आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा.
केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे. त्यामुळेच राज यांना गुन्हेगारी मनोवृत्तीचा राक्षस म्हटले पाहिजे. रामायणकाळातही राक्षसांच्या वेगवेगळ्या झुंडी उत्पात माजवत होत्याच. सध्या महाराष्ट्रात त्यातल्या एका राक्षसाने भाजपचा हात पकडला आहे, तर दुसर्याला सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीने भस्मासुरासारखा आशीर्वाद दिला आहे. याच कॉंग्रेस पक्षाने पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करणार्या व्यक्तीला बळ दिले होते. अमेरिकेनेही रशियाला शह देण्यासाठी अफगाणिस्तानात तालिबानला प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर याच तालिबानने जगभरात दहशतवादी हैदोस घातला.
राज ठाकरे यांना कॉंग्रेस सरकारने काहीही करायला मोकळीक दिली आहे ते पहाता पाकिस्तानातही तेथील सरकार तिथल्या कट्टरपंथीयांना एवढी मोकळीक देत नसेल असे वाटते. पाश्चात्य देशात आशियाई व्यक्तींवर कधी कधी हल्ले होण्याच्या घटना घडतात. पण महाराष्ट्रात मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या गुडांनी नित्यनियमाने उत्तर भारतीयांना लक्ष्य केले आहे.
ज्या महाराष्ट्राच्या भूमीतून बाळ गंगाधर टिळक, सावरकर या नेत्यांचा जन्म झाला, याच भूमीतील प्रतिभाताई पाटील देशाचे सर्वोच्च स्थान भूषवत आहेत, त्या राज्यातील पवित्र भूमी आता अनिर्बंध गुन्हेगारीचे बळी ठरलेल्या सामान्य माणसांच्या रक्ताने बरबटली आहे. देशाला काळीमा फासणारी ही बाब आहे. प्राचीन काळी भारतात पशुंचीही पूजा होत होती. पण हिंसक झाल्यानंतर त्यांना पिंजर्यात ठेवले जाई. मानसिक अवस्था बिघडल्यानंतर अशा रूग्णाला दोरीने बांधून ठेवण्याची सरकारी व्यवस्थाही आपल्याकडे आहे आणि आता अशा रूग्णांच्या मेंदूवर चांगल्या शस्त्रक्रियाही होऊ लागल्या आहेत. पण सत्तेतील राजकिय डॉक्टरांकडे मात्र आपल्याच 'रूग्णालयात' गर्दी व्हावी किंवा आर्थिक फायदा व्हावा यातच रस आहे. म्हणूनच तर राज ठाकरे नावाचा राक्षस खुलेआम फिरतो आहे.
मुंबई उत्तर भारतीयांविना २४ तास तरी राहू शकेल काय? म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने वेळीच कायदेशीर उपाय योजून राज ठाकरेंवर योग्य ती शस्त्रक्रिया करायला नको का?
प्रतिक्रिया
21 Oct 2008 - 12:36 pm | घाशीराम कोतवाल १.२
मुंबई उत्तर भारतीयांविना २४ तास तरी राहू शकेल काय? म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने वेळीच कायदेशीर उपाय योजून राज ठाकरेंवर योग्य ती शस्त्रक्रिया करायला नको का?
भोचक तुमचे डोक ठिकानावर आहे काय?
तुम्हि कधि या भय्याचा माजोरडेपणा चा अनुभव घेतला आहे काय.
शेवटि हे आपले दुर्देव आहे कि आपण काहि करायचे नाही आणी दुसरा करत आसेल तर त्याला करु द्याय्चे नाही
ह्या भय्यामुळे मुंबईत मराठी मुलांना रोजगार मिळत नाही
राज ठाकरे यांना कॉंग्रेस सरकारने काहीही करायला मोकळीक दिली आहे ते पहाता पाकिस्तानातही तेथील सरकार तिथल्या कट्टरपंथीयांना एवढी मोकळीक देत नसेल असे वाटते. पाश्चात्य देशात आशियाई व्यक्तींवर कधी कधी हल्ले होण्याच्या घटना घडतात. पण महाराष्ट्रात मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या गुडांनी नित्यनियमाने उत्तर भारतीयांना लक्ष्य केले आहे.
तुम्ही राज ठाकरेची तुलना पाकिस्तानि अतीरेक्या बरोबर करता तुमच्या जिभेला काहि हाड
*** शेपुट घालि प्रव्रुति आहे या प्रव्रुतिबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्चा
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
21 Oct 2008 - 12:41 pm | भोचक
घाशीराम कोतवाल तुम्ही ज्याचा मुखवटा घेतलात त्या प्रवृत्तीसारखे का वागता? कृपया, वर लिहिलेली ओळ वाचली असतीत तर अशी मुक्ताफळे उधळली नसतीत. कृपया ही मते माझी नाहीत. नई दुनिया या बड्या वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून व्यक्त होणारे हिंदी भाषिक मानसिकतेचे उदाहरण मी यातून मांडले आहे.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
21 Oct 2008 - 12:41 pm | टारझन
हा टोमणा आहे की तुझं मत आहे ? टोमणा असेल तर मस्त टोमणा दिलाय .. आणि तुझं मत असेल तर मला तुझा विमा काढायची जाम इच्छा झालीये .. असो ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
21 Oct 2008 - 12:43 pm | आनंदयात्री
भोचक साहेब, राज साहेबांबद्दल वैयक्तीक दुश्मनी असल्यासारखे लिहले आहे त्यांनी ?
त्यांना राक्षस कशावरुन संबोधतता ?
राक्षस कोणाला म्हटले जाते ? जो अत्याचारी असतो, जो फक्त स्वार्थासाठी अमानुषरित्या वागतो. आणी कारणाविना हत्या करतो. तुमचे राजसाहेबांसाठी राक्षस हा शब्द वापरणे अजिबात पटले नाही.
निषेध व्यक्त करतो.
21 Oct 2008 - 12:47 pm | घाशीराम कोतवाल १.२
पण भोचक हा लेख मला तुम्हि लिह्ल्या सारखा वाटत आहे असो तर मग नई दुनयाचे लिंक पेस्ट करा ना
नाही तर मग लोकांची मते खा
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
21 Oct 2008 - 12:49 pm | ऍडीजोशी (not verified)
हे भोचक चे मत नसून आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. असं ह्या लेखाच्या पहिल्याच ओळीत म्हटलंय. त्यामुळे शांत व्हा.
21 Oct 2008 - 12:51 pm | इनोबा म्हणे
कुत्र्याच्या शेपटावर पाय पडल्यावर कुत्री भुंकणारच!
ज्या लालूने गुरांचा चारा ही सोडला नाही,जे स्वतः गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांना राज वर आरोप करण्याचा नैतिक अधिकार आहे काय? असो. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
बाळासाहेब ठाकरेंनी लालूला 'राजकारणातला विदुषक' हे अगदी योग्य नाव दिले होते.
(कट्टर मराठी) -इन्या डोईफोडे
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
21 Oct 2008 - 12:53 pm | नंदन
भोचक यांनी इतर ठिकाणी (कमीत कमी ३-४ इतर लेखांच्या प्रतिक्रियेत) मांडलेली मते, इंदुरात त्यांना जाणवलेल्या हिंदी भाषकांच्या प्रतिक्रियांची उदाहरणे यावरून आणि त्यापेक्षाही वरील शीर्षकावरून (वाचा आणि थंड बसा - जे पंचेचाळीस-एक वर्षांपूर्वी बाळ ठाकर्यांनी 'मार्मिक'मध्ये चालवलेल्या सदराचे - ज्यात सरकारी उच्चपदस्थ अधिकार्यांच्या नावाच्या याद्या येत - शीर्षक होते), त्यांच्या या विषयाबद्दलच्या भूमिकेचा अंदाज येऊ शकेल. असो, भोचकराव जरा अधिक स्पष्ट लिहिलेत तर उत्तम.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Oct 2008 - 12:58 pm | विजुभाऊ
लालु / मुलायम / अबि आझमी यांच्यावर अजामीन पात्र केस दाखल करता येईल का?
21 Oct 2008 - 5:25 pm | छोटा डॉन
कित्येक केसेस आहेत पण त्याचे काय होतेय ते माहित आहे ना आपल्याला ...
काही उपयोग नाही ...
अहो गल्लीतल्या झोपडपट्टी दादाला पण हे "अजामिनपात्र वॉरंट" काय *ट वाकडे करु शकत नाही तिथे ह्या मस्तवाल बैलांचे काय विचारता ?
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
21 Oct 2008 - 1:01 pm | भोचक
हिंदी भाषक प्रांतात रहात असल्याने येथील वृत्तपत्रे, इतर प्रसारमाध्यमे मी लक्षपूर्वक वाचतो आहे. त्यातही राज प्रकरणासंदर्भात तर जरा जास्तच. आपण महाराष्ट्रात रहाताना हिंदी वृत्तवाहिन्यांमार्फत हे सारे पहात असलात तरी लिखाणाच्या माध्यमातून राज यांच्यासंदर्भात येणारी टीका जरा जास्तच कडवट आहे. ती कदाचित तुमच्या वाचनात येत नसावी. मी ती रोजच वाचतो आहे. (माझ्या तळपायाची आग त्यामुळेच मस्तकात जाते तरीही) योगायोगाने आज याच विषयावर आज अग्रलेख आला आणि रहावले नाही म्हणून मी त्याचे भाषांतर करून आपल्याला दिले. वाहिन्यांवरची बातमीदार मंडळी उथळ असल्याने त्यात सवंग वृत्तांकन येते यात काही नवल नाही. पण किमान वृत्तपत्रात तरी तारतम्याने लिहिणारे पत्रकार असतात असा समज आहे. पण येथील वृत्तपत्रेही राजविरोधी लिखाण करताना कोणताही मुलाहिजा बाळगत नाही आणि तारतम्य तर कोसो दूर रहात आहे. हे सगळे शेअर करण्यासाठीच हा सारा खटाटोप. हम्म. नई दुनियाची लिंक देतो आहे. त्याच्या संपादकीय पानावर जाऊन कृपया लेख वाचा. त्यांनी तर राज यांना दानव म्हटले आहे.
http://www.naidunia.com/
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
21 Oct 2008 - 5:21 pm | अनिरुध्द
लालू, मुलायम, अबु हे तिघेही महाराष्ट्राच्या जमीनीवर पाय ठेवण्यास अपात्र आहेत. यांना धडा शिकवलाच पाहीजे.
21 Oct 2008 - 6:00 pm | विसोबा खेचर
भोचकगुरुजी,
हिंदी वर्तमानपत्रातील दुवा इथे दिल्याबद्दल धन्यवाद...
तात्या.