घरगुती सावरकर

भोचक's picture
भोचक in जनातलं, मनातलं
28 May 2010 - 5:06 pm

सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज....

सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे. कारण विचारल्यावर सांगायचे, 'जानवे ही चावीचा जुडगा अडकविण्याची सोय आहे.' शिवाय मजबूत असल्याने तुटत नाही. त्यामुळे गळ्यात घालायला अन्य कोणताही दोरा त्यांना चालत नसे. अर्थात, श्रावणी करून घेऊन ते जानवे घालत नसत. कुठलेही मंत्रोच्चार ते जानवे घालताना करत नसत.

रूढार्थाने देवावर विश्वास नसला तरी सावरकर कोणत्या तरी अज्ञात शक्तीला मात्र मानत. कोणतेही कर्मकांड करत नसले तरी रोज अंघोळ झाल्यावर दहा मिनिटे स्वस्थ बसून कुलदेवता 'अष्टभूजादेवीचे' स्तोत्र ते म्हणत. त्यांना इतरही बरीच स्तोत्रे येत होती.

कर्मकांडांना विरोध असला तरी समुच्च हिंदूंना एक करण्यासाठी त्यांना त्याचाही आधार घ्यायची गरज पडत होती. म्हणून बाटवलेल्यांना पुन्हा हिंदू केल्यानंतर केल्या जाणार्‍या धार्मिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित रहायचे.

सत्यनारायण पूजा वगैरे भानगडी त्यांच्या घरात कधी होत नव्हत्या. इतकेच काय देवपूजाही होत नसायची.

रत्नागिरीला अस्पृश्योद्धाराचे काम त्यांनी सुरू केले, त्याला उच्चवर्णियांचा पाठिंबा फारसा नव्हता. इतकेच काय ते ज्या नाना पटवर्धनांच्या घरात रहात असत त्यांचाही त्याला पाठिंबा नव्हता. पण म्हणून त्यांनी सावरकरांना घरातून बाहेर काढले नाही.

सावरकरांनी कधीच आपल्या मुला बाळांना किंवा कुटुंबियांना राजकीय कार्यात आपले 'वारस' म्हणून पुढे आणले नाही. कोणत्याही सभेला पत्नीला वा मुलांना नेले नाही. आपल्यातील अत्त्युच्च गुणांचा वारसा जाणीवपूर्वक वाहून न्यावा यासाठीही प्रयत्न केले नाहीत.

विश्वासरावांच्या मुलीचे असीलता म्हणजे खड.ग हे नावही त्यांनीच ठेवलेले.

सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर मात्र संघाचे स्वयंसेवक होते. सावरकरांनी त्यांचे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राखले होते.

त्यांच्या घरी कायम लोकांचा राबता असे. सकाळपासून माणसे घरी येत असल्याने आवरासावरीला उशिर होई. त्यांची अंघोळही बरीच उशिरा होई. सहाजिकच जेवणासही उशिर होत असे. परंतु, घरच्यांना वेळीच जेऊन घेण्याची त्यांची ताकीद होती. माईने आपल्यासाठी जेवायला थांबू नये असे ते स्पष्ट सांगत.

सुरवातीच्या काळात सावरकर कुटुंबाला आर्थिक अडचणींना खूप तोंड द्यावे लागले. पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. त्यात घरखर्च चालायचा. या काळात ते मुंबईच्या दिनबंधूचे संपादन विनावेतन करायचे. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना सरकारी पेन्शन मिळू लागली. त्यात कुटुंब खर्च भागू लागला.

पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.

सुरवातीला खारला राहिल्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कात सावरकर सदन बांधले. त्यात लाकडाचा, विटांचा वापर केला. गांधीहत्येनंतर जाळपोळ आणि दगडफेक झाली, तेव्हा सावकर सदनही त्याला अपवाद नव्हते. पण मजबूत घरामुळे नुकसान झाले नाही. घर बांधताना ते पक्के असावे यामागचा त्यांचा हेतू कोणत्याही हल्ल्याला तोंड देणारे असावे हाच होता.

सावरकरांच्या घरगुती आयुष्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही येऊ द्या.

संस्कृतीइतिहाससाहित्यिकसमाजजीवनमानराजकारणविचारलेखमतसंदर्भप्रतिसादबातमीमाध्यमवेधअनुभवमाहितीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

पक्या's picture

2 Jun 2010 - 2:15 am | पक्या

प्रतिसाद आवडला.
थत्ते साहेबांकडे आता तसे काही मुद्दे रहिले नाहित वरील विधान खोडून काढायला. त्यामुळे उगाच शब्दखेळ करीत आहेत असे वाटू लागले आहे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

चेतन's picture

1 Jun 2010 - 5:04 pm | चेतन

नितिन

खर तर मला या वादात काही लिहायचं नव्हतं पण

जसे सावरकर देव नव्हते तसे गांधीही देव नव्हते (मोठे माणुस नक्कीच होते).

थोडे गुगुलल्यावर हा पूर्ण उतारा मिळाला

NEHRU’S speeches on KASHMIR

PLEDGE TO KASHMIR

(A statement from New Delhi, January 15, 1948.)

From, Independence and After, A collection of the more important speeches of Jawaharlal Nehru from September 1946 to May 1949. The Publications Division, August, 1949

(India very generously agreed to allocate Rs. 75 crores to Pakistan out of the cash balances to help the latter to make a start. It was felt that the ArbitraI Tribunal should not have allocated so big an amount to Pakistan, and it was hoped that this generosity on the part of the Indian Union would have reciprocal response. The Deputy Prime Minister, Sardar Patel, made it clear that this financial deal was linked with the overall settlement of all outstanding issues. But in the meantime, in Kashmir Pakistan waged virtually an undeclared war against India; and lest the Rs. 55 crores (Rs. 20 crores having already been paid out of the 75 crores ) should be spent against India in Kashmir, it was withheld pending the settlement of the Kashmir issue. It became another cause of bitterness between India and Pakistan. When Mahatmaji began his fast an January 13 and appealed to the nation to remove ill-will, prejudice, and passion which poisoned the relations between India and Pakistan, the Government of India decided to pay the amount due, namely, Rs. 55 crores to Pakistan immediately as a gesture of goodwill to that State and as their contribution “to the non-violent and noble effort made by Gandhiji.” On January 18, Mahatma Gandhi terminated his fast in response to the pledge given by the citizens of Delhi through the peace committees that they would banish communalism from their hearts and from the country.)

The Government’s decision in regard to the payment of the cash balances to Pakistan has been taken after the most careful thought and after consultation with Gandhiji. I should like to make it clear that this does not mean any change in our unanimous view about the strength and validity of the Government’s position as set out in various statements made by distinguished colleagues of mine. Nor do we accept the facts or arguments advanced in the latest statement of the Finance Minister of Pakistan.

We have come to this decision in the hope that this generous gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards, will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast. That fast, of course, had nothing to do with this particular matter, and we have thought of it because of our desire to help in every way in easing the present tension.

Six months ago we witnessed a miracle in Calcutta where ill-will changed overnight into goodwill, through the alchemy of a similar fast. The alchemist who worked this change was described by our Governor-General as the one-man boundary force which succeeded when the boundary force of 50,000 men in West Punjab did not succeed in keeping the peace. This unarmed knight of non-violence is functioning again. May the same alchemy work again in India and elsewhere! We have sought to remove one major cause of dispute an argument between India and Pakistan and we hope that other problems will also be resolved. But let it be remembered that the people of Kashmir are suffering from a brutal and unprovoked invasion, and we have pledged ourselves to help them to gain their freedom. To that pledge we shall hold and we shall do our utmost to redeem it. We seek their freedom not for any gain to us, but to prevent the ravishing of a fair country and a peaceful people.

उपोसषण 'प' साठी नसले 'प' साठी सहमती नक्कीच होती (अथवा त्यांच्या सहमतिनुसारच हे झाले होते)

Dipankar हे गांधींचे एका प्रार्थनेतले विचार

Hindus and Sikhs must see that there is no retaliation, whatever Muslims elsewhere may do. Some say I am fasting only for the Muslims. That is true only in part. I fast to purify myself. How long will I fast? Until I am satisfied that the people of all religions in India mix like brothers and move without fear. Otherwise my fast can never end."

He broke his fast only when leaders of both the Hindu and Muslim communities assured him that they would restore communal harmony and implored him to end the fast.

चेतन

नितिन थत्ते's picture

1 Jun 2010 - 5:40 pm | नितिन थत्ते

किती वेळा तेच?
१. >>उपोसषण 'प' साठी नसले 'प' साठी सहमती नक्कीच होती

५५ कोटी पाकिस्तानला द्यावेत हे गांधींचे मत होतेच. हे कुणीही नाकारलेले नाही.

२. On January 18, Mahatma Gandhi terminated his fast in response to the pledge given by the citizens of Delhi through the peace committees that they would banish communalism from their hearts and from the country.

He broke his fast only when leaders of both the Hindu and Muslim communities assured him that they would restore communal harmony and implored him to end the fast.

५५ कोटी दिले म्हणून उपोषण सोडले नाही म्हणजेच उपोषणाचे कारणही ५५ कोटी नव्हते हे यातून स्पष्ट होते.

आता पुरे झाले असे वाटते.

नितिन थत्ते

अहो थत्ते साहेब,
तुम्ही तुम्हाला अनुकूल असे उत्तर देवून "आता पुरे झाले असे वाटते" असे का म्हणता?

पुढील अनेक पिढयांचा 'बुद्धीभेद' करणे हे तर राजकारण्यांचे आवडते उद्योग असतात. कदाचित ह्याचसाठी त्यांनी उपोषण थोडे लांबवले नसेल कशवरून?

नितिन थत्ते's picture

1 Jun 2010 - 8:16 pm | नितिन थत्ते

>>पुढील अनेक पिढयांचा 'बुद्धीभेद' करणे हे तर राजकारण्यांचे आवडते उद्योग असतात. कदाचित ह्याचसाठी त्यांनी उपोषण थोडे लांबवले नसेल कशवरून?

मग पुढे चर्चाच कशाला करायची?

आत्तापर्यंत इंद्रराज पवार यांनी आकाशवाणीवरील बातमी म्हणून जे सांगितले त्याखेरीज कोणताही रिझनेबल डायरेक्ट पुरावा कोणी दिलेला नाही. ती बातमी सुद्धा चुकीची असू शकते.

बाकी कोणत्याही दुव्यांमधून/पुराव्यामधून ५५ कोटीसाठी उपोषण केले हे सूचित होत नाही.

गांधींनीच नथुरामला सांगून स्वतःचा खून करवला असे म्हणून मोकळे होऊया.

नितिन थत्ते

Dipankar's picture

1 Jun 2010 - 9:44 pm | Dipankar

आकाशवाणी, टाईम्स हे खोटे बोलत आहेत असेच तुम्हाला म्हणायचे आहे ना?

समंजस's picture

1 Jun 2010 - 11:58 am | समंजस

धन्यवाद इन्द्रराजसाहेब.
बरीचशी माहिती जी पुर्वी माझ्या वाचण्यात आली होती ती काहीशी विस्कळीत स्वरुपात आणि तुकडयांमधे होती. या धाग्याच्या निमीत्ताने बरीचशी माहिती एकाच ठिकाणी सलगपणे वाचायला मिळतेय. त्याबद्दल तुम्हाला आणि थत्तेसाहेबांना धन्यवाद :)
सावरकर, सावरकरांचं हिंदुत्व, महात्मा गांधींची हत्या आणि त्या घटनेशी असलेला/नसलेला सावरकरांचा संबंध, सावरकरांचे महात्मा गांधींशी असलेले वैचारीक मतभेद, महात्मा गांधीं/नेहरुं यांचा सावरकरांच्या हिंदुत्त्वाला असलेला विरोध, महात्मा गांधींमुळे पाकीस्तानला देण्यात आलेले किंवा न देण्यात आलेले ५५ कोटी रुपये या बद्दल दोन्ही बाजूंचे मुद्दे/विचार, पुरावे सादर करण्याचे प्रयत्न हे बर्यापैंकी संतुलीत आहेत आणि विशेषकरून जास्त माहिती मिळवण्याचे तुमचे कष्ट आणि उपस्थीत केलेल्या शंका/प्रश्न/विरोधी मुद्दे यांना उत्तरे देण्याचा केलेला प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहेत.
कोणाही एका बद्दल पराकोटीचं प्रेम किंवा द्वेष न ठेवता, मला व्यक्तीशः तरी ह्या घटना आणि त्यामागील कारणे तसेच कारणीभुत असलेल्या व्यक्तीं बद्दल आणखी विस्तृतपणे जाणुन घ्यायला आवडेल(अर्थातच मिळतील तेव्हढया पुराव्यानींशी :) )
माझी तुम्हाला आणि थत्तेसाहेबाना विनंती आहे की इथेच न थांबता ही चर्चा पुढे सुरू ठेवावी आणि काय खरं काय खोटं हे समोर आणण्याचा प्रयत्न करावा.

धन्यवाद पवारजी,
छान माहिती.
आप्पा
सावरकरप्रेमी

इन्द्र्राज पवार's picture

1 Jun 2010 - 2:30 pm | इन्द्र्राज पवार

"...इंद्रराज पवार यांनी मात्र आज स्वतःहून (मी उत्तरे देत नाही असे पाहून?) पुन्हा चर्चेत उडी घेतली आहे त्याबद्दल त्यांचा सौम्य निषेध...."

नितिन जी ~~ तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीने केलेले सौम्य निषेध माझ्या दृष्टीने नेहमीच स्वागतार्ह राहील. हे मी अशासाठी म्हणतो की मी "निषेध" करण्याच्या तरी पातळीचा आहे हे तुम्ही मान्य करत आहात, अन्यथा तुम्ही मला सहज "दुर्लक्ष" करू शकला असता.

या निमित्ताने मी काही गोष्टी स्पष्ट केल्या तर तुम्ही त्या आपुलकीने स्वीकाराव्यात ही आग्रहाची विनंती :

१. "थांबावे" हे ठरले होते हे मान्यच होते. त्यानंतर मी फक्त दोन प्रतिसाद लिहीले आहेत, त्यापैकी एक ~ श्री.गागाभट्ट यांनी उपस्थित केलेला "सावरकर यांनी उर्दु भाषा शिकून केलेले कुराणाचे अध्ययन...." ज्याचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी वा गांधी-नेहरू वादाशी कोणताही संबंध नसून एक अभ्यासू वृत्ती आणि भाषातज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे असलेली शिकायची चिकाटी या बाबी मला व त्यांना अभिप्रेत होत्या.... त्याबद्दल श्री. पंगा यांनी आभार मानले. तो विषय संपला.

२. ~~ दोन : श्री.हुप्प्या यांनी लिहिलेली ५५ कोटीची शंका. याला उत्तर देणे मी जरूरीचे एवढ्यासाठी समजले की, "याने सांगितले, त्याने सांगितले, ते असे म्हणतात... त्यांचे असे मत आहे..." अशा पध्द्तीने गोंधळाचे धुके अधिकच दाट होत जाते. त्यापेक्षा त्या दिवसांच्या घडामोडीचा अधिकृत माध्यमातून आलेल्या तत्संबंधी बातम्या आणि शासकीय पातळीवरून झालेले खुलासे (ज्यांचा "रेकॉर्ड" म्हणून अभ्यासकांना वापर करण्याची मुभा असते...) हे अधिक प्रकाश टाकू शकतात, म्हणून माझ्याकडे असलेल्या टाईम्सच्या त्या तीन चार दिवसातील बातम्या देणे मी उचीत मानले. इथे आपल्या त्या विषयाचा दुरान्वयेदेखील संबंध नाही.

नेहरूनी पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचे मान्य करणे आणि त्याच संध्याकाळी गांधीनी उपोषण सोडणे याची काहीतरी तर्कसंगती आहे की नाही, हे तुम्हीच सांगा. असे असूनही गांधीनी "हिंदु मुस्लिम एकोप्यासाठी उपोषण केले" असे समजणे म्हणजे स्वतःचीच फसगत करणे होय.

आचार्य अत्रे यांनी तर "नवयुग" मधुन या ५५ कोटीबद्दल गांधी-नेहरु-पटेल यांच्यावर काय हल्ले (आणि कोणत्या भाषेत...) केले आहेत ते सांगण्याची गरज नाही. अत्रे यांचे नाव मी इथे एवढ्यासाठी घेत आहे की, या तिघांबद्दल त्यांच्या मनात नीतांत आदर होता, आणि गांधीना तर ते देवच मानत.

भारत सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्याची दिल्ली येथील "बहादुरशाह जफर मार्ग" वर असलेल्या युजीसीच्या लायब्ररीत तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या लायब्ररीत अधिकृत असे "ट्रान्सफर ऑफ पॉवर" चे ग्रंथ आहेत जे अभ्यासकांना उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही...मात्र एखाद्या खासदाराचे (ओळखीबाबत...)शिफारसपत्र लागते. (मी एकदा श्री. सुशीलकुमार शिंदे व दुसर्‍यांदा श्री. पृथ्वीराज चव्हाण यांचे तसे पत्र मिळविले होते. दोघांशी माझा बिलकुल परिचय नसतानदेखील ज्या कारणासाठी मी त्यांच्याकडे आलो आहे, हे समजलेवरून त्यांनी पटकन तसे पत्र दिले... इतकेच नव्हे तर श्री.शिंदे यांनी तर आपल्या असिस्टंटला सांगून जेएनयूच्या ग्रंथपालाशी माझी भेट घालून देण्यास सांगितले.... असो...).

मुद्दा असा की, जर भारत सरकारनेच हे रेकॉर्ड अधिकृत मान्यता म्हणून स्वीकृत केले असेल तर त्याचा आधार आपण घेतला तर सत्य-असत्यतेचा गुंता राहणार नाही.

यात १ जानेवारी ते ३१ जानेवारी १९४८ या कालखंडाचे सविस्तर वर्णन आहे. लॉर्ड माऊंटबॅटन हे या काळात दिल्लीतच होते आणि काश्मिर प्रश्नावरून झालेला वाद शमविण्याचा ते प्रयत्न करीत होते. त्यांचे सहकारी सर कॅम्पबेल-जॉन्सन या दोघांनीही आपापल्या डायरीत ज्या नोंदी केलेल्या आहेत त्यानुसार काश्मिरचे राजे सर हरी सिंग यांच्या धरसोड वृत्तीमुळे जिना आणि कं.चे फावले होते व व्हॅलीमध्ये आगडोंब उसळला होता. अशा स्थितीत जो पर्यंत पाकिस्तानी घुसखोर तिथून हलत नाहीत तो पर्यंत रिझर्व्ह बँकेतील पाकचा ५५ कोटीचा वाटा त्यांना बिल्कुल देता येणार नाही अशी ठाम भूमिका नेहरूंनी घेतली व तिला सरदार पटेलांनी पाठींबा दिला. पैशासाठी आलेल्या पाकिस्तानच्या प्रतिनिधींना त्यांनी ठामपणे सांगीतले की, "India would never agree to any payment until the Kashmir affair was settled." (हे माझे शब्द नसून सरकारी रेकॉर्डमधील आहेत.)

आता इथे कॅम्पबेल जॉन्सन यांची नोंद पहा :

Hon. Lord (i.e. Mountbatten) told me, ‘A step both unwise and unstatesmanlike’. (म्हणजे नेहरु-पटेल यांनी ५५ कोटीच्या बाबतीत घेतलेली...). He discussed this issue with Gandhi on the same evening who not only agreed with Lord but found the whole thing morally wrong ~~~ “Like an elder brother hanging on to the rightful share of the patrimony of the younger.” Before the closing of the meeting, Gandhi told Mountbatten that he would take up the matter with Nehru and Patel and something about settling the issue.

या अधिकृत नोंदीनुसार जर खुद्द गांधीच असे म्हणतात की, "हा नकार म्हणजे थोरल्या भावाने धाकट्या भावास वाडवडिलांच्या इस्टेटीतील न्याय्य वाटा न देण्यासारखे आहे..." आणि नंतरचे "समथिंग अबाऊट सेटलिंग द इश्शु..." म्हणजे त्यांचे निर्वाणीचे "उपोषणा"चे शस्त्र.... ज्याचा रास्त उल्लेख "टाईम्स" च्या त्या तीन दिवसांच्या अंकात आहे.

इन्द्र

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नितिन थत्ते's picture

1 Jun 2010 - 2:44 pm | नितिन थत्ते

>>नेहरूनी पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचे मान्य करणे आणि त्याच संध्याकाळी गांधीनी उपोषण सोडणे

उपोषण त्याच दिवशी सुटले नाही. किंबहुना १६ जाने ल पैसे दिले गेले तरीही ते सुटले नाही. ते १८ जाने ला सुटले.

मी नेहरू-पटेल यांच्याशी बोलतो वगैरे जे कॅम्पबेल यांच्या नोंदीतील म्हणणे आहे ते कोणत्या तारखेचे हे स्पष्ट होत नाही.

तुमच्या टाइम्सच्या नोंदीप्रमाणे १ जाने ला पैसे न देण्याचा निर्णय झाला. उपोषण १३ जाने ला चालू झाले. कँपबेल यांची नोंद कधीची? ते जाणणे महत्त्वाचे.

नितिन थत्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2010 - 4:03 pm | बिपिन कार्यकर्ते

नितिन, ही एक शक्यता लक्षात घेऊन बघ...

०१. उपोषण त्याच दिवशी सुटले नाही. किंबहुना १६ जाने ल पैसे दिले गेले तरीही ते सुटले नाही. ते १८ जाने ला सुटले.

०२. मी नेहरू-पटेल यांच्याशी बोलतो वगैरे जे कॅम्पबेल यांच्या नोंदीतील म्हणणे आहे ते कोणत्या तारखेचे हे स्पष्ट होत नाही.

०३. तुमच्या टाइम्सच्या नोंदीप्रमाणे १ जाने ला पैसे न देण्याचा निर्णय झाला. उपोषण १३ जाने ला चालू झाले. कँपबेल यांची नोंद कधीची? ते जाणणे महत्त्वाचे.

१ जानेवारी : पैसे न देण्याचा निर्णय.

२ जानेवारी ते साधारण १२-१३ जानेवारी : राजनैतिक पातळीवरून, पैसे दिले जावेत यासाठी प्रयत्न. यात आधी पाकिस्तानी कनिष्ठ पातळी ते वरिष्ठ पातळी प्रयत्न झाले असावेत. त्यात ३-४ दिवस गेले. मग अजून वरिष्ठ पातळीवर बोलाचाली. त्यात ३-४ दिवस. मग लॉर्ड माउंटबॅटन, नेहरू, गांधीजी वगैरे... त्यात ३-४ दिवस. गांधीजींचा उपोषणाचा निर्णय... ब्रह्मास्त्र. गांधीजींच्या उपोषणाला आणि हट्टीपणाला सगळेच घाबरून असत. आणि सहसा ब्रह्मास्त्राच्या आधी इतर अस्त्रे वापरून बघितली जातात. तसेच हे.

१३ जानेवारी : उपोषण सुरू.

१३ जानेवारी ते १६ जानेवारी : नेहरूंची चलबिचल --> घबराट --> शरणागती --> पैसे दिले गेले.

१७ जानेवारी / १८ जानेवारी : पैसे पाकिस्तानला मिळाले. उपोषणाची समाप्ती.

कँपबेल यांची नोंद कोणत्या तारखेची हे महत्वाचे आहेच. पण त्यात एकूण सूर असाच आहे की उपोषणाचा आणि ५५ कोटीचा संबंध असावा.

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

1 Jun 2010 - 4:23 pm | नितिन थत्ते

शक्यता रोचक आहे. पण तो रोचकपणा गृहीतकाला सोयीचा म्हणून आहे.

मी वर १२ जानेचे गांधींचे उद्यापासून उपोषणाला सुरुवात असे भाषण दिले आहे (दुवा दिला आहे) त्या भाषणात ५५ कोटींविषयी चकार शब्द कसा नाही? मणिभवनच्या दुव्यावर आणखीही काही एव्हेण्ट दिले आहेत त्या इव्हेण्ट मध्ये सुद्धा ५५ कोटींचा उल्लेख झाला नव्हता असे म्हटले आहे. पवार यांनी 'हा घ्या पुरावा' म्हणून टाइम्स मधल्य ज्या बातम्या दिल्या आहेत त्यातही कुठल्याही प्रकारे (नेहरूंचे निवेदनासह) उपोषण ५५ कोटींसाठी होते असे सूचित होत नाही हे मी दाखवलेच आहे.

(५५ कोटी पाकिस्तानला द्यावेत असे गांधींचे म्हणणे होते याविषयी दुमत नाही. फक्त उपोषण त्यासाठी नव्हते असे माझे म्हणणे आहे).

पैसे दिले गेल्यावर ते २ दिवसांनी पाकिस्तानला पोचले (म्हणजे ब्यागा भरून ५५ कोटी रुपये नेले होते की काय?) यासाठी गांधी उपोषण सोडायचे थांबले हे पटत नाही.

नितिन थत्ते

Dipankar's picture

1 Jun 2010 - 2:55 pm | Dipankar

पवारसाहेब आपल्या अभ्यासाला साष्टांग नमस्कार

आनंद's picture

1 Jun 2010 - 3:36 pm | आनंद

पवारसाहेब आपल्या अभ्यासाला साष्टांग नमस्कार
असेच म्हणतो.

नितिन थत्ते's picture

1 Jun 2010 - 3:52 pm | नितिन थत्ते

धागा सावरकरांवर आणि चर्चा मात्र गांधी नेहरूंवर.
गांधी नेहरू विषयाच्या चर्चेची सुरुवातसुद्धा 'नेहरू-पटेलांनी आकसाने सावरकरांना अडकवले' या बिनबुडाच्या विधानाने झाली. आणि घसरत घसरत ५५ कोटींवर आली.

एकूण सावरकर वगैरे निमित्त.... गांधी नेहरूंना ठोकण्याचे साधनमात्र

या माझ्या सिद्धांताला हे पूरकच आहे.

नितिन थत्ते

ऋषिकेश's picture

1 Jun 2010 - 4:11 pm | ऋषिकेश

गांधी नेहरूंना ठोकण्याचे साधनमात्र

सहमत
विषय कुठलाही असो, क्रांतीकारक कुठलाही असो, कुठलाही नेता, कोणतीही घटना (प्रसंगी अशी घटना जेव्हा उपरोल्लेखित कोणी जिवंतही नव्हते).. शेवट नेहमी याच नावांपाशी येऊन थांबतो..

उद्या एखाद्या पाककृतीवरही गांधी-नेहरुंना ठोकण्याचा प्रयत्न दिसल्यास आश्चर्य वाटणार नाहि ;)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2010 - 4:20 pm | बिपिन कार्यकर्ते

किंवा, गांधी नेहरूंना ठोकण्याची पाककृती असा एखादा धागा यायची शक्यताही आहे. ;)

बाकी नितिन / ऋ यांनी केलेला आरोप मी माझ्यापुरता नाकारतो आहे. :)

बिपिन कार्यकर्ते

चेतन's picture

1 Jun 2010 - 5:32 pm | चेतन

गांधी नेहरूंना ठोकण्याचे साधन

हा आरोप

मी सावरकरांना ठोकण्याचे साधन म्हणुन गांधीहत्येतले आरोप दाखवायचे असाही करु शकतो.

चेतन

अवांतरः मणिशंकर अय्यरने आणि काँग्रेसने जे केले त्यावर मी मणिशंकरला नक्कीच अंदमानातल्या कोठडित १०-१२ वर्षे टाकलं असतं

पंगा's picture

1 Jun 2010 - 5:35 pm | पंगा

एकूण सावरकर वगैरे निमित्त.... गांधी नेहरूंना ठोकण्याचे साधनमात्र

काही सावरकरांच्या निमित्ताने गांधी-नेहरूंना ठोकतात, तर काही हिंदुत्ववादी-यज्ञोपवीत"वादीं"ना ठोकतात... चालायचेच.

बिच्चारे सावरकर! केवळ निमित्तमात्र!

- पंडित गागाभट्ट.

विकास's picture

1 Jun 2010 - 5:45 pm | विकास

उद्या एखाद्या पाककृतीवरही गांधी-नेहरुंना ठोकण्याचा प्रयत्न दिसल्यास आश्चर्य वाटणार नाहि

अहो पण गांधी-नेहरूंना त्यांच्या "पाक"कृतीवरूनच तर ठोकण्यात येते ना ;)

बाकी बाहेर असल्याने हा धागा आत्ताच वाचत आहे आणि पचवत आहे. खूपच चांगली आणि नवीन माहीती या निमित्ताने मिळत आहे.

बाकी राहीले नेहरू-गांधींना ठोकण्याचे... ते नशीब बर्‍याचदा ऐतिहासीक व्यक्तींच्या बाबतीत असतेच असे म्हणावेसे वाटते. सावरकरांच्या बाबतीतच त्यांच्या भाषेनिमित्त हा धागा दोन वर्षांपूर्वी लिहीला होता त्यात नंतर कशी चर्चा झाली ती पण या संदर्भात पहाता येईल.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

भारद्वाज's picture

1 Jun 2010 - 5:18 pm | भारद्वाज

धागा सावरकरांवर आणि चर्चा मात्र गांधी नेहरूंवर.

हेच म्हणतो. वेगळा धागा घेणे योग्य ठरले असते.
मात्र घडलेल्या घटनेचे सर्व सामान्यांना माहित नसलेले वेगवेगळे कंगोरे उलगडले जातायत (पण हे वेगळ्या धाग्यावर घेणे उचित ठरले असते असे पुन्हा नमूद करतो).
गांधीहत्या आणि सावरकर या वादात गांधी,नेहरू (तसेच पटेल) येणारच. जर या महान नेत्यांच्या भव्य कामगिरीचा उदोउदो होतो(हे सावरकरांनासुद्धा लागू आहेच)तर त्यांच्या प्रकाशात न आलेल्या (किंवा लपवून ठेवलेल्या) बाबींचा उलगडा होणेही महत्वाचे !! जे मिपावर तपशीलवार होत आहे.
थत्तेकाका व पवारकाका दोघेही संयमित व तपशीलवार माहिती देतायत. दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jun 2010 - 5:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचा सिद्धांत काही अंशी मान्य आहे, पण त्यातले (ठोकणं वगैरे) शब्द नाहीत.

  • सावरकरांचं कार्य त्यांच्या संपर्कात असलेल्या किंवा त्यांच्या समकालीन लोकांना वगळून मांडता येईल का? गांधीजींच्या कार्याबद्दल बोलताना जिना किंवा नेहरूंना वगळून चालेल का? जर गांधी-सावरकर किंवा नेहरू-सावरकर संबंध अतिशय सलोख्याचे असते तर त्यांचा उल्लेख टाळून जाणं चाललं असतं का?
  • अर्थात धागा "घरगुती सावरकर" असा असल्याने तरीही हे सर्व अवांतर ठरलं असतंही; पण गांधीजींनी काही चुका केल्या आणि त्याचे हे-हे पुरावे मी देतो/ते असं लिहीणं (जे इंद्र लिहीत आहे) म्हणजे गांधी-नेहरूंना ठोकणं आहे का?
  • अगदी चर्चा धाग्याशी अवांतर असेल तरीही ती (मी धरून) अनेकांसाठी माहितीपूर्ण आहे, तर अशावेळी सर्कारी बाबूगिरी दाखवून सुरू असलेली चर्चा बंद पडणं योग्य आहे का?

अदिती

नील_गंधार's picture

1 Jun 2010 - 5:44 pm | नील_गंधार

आदिती ताईंशी सहमत.
चर्चा चांगली चालु आहे व बरीचशी नवीन माहिती मिळते आहे.

नील.

ऋषिकेश's picture

1 Jun 2010 - 11:00 pm | ऋषिकेश

सावरकरांचं कार्य त्यांच्या संपर्कात असलेल्या किंवा...................चाललं असतं का?

यात विषय काय आहे त्यावर अवलंबून आहे. जर गांधीजींच्या स्वच्छता मोहीमेवर किंवा हरिजनांच्या कार्यामधे उगाच इतरांची नावे घेणं टाळावं असं वाटतं तसंच सावरकरांची भाषाशुद्धी (इथे घरगुती आचार) वगैरेमधे उगाच नेहरु-गांधी आणणं टाळण्याजोगे आहे

अर्थात धागा "घरगुती सावरकर" असा असल्याने तरीही हे सर्व अवांतर ठरलं असतंही; ..... म्हणजे गांधी-नेहरूंना ठोकणं आहे का?

वेगळा धागा काढावा ही सुचना बर्‍याच जणांनी केली आहे.. ती डावलून याच धाग्यावर ही चर्चा करण्याचा अट्टाहास समजला नाहि. बाकी ठोकणं / न ठोकणं वैयक्तीक मत झालं.. तेव्हा माझ्यामते इंद्र जे करत आहेत ते मुद्देसुद आहे.. अभ्यासपूर्ण आहेच आणि एक बाजू(च) व्यवस्थित दाखवणार आहे.. याला ठोकणं म्हणता येऊ नये.. मात्र त्या निमित्ताने इतर बरेच संदर्भरहित प्रतिसाद, आरोप, वाक्ये संप्पुर्ण चर्चाभर पसरली आहेत त्याला ठोकणेच म्हणावे लागेल.

अगदी चर्चा धाग्याशी अवांतर असेल तरीही ती (मी धरून) अनेकांसाठी माहितीपूर्ण आहे, तर अशावेळी सर्कारी बाबूगिरी दाखवून सुरू असलेली चर्चा बंद पडणं योग्य आहे का?

नाहि योग्य नाहि. चर्चा बंद करा असे माझेही मत नाहि.. या धाग्यावर होणारी चर्चा ही खरोखर रोचक आहे. इंद्रराव व नितीनपुरती मुद्देसूद व ससंदर्भही आहे. तेव्हा ती केवळ सर्कारी बाबुगिरी दाखवून थांबवू नये अशी दोघांना विनंती

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

इन्द्र्राज पवार's picture

1 Jun 2010 - 5:29 pm | इन्द्र्राज पवार

"...१३ जानेवारी : उपोषण सुरू.
१३ जानेवारी ते १६ जानेवारी : नेहरूंची चलबिचल --> घबराट --> शरणागती --> पैसे दिले गेले.
१७ जानेवारी / १८ जानेवारी : पैसे पाकिस्तानला मिळाले. उपोषणाची समाप्ती.

दोन देशातील (१५ ऑगस्ट १९४७ नंतरचे) व्यवहार एखादी दुधाची बाटली या घरातून त्या घरात जावी अशा सहज रितीने होत नसतात. ज्यावेळी एका देशाचा पंतप्रधान "५५ कोटी पाकिस्तानला देण्याची घोषणा" जागतिक पातळीवरील मिडियाच्या प्रतिनिधीसमोर व ती ही लेखी स्वरुपात करतो, त्यावेळी असे कोणी म्हणत नाही..."असं का... मग काढा बघु त्या ५५ कोटींच्या नोटा, दाखवा आम्हाला... मगच आमचा विश्वास...".

नेहरुंची ५५ कोटीची कबुली झाली दुपारी १.३० वा... पण ती झाली म्हणजे त्या निर्णंयाची "सरकारी प्रत..." मिळेपर्यंत वृत्तवाहिन्या वा त्यांचे प्रतिनिधी सेक्रेटेरीयटमध्ये थांबून राहतात. हे होईपर्यन्त संध्याकाळ आणि लोकांची बिर्ला हाऊसकडे पावले वळतात.... ते गांधींचे मुक्कामाचे ठिकाण...काही हिन्दी वृत्तप्रतिनिधी घाईघाईने श्री.प्यारेलाल यांना नेहरुंच्या त्या घोषणेची माहिती देतात. प्यारेलाल यांना समाधान वाटते (तसे ते तिथे हजर असलेल्या सुशिला नय्यर यांनाही सांगतात). पण तो पर्यन्त गांधींच्या प्रार्थनेची वेळ, म्हणून त्या वेळी ती बातमी त्यांना देता येत नाही. रात्री त्यांना याबाबत सविस्तर सांगितले जाते व त्यांचा उपोषण सोडण्याचा निर्णय होतो. (आता मी जरी वरील प्रतिसादात गांधींनी उपोषण सोडले असे जरी म्हटले असले तरी त्यांनी दि.१७ जानेवारी रोजी सर्व व्यवहार लेखी स्वरूपात मागीतला होता व त्यावर संबंधितांच्या सह्या...या सर्व व्यवहारामधील दुसरा उद्देश "दिल्लीत शांतता रक्षणाची हमी" असे झाले तरच "मी उपोषण सोडले" असा अर्थ....)

राजभवनात परत गडबड... कारण तो पर्यंत गांधींची प्रकृती खालावली असे बातमीपत्र. आता ५५ कोटी तर पाकिस्तानला दिले हे कागदोपत्री नेहरु-पटेल यांनी मान्य केलेच... राह्ता राहिले शांतता ऱक्षणाची हमी. "गांधी वाचले पाहिजेत" या पटेलांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काँग्रेस, हिंदु महासभा, मुस्लिम लीग, रा.स्व.संघ, शीख प्रातिनिधीक संस्था यांनी त्या हमीपत्रावर दि.१७ जानेवारीला सह्या केल्या व ती सर्व कागदपत्रे त्याच रात्री गांधींना देण्यासाठी श्री.प्यारेलाल यांच्याकडे सुपूर्द केली गेली.

हमीपत्रातील कलमे ~~
१. दिल्लीतील मुसलमानांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहील.
२. ख्वाजा कुतुबुद्दीन दर्ग्याचा उरूस नेहमीप्रमाणे होईल.
३. सब्जीमंडी, करोलबाग आणि पहाडगंज या भागात मुसलमानांना मुक्तपणे फिरू दिले जाईल.
४. हिन्दुंनी व्यापलेल्या मशिदी मुसलमानांना परत केल्या जातील आणि दिल्लीत मुसलमानांना म्हणून ठेवलेला जो भाग मोकळा आहे त्याचा हिन्दु कब्जा करणार नाहीत.
५. दिल्लीतुन बाहेर गेलेले मुसलमान परत येऊ शकतील असे वातावरण तयार केले जाईल....

आता हे हमीपत्र व तीवर वर उल्लेख केलेल्या संघटनेंचे प्रतिनिधी यांच्या मान्यतादर्शक सह्या यासह "इतर" कागद्पत्रे असा जो उल्लेख खुद्द प्यारेलाल यांच्याकडे देण्यात आला....यामध्ये ५५ कोटीची "ट्रान्स्फर डॉ़क्युमेंट्स" नाहीत असे आपण समजणे याला काही अर्थ आहे काय?

शेवटी ~~~
श्री. बिपिन आणि श्री. नितिन जी.... "आकाशवाणी" मुंबई केन्द्रात आपले कुणी ओळखीचे आहेत का? असतील तर त्यांच्याशी संपर्क साधुन "भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आकाशवाणी ~ १९४२ ते १९५०" असा एक मोठा ध्वनीसंग्रह त्यांच्याकडे आहे; तो ऐकणे तुम्हा दोघांना शक्य आहे का?

शक्यतो महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी अभ्यासकांना त्या पध्द्तीच्या टेप्स उपल्ब्धतेनुसार ऐकण्यासाठी दिल्या जातात. तीमध्ये "दिनांक १३ जानेवारी १९४८" चे बातमी संकलन आहे. "करारानुसार पाकिस्तानसमवेतच्या सर्व बाबी पूर्ण व्हाव्यात यासाठी महात्मा गांधी यांनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे."..... ही बातमी त्या दिवशी संपूर्ण देशात १४ भाषेत ध्वनीक्षेपीत झाली होती.

अजुनही आपण असे म्हणायचे का की गांधींच्या उपोषणाचा आणि ५५ कोटीचा काहीही संबंध नव्हता?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भडकमकर मास्तर's picture

1 Jun 2010 - 5:46 pm | भडकमकर मास्तर

सध्या हे एवढेच...
__/\__

समंजस's picture

1 Jun 2010 - 5:51 pm | समंजस

"करारानुसार पाकिस्तानसमवेतच्या सर्व बाबी पूर्ण व्हाव्यात यासाठी महात्मा गांधी यांनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे."..... ही बातमी त्या दिवशी संपूर्ण देशात १४ भाषेत ध्वनीक्षेपीत झाली होती.
--------------------------------------------------------------------
जर हे सत्य असेल तर(त्या जुन्या टेप्स उपलब्ध असतील तर) मला वाटतं उपोषणाचं एकच कारण(हिंदू-मुस्लीम एकता) देणार्‍यांनी या गोष्टींचा नक्कीच पडताळा करून बघावा आणि काय खरं ते पुढे आणावे.

नाहीतर सावरकर विरोधकांनी गांधी हत्येचं निमीत्त करून सावरकर-हिंदू महासभा यांना ठोकणे तसेच ५५ कोटीचं निमीत्त करून गांधी विरोधकांनी महात्मा गाधींना ठोकणे हे अव्याहत चालूच राहणार.

स्वाती२'s picture

1 Jun 2010 - 5:30 pm | स्वाती२

धागा आणि त्या वरील चर्चा वाचून बरीच नविन माहिती मिळाली.

नितिन थत्ते's picture

1 Jun 2010 - 6:57 pm | नितिन थत्ते

>>"करारानुसार पाकिस्तानसमवेतच्या सर्व बाबी पूर्ण व्हाव्यात यासाठी महात्मा गांधी यांनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.

ही बातमी अशीच प्रसिद्ध झाली होती याचा काही संदर्भ देता आला तर द्यावा.

तरीही १२ जानेवारीच्या भाषणात गांधींनी उपासाचे कारण म्हणून ५५ कोटीचा उल्लेख केला नाही. (भाषणाचा दुवा मी दिला आहे). ती बातमी चुकीच्या माहितीवर आधारलेली असू शकते- आकाशवाणीवरची असली तरीही. (कटात सामील असलेल्यांच्या हस्तकांनी तर ती अशा प्रकारे दिली नसेल?- ह. घेणे)

(हे इंद्रराज पवार इतक्या झटपट नवनवे संदर्भ-निरुपयोगी का होईना- देत आहेत. सगळे संदर्भ तयारच ठेवले आहेत की काय?)

नितिन थत्ते

sagarparadkar's picture

1 Jun 2010 - 8:16 pm | sagarparadkar

अहो थत्ते साहेब,

तुम्ही परत परत 'मणिभवन' च संदर्भ देत आहात. पण मला सांगा ती संस्था गांधी परिवाराचीच ना? मग ते कसं काय त्यांच्याच अडचणीचं वाण्ङ्मय संभाळ्णार ...

आता आपण वकिली बुद्धीने 'परीवार' या शब्दाचा कीस काढत बसाल, तर त्या परिवारात सर्वच कोन्ग्रेजी लोक आलेच हे आधीच स्पष्ट करतो.

मला भारत्-पाक फाळणी आणि 'प्रिटोरिया' राजवटीने सत्ता सोडावी लागणार म्हटल्यावर द. आफ्रिकेत खेळलेली खेळी यात बरंच साम्य जाणवतंय.

त्यांनीपण 'झुलु इंकाथा मुव्हमेन्ट' च्या मंगोसुथु बुथलेझी ला डॉ. नेल्सन मंडेलांविरुद्ध भडकवले. त्याने स्वतंत्र 'झुलुलँड' ची मागणी सुरू केली. पण डॉ. मंडेला (जरी म. गांधींचे अनुयायी मानले जातात तरी) ह्यांनी मुत्सद्दीपणाने मंगोसुथुशी चर्चा करून प्रिटोरियाचा हा डाव उधळून लावला व द. आफ्रिका ह देश अखंड ठेवण्यात ते यशस्वी झाले. म. गांधी फाळणी टाळण्यात यशस्वी झाले का?

बरं आता तुम्ही म्हणणार की हे अवांतर झाले. तुमचीच खेळी ओळखून मी आत्ताच म्हणतो कि " आता हे पुरे झाले असे वाटते" ...

नितिन थत्ते's picture

1 Jun 2010 - 8:59 pm | नितिन थत्ते

मी फक्त मणिभवनचीच साईट सांगत नाहीये. ती साईट गांधी परिवाराचीच आहे यात काही संशय नाही.

इंद्रराज पवार यांनी टाइम्स मधल्या ज्या बातम्या उद्धृत केल्या आहेत त्यातून उपोषणाचा आणि ५५ कोटींचा काही संबंध दिसत नाही हे मी दाखवून दिले आहे.

१२ जानेवारीच्या गांधींच्या भाषणाचा दुवा दिला आहे ते हिंदुस्तान टाइम्स मध्ये १३ जानेवारी रोजी छापून आलेले आहे. आणि ते गोषवारा म्हणून आलेले नसून फुल टेक्स्ट म्हणून आलेले आहे. गांधींनी खरोखरच ५५ कोटीसाठी उपोषण केले असते तर त्यांनी आपल्या भाषणात नक्की तसा उल्लेख केला असता.

(आकाशवाणीची बातमी आणि गांधींच्या स्वतःच्या भाषणाचे टेक्स्ट वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतील तर गांधींचे स्वतःचे भाषण अधिक विश्वासार्ह हे उघड आहे. या भाषणाचे टेक्स्ट असे नव्हते- तसे होते- हे कुणी दाखवले तर तेही तपासून घेऊन मान्य करायला हरकत नाही).

राहता राहिली आकाशवाणीची बातमी. ती प्रत्यक्ष ऐकायला मिळाल्यावर त्यावर मत व्यक्त करू शकेन. तेवढा एकच वाजवी पुरावा आत्तापर्यंतच्या चर्चेतून पुढे आला आहे. त्या बातमीची ट्रान्सस्क्रिप्ट पवार शेजारीच घेऊन बसलेले असावेत. ती त्यांनी स्कॅन करून येथे चढवायला हरकत नाही.

तोपर्यंत पुढे काही बोलणे नाही. चालू द्या.

नितिन थत्ते

इन्द्र्राज पवार's picture

1 Jun 2010 - 8:24 pm | इन्द्र्राज पवार

"....(हे इंद्रराज पवार इतक्या झटपट नवनवे संदर्भ-निरुपयोगी का होईना- देत आहेत. सगळे संदर्भ तयारच ठेवले आहेत की काय?)...."

चला...."निरुपयोगी" का होईना.... ते नवनवे संदर्भ आहेत हे तुम्ही मानता याचा मला आनंदच होतो. याच नव्हे तर आपल्या देशातील पहिल्या स्वातंत्र्य उठावाच्या (१८५७) तारखेपासून २६ जानेवारी १९५० पर्यंतच्या कालखंडावर मी भरपूर अभ्यास केला आहे....(वैयक्तिक ग्रंथालयदेखील आहे... शिवाय अशा काही ओळखी आहेत की, अशा माहिती संदर्भात एखाद्याच्या दारावर मध्यरात्री जरी खटखट केले तरी ती व्यक्ती स्वागतच करते.... याचा फार उपयोग होतो.. शिवाय माहिती मिळविण्यासाठी आपल्या भाषेत विनम्रता आहे असे समोरच्याला समजले तरी निम्मे काम होऊन जाते).... किंवा तुमच्यासारख्या अशाच प्रकारच्या गंभीर वाचकाला हे देखील माहित असेल की, अशा अभ्यासाची भूख कधीही शमत नाही...त्यासाठी निमित्त मात्र हवे असते, जे अशा प्रकारच्या चर्चेतून मिळत असते.

वाईट इतकेच वाटते की, अशा चर्चेला तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्याने "आकाशवाणीवरची असली तरीही. (कटात सामील असलेल्यांच्या हस्तकांनी तर ती अशा प्रकारे दिली नसेल?"... असे ~ लाईटली का होईना ~ म्हणणे. इतके चीप करू नका सरकारच्या त्या यंत्रणेला... "हस्तक" जरी असले तरी ते १४ भाषेतील तर्जुमा करणारे होते असे म्हणणे धाडसाचे होईल. (मला अनुभव आहे मुंबई आकाशवाणीचा.... किती नाकदुर्‍या काढाव्या लागतात काही माहितीसाठी त्याची....प्रसंगी अपमानदेखील सहन केला आहे.... असो).

ऑल इंडिया रेडिओ ही संस्था म्हणते आमिर खानच्या "रंग दे बसंती....." धर्तीचा बाजार होता काय...जिथे पिस्तूल घेऊन जावे... केंद्राधिकारीला वेठीस धरून स्वतः ब्रॉडकॉस्ट करून देशाचे "तारक" आम्हीच आहोत असे सांगायला?

तुमचा हा आक्षेप मी विनातक्रार मान्य करतो की, ही चर्चा "घरगुती" वरून एकदम सार्वजनीक पातळीवर आली. पण याचा अर्थ असा बिलकुल नाही की, गांधी-नेहरू-पटेल यांना दूषणे देण्यासाठी (मी "ठोकणे" शब्द कधीच वापरणार नाही, कारण माझी ती पात्रताच नाही.... कुठे ते महामानव आणि कुठे आमच्यासारखे चिल्लरखुर्दा. काजव्याइतपतदेखील आमची लायकी नाही त्या सूर्यांची महती गायला !) या संस्थळाचा उपयोग मी अथवा अन्य कुणी करत असेल. शेवटी "भारताचे स्वातंत्र्य" हा एक इतिहास आहे आणि ज्याला त्याल्या त्या विहिरीत आपआपल्या मोटीने उतरण्याचा विधीयुक्त हक्क आहे... जो तुम्हाला अन् मलाही आहे. असो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

sagarparadkar's picture

1 Jun 2010 - 10:06 pm | sagarparadkar

श्री. इन्द्रराज पवार ह्यांनी उत्तर दिलेलेच आहे.

मला तरी त्यांचे एकूण विवेचन हे "अभ्यासोनि प्रकटावे ..." ह्या समर्थ वचनाप्रमाणेच वाटतेय. हां आता हे काही लोकांना अडचणीचं ठरतंय त्याला कोण काय करणार?

गांधिजींचंच खरं मानायचं ह्या मताशी सहमत होणं अवघडच. मला तर त्यांची अनेक वक्तव्यं आणि क्रूती ह्यात बरंच पाणी मुरतंय असं नेहेमीच वाटतं.

अनेकदा सत्य, अर्धसत्य आणि पूर्णसत्य हे सोयीनुसार (ब्रिटिशान्च्या) सांगितलं किंवा दडवलं गेलंय असं वाटतंय.

इतिहासात अनेकदा तपशिलापेक्षा 'घटनाक्रम' हा जास्तं काही सांगून जातो. कारण आपण ज्यांच्यबद्दल बोल्तोय ते सर्व राजकारणी होते हे लक्षात घेतलेलं बरं.

एकदा तटस्थपणे गांधिजींची तुरुंगातील खोली आणि सावरकरांची अन्दमानमधील सेल्युलर जेल्मधील 'कोठडी' (खोली मुद्दम्हूनच म्हणत नाहीये) हे दोन्ही डोळ्यांपुढे आणा, आणि नि:पक्षपणे तुलना करून बघा. अनेक उत्तरं आपोआपच मिळून जातील.

नितिन थत्ते's picture

1 Jun 2010 - 10:35 pm | नितिन थत्ते

>>गांधिजींची तुरुंगातील खोली आणि सावरकरांची अन्दमानमधील सेल्युलर जेल्मधील 'कोठडी....

नवा (जुनाच) मुद्दा.

नितिन थत्ते

सोम्यागोम्या's picture

2 Jun 2010 - 12:29 am | सोम्यागोम्या

पवारांच्या अभ्यासाबद्दल त्यांना सा.न. मला तरी त्यांचं म्हणणं पटतय. ते योग्य दाखले देत आहेत.
थत्ते यांनी त्यांचे मुद्दे मान्य करायचेच नाहीत असं टोकाचं ठरवून ठेवल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियांचा समतोल सुटत चालला आहे असे वाटते.

छान चर्चा. माहितीपूर्ण विवेचन. आणखी वाचायला आवडेल.

इन्द्र्राज पवार's picture

3 Jun 2010 - 12:09 am | इन्द्र्राज पवार

"....पवारांच्या अभ्यासाबद्दल त्यांना सा.न...."

तुमचे हे वाक्य मी केवळ आभार प्रदर्शनासाठी घेत आहे... सा.न. करावा एवढा का माझा अभ्यास नाही.... बस्स एस.टी. प्रवासात शेजारी बसलेल्या माणसापेक्षा एखादे दुसरे ज्यादाचे पुस्तक वाचलेले असते, इतपतच. पण अशा चर्चेमुळे अभ्यासाला दिशा मिळते हेही नसे थोडके !!

आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु आणि इतर अनेक क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, पण हे सर्वजण 'त्यां'च्या लेखी महत्वाचे नव्हते कारण त्यांनी केली ती 'हिंसा'. ...
मग ब्रिटिशांनी 'जालियनवाला बाग' मधे काय 'वैष्णव जन तो ' गायलं का? मग चौरिचुरा मधे १९४२ च्या आंदोलनात केवळ ४ पोलिस मारले गेले म्हणून अक्ख्या देशभरातलं आंदोलन का मागे घेतलं. त्यामुळे फायदा कोणाचा झाला? ब्रिटिशांचा कि भारतीय स्वातन्त्र्यं चळवळीचा?

प्रचंड बहुमताने 'निवडून' आलेल्या सुभाषचंद्र बोस यांना डावलून पट्टाभि सीतारामय्या ह्यान्ची कॉन्ग्रेसच्या अध्य़क्षपदी 'नियुक्ति' क केली गेली? तेव्हा तत्त्वाग्रह, सत्याग्रह ह्यांची आआठवण का झाली नाही?

परत म्हणा कि हे विषयांतर होतंय म्हणून ...

पक्या's picture

1 Jun 2010 - 10:56 pm | पक्या

भोचकजी सावरकरांविषयी घरगुती माहिती दिल्याबद्द्ल धन्यावाद.
इंद्रराज छान माहिती पुरवलीत. धन्यवाद. आपल्या दांडग्या अभ्यासाला सलाम.
सावरकरांविषयी , गांधी नेहरू , आंबेड्करांविषयी, भारतीय स्वातंत्र्याविषयी अजून उजेडात नसलेली माहिती वाचायला आवडेल. आपणास नम्र विनंती करतो की नवीन धागे उघडून हे कृपया लिहा . ज्यायोगे माहित नसलेला इतिहास समजेल, चर्चा घडेल आणि नवीन विचार ही समोर येतील.

नितीन थत्ते जी , 'आता पुरे , हे इथेच थांबवतो ' असे म्हणून कृपया चर्चा थांबवू नका. या धाग्यावर पुढे घडलेली चर्चा अवांतर वाटली तर नवीन धागा सुरू करण्याची सोय आहेच ना. 'माझ्याकडे मुद्दे आहेत , माहिती आहे' असे सांगायचे आणि 'पण मी सांगणार नाही' ह्याला काय अर्थ आहे. असेच म्हणायचे असेल तर चर्चेत उतरूच नका ना.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

sagarparadkar's picture

1 Jun 2010 - 11:03 pm | sagarparadkar

>> 'माझ्याकडे मुद्दे आहेत , माहिती आहे' असे सांगायचे आणि 'पण मी सांगणार नाही' ह्याला काय अर्थ आहे. असेच म्हणायचे असेल तर चर्चेत उतरूच नका ना.

असेच म्हणतो ... लढ बाप्पू =))

इथे कोणी य. दि. फडके ह्यांचे नातेवाईक आहे का? असलात तरी तुम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळे मत मांडायचा अधिकार आहे. ... कोणी त्यांचीच री ओढायची अशी सक्ती केलीय का? तसं असेल तर ते 'गांधीवादा'शी प्रतारणा करणारं ठरेल :))

श्रावण मोडक's picture

1 Jun 2010 - 11:19 pm | श्रावण मोडक

दमलो!!! परंपरेला साजेशी चर्चा (सुरू आहे).
स्वगत: प्रत्येक गोष्टीवर कृष्ण-धवल उत्तरंच हवीत हा आग्रह कधी सुटायचा कुणास ठाऊक! माणसं इतकी तर्कदुष्ट नसतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात ग्रे एरिया असतातच. मग ते सावरकर असोत वा गांधी. नेहरू वगैरेही. पटेलही. अगदी गेलाबाजार आजचे नेते-पुढारीही. एखादी करडी रंगसंगती दिसली म्हणजे लगेच तो माणूस काळा किंवा म्हणून त्याचा श्वेतवर्ण कसा भ्रष्ट आहे वगैरेचा सोस किती असावा! या माणसांनीसुद्धा आपण परफेक्ट आहोत असा दावा केला नसावा (नाही, असे म्हणत नाही. कारण ती माणसं परफेक्ट नाहीत). गांधी गांधीवादी नव्हते आणि बहुदा सावरकरही सावरकरवादी नसावेत (अगदी मार्क्सच्या नावे म्हणतात तसं या नेत्यांनीही असं कुठं म्हटलं आहे का हे पहावं लागेल एकदा). हे 'वादी' असतो आपणच. 'संवादी' क्वचितच असतो बहुदा. असतोच, तर काळाच्या प्रवासात आजच्या बिंदूवर उभे राहून इतिहासाचे मूल्यांकन करताना त्या-त्या व्यक्तींच्या वर्तनासाठी फक्त आजचेच मापदंड आजच्याच चष्म्यातून लावून पाहिले नसते हे मात्र खचित.
हे स्वगत आहे. त्यामुळे ते बहुतेक इतरांना पटणे शक्य नाही. अशांनी त्यास खुश्शाल फाट्यावर मारावे, ही विनंती.

भडकमकर मास्तर's picture

2 Jun 2010 - 9:38 am | भडकमकर मास्तर

सहमत...
अवांतर :
या प्रतिसादातच इतका करडा रंग दिसतोय , :P
ग्रे एरिया फार आहे... :W

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jun 2010 - 11:54 am | बिपिन कार्यकर्ते

ग्रे एरिया फार आहे...

त्या पेक्षा ग्रे मॅटर असते तर!!! ;)

खुद के साथ बातां: पुढचे चार पाच कट्टे टाळावेत म्हणतोय. :D

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

2 Jun 2010 - 11:59 am | श्रावण मोडक

संपादकांच्या खुदके साथ बातांशी सहमत; :) बाकी अर्थातच असहमत. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jun 2010 - 12:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"संपादकांचे ग्रे मॅटर ठिकाणावर आहे काय?" असा लेखच लिहायला हवा.

'ग्रे एरिया'बद्दल श्रामोंशी सहमत.

अदिती

इन्द्र्राज पवार's picture

1 Jun 2010 - 11:07 pm | इन्द्र्राज पवार

"इतिहासात अनेकदा तपशिलापेक्षा 'घटनाक्रम' हा जास्तं काही सांगून जातो. कारण आपण ज्यांच्यबद्दल बोल्तोय ते सर्व राजकारणी होते हे लक्षात घेतलेलं बरं...."

श्री.सागर पराडकर यांचा हा मुद्दा बरेच काही सांगून जातो. "चरित्रलेखन" हा प्रकार फार धोकादायक असू शकतो, कारण लिहिणारा विषयव्यक्तीबाबत भक्तीभावानेच लिहिणार, त्याला देवत्व अर्पण करणार... त्याच्या जीवनपटातील काही डाग काळवंडलेले असले तर खुबीने ते झाकणार... आदी गोष्टी होत असतातच. त्यामुळे अभ्यासकाच्या दृष्टीने अशी चरित्रलेखने ही "फॅक्ट्फुल" न होता "फॅन्सीफुल" होऊन जातात. त्यामुळे निरपेक्ष वृत्तीने काही गोष्टींचा आपणास मागोवा घ्यायचा असेल तर जास्तीतजास्त घटनाक्रम आणि त्या अनुषंगाने विविध माध्यमातून झालेल्या चर्चा यावर लक्ष केन्द्रीत करणे केव्हाही हितकर असते.

विभूतिपूजा हा आपल्याकडील लेखकांचा असाध्य असा आजार आहे आणि अशा प्रकारच्या वाचनाचा एक निश्चित असा वाचकवर्गही समाजात असतोच, त्यामुळे असे एकतर्फी मार्ग स्वीकारले जातात.... दुर्दैवाने इतिहासाच्या नजरेतून याला संतुलित सादरीकरण असे म्हटले जात नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

इन्द्र्राज पवार's picture

1 Jun 2010 - 11:51 pm | इन्द्र्राज पवार

"....एखादी करडी रंगसंगती दिसली म्हणजे लगेच तो माणूस काळा किंवा म्हणून त्याचा श्वेतवर्ण कसा भ्रष्ट आहे वगैरेचा सोस किती असावा!...."
श्रामो जी...
तुमचे हे वाक्य तुम्ही माझ्या मनातील वाचून लिहिला की काय असा प्रश्न मला पडला आहे. तुमच्यासारखेच मी म्हणतो की कोणतीही व्यक्ती (अगदी रामकृष्णापासून घेतले तरी....) शंभर टक्के सदगुणी तसेच दुर्गुणीही नसते. परिस्थितीनुसार त्यांचे वर्तन झालेले असते पण असा एखादा प्रसंग त्या व्यक्तीच्या जीवनाचा ल.सा.वि. ठरू नये इतपत भान आपण ठेवले तर इतिहासाकडे पाहण्याची आपली दृष्टी बरीचशी शुध्द होईल.

संताप येतो तो पक्षीय पातळीवर जाऊन क्षुद्र मनाचे राजकारण खेळणार्‍या दीड दमडीच्या पुढारी लोकांचा ! काय मिळविले त्या मणीशंकर अय्यरने आणि त्याच्या अंदमानमधील त्या घृणास्पद कृतीला पाठी घालणार्‍या काँग्रेस आघाडी सरकारने? मनामनातील तेढ वाढत जाते ते या राजकारणी लोकांकडून..!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

ज्ञानेश...'s picture

2 Jun 2010 - 11:27 am | ज्ञानेश...

एकंदर चर्चा खूप सुरेख चालली आहे. काही नव्या गोष्टी कळल्या, काही जुनी मते तपासून घेता आली...
खराटा आणि इन्द्रा द टायगर यांचा आभारी आहे. बराच अभ्यास आहे दोघांचाही.

इन्द्र्राज पवार's picture

2 Jun 2010 - 8:49 pm | इन्द्र्राज पवार

धन्यवाद ज्ञानेश.... "जुनी मते तपासून घेता आली" असे आपण म्हणता.. पण मी सांगतो ती मते तुमच्या वाचनाची कक्षा वाढवुन तयार करा व नंतरच त्यांना विराम द्या... केवळ इथल्या चर्चेवर समाधान मानू नका.... फार मोठा इतिहास आहे आपल्या देशाला.... जो कुठल्याही महविद्यालयात वा विद्यापीठात समतोलरितीने शिकविला जात नाही... तिथेही विविध विषयाचा अभ्यासक्रम निश्चित करणे ही बाब "डीन्स" आणि "बोर्ड ऑफ स्टडिज" नावाचे जे संस्थान आहे त्यावर वर्षानुवर्षे चिकटून बसलेल्या धेंडाच्या विचारसरणीवर आणि त्यांचा कल ज्या राजकारणावर असतो त्या प्रवाहाशी निगडीत असते...त्यामुळे आपला खरा अभ्यास हा विद्यापीठाची ती पदवीची सुरळी घेऊन बाहेर पडल्यावरच सुरू होतो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मृत्युन्जय's picture

28 May 2011 - 11:46 am | मृत्युन्जय

सावरकरांच्या जयंतीनिमित्त एक चांगला धागा वर आणावा म्हणतो.