तिचं ऑफिस सातव्या मजल्यावर, त्याचं दहाव्या. सकाळचे ८. नवीन नोकरीचा अतिउत्साह. फक्त दोघेच ऑनलाईन दिसत होते ऑफिस गृपवर. दोघांनाही आश्चर्य वाटलं.

त्याने मोठ्या उत्स्फूर्तपणे आणि हसून लिहिलं, "माझ्याशी स्पर्धा?"

तिचा बराच वेळ रिप्लाय नाही. तो कामात पुन्हा दंग. काही वेळातच ती समोर उभी राहिली, सुंदर हास्य, बोलके डोळे आणि उत्साह घेऊन. त्याचं अर्ध लक्ष कामात.

"कॉफी घेऊयात?", ती म्हणाली.

त्याला काही सुचेना, "तू पुढे हो, मी आलोच हे थोडंसं काम संपवून."

ती मागे वळून पाहत पाहत पोहोचली पँट्री मधे.
छान गाणं गुणगुणत होती ती, कॉफी घेता घेता.

कथा