आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग -१

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Sep 2010 - 10:34 pm

मित्रहो,

हा ही लेख परत टाकला आहे तो श्री. क्लिंटन यांना त्यांच्या लेखात व्यक्त केलेल्या मतांना पाठींबा देण्यासाठी. जे ब्राह्मण लोकांना घाबरवून रोजी रोटी कमवतात आणि या लेखात वर्णन केलेले महाराज यांच्या मला तरी काही मुलभुत फरक दिसत नाही. समाजाने या सगळ्यांपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे हे निश्चित. आणि या कामात ब्राह्मणांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे माझे ठाम मत आहे.

याचा अर्थ कोणी कृपया असा काढ नये की मी हिंदू धर्मा विरूध्द आहे. पण आपल्या धर्माचे वैशिठ्य हेच आहे की तो Dyanamic आहे. त्यामुळे हा बदल होणारच आहे हे सगळ्यांनी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आत्मे गहाण टाकलेत, बुद्धी टाकू नका !
सध्या आपल्या राज्यातील धार्मिक वातावरण परत एकदा ढवळून निघायची चिन्हे दिसू लागली आहेत. आपल्या राज्यातील भोळी भाबडी जनता खर्‍या अर्थाने केव्हा शहाणी होणार हे परमेश्वरच जाणो. सध्या राजकारणी आणि त्यांचे बागलबच्चे असलेले तथाकथित व्यावसायिक ह्यांनी नवीन प्रकारच्या धंद्यात लक्ष घातलेले आहे आणि ते म्हणजे देवळांचे मॉल बांधणे. पुण्यात आपण जे सध्या पाहतो ते ह्या मॉलची रंगीत तालीम आहे असे समजा ना ! आता ह्या छोट्या उपक्रमामधे अतोनात यश मिळालेले पाहून मोठे व्यावसायिक ह्या धंद्यात उतरले आहेत. सहकारनगर येथे आपण ह्या प्रकारचा छोटा मॉल पाहू शकतो. ह्या मॉलमधे तुम्ही गेलात तर त्याची उलाढाल किती असेल ह्याची कल्पना तुम्हाला सहज येऊ शकेल. ते पैसे कोणाच्या खिशत जातात हे सांगायची गरज नाही. पण ज्याप्रमाणे लाच घेणार्‍या इतका देणाराही दोषी असतो त्याच नियमाप्रमाणे त्या देवळात लाखो रुपये वाहणारे पण तेवढेच दोषी आहेत. जर आपल्या धर्मगुरुंनी असा आदेश काढला की देवळात पैसे टाकणे हे पाप आहे तर हा सगळा प्रश्न मिटून जाईल. पण तसे ते करणार नाहीत. कारण दुर्दैवाने आपल्या धर्मगुरुंना तुमच्या आमच्या आयुष्याशी काही देणे घेणे नसते नाहीतर त्यांनी मंगळामुळे होणारी हजारो स्त्रियांची परवड थांबविली असती. आता आपल्यातीलच काही शहाणे असे म्हणतील की माणसांना त्या मॉलची गरज आहे म्हनून ती जातात. पण हा दावा अत्यंत फोल आहे. कारण सामान्य जनतेला कुठल्या बाजूला झुकवायचे. त्यांना काय खरेदी करायला लावायचे, त्यांच्या मनावर एखादी गोष्ट कशी बिंबवायची ह्याचे आता एक पध्दतशीर शास्त्र तयार झालेले आहे. एखाद्या गोष्टीची नैसर्गिक गरज ही आता इतिहासात जमा झालेली गोष्ट आहे. ह्या गोरगरिबांना लुटायच्या नीच कारस्थानात आपले राजकारणी, आपली नोकरशाही कशी सामील आहे हे आपण नुकतेच एका देवळांच्या मॉलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बघितले. नशीब आपल्या संतपरंपरेच दबाव अजून ह्या निर्लज्ज लुटारुंवर आहे म्हणून विठोबा रखूमाईची तरी देवळे बांधण्यात आली नाहीतर ह्यांनी सत्यसाईबाबांचेच देऊळ बांधले असते. ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे.
असो. परवा जे देवळांच्या मॉलचे उद्घाटन झाले त्यावेळीच्या गावकर्‍यांच्या ज्या मुलाखती दूरदर्शनवर दाखवल्या त्या पाहिल्यावर हसावे का रडावे हेच कळेना. त्यातल्या जवळजवळ सर्वजणांनी बाबा आले त्यामुळे आमच्या गावाचे रस्ते झाले ही बाबांचीच कृपा झाली असे सांगितले. ह्याऐवजी त्यांनी रस्ते न करणार्‍या नोकरशाहीला धारेवर धरले असते तरी चालले असते. बाबांच्या कार्यक्रमासाठी नोकरशाही राबली असेलच. पोलीस तर निश्चितच राबले असतील. याचा खर्च आपल्या खिशातून गेला आहे हे लक्षात घ्या. ह्या मॉलमुळे त्या गावाच्या जमिनीची किंमत आता गगनाला भिडेल. पण त्याचा तिथल्या गावकर्‍यांना काहीच उपयोग होणार नाही कारण त्या अगोदरच या लुटारुंच्या टोळीने त्या कवडीमोल भावाने आणि प्रसंगी दडपशाहीने विकत घेतल्या असणार. आता त्यांच्या नशीबी त्या देवळांच्यासमोर फुटाणे, हळद, कुंकू आणि बत्तासे विकण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही. आता तेथे बाबांचेपण काही दिवसांनी देऊळ होईल आणि पंचतारांकित पर्यटन व्यवसाय चालू होईल. असो. ज्या बाबांच्या हस्ते हे उद्घाटन झाले आणि ज्यांच्या नावावर हा व्यवसाय आता उभा राहणार आहे ते आहेत तरी कोण ? त्यांचा इतिहास कोणी तपासून बघितला आहे का ? महाराष्ट्राची जी संतपरंपरा आहे त्या परंपरेत त्यांना बसविण्याची त्यांची योग्यता आहे की नाही किंवा ज्या देवांच्या देवळांचे त्यांनी उद्घाटन केले त्या देवळाच्या दारात तरी उभे राहण्याची त्यांची लायकी आहे की नाही हे तपासून बघायला लागेल. आता काही लोक असेही म्हणतील की वाल्याचा नाही का वाल्मीकी झाला ? पण ते उदा. येथे गैरलागू आहे. बाबांनी त्यांच्या चुकांची शिक्षा भोगावी आणि मग खुशाल उद्घाटने करत फिरावे. आम्ही स्वत: त्यासाठी राबू.

 सत्यसाईबाबा – "परत सांगितलीच पाहिजे अशी कहाणी" लेखक : बाबू गोगिनेनी . Former General Secretary of Rationalist Society of India.
अवतार : ईश्वरम्माच्या शरीरात स्नानाच्यावेळी एक दिव्य प्रकाश शिरला, तेव्हा तिला आणि तिच्या अडाणी नवर्यातलाही ही कल्पना नव्हती की परमेश्वराने तिची मानवजातीत अवतार घेण्यासाठी निवड केली आहे. संस्थानाची अधिकृत कागदपत्रे आपल्याला सांगतात की "परमेश्वराच्या ह्या अवताराविषयी फार पूर्वी येशूने आणि महंमदाने सांगून ठेवले होते. ज्यांच्या कुराणामधे आणि बायबलमधे हा उल्लेख सापडत नाही. त्यांच्यासाठी स्वत: बाबांनीच सांगितले आहे की शिर्डीच्या साईबाबांनी १९१८ साली सांगूनच ठेवले होते की मी हे शरीर सोडल्यानंतर आठ वर्षांनी ते पुट्टपर्थी येथे सत्यसाईबाबा म्हणून जन्म घेतील. चंद्र जसा कलेकलेने वाढतो त्याप्रमाणे परमेश्वराचा अंश ईश्वरम्माच्या पोटात वाढत होता आणि २३ नोव्हेंबर १९२६ रोजी एका मुलाचा जन्म झाला. त्याचा जन्म झाल्यावर घरातली वाद्ये आपोआप झंकारायला लागली, एक मंद सुवास घरभर पसरला आणि एका नागाने जन्मलेल्या बाळावर आपला फणा धरला.
सर्वज्ञानी असतानासुध्दा "सत्यनारायन राजू" (जे त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले होते.) शाळेत जायला लागला. थोड्याच दिवसात त्याच्या अगाध लीलांचा अनुभव सर्वांना येऊ लागला. मुलांना तो त्याच्या जादूच्या शक्तीमुळे आवडू लागला तर शिक्षक त्याला घाबरु लागले. का ते माहीत नाही. १९४० साली तो जेव्हा १५ वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या वेडावरच्या इलाजांना कंटाळून सत्यनारायण राजूने जगाला तो अवतार असल्याचे सांगितले आणि स्वत:ला सत्यसाईबाबा हे नाव घेतले. त्यांनी घोषणा केली "येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या. मीच परमेश्वर आहे. माझी अगाध आहे आणि त्याला अंत नाही. ह्या पृथ्वीतलावर सत्य आणि प्रेमाने मानवता आणणे हे माझे काम आहे. २०२२ साली ह्या अवतारानंतर मी कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात प्रेमसाई म्हणून जन्म घेणार आहे." मला वाटते त्यांची जागा चुकलेली दिसते आहे. एवढ्या पैशाची गुंतवणूक केल्यावर त्यांची महाराष्ट्रातून सुटका होईल असे वाटत नाही.
बाबांचे चमत्कार :- "चमत्कार ही माझी ओळख आहे" हे शिर्षक आहे हॅरॉल्डसन नावाच्या लेखकाने जे बाबांच्या चमत्कारांविषयी लिहिले आहे त्यातील एका प्रकरणाचे. बाबांनीच त्यांच्या एका मुलाखतीत हे वाक्य उच्चारले होते. थोड्याच दिवसात सत्यसाईबाबा त्यांच्या चमत्कारांमुळे जगभर प्रसिध्द झाले. त्या काळात मान्यता पावलेल्या एका मासिकात म्हणजे "रिडर्स डायजेस्ट" मधे त्याबद्दल लिहून आले होते. फक्त त्यात त्यांनी सत्यसाईबाबांना परमेश्वर म्हणायच्याऐवजी चुकून गुरु म्हटले होते. त्यांनी लिहिले होते "ते हवेतून सोन्याच्या अंगठ्या , नाणी काढतात. दगडाचे चॉकलेटमधे रुपांतर करतात. आजारी लोकांना विभूती देऊन बरे करतात. ही त्यांच्या हातात कुठून येते हे कोणालाही कळत नाही. सगळ्यात कहर झाला जेव्हा त्यांनी १९५० साली एका मुलाला ज्याचे शरीर कुजत चालले होते त्याला परत जिवंत केले तेव्हा. १९७१ साली डॉ. जॉन हिस्लॉप जो अमेरिकन साई फौंडेशनचा अध्यक्ष होता त्याने तर असे जाहीर केले की वॉल्टर कोवान – ज्याचा ह्रदय बंद पडून मृत्यू झाला होता, - त्याला बाबांनी परत जिवंत केले. कै. सुरी भगवंतम जे इंडियन इन्स्टीट्यूटचे प्रमुख होते आणि भारत सरकारचे विज्ञान सल्लागार होते त्यांनीपण एक चमत्कार सांगितला आहे की एक दिवस बाबांनी एकदम हवेतून भगवतगीता काढून दाखवली. ह्या माणसांनीच बाबांना पुढे आणले असणार ह्यात शंकाच नाही. पुढे काय घडले असणार हे सूज्ञास सांगणे नलगे. त्यांच्या ह्या चमत्कारांच्या मालिका तरी बघा – एकदा पाण्यात त्यांचे बोट बुचकळ्यावर त्याचे पेट्रोल झाले, चिंचेच्या झाडावरुन त्यांनी आंबे काढले, एवढेच काय चीनच्या हल्ल्यात त्यांनीच चीनच्या सैन्याला पिटाळून लावले असे अनेक चमत्कार त्यांच्या पदरी आहेत. ते स्वत: असा दावा करतात की ते कधीच झोपत नाहीत. गंमत म्हणजे डॉ. सॅम्युएल सॅंडवाईज ह्यांना बाबांनी सांगितले की मीच परमेश्वर आहे आणि मी सर्वशक्तिमान आहे आणि मी सर्व ठिकाणी असतो तेव्हा त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. मग त्यांना हिस्लॉप विचारतात सर्व जगाचा कारभार चालवण्याचे काम असल्यामुळे बाबांना आपल्याशी बोलायला कसे परवडते ? बाबा त्यांना खात्री देतात की ते सर्वत्र असतात परमेश्वराला कसली सीमा ? हिस्लॉपचे ह्या उत्तराने म्हणे लागलीच समाधान झाले.
ह्या सगळ्या प्रकारात अडाणी माणसेच फसली जातात असे नाही. बाबांच्या शिष्यांमधे कोण नाही ? भारतातील प्रथम दर्जाचे राजकारणी, मंत्री, न्यायाधीश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, मॉरिशस ह्या देशांचे पंतप्रधान, ग्रीक देशाचे माजी पंतप्रधान, स्पॅनिश राजघराणे, वकील, डॉक्टर्स आणि सामान्य जनता हे सर्व त्यांचे अनुयायी आहेत. पापे करुन झाल्यानंतर अध्यात्माची कास धरावी लागते ह्यामुळेच की काय अनेक "तसले" लोकपण त्यांच्या कच्छपी लागलेले दिसतात. उदा. त्यांच्या जवळचे मानले जाणार्‍यांची ही यादी पहा – गुलिओ ऍड्रीओटी, इटलीचे पंतप्रधान ज्यांच्यावर एका वार्ताहराचा खून केल्याचा खटला चालवला गेला. बेटीनो क्रॅक्सी अजून एक पंतप्रधान ज्यांना ५ वर्षे भ्रष्टाचारासाठी शिक्षा झाली होती, राजकन्य़ा पोहलवी, इराणच्या राजाची बहीण, जिला हेरॉईनच्या व्यापारात शिक्षा झाली होती.
ह्या अशा वातावरणात श्री. अब्राहम कोवूर आणि श्री. डॉ. नरसिंहन ( बेंगलोर विद्यापीठाचे उपकुलगुरु ) ह्यांनी सत्यसाईबाबांच्या विरोधात त्यांचे पितळ उघडे पाडण्याची मोहीम मोठ्या धैर्याने चालवली. डॉ.कोवूर ह्यांनी त्यांनीच लिहिलेल्या "Begone Godmen" ह्या पुस्तकात डॉ. भगवंतम ह्यांनी वॄत्तपत्रात केलेल्या दाव्यासंदर्भात लिहिले आहे. हे भगवंतम बाबांच्या तेलगू ते इंग्रजीचे दुभाषी होते. त्यांनी एका वर्तमानपत्रात बाबांचा एक चमत्कार लिहिला. "जगप्रसिध्द सिको कंपनीचे प्रमुख पुट्टपर्थीला भेट द्यायला आले तेव्हा बाबांनी त्यांना एक घड्याळ हवेतून काढून त्याचा प्रसाद त्यांना दिला. ते घड्याळ बघितल्यावर त्यांनी लगेचच बाबांसमोर लोटांगण घातले आणि ते त्यांचे शिष्यत्व पत्करले. ते घड्याळ काही साधेसुधे नव्हते. ते एक असे घड्याळ होते की जे अजून बाजारात यायचे होते आणि ते त्यांनी त्यांच्या ऑफीसमधे कडीकुलपात ठेवले होते." भगवंतम ह्या घटनेबाबत जास्त काही सांगायला तयार नव्हते म्हणून डॉ. कोवूरांनी सिकोच्या प्रमुखांशी म्हणजे श्री. हातोरी ह्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांना ह्या गोष्टीला दुजोरा द्यायला सांगितला. श्री. हातोरींनी जे उत्तर पाठवले ते असे – "आपल्या पत्रात ज्या माणसाबद्दल आपण लिहिले आहे त्या माणसाविषयी मला काहीच माहिती नाही. ह्या साईबाबा नावाच्या माणसाला ना मी ओळखत ना माझ्या कंपनीतील कोणी माणूस. ही बातमी अत्यंत खोटी आहे ह्याबद्दल आम्हाला खात्री आहे. हे उत्तर जेव्हा त्याच वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले तेव्हा भगवंतमचे ताबूत थंडे झाले. ह्यावरुन ह्या बाबांनी आपला चमत्कार जनतेमधे पसरवण्यासाठी कोणाकोणाला हाताशी धरले होते आणि त्यासाठी कुठल्या मार्गाचा अवलंब केला होता हे समजून येईल.
जयंत कुलकर्णी.

धोरणसंस्कृतीधर्मसमाजजीवनमानतंत्रराहणीविज्ञानज्योतिषफलज्योतिषप्रकटनविचारप्रतिक्रियालेखसल्लामाहिती

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

30 Sep 2010 - 11:13 pm | शिल्पा ब

एक तर लोक प्रचंड मूर्ख आहेत....
जो माणूस स्वतःच म्हणतो कि "मी परमेश्वर आहे" त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर "मी त्या परमेश्वराची खरी आई म्हणजे आदिमाया आहे "
आत्तापर्यंत टीव्हीवर, शाळेत इ. ठिकाणी विज्ञान परिषदेने आणि इतर वैज्ञानिकांनी कितीतरी अशा हातचलाख्या करून दाखवल्या आहेत आणि हे भोंदू जे काही करतात ते कसे खोटे आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे...आम्हालातर शाळेत पुस्तकात याविषयी धडा पण होता असे आठवते - भोंदू कसे पूर्ण बाह्यांचे सदरे घालून त्यात काय काय लपवून मग हातचलाखीने काढून दाखवतात वगैरे...

बाकी या राजकारण्याचे आणि समाजातील इतर "प्रतिष्ठितांचे " बोलायचे तर प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ दडलेला असणारच...किंवा या लोकांचा ते तस्करी किंवा इतर काही अवैध कामासाठी उपयोग करून त्यांना वाटा देत असणार...त्याबदल्यात लोकांसमोर मोठे लोक आमचे अनुयायी आहेत हे दाखवायचे फक्त...

अंधश्रद्धेचा पगडा, संकटाला बेधडक सामोरे जाण्याची वृत्ती, कामसूपणा नसणे अन कमी आत्मविश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत या भोन्दुंना काही मरण नाही.

गुंडोपंत's picture

1 Oct 2010 - 7:56 am | गुंडोपंत

आणि या कामात ब्राह्मणांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे माझे ठाम मत आहे. का संभाजी ब्रिगेडचा पुढाकार चालत नाही वाटतं? ;)

ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे.
जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका.

येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या.
जो माणूस असे विधान करू शकतो आणि त्या नंतर कुणीही फतवे काढत नाही, त्याला एकही अतिरेकी ठार मारत नाही यावरूनच तो दैवी असणार याची मला खात्री पटते. बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथे?

Pain's picture

1 Oct 2010 - 8:28 am | Pain

ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे.
जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका.

लेखकास तसे अजिबात म्हणायचे नाही. ते या भोंदूंचा दृष्टिकोन सांगत आहेत. गैरसमज करून घेउन नका.

जयंत कुलकर्णी's picture

1 Oct 2010 - 8:34 am | जयंत कुलकर्णी

गुंडोपंत,

मला वाटते आपण जरा लिहिण्यात घाई करताय. माझ्या या वाक्याचा अर्थ असा आहे की हे जे थोर संत होते त्यांची आठवण या ढोंगी भक्तांना होत नाही कारण यांची भक्ती करून संपत्ती गोळा करता येत नाही.

यात न समजण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही.

दुसरे आपण लिहिलेले शेवटचे वाक्य ---
// बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथ////

आपण हे इथेच वाचलेत ना ? मग हा विरोधाभास कशासाठी.

उल्हास's picture

1 Oct 2010 - 8:27 am | उल्हास

अहो शिवराज पाटिल कपडेपट फेमस याना गृहमंत्री , अशोक चव्हाण मुख्यमंत्री तसेच भक्तांच्या लायकिप्रमाणे म्हणजे गरीबाला विभुति, श्रीमन्ताला चेन, घड्याळ देण्याचे चमत्कार करणार्‍याला चमत्कार करीत नाही असे कसे म्हणता

सुधीर काळे's picture

1 Oct 2010 - 9:55 am | सुधीर काळे

जयंतराव,
सुरेख लेख. मलाही मनापासून वाटते कीं देवळे फक्त देवांची बांधावीत, मर्त्य मनुष्यरूपात अवतरलेल्या संतांची बांधू नयेत! (अर्थात् हे माझे वैयक्तिक मत!)
संतांसारखे देवपुरुष आपल्याला देव प्राप्त करून देण्याच्या कार्यात मार्गदर्शन करतात. पण शेवटी देव ते देव व त्यांचीच देवळे बांधावीत.
सध्या प्रवासात आहे. जकार्ताला परतल्यावर आपला आणि (प्रेसिडेंट) क्लिंटन यांचा लेख नीट वाचून पुन्हा लिहीन.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Oct 2010 - 9:20 am | प्रकाश घाटपांडे

अंनिस च्या सुरवात कोवुर व त्यानंतर पुढे तो वारसा चालवणारे बी प्रेमानंद यांच्याच प्रेरणेतुन व कार्यातुन झाली आहे