ही कथा पाचहजार वर्षांपूर्वी मीच लिहिलेल्या ‘रोबोट: कथा आणि व्यथा’ ह्या कथा संग्रहातून घेतली आहे. हा कथासंग्रह पाचव्या मितीत( Fifth Dimension) असल्यामुळे वाचकांना तो डाउनलोड करणे शक्य नाही. मीच इथे लिहित जाईन. रोबोही आता पाचव्या मितीत निघून गेले आहेत.
तर मानव हे रोबोटपासून उत्क्रांत झाले ह्या रोबोर्वीन नावाच्या शास्त्रज्ञाच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे.
मानवाचे प्रोग्रामिंग त्याच्या जन्मापासूनसुरु होते. आधी नातेवाइक, मग शाळा, नंतर समाज हे महत्कार्य करत असतात. खर तर लहान मुले ही आइन्स्टाइन पेक्षा महान शास्त्रज्ञ, शेक्सपिअरपेक्षा महान लेखक असतात. त्यांचा सगळीकडे मुक्त संचार असतो. पण समाजाला हे परवडण्यासारखे नसते. त्यांच्या प्रतिभेला खच्ची करण्याची महत्वाची जबाबदारी शाळांवर असते. लहान मुलगी बारा तेरा वर्षांची होते तोपर्यंत ही प्रक्रिया जवळ जवळ पूर्ण होते. त्यांच्यावर देव, धर्म, राष्ट्र, समाज, रूढी, रिती, जात पात ह्यांची जाणीव करून दिली जाते. हे प्रोग्रामिंग मानव बी इ, एम बी ए वगैरे पर्यंत पूर्ण होतं.
हे कशासाठी करावे लागते? कारण कारखाने, राजकारण इत्यादींसाठी रोबोंटची नितांत गरज असते ती पुरी करण्यासाठी!
हे रोबोटमानव मग वरून एक कमांड आली की त्याप्रमाणे वागतात. ते ठराविक प्रसंगी हसतात, रागावतात, गहिवरून रडतात, एकत्र येऊन मोर्चां काढतात, जस ज्याचे प्रोग्रामिंग तसे त्याचे वागणे. आणि अखेर हे सगळे विसरून रात्री......
मग नविन रोबोटमानवाचा जन्म होतो.तर अशी विश्वाची आणि रोबोंच्या छटाक आयुष्याची, अदपाव सुखाची आणि मणभर दुःखाची सुरुवात झाली.
रोबोंटची उत्क्रांती होतच राहील.
त्यातून महारोबोट निर्माण होतील. ते स्वतःला रोबोट सेपियंस म्हणवून घेतील.
रोबोट सेपियंसच्या उत्क्रांतीचा पुढील टप्पा म्हणजे होमो सेपयंस. होमो सेपयंस म्हणजे शहाणा माणूस! ही शहाणी माणसं त्यांच्या सर्वांचा रक्षणकर्ता, विश्वाचा चालक, मालक, पालक आहे त्या महान अतिसंगणकाला विसरतील........” ते भूतकाळ विसरतील. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागतील. जणुकाय नवीन शोध लावला ह्या कल्पनेने रोबोंटचा पुनराविष्कार करतील. प्रत्येक कामासाठी रोबोंटना राबवतील! स्वतः मात्र ऐशोआरामाचे जीवन जगतील. आपल्या अवयवांचा उपयोग न केल्यामुळे हात, पाय, कान, नाक, डोळे हे अवयव झडून जातील. सरते शेवटी शरीर, मन आणि प्रोसेसर विरहित होमो सेपिअन विचारस्वरुपात पृथ्वीवर भटकत राहतील. आणि त्यांची जागा देवानाम्प्रियदर्शी मत्प्रिय रोबोट घेतील. अश्या तऱ्हने रोबोटस शॅल इनहेरीट द अर्थ!!”
पहा पटते आहे का. नाही पटणार कारण दहावी पास आणि बारावी नापास लेखकावर कोण विश्वास ठेवणार हो?
देवा, त्यांना क्षमा कर. कारण तो त्यांचा दोष नाही. ते त्यांच्या प्रोग्रामिंगचे बळी आहेत!
प्रतिक्रिया
9 Feb 2023 - 11:18 am | कर्नलतपस्वी
सरते शेवटी शरीर, मन आणि प्रोसेसर विरहित होमो सेपिअन विचारस्वरुपात पृथ्वीवर
अशीच एक कथा लहान असताना वाचली होती. लहान म्हणजे साठ वर्षापुर्वी. एका ट्यांक मधे अक्टोपस सारखे पेशी तरंगत होत्या,त्या पेशी म्हणजे मनुष्याचा ब्रेन,इतर अवयव नव्हते. त्या सर्व जगातील व अंतराळात असलेल्या अशाच पेशींबरोबर संपर्क साधत होत्या व आणखीनही बरेच काही लिहीले होते. माझ्या बालबुद्धीला एवढेच समजले व लक्षात राहीले.
छान कथा.
9 Feb 2023 - 11:34 am | कुमार१
छान कथा.
9 Feb 2023 - 11:49 am | राजेंद्र मेहेंदळे
विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥
हरू जाळितो लोक संहारकाळी।
परी शेवटी शंकरा कोण जाळी॥
कथा आवडली.
10 Feb 2023 - 10:49 pm | चित्रगुप्त
कथा आवडली. मनाचे श्लोक थोरच.
10 Feb 2023 - 11:02 pm | चित्रगुप्त
'रोबोट' या शब्दाबद्दल माहिती हुडकता खालील मिळाले:
Robot is drawn from an old Church Slavonic word, robota, for “servitude,” “forced labor” or “drudgery.” The word, which also has cognates in German, Russian, Polish and Czech, was a product of the central European system of serfdom by which a tenant's rent was paid for in forced labor or service.
In 1920, the RUR play by Czechoslovakian author Karel Čapek was published, who coined the term robot.
The first digitally operated and programmable robot was invented by George Devol in 1954 and was ultimately called the Unimate. This ultimately laid the foundations of the modern robotics industry.
Gynoids are humanoid robots that are gendered feminine. They appear widely in science fiction film and art. They are also known as female androids, female robots or fembots, although some media have used other terms such as robotess, cyberdoll, "skin-job", or Replicant.
11 Feb 2023 - 2:15 pm | सिरुसेरि
छान लेखन . रोबोटवर आधारीत एक फॅनफिक्शन लिहिण्याचा पुर्वी प्रयत्न केला होता https://www.misalpav.com/node/39435 . आवडली तर जरुर कळवा.
11 Feb 2023 - 4:07 pm | भागो
मस्त जमलीय .आवडलीच.