डीसक्लेमर :-
खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही.
"पर्या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.
"वेडाच आहेस, मिपावर प्रसिद्ध होण्यासाठी फार काही कष्ट लागत नाहीत लेका, चल मी समजावतो तुला." मी त्याला आश्वासन दिले.
मिपावर आजकाल दोन प्रकारचे सदस्य पटकन प्रसिद्ध होतात,
१) विचारजंत
२) टुकार
१) विचारजंत :-
ह्या लोकांना स्वत:विषयी फार म्हणजे फारच कौतुक असते. आपण जे काहि लिहितो ते अतिशय ज्ञानसंपन्न, लोकांना शहाणे करुन सोडणारे म्हणजेच 'लै भारी' असते असा ह्यांचा गोड गैरसमज असतो (माझ्यासारखा). आपले लेखन म्हणजे मिसळपाव इतिहासातील सोनेरी अक्षरे आहेत असेच हे लिहित असतात. खरे तर अक्कल असते शुन्य पण आपण फार मोठे ज्ञानी, सगळ्या विषयातली सगळी अक्कल असल्यासारखे वागणे हे ह्यांचे गुण. आपण फार मोठे विचारवंत आहोत असे ह्यांना वाटु लागते आणी मग जंत झालेल्या माणसला जसे सारखी साखर खावेसे वाटु लागते तसे ह्यांना विचार लिहावेसे वाटु लागते. मग एक दिवस ह्यांचे विचारजंतात रुपांतर होते.
विचारजंत होण्यासाठी करावयाचे उपाय :-
१) सहसा इतरांच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचा नाही, दिला तरी तो प्रतिसाद धाग्यापेक्षा मोठा असला पाहिजे ह्याची काळजी घ्या. धागा १० ओळींचा असेल तर तुमचा प्रतिसाद कमीत कमी २० ओळींचा असला पाहिजे.
२) २/३ दिवसातुन अतिशय रटाळ विषयावर धागे काढुन त्यावर त्याहुनही रटाळ चर्चा करीत रहा.
उदा :-
१) राजीव गांधीचा प्रेम विवाह.
२) समाजातील महिलेचे स्थान व अबलांच्या रक्षणासाठी सरकारी कायद्यातील तरतुदींचा अभाव.
३) सिमेंटच्या आधारभुत किंमतीचे फायदे.
४) भजनलाल ह्यांची पुढील कारकीर्द काय असावी ?
ह्या धाग्यात कोणीही प्रतिसाद दिला नाही तरीही आपण लिहितच रहावे, कुण्या नेत्यांची वाक्ये, पुस्तकातील संदर्भ गुगलुन गुगलुन लिहित रहावे. एखादे फेक प्रोफाईल असल्यास स्वत:च्याच धाग्यावर येउन "अतिशय अभ्यासु लेख." "नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन." अशा प्रतिक्रीया द्याव्यात.
३) एका वाक्याची चार वाक्ये बनवता आलीच पाहिजेत. दुसर्या सदस्यानी दिलेली माहिती आपण दिल्यासारखा आव आणता आला पाहिजे.
उदा :-
'क्ष' ने एखाद्या विषयावर " १९८७ साली पवारांनी हा नियम आंमलात आणला, त्याला महाजन ह्यांनी अनुमोदन दिले." अशी प्रतिक्रीया दिली असेल, तर आपण लगेच "खरे तर हि कल्पना महाजनांची पण 'वाईज थिंक्स अलाईक' असे काहिसे घडुन ती कल्पना आधी मांडण्याचा मान पवारांनी घेतला, १९८७ साल होते ते (मग त्या वर्षात घडलेल्या एखाद्या घटनेचा उल्लेख करावा. उदा :- १९८७ साल लक्षात रहायचे कारण म्हणजे ह्याच साली अमेरीकन मोटर्स कंपनी ख्राईसलर्स मध्ये विलीन झाली) असे ठोकुन द्यावे. म्हणजे विचार लोकाचे पण ते आपले म्हणुन मांडता आले पाहिजेत.
४) विशेषत: नविन आलेल्या सदस्यांना 'टार्गेट' करावे. ह्यांनी लिहिलेल्या लेखनावर हे लांबच्या लांब 'अभ्यासु प्रतिसाद' द्यावेत. हे लगेच तुमचे फॅन होउन जातात. संपुर्ण कम्युनिटी ज्या सदस्याच्या लेखनाला 'भिकार' म्हणत असेल त्या सदस्याच्या धाग्यावर जाउन हमखास "मस्त लिहिलय, असे वेगवेगळे विषय कसे काय सुचतात तुम्हाला?" अशी प्रतिक्रीया देउन यावी.
आता बघुयात 'टुकार' कसे बनावे. टुकार बनण्यासाठी धागे व तुमचे प्रतिसाद हे दोन्ही जमेल तेव्हडे टुकार असले पाहिजेत. तुमचे लेखन वाचुन लोकांनी डोकीच आपटुन घेतली पाहिजेत. सध्या अशा सदस्यांची फुल्ल चलती आहे .
टुकार होण्यासाठी काय करावे :-
१) प्रथमत: जमेल तेव्हड्या टुकार प्रतिक्रीया द्याव्यात.
उदा :-
१) 'हिटलर एक क्रुरकर्मा' अशा धाग्यावर जाउन "क्रुरकर्मा ? तुम्हाला काय त्रास दिला त्यानी??" अशी एक टुकार आणी हिणकस प्रतिक्रीया द्यावी.
२) कोणी 'शाळेतील गमती जमती' असा धाग काढला तर तिथे जाउन "तुम्ही मोठे कधी होणार?" किंवा "पाळण्यातल्या गंमती जंमतींचा धागा कधी?" अशी प्रतिक्रीया देउन यावी.
अशा प्रतिक्रीयांचे बरेच चाहते असल्याने, ते लगेच तुमची प्रतिक्रीया कॉपी पेस्ट करुन खाली दात दाखवणार्या स्मायली काढतात.
३) जमेल तेव्हडा धागा काढणार्याचा अथवा त्या धाग्यावर प्रतिक्रीया देणार्यांचा अपमान करावा.
उदा :-
'बालविवाह आणी कायदा' असा धागा कोणी काढला की लगेच तिथे जाऊन धागा काढणार्याला 'लग्न करा आता म्हणजे असे प्रश्न पडत नाहीत" अथवा " तुमचा बालविवाह मोडला होता का हो?" असे कुच्छीत प्रश्न विचारावेत. एखाद्या प्रतिसादकर्त्याला "काय हो तुम्हाला मुले किती?" असा हलकट प्रश्न विचारावा.
'मिपासाठी आपले योगदान' अशा प्रकारे कोणी धागा काढल्यास "तुमचे सदस्यत्व रद्द करुन घ्या, उपकार होतील' असा एक उगाच हिणकस टोमणा मारुन यावे.
एखाद्या सुंदर कथेवर "लाजवाब, अप्रतिम !" असे लिहुन एकदम खाली, "कुठुन ढापलीत?" असे विचारुन यावे. त्या धाग्यावर 'अगले जनम मोहे बिटिया हि कीजो" वगैरे मालीकांना शिव्या देउन याव्यात. उगाचच कुठल्याही धाग्यावर जाउन "रावण कोणी बघितला का?" अशा चर्चा करुन याव्यात.
एकुण काय तर जेव्हडे टुकार वागता येईल तेव्हडे वागावे. लवकरच आपली (अप)किर्ती मिपावर पसरुन आपण प्रसिद्धी पावाल.
"बदनाम हुए तो क्या ? नाम तो हुआ !!"
-----------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
21 Jun 2010 - 12:03 pm | अवलिया
तुम्ही काय हल्ली सुट्टीवर आहात कि काय...धाग्यावर धागे काढताय म्हणून म्हंटल..
--अवलिया
21 Jun 2010 - 12:13 pm | शानबा५१२
:) :) :) :) :) :) :)
कोणासाठी होत हे?
बाकी भावना पोचल्या!!!
21 Jun 2010 - 12:15 pm | अवलिया
छान ! भावना पोचणे महत्वाचे बाकी दुय्यम.
--अवलिया
21 Jun 2010 - 12:05 pm | अवलिया
विचारजंतांवर अजुन विस्तृत चर्चा करता आली असती
--अवलिया
21 Jun 2010 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार
कर की मग प्रतिक्रीयेतुन. आमच्या पण ज्ञानात अजुन भर पडेल.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
21 Jun 2010 - 12:10 pm | अवलिया
टंकतो दुपारहुन
--अवलिया
21 Jun 2010 - 12:10 pm | चन्द्रशेखर सातव
हा हा हा,परा साहेब मिपा वर प्रसिद्ध होण्याचा हा मार्ग सुचाल्याबद्दल धन्यवाद.आता आमची क्याटेगरी विचारजंत कि टुकार असा एक धागा काढावा म्हणतो.म्हंजे लगेच प्रसिद्ध होता येईल.
मिपा वरचे चार सदस्य पण धड ओळखत नाही असा
चंद्र
21 Jun 2010 - 12:10 pm | शानबा५१२
प्र्ण लेख वाचुन झाल्यावर हायस वाटल.फक्त जोरात हुश! करायच बाकी राहील होत.
माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते.
उदाहरणादाखल 'घोड्याला माहीती असेल नियम नाही पाळले तर घोडा............' हा 'unicorn घोडा' की काय त्या लेखावरचे प्रतिसाद व प्रतिसादाला मिळालेले प्रतिसाद.
धन्यवाद!
21 Jun 2010 - 12:14 pm | अवलिया
>>मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत
काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या.
--अवलिया
21 Jun 2010 - 12:16 pm | अवलिया
आणि बिचारा मास्तर जुळ्या चिंबो-यापायी बदनाम झाला. असो.
--अवलिया
21 Jun 2010 - 1:01 pm | मदनबाण
बिचारा मास्तर जुळ्या चिंबो-यापायी बदनाम झाला.
ख्या ख्या ख्या. खी खी खी
मदनबाण.....
"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg
21 Jun 2010 - 1:03 pm | यशोधरा
प्रकाटाआ.
21 Jun 2010 - 12:20 pm | II विकास II
>>काही विशिष्ट संपादकांच्या गुड बुकात असेल तर तुमचे प्रतिसाद संपादित होणार नाहीत आणी तुम्ही हवे ते लेख किंवा प्रतिसादात लिहु शकाल. असे संपादक कोण हे वेगवेग्ळ्या धाग्यांचा अभ्यास करुन समजु शकेल. तोपर्यंत आत्ममैथुन, हस्तमैथुन, असे शब्द कुठे आणि कसे वापरायचे ते समजुन घ्या.
== नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन.
21 Jun 2010 - 12:30 pm | मदनबाण
नाना, ज्या दिवशी संपादक होईल. त्या दिवशी मी पेढे वाटीन.
अरे सख्या...नाना तिकडे आंब्यांच्या मागे लागलाय अन् तू पेढे कसले वाटतोस ? ;)
चांगला चोखताना गोड लागेल असा केसर दे त्याला !!! ;)
मदनबाण.....
"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg
21 Jun 2010 - 12:23 pm | आंबोळी
नान्याशी कट टु कट सहमत.
आंबोळी
21 Jun 2010 - 12:19 pm | आंबोळी
अतिशय अभ्यासु लेख.
परा यांनी नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन केलय....
खरे म्हणजे त्याना सुट्टी असल्याने ते असे एकावर एक सुंदर धागे काढत आहेत.
मित्राची व्यथा त्यांनी येथे फारच प्रभावीपणे मांडली आहे.
येथे खरे म्हणजे विचारजंतांवर आजून विस्तृत चर्चा करता आली असती. पण हरकत नाही.
पु.ले.शु.
आंबोळी
21 Jun 2010 - 12:19 pm | दिपक
पराष्टाईल लिखाण. डाण्याचा हा लेख आठवला. :-)
21 Jun 2010 - 12:21 pm | वेताळ
माझ्यामते,मिपावर आजकल अश्लिल्,उध्दट्,घाण काहीतरी शुध्द भाषेत लिहल की त्यावर चर्चा होते.
हे कसे काय तु म्हणु शकतोस?
परा हलकट आहे हे परत सिध्द झाले.सगळी गुपिते बाहेर फोडतो. X(
वेताळ
21 Jun 2010 - 12:30 pm | शानबा५१२
सांगायची इच्छा नव्हती पण विचारलस म्हणुन सांगतो.
एक उदाहरण दीलच आहे,तु मग त्यावरुन अंदाज नाही का काढु शकत?
लिहणार होतो सर्व शोधुन शोधुन पण राहु दे कोणाची नाव आली तर तापतील माझ्यावर!
21 Jun 2010 - 12:21 pm | II विकास II
तद्दन फालतु लेखन, प्रसिध्द होण्याचा एक केविलवाणा प्रयत्न
21 Jun 2010 - 12:22 pm | सहज
क्षणभर वाटले की थोर विचारवंत परा यांनी टुकारवंतीय लोकांच्या हातात कोलीत दिले आहे की काय? पण धागा दुसर्यांदा वाचला तेव्हा त्यामागील खरा उद्देश कळाला. अर्थात ज्यांना कळाला नाही त्यांनी स्व:ताला लेसर ह्युमन समजुन पराचा राग राग करायला काहीच हरकत नाही.
लगे रहो पराभाय!
लेखमाला होउन जाउ दे.
22 Jun 2010 - 1:03 pm | Nile
सौंदर्यफुफाटाफेम पराकुमार यांच्या अलौकिक प्रतिभेने नटलेल्या लेखावर छिन्न विछिन्न प्रतिसाद पाहुन मन व्याकुळ झाले. मिपावर साचत चाललेल्या तद्दन पकाउ धाग्यांच्या ढिगामुळे आलेल्या विसरतेनेच की काय पराकुमार अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौनच बाळगतात. अश्या ह्या टुकार लेखकांच्या पुरात मिपाकर वाहुन जात असताना पाहुन आलेल्या हताशतेने पराकुमार हतबल झालेले असावेत असे त्यांच्या लेखातील टिंब टिंबातुन टपकत आहे. अश्या अघटितापुढे साक्षात पराकुमारांनीच हात टेकले तर चार घटका शब्द-कण-प्राशन इच्छेने मिपावर येणार्या सामान्याने प्रेरणा घ्यावी तरी कुठुन? ह्या भविष्य अंधारात लोटणार्या परिस्थितीवर ज्वलंत टिका करण्याच्या हेतुने लेख सुरु केलेल्या पराकुमार यांच्या मनसुब्यावर कुणीतरी मुंबईच्या पर्ज्यनाचा प्रहार केला आहे की काय असे वाटल्याशिवाय रहावत नाही.
-Nile
22 Jun 2010 - 4:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी दवणीय* प्रतिसाद आहे हा!
अदिती
* कॉपीराईटः नंदन
21 Jun 2010 - 12:41 pm | शानबा५१२
कारजेन,
टची
शानबा५१२,
तुला हुरदयसरपशी म्हणायच आहे का?
21 Jun 2010 - 12:42 pm | शानबा५१२
मी फेमस झालो का? की अजुन काही लिहाव लागेल.
:)
21 Jun 2010 - 2:08 pm | प्रकाश घाटपांडे
गुंडोपंतांनी देखील काही मार्ग सुचवले आहेत
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
21 Jun 2010 - 2:13 pm | भोचक
परा, हा एक नंबरचा टुकार आहे. :{}
(भोचक)
जाणे अज मी अजर
21 Jun 2010 - 4:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
साफ सहमत आहे भोचकभाऊंशी! पर्या अतिशय टुकार विचारजंत आहे!
अदिती
21 Jun 2010 - 2:17 pm | इंटरनेटस्नेही
नेहमीप्रमाणेच कसदार व सुंदर लेखन.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
21 Jun 2010 - 2:17 pm | प्रकाश घाटपांडे
नशीब की योगायोग
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
21 Jun 2010 - 3:13 pm | ऋषिकेश
मिपावर "मिपा" आणि त्यावरील लेखन/लेखक वगैरे विषयांवर चांगले./वाईट/अभ्यासपूर्ण/ एकोळीचे वगैरे वगैरे धागा/कौल काढणारे विसरलास का? तेही लग्गेच प्रसिद्ध होतात
ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन
21 Jun 2010 - 4:02 pm | जागु
हम्म..
21 Jun 2010 - 6:23 pm | प्रभो
हॅहॅहॅ...क्याफेतला सौंदर्यफुफाटा कमी झालेला दिसतोय....
लेख बिख लिहायला लागलास ....ते पण विचारजंती... ;)
21 Jun 2010 - 6:24 pm | तिमा
परा, टारझन, सहज्,शानबा ५१२, घासकडवी, वेताळ, विकास, आंबोळी, छोटा डॉन, शिल्पा ब, मदनबाण, अवलिया, ते कोण ते डायबिटिसवाले, बिरुटेसर, घाटपांडे, क्लिंटन, विसोबा खेचर ही सहज आठवणारी नांवे आहेत. म्हणून या मिपावर प्रसिध्द व्यक्ति आहेत असे म्हणता येईल का ?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
21 Jun 2010 - 6:38 pm | शुचि
>>अशा प्रतिक्रीयांचे बरेच चाहते असल्याने, ते लगेच तुमची प्रतिक्रीया कॉपी पेस्ट करुन खाली दात दाखवणार्या स्मायली काढतात.>>
=)) =)) =))
21 Jun 2010 - 7:00 pm | पाषाणभेद
ज्याप्रमाणे विचार हि एक प्रवृत्ती आहे अन विचारजंत हा त्या प्रवृत्तीचा एक प्राणी आहे त्याच प्रमाणे टुकार ही एक हि एक प्रवृत्ती आहे. तत्राप आपण विचारजंत हा प्राणी असल्याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे टुकारजंत ह्या प्राण्याचाच उल्लेख करायला हवा होता. आपण केवळ टुकार असा उल्लेख केल्याने लेखात जे वजन प्राप्त होणे क्रमप्राप्त होते ते प्राप्त न होता अवास्तव महत्व (त्या शब्दाला - लेखाला नव्हे) प्राप्त झाले हे आपणास ठावूक नसल्याने आम्हास ते तुम्हास व त्याचप्रमाणे इतर सर्व वाचकांस नम्रपणे कथीत करू वाटते. त्या वाटण्यामागेही (चटणी नव्हे)आपल्याप्रती असणारे गुण जसे स्नेह, प्रेम, अभिलाशा, सहृदता, आत्मियता, करूणा, दया, क्षमा, शितलता (म्हणजे थंडपणा - आपल्या प्रकृतीचा नव्हे- आपल्या स्वभावाचा) कारणीभूत आहे. आपले विशाल अतं:करण या विचाररंजनाला सामावून घेतीलच अशी आम्हास आशा, विश्वास आमच्या नेत्रांस दृषष्टीगोचर होत आहे. असो. देवाजीची करूणा आहेच. ती आपणांस लाभो या सदिच्छा, शुभेच्छा, आशा, विश्वास आहे.
तथास्तू.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
21 Jun 2010 - 7:23 pm | बिपिन कार्यकर्ते
फालतु. पराची काळजी वाटते. :D
(आपला - प्रसिद्धिपरांङमुख) बिपिन कार्यकर्ते
21 Jun 2010 - 7:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> प्रसिद्धिपरांङमुख <<
शुद्धलेखन चुकलंच हो कार्यकर्ते!
अदिती
21 Jun 2010 - 9:56 pm | नितिन थत्ते
शुद्धलेखन या अश्लील शब्दाचा मिपासारख्या सोज्वळ संकेतस्थलावर उघड उल्लेख केल्याबद्दल अदितीबैंचा निषेध.
संपादक झोपले आहेत का?
नितिन थत्ते
21 Jun 2010 - 10:06 pm | बिपिन कार्यकर्ते
संपादक झोपले आहेत का?
मिपावरील कर्मकांडातील सध्याचा एक आवश्यक विधी पूर्ण केल्याबद्दल मी तुमचेपण पांग कसे फेडू याचाच विचार करून तळमळतो आहे. इतका वेळ कोणीही अजून असे लिहिले कसे नाही म्हणून तळमळत होतो. मी तुमचे उपकार खरोखरीच जल्मभर विसरणार नाही.
बिपिन कार्यकर्ते
22 Jun 2010 - 12:12 pm | अवलिया
>>तुमचेपण पांग कसे फेडू
आतापर्यंत कुणा कुणाचे पांग फेडले हो पाङ्ग फेडकर्ते?
--अवलिया
22 Jun 2010 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार
"फेडिन पाङ्गकर्ते" हे जास्ती योग्य वाटते ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Jun 2010 - 12:22 pm | अवलिया
सहमत आहे. संपादकांनी माझ्या प्रतिसादात तशी दुरुस्ती करुन घ्यावी
--अवलिया
21 Jun 2010 - 9:58 pm | मुक्तसुनीत
>> प्रसिद्धिपरांङमुख <<
शुद्धलेखन चुकलंच हो कार्यकर्ते!
प्रसिद्धीपराङ्मुख हे "शुद्ध" आहे का ?
-सुषुम्नावस्थेतला संपादक !
21 Jun 2010 - 9:14 pm | टारझन
केवळ अफलातुन !! हा विषय घेऊन टार टार फाड्ण्याचा विचार होता , परंतु तो लेख मनातल्या मनात खारिज करुन टाकला , बिपीनदा मुळे ,
उगाच माझ्यामुळे त्यांना खराब णको वाटायला !!
टारझन फॅक्ट्स : बाकी थोडं अवांतर पण समांतर, मराठी संस्थळांवर प्रत्येक जण (प्रत्येक जण) स्वतःची लाल करुन घ्यायला येतो (मान्य करा , करु नका ), हे सत्य आहे :) ह्यात मी सुद्धा आलो :)
21 Jun 2010 - 9:49 pm | बिपिन कार्यकर्ते
टार्या!!! टार्या!!!!!! तुझे पांग मी कसे फेडू?
बिपिन कार्यकर्ते
21 Jun 2010 - 9:50 pm | प्रभो
धागा उडवून ;)
21 Jun 2010 - 9:53 pm | टारझन
आयडी पण ऊडवा राव ... कारण छाण छाण गोड गोड बळेच वागणे आपल्याला जमणार नाय ... आणि डोक्याला शॉट देणारं वाचल्यावर केकलल्या शिवाय आत्मा पांडुरंगाला चैन काय पडत नाय :) जुलै म्हैण्यापासनं जालिय व्हिआरेस च घेतो :)
22 Jun 2010 - 1:42 am | स्वप्निल..
नको रे .. आमच्यासारख्या वाचणार्यांना पण घ्यावी लागेल मग .. :?
21 Jun 2010 - 10:03 pm | पंगा
सहमत. आम्ही मान्य करतो. काहीजण करत नसतीलही. ज्याचात्याचा प्रश्न. काय?
- पंडित गागाभट्ट.
21 Jun 2010 - 10:08 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे. शिवाय, काही लोकांची आधीच एवढी उघड लाल असते की त्यांना मान्य वगैरे करण्याची गरज पडत नसेल. ;)
बिपिन कार्यकर्ते
21 Jun 2010 - 10:21 pm | पंगा
दुजोर्याबद्दल धन्यवाद.
- पंडित गागाभट्ट.
21 Jun 2010 - 10:49 pm | Pain
टारझन फॅक्ट्स: चूक.
आणि स्वतः ला त्यात धरल्याने चुकिची वस्तुस्थिती होणार नाही.
21 Jun 2010 - 10:53 pm | Pain
आधी सुरु केलेली मुलाची गोष्ट पुर्ण कर आणि मग काहीही लिही. या क्रमशः वाल्यांचे काहीतरी केले पाहिजे.
29 Mar 2011 - 12:50 pm | सुहास..
हा कसा काय मिस झाला ;)
=)) =)) =))
झकास लिखाण आणि त्यावरील प्रतिसाद ही
29 Mar 2011 - 2:48 pm | वपाडाव
सुहासराव..
हा कसा काय मिस झाला ?
अगदी हेच म्हंतो...
29 Mar 2011 - 2:56 pm | कवितानागेश
पुन्हा एकदा खूप हसले.
शिवाय, काही लोकांची आधीच एवढी उघड लाल असते की त्यांना मान्य वगैरे करण्याची गरज पडत नसेल. >>
ही प्रतिक्रिया बेष्ट आहे!
24 Mar 2013 - 1:46 pm | मन१
हुच्च.
25 Mar 2013 - 5:39 pm | भावना कल्लोळ
हा सगळा लेख वाचल्यावर मिपा वर लिहावे की नाही असा प्रश्न पडला आहे कारण आम्ही नवीन लोकांना प्रसिद्धी नको पण वाचनातून, प्रतिक्रियेतुन एक मित्र परिवार मिळेल हिच अपेक्षा आहे …
26 Mar 2013 - 8:29 am | मन१
वाचनातून, प्रतिक्रियेतुन एक मित्र परिवार मिळेल
गॉड ब्लेस यू.टेक केअर.
26 Mar 2013 - 4:18 pm | भावना कल्लोळ
:)
25 Mar 2013 - 8:00 pm | अत्रुप्त आत्मा
मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?
25 Mar 2013 - 8:45 pm | जेनी...
=))
जय हो स्मायली बाबा कि =))
25 Mar 2013 - 9:06 pm | बॅटमॅन
+१११११११११११११.
काय स्मायली का काय हो, मारिओ गेम आठवला एकदम =)) =))
25 Mar 2013 - 9:09 pm | टवाळ कार्टा
सगळ्यात सोप्पी पध्धत.... "पोरीचा" आयडी घ्यावा ;)
30 Mar 2013 - 8:46 am | प्रसाद गोडबोले
26 Mar 2013 - 4:28 pm | स्मिता चौगुले
* विशेषत: नविन आलेल्या सदस्यांना 'टार्गेट' करावे.
*जमेल तेव्हडा धागा काढणार्याचा अथवा त्या धाग्यावर प्रतिक्रीया देणार्यांचा अपमान करावा.
अगदि मान्य... असेच होते इथे
26 Mar 2013 - 6:29 pm | सासुरवाडीकर
"Some say love is a feeling that lasts till death do us part. but I disagree. my love for you will
last beyond death, beyondearth, beyond the universe"
beyond the time and spece.
29 Mar 2013 - 2:32 pm | श्रिया
प्रसिद्धिसाठी सद्ध्या सुरू झालेली पद्धत
१.मुद्दाम अशुद्ध लिहिणे
२.बोबडे लिहिणे
३.इंग्रजीचा अतिरेकी वापर
30 Mar 2013 - 12:20 pm | अविनाशकुलकर्णी
धागा हा हटके विषयावर असावा....निराळ्या बाजुने घटनेचा विचार करुन धागा गुंफावा ...जेंव्हा शब्द अपुरे पडतात त्या वेळी चित्रांचा मुक्त हस्ते वापर करावा..[चित्रे कशी चढवायची याच्या सुचना दिल्या आहेतच ]
टिकाकाराना घाबरू नये..पण सुचनांचा आदर करावा.. .....बरेच वेळा तुमचे धागे उडतात ...पण ना उमेद होऊ नये..
धागा काढताना आपले व इतरांचे २ घटका मनोरंजन इतकी माफक अपेक्षा ठेवून धागा गुंफावा ...
6 Jun 2016 - 8:51 pm | भोळा भाबडा
छान मार्गदर्शन!!!
मी 2) टुकार