चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी - भाग २

Primary tabs

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
17 Nov 2008 - 3:52 am

आधीच्या भागाचा दुवा ... चला मंडळी "पॅरीस" पाहुयात ... पॅरीस : एक प्रेमनगरी - भाग १

बाहेर आल्यावर वाटत होते की कोणत्या तरी वेगळ्याच दुनयेत आलो, आत जे काही होते ते दैवी, अलौकीक, अप्रतिम, अमानवी, उच्च असे काही आणि बाहेर तुमच्याआमच्यासारखे सामान्य, छे शब्दच नाहीत आतले सौंदर्य शब्दातुन उतरवायला, फोटो तरी किती काढणार ???

तर बाहेर आल्यावर आम्ही थोडी पेटपुजा करुन पुन्हा बसमध्ये चढलो. च्यायला ह्या ठिकाणी जेवणाने चांगलाच शॉट लावला डोक्याला. आम्ही पुण्याच्या "जोशी वडेवाल्यागत" फेमस असणार्‍या पॅरीसच्या एका दुकानातुन "बर्गर कम सँडवीच कम काहीतरी" घेतले, चावता चावता चक्क हालत खराब झाली, एवढा कडक ब्रेड जो सामान्य दाताने तोडणे अशक्य आहे तो हे लोक कसा काय खातात ते "लिओनार्डो दा विंची" जाणो, आम्ही आपलं जहागिरदारागत आमचे खाणे तिथे मोकाट उडणार्‍या कबुतरांवर मेहरबान करुन पुढे निघालो ...

त्यानंतर जाताना गाडी एका अतिशय जुन्या ( अंदाजे ५०० वर्षे) पुलावरुन गेली, त्याच्या आसपास एकदम सुंदर जुन्या धाटणीच्या युपोरिअन इमारती होत्या, मस्त वाटले पाहुन.

मंडळी ह्या ठिकाणी आपल्याला भाडेतत्वावर ( च्यायला, काय एकदम टिपीकल देशी शब्द आहे ) "बोट्स उर्फ नावा" मिळु शकतात ...
अफाट रेंज आहे, साध्या नावेपासुन ते अलिशान सर्व "सोई" उपलब्ध असणार्‍या क्रुज पर्यंत, आम्ही आपलं सुमडीत पुढे निघालो...

त्यानंतर पुढे गेल्यावर दिसले ते ख्रिश्चनिटी संस्कॄतीचा शिरपेच .... दी कॅथेड्रल ऑफ नॉत्र डॅम ...
हे अतिभव्य चर्च पाहुन अक्षरशः डोळे पांढरे होण्याची वेळ येते. आता जरा ह्याचा इतिहास सांगतो.
जेव्हा इसवी सन ११६० च्या सुमारास "चर्च ऑफ पॅरीस" ला अधिकृतरित्या "युरोपचे प्रमुख चर्च" म्हणुन मान्यता मिळाली तेव्हा त्या काळचा बिशप " मॉरीस दी स्युली" ने जुनी वास्तु पाडुन नवे एक नेत्रदिपक चर्च बांधण्याचा घाट घातला, त्याला त्या काळचा राजा "सातवा लुई" कडुन सर्व मदत मिळुन इसवी सन ११६३ साली चर्चच्या बांधकामास सुरवात झाली व टप्याटप्याने इ.स. १३४५ साली आज जसे दिसते तसे चर्च बांधुन झाले, त्या काळच्या बिशप्सनी आपली सर्व ताकद व पैसा ह्या कामी ओतला.
हे चर्च प्रामुख्याने त्याच्या "शैली, ५ अतिप्रचंड ऑर्गन्स, अतिप्रचंड व सुमधुर घंटा, मनमोहक काचेची तावदाने, पेंटिंग्स व काही पुतळे" ह्यासाठी प्रसिद्ध आहे.

आतले फोटो काढता आले नाहीत पण बाहेरच्या फोटोवरुन त्याच्या वैभवाची कल्पना येऊ शकते ...

जाता जाता : अशी एक आख्यायिका सांगतात की " जो माणुस ह्या त्या चर्चच्या चौकात उतरुन त्या भुमीवर पाय ठेवतो तो पुन्हा फिरुन नक्की पॅरीसला येतो, म्हणजे संत नॉत्र डॅम त्याला पुन्हा बोलवतो." अच्छा, मग आपले ठरले तर, पुन्हा आपण नक्की फिरुन पॅरीसला जाणार, जर तसे झाले नाही तर मात्र आपले आणि नॉत्र डॅम बाबाचे भांडण नक्की.
उगीच नाय सांगत, पुरावा आहे आपल्याकडे तेथे पाय ठेवल्याचा,आता बघतोच कसे बोलवत नाही ते ...
( ही माहिती स्वातीताई "दिनेश" यांच्याकडुन ... :) )

त्यानंतर गाडी गेली ती "प्लेस डी कॉनकॉर्ड" वरुन, हा पॅरीसचा सगळ्यात मोठ्ठा व प्रमुख चौक.
ही जागा प्रामुख्याने पुतळे ( वेगवेगळ्या राजे, राण्या, योद्धे ) व मनमोहक कारंजे ह्यानी अगदी गच्च भरले आहे, पहायला खुप सुंदर आहे.
ह्याचे इतिहासात अजुन एक महत्व म्हणजे "फ्रेंच राज्यक्रांतीच्या " काळातले प्रसिद्ध "गिलोटीन्स" येथेच उभारण्यात आले होते, त्या काळात प्रामुख्याने प्रजेने त्यांना त्रास देणार्‍या अनेक लोकांचे मुंडके ह्याच ठिकाणी उडवले होते. त्यात सांगायचे तर "राजा लुई पंधरावा, राणी अँटोनेट्टी, राणी इलिझाबेथ, मॅडम ड्यु बरी, डँटन, सेंट लुईस " ह्यासारख्या अनेक राजे उमरावांचा समावेश आहे, असे म्हणतात की इथे एवढा रक्तपात झाला की नंतर जेव्हा "पोप" पॅरीसला आले तेव्हा त्यांनी ह्या अपवित्र भुमीवरुन जायला नकार दिला ...
जेवढे सुंदरता अनुपम तेवढेच क्रौर्यही भयानक, ह्याचे उत्तम उदाहरण इथे आहे ...

त्यानंतर पुढचे स्थान येते ते म्हणजे "आर्क दी ट्रिम्फो " ...
पण तिकडे जाण्याआधी एका गोष्टीचा उल्लेख करणे गरजेचे आहे तो म्हणजे ह्या २ स्थानांना जोडणारा रस्ता. ह्याचे नाव आहे "अवेन्यु दी चॅम्प्स शांजेलिझे" उर्फ "जगाचा फॅशन स्ट्रीट", होय मंडळी जगाच्या सर्व फॅशन्सचे हे उमग स्थान, अतिशय मोठ्ठा व सरळसोट रस्ता हा, जगातले फॅशनशी संबंधीत यावच्चवत बँड्स इथे उपलब्ध आहेत.
शिवाय ह्या रस्त्यावर असणार्‍या अलिशान हॉटेलातुन अखंड चालु असतात ते "फॅशन शोज" , होय तेच की आपल्यातले बरेच जणे घरच्यांपासुन चोरुन लपुन व रात्री जागुन एकेकाळी "एफ टीव्ही" वर मोठ्ठ्या चवीने पहायचे. खरे सांगायचे तर हा अख्खा रस्ताच एक "फॅशन शो चा रॅम्प" आहे ....
( इथले फोटो इथे देत नाही, उगाच "नसते साहित्य" प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली माझा "आयडी व आयपी ब्लॉक" व्हायचा ... ;) )

तर आपण आता आलो आहोत ते "आर्क दी ट्रिम्फो" जवळ.
हे स्थळ फ्रेंच लोकांचे "शुरा मी वंदिले" चा वारसा जपणारे.
वेळोवेळी ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देउन ह्या देशाच्या सुरक्षेवर एक नख उमटु दिले नाही व देशाचा मानसन्मान अबाधित ठेवला त्यांना फ्रेंच जनतेची ही मानवंदना. इथे सर्व प्रमुख "जनरल्स" ची नावे आढळतात व काही जणांची थडगीही आहेत ...
प्रामुख्याने "नेपोलियन दी ग्रेट" च्या सेनान्यांची नावे इथे दिसतात ...


अजुन एक जाताजाता : हे स्थळ दिसायला आपल्या "गेट वे ऑफ इंडिया" सारखे आहे , आपल्याला हटकुन त्याचीच आठवण होते.
अजुन एक सांगायचे म्हणजे हे एका चौकाच्या अगदी मध्यभागी असुन त्याच्या चहुबाजुंनी वाहनांनी भरभरुन वाहणारा रोड आहे, तिथे मध्यावर जायला ठिकठिकाणी "भुयारी मार्ग" आहेत. आम्हाला याची कल्पना नसल्याने आम्ही देशी स्टायलीत "ओ रुको बाबा, रस्ता ओलांडना है हमकु, थांबो थांबो " करत पळापळ करत रस्ता ओलांडला.
पण हे करताना आम्ही त्या शिस्तीतल्या वाहतुकीची अवस्था २ मिनीटातच "पुण्यात चतुर्थीला दगडुशेठ गणपती " समोरच्या वाहतुकीसारखी करुन टाकली ...
पण इथे "माणसाच्या जीवाला" जास्त किंमत असल्याने आम्ही सुखरुन रस्ता पार करु शकलो, छे आमची चुकच झाली खरी.
असो, तुम्हाला म्हणुन सांगितले ....

आता थांबायची वेळ झाली, सलग लिहले तर लेख अति मोठ्ठा व एकसुरी होण्याची शक्यता असते.
बाकीचे सगळे अगदी आयफेल टॉवरसगट पुढच्या भागात नक्की , कृपया समजुन घ्यावे ...

क्रमश ::::
( पुढील भाग ३-४ दिवसात नक्की ....)

प्रतिक्रियाआस्वादलेखअनुभवविरंगुळामांडणीवावरसंस्कृतीकलाइतिहाससमाजजीवनमानप्रवासमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

प्राजु's picture

17 Nov 2008 - 4:01 am | प्राजु

खूपच सुंदर चित्रे आहेत सगळी.
डॉन भाऊ,
यावेळी आपण बरंच सविस्तर लिहिलं. आणि बरीच माहिती समजली. ते चर्च चं चित्र एकदम मस्त.
आणि हो, नॉत्र डॅम बाबा, तुला नक्कि पुन्हा भेटीला बोलावणार..अगदी नक्की! (नाहीतरी त्यांनाही अस्सल पुणेरी नमुना कधी पहायला मिळणार! );)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

17 Nov 2008 - 4:20 am | नंदन

फोटोज आणि त्यांचे माहितीपर वर्णन मस्तच. आर्क पाहून दिल्लीचे इंडिया गेट आणि तिथली अमर जवान ज्योत आठवली. कॉन्कॉर्ड चौकाचा फोटोही सुरेख. (तिथला तो सोनेरी ओबेलिस्क मूळचा, एका पुरातन इजिप्शियन मंदिरातला आहे.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

रेवती's picture

17 Nov 2008 - 6:25 am | रेवती

आयफेल टॉवरबद्दल वाचायला उत्सुक आहे.

रेवती

रेवती's picture

17 Nov 2008 - 6:25 am | रेवती

आयफेल टॉवरबद्दल वाचायला उत्सुक आहे.

रेवती

घाटावरचे भट's picture

17 Nov 2008 - 6:47 am | घाटावरचे भट

घरबसल्या पॅरिसची सहल....

अनिल हटेला's picture

17 Nov 2008 - 8:22 am | अनिल हटेला

सही रे डॉन भाउ !!

आंदे और भी!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आनंदयात्री's picture

17 Nov 2008 - 10:00 am | आनंदयात्री

लै भारी रे डॉन्या !! तु काढलेले फोटो पहातांना कॅलेंडरवरचे फोटो पाहिल्यासाराखे वाटते. मस्त फोटो.

आपलाच,

(गावठी)

आंद्यानार्दो - द - विंची

छोटा डॉन's picture

17 Nov 2008 - 1:36 pm | छोटा डॉन

तु काढलेले फोटो पहातांना कॅलेंडरवरचे फोटो पाहिल्यासाराखे वाटते. मस्त फोटो.

बरोबर आहे ...
कारण मी प्रत्येक फोटो हा "फोटो एडिटर" मध्ये घेऊन त्यावर अनंत प्रयोग केले आहेत.
म्हणजे क्रॉपिंग, टिल्ट, टिन्ट, सेपीया इफेक्ट, सॅचुरॅशन, शेडींग, फोकस, लाईट टेम्परेचर, हायलाईट्स, कॉन्टास्ट सेटिंग वगैरे वगैरे ...
प्रति फोटो साधारणाता ८-१० मिनीटे वेळ जातो ...
मग येतो तो परफेक्ट "कॅलेंडर लुक" ...
अर्थातच सर्वच असे नाहीत, काही काही जसे आहेत तसे चढवले आहेत ...

( शिकाऊ फोटोग्राफर ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

यशोधरा's picture

17 Nov 2008 - 10:02 am | यशोधरा

मस्तच फोटू रे डान्या! :)

मनस्वी's picture

17 Nov 2008 - 11:41 am | मनस्वी

सुंदर फोटो.

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2008 - 12:46 pm | स्वाती दिनेश

डॉन्या, छान झाला आहे हा भागही.. फोटो तर काय .. वॉवच ! खरे आहे कितीही वेळा पॅरिसला गेलं तरी मन भरत नाही हेच खर..
त्या अमिताभचा कुठल्याशा सिनेमात दिव्यांचा पोषाख आहे,तसा अंगावर दिवे ल्यालेला आयफेल टॉवरचा फोटू टाक रे पुढच्या भागात नक्की..
स्वाती

शाल्मली's picture

17 Nov 2008 - 1:34 pm | शाल्मली

डॉन्या,
हा भाग सुध्दा मस्त झाला आहे .
आयफेल चे फोटो लवकर टाक.
--शाल्मली.

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 1:58 pm | विसोबा खेचर

मेल्या छोट्या डॉना, छानच आहे हो तुझं पॅरीस!

सगळे फोटू छान..! :)

तात्या.

--

प्रासाद इथे भव्य परि मज भारी
आईची झोपडी प्यारी!
- वि दा सावरकर.

सुनील's picture

17 Nov 2008 - 2:01 pm | सुनील

लेख आणि फोटो उत्तम! पण फारच कमी लिहिता राव. भाग जरा मोठे टाका!

जाताजाता -
राजा लुई पंधरावा, राणी अँटोनेट्टी, राणी इलिझाबेथ, मॅडम ड्यु बरी, डँटन, सेंट लुईस "
राणी इलिझाबेथ गिलोटीनखाली? काहीतरी चुकलयस वाटतयं.

अवेन्यु दी चॅम्प्स एलिसीस
फ्रेन्च उच्चार शांजेलीझे असा आहे. उच्चार अर्थातच फार महत्वाचा नाही.

अजून येउद्यात.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ's picture

17 Nov 2008 - 6:04 pm | लिखाळ

मस्त रे !! माहिती, वर्णन आणि फोटो सर्वच छान ! आता जरा मोकळे ढाकळे लिहिल्यामुळे अजून छान वाटत आहे..
तिसर्‍या भागाची वाट पाहतो आहे.
-- लिखाळ.

शितल's picture

17 Nov 2008 - 6:15 pm | शितल

डॉन्या,
मस्तच रे !
फोटो खुपच सुंदर काढले आहेस, आणि माहिती छान सांगितली आहेस. :)
पुढचा भाग लिहायला तुला वेळ मिळु दे लवकर. :)