खडपाकोळी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
3 Jul 2025 - 11:57 am

चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी
राखू कशी, अंगावरली ?
राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!!

कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील.

सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो.

मुक्तकआस्वादअनुभव

स्वार्थी फुलांचा परमार्थ

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
2 Jul 2025 - 6:07 pm

हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की,

ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच!

मुक्तक

पार

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
2 Jul 2025 - 1:09 pm

जनुकांचा जिना सोसे
प्रसवाच्या कळा
श्रवणाच्या पार उभा
अनाहत निळा

प्रतिबिंब जाऊ पाहे
बिंबाच्याही पार
उडोनिया पारा उरे
काच आरपार

पिंपळाच्या पारापाशी
खोरणात दिवा
लावण्यास कोण येते
घोर लागे जीवा

नक्षत्रांच्या पार जाई
मिथकांचा पैस
सृजनाच्या कल्लोळात
सावरून बैस

शब्दांच्याही पार ओळ
कवितेची गेली
लुटुपुटू राजा खेळे
तरी भातुकली

मुक्तक

काल पाकिट रिकामे केले..

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
2 Jul 2025 - 8:16 am

काल पाकिट रिकामे केले..

पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता.

कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला..

गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली.
एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते.
एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला..
आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही.

वाङ्मय

पहिलीपासून हिंदी निर्णय की राजकीय हत्यार ?

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
30 Jun 2025 - 10:01 pm

तुम जिस स्कूल मे पढते हो उसके देवाभाऊ हेडमास्टर है.. सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती, ज्याने उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का देत विरोधी आघाडीला कमकुवत केले आहे. या रणनीतीने हिंदी आणि उत्तर भारतीय मतदारांना प्रभावित करत दोन पक्षी एकाच दगडात मारले आहेत. मास्टर स्ट्रोक काय आहे? ही खेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी (MVA) यांना कमकुवत करण्यासाठी रचण्यात आली.

धोरणप्रकटन

सुरीला दारूडा,..

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
30 Jun 2025 - 9:46 pm

संध्याकाळचे सात-साडेसातला कुकरची शिट्टी होऊ लागली, की
तिच्या सूऊऊऊ आवाजाच्यानंतर ,कधी आधी
"चंदनाची चोळी अंग अंग जाळी... बाई ठिपक्यांची.. ठिपक्यांची.."
असा तालामुरातला खडा आवाजान गाणारा बेवडा ऐकू यायचा.
घरासमोरच्या मुख्य हमरस्ता कायम वाह‌ता असतो.फाटक्या शर्टमधला तो मळका दारूडा झिंगत रस्त्याहून धीमेपणाने घरी जायचा .
बर नुसता झिंगायचा नाही तर वरच्या पट्टीत गात चालायचा. "चंदनाची चोळी अंगजाळी, बाई ठिपक्यांची हे त्याचे विशेष गाणं होत.
"बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची ..."

मुक्तक

मराठी गाणे ai चा वापर करून

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in जनातलं, मनातलं
30 Jun 2025 - 9:30 pm

मित्राने , एक नवीन प्रयोगाची सुरुवात करत आहे
ai
चा वापस करून मराठी गाणे

१) इथे माझ्या तू नळी चा दुवा दिला आहे
२) ai विडिओ बनवणे वेळ खाऊ आहे ,५ -५ सेक चा विडिओ एकत्र जोडत आहे ,कृपया सकारात्मक सुधारणा सुचवा
३) एका गाण्यासाठी एक वेगळा प्रतिसाद आहे ,तिकडे थोडे थोडे करून गाणे जोडत जाईन

संस्कृतीमाहिती

राडा

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
30 Jun 2025 - 9:17 am

राडा
______

स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते.

आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती. तिच्या भितीने आणखीही कोणी त्या रिक्षात चढायला धजावत नव्हते.

मुक्तकविचार