===============================================================================
न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
१० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
१२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
१५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
१८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
२१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
२४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
२६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
२९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
===============================================================================
न्यू यॉर्क हे अमेरिकेच्या पूर्व किनार्यावरचे एक शहर. जगप्रसिद्ध शहरांच्या यादीत नाव असलेल्या या शहराच्या नावाभोवती एक वेगळेच वलय आहे, हे नि:संशय. त्याला विविध कारणे आहेत आणि त्यातल्या एक किंवा अनेक कारणांनी हे शहर पर्यटकांच्या यादीत बर्याच वर, किंबहुना पहिल्या स्थानावर असते. अश्या शहराची काहीशी दीर्घ भेट आटपून नुकताच परतलो आहे. अर्थातच त्या भेटीत न्यू यॉर्कमध्ये बरीच भटकंती झाली, त्या शहराचा भरपूर आनंद उपभोगला, थोडक्यात "जीवाचे न्यू यॉर्क केले !" तो अनुभव वाचकांबरोबर वाटून त्या आठवणींचा आनंद परत अनुभवण्याचा मोह आवरला नाही यात आश्चर्य ते काय ? असो.
अमेरिकेला जायचे नक्की झाले आणि अर्थातच इतर तयारीबरोबर काय काय पहायचे याचा विचार सुरू होणे अपरिहार्य होता. पूर्वी एकदा अमेरिकासफर झाली होती. तेव्हा पूर्व किनारा ते पश्चिम किनारा चवीने बघून झाले होते. शिवाय या सफरीचा मुख्य हेतू आमच्या युवराजांना भेटणे आणि त्यांच्या सोबत काळ व्यतीत करणे हाच होता. त्यामुळे, भेट देण्याच्या जागांची फार मोठी यादी नव्हती. अमरिकेच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची १५ दिवसांची एक सहल करण्याची माझी इच्छा होती. पण ते नक्की करेपर्यंत त्या सहलींतल्या ऑक्टोबरपर्यंतच्या जागा संपून गेल्या. उगाच हट्टाने फिरायला जायचेच म्हणून कोठेतरी भटकंती करण्यात माझा रस नव्हता. त्यामुळे, "न्यू यॉर्क न्यू यॉर्क म्हणजे आहे तरी काय, हे संपूर्ण शहर पिंजून काढून पाहूया." असा विचार पक्का झाला. अर्थात असे केल्याने भेटीचा सर्व वेळ मुलाबरोबर राहता येईल हा गुप्त स्वार्थ होताच !
अमेरिकेला जायचे तर व्हिसा काढणे आलेच. या बाबतीत साधारणपणे जरा धडकी भरेल अश्या कहाण्या सांगितल्या जातात. मात्र या प्रकरणाची जनमानसात जी हवा आहे त्यापेक्षा ते खूपच सरळ आणि सोपे असल्याचा अनुभव आला. अमेरिकन दूतावासाच्या संस्थळावरील अर्ज भरा, संस्थळावरच किंवा त्यांनी दिलेल्या यादीतील एका बँकेत व्हिसा प्रोसेसिंग फी भरा आणि संस्थळावरून अनुमती आली की आपल्याला सोयीच्या जागेवरील काउंसलेटमध्ये मुलाखतीची वेळ घ्या, बस्स. मुंबईमधल्या काउंसलेटमध्ये १५ दिवसांच्या आतली मुलाखतीची वेळ मिळाली.
मुलाखतीच्या दिवसाच्या कमीत कमी एक दिवस अगोदरची वेळ घेऊन VFS या वकिलातीच्या मान्यताप्राप्त एजंट कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात बोटांचे ठसे देणे व फोटो काढून घेणे करावे लागते, तेही सोपस्कार पूर्ण केले.
दुसर्या दिवशी, मुलाखतीला आलेल्या लोकांची काऊंसलेटबाहेरची मारुतीच्या शेपटीसारखी लांबच लांब रांग पाहून "आता दिवसभर इथेच जाईल" असे वाटले. मध्ये मध्ये थांबत थांबत, पण तरीही फार मोठे थांबे न घेता न घेता रांग पुढे पुढे जात राहिली आणि थोड्याच वेळात काऊंसलेटच्या अंतर्भागात पोहोचलो. तेथे रांग थांबली असताना बसायची व्यवस्थाही होती, हे पाहून बरे वाटले. फार खोळंबा न होता एकून अर्ध्या-पाऊण तासातच मुलाखतीच्या दालनात पोहोचलो. तेथे रांगेत उभे असताना आमच्या पुढे असलेल्या तरुणीच्या चाललेल्या मुलाखतीतील संभाषण ऐकू येत होते. अमेरिकेत शिकत असलेल्या मुलाशी तिचे दोन-तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ती मोठ्या कळकळीने सगळी माहिती अधिकार्याला सांगत होती. पण, "शिकत असलेला तिचा नवरा त्या दोघांचा आर्थिक भार कसा उचलेल ?" याबाबत अधिकार्याची समजूत पटवून देण्यात ती अयशस्वी ठरली. अधिकार्याने "सॉरी मॅडम, मी तुम्हाला व्हिसा देऊ शकत नाही" असे म्हणत पासपोर्ट परत करून तिची बोळवण केली. हे सगळे कान देऊन ऐकत असलेल्या आमच्या गृहमंत्र्यांवर त्याचा प्रभाव पडलाच ! "आता असं झालं तर काय?" अश्या प्रश्नाला "तिची आणि आपली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तेव्हा उगाच काळजी करू नको" असे म्हणत आम्ही मुलाखत घेणार्या अधिकार्यासमोर गेलो.
"(अ) आपल्या देशात जाणारी व्यक्ती तेथे अवैधरीत्या राहणार नाही आणि/किंवा (आ) आपल्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोहोचविणार नाही आणि/किंवा (इ) आपल्या देशावर आर्थिक भार ठरणार नाही" ही काळजी घेणे हे वकिलातीतील व्हिसा अधिकार्यांचे मुख्य काम असते, हे माहीत होते. शिवाय, अगोदरच्या अमेरिका भेटीच्या वेळच्या मुलाखतीचा आणि त्या वेळेस मुलाखत घेणार्या अधिकार्याशी झालेल्या किंचित बाचाबाचीचा अनुभव होता. ;) त्यामुळे मी बर्यापैकी निर्धास्त होतो. मात्र, त्याच बरोबर, तो अनुभव वेगळ्या देशातील वकिलातीतील होता आणि "कोणतेही कारण न देता कोणालाही व्हिसा नाकारण्याचे अधिकार सर्वच देशांच्या वकिलातींना असतात", हे सुद्धा पुरेपूर माहीत होते. त्यामुळे, अनावश्यक अतीआत्मविश्वासही नव्हता.
वकिलातीचे सर्व अमेरिकन अधिकारी खूपच विनयशीलपणे वागताना दिसले. स्मितहास्यपूर्वक 'गुड मॉर्निंग' ने स्वागत झाले. मुलाखतीचे सोपस्कार आटपताना एखादा टोकदार प्रश्नही सौम्य शब्दांत आणि 'सर' वगैरे संबोधने सढळपणे वापरून केला गेला. एकंदरीत वरिष्ठतेचा किंवा तुच्छतेचा आविर्भाव चुकूनही दिसला नाही. याविरुद्ध, काऊंसलेटमधल्या भारतीय सुरक्षाकर्मचार्यांची वागणूक बर्यापैकी उद्धट आणि काही वेळेस चीड आणणारी होती. अमेरिकन काऊंसलेटमध्ये आपण व्हिसा घ्यायला आलो आहोत या कारणाने लोक त्यांची वागणूक नाईलाजाने शांतपणे सहन करत होते.
पाचेक मिनिटांची मुलाखत संपल्यावर "तुम्हाला व्हिसा दिला आहे, पाच दिवसांत पासपोर्ट ताब्यात मिळेल" हे आश्वासन मिळाले. काम संपवून "अरे वा ! हे प्रकरण तर खूपच सोपे आहे" असा विचार करत इमारतींबाहेर पडलो. त्याच वेळेस अजून एक गोष्ट ध्यानात आली की, "अरेच्च्या, मुलाखतीत भरभक्कम पुरावे असावे म्हणून आणलेली बर्यापैकी जाड फाइल तर सर्व वेळ बॅगेतच होती." आठवडाभर परिश्रमाने तयार केलेल्या कागदपत्रांना पाहणे तर दूरच, पण मुलाखतीत त्याबद्दल काही प्रश्न किंवा त्यांचा साधा उल्लेखही होऊ नये ?! काय हे !! ;) पण, व्हिसा मिळाल्याच्या आनंदात ही गोष्ट विसरायला फार वेळ लागला नाही.
व्हिसाचा अर्ज करताना संस्थळावर असलेल्या यादीतील आपल्याला सोयीच्या ठिकाणाची "पासपोर्ट परत ताब्यात घेण्याचे ठिकाण (पासपोर्ट कलेक्शन सेंटर)" अशी निवड आपण करू शकतो. पुण्यातल्या सोहराब हॉल (पुणे स्टेशन) येथील VFS चे कार्यालय असे एक कलेक्शन सेंटर आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील लोकांची एक मुंबई फेरी वाचते. व्हिसासह पासपोर्ट तेथे पोहोचला की नाही हे आपल्याला वकिलातीच्या संस्थळावर पाहता येते.
मुलाखत शुक्रवारी असल्याचा फायदा घेत शनिवार-रविवार ठाण्यातील नातेवाइकांचा पाहुणचार घेऊन सोमवारी दुपारी पुण्यात घरी पोचलो. सोमवार म्हणजे मुलाखतीनंतरचा कामाचा पहिलाच दिवस होता. तरी साधारणपणे दुपारी दोन वाजता घरी पोहोचल्यावर वकिलातीच्या संस्थळावर डोकावण्याचा मोह झालाच ! अहो आश्चर्यम्, तेथे "पासपोर्ट पुण्याला पोहोचला आहे आणि तो घेऊन जाऊ शकता" अशी सूचना होती ! पासपोर्ट हातात आल्यावर पाहिले तर व्हिसावरची तारीख मुलाखतीच्या दिवसाचीच होती.
थोडक्यात, लोकहो, "परदेशात जाणारी व्यक्ती तेथे अवैधरीत्या राहणार नाही आणि/किंवा त्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोहोचविणार नाही आणि/किंवा त्या देशावर आर्थिक भार ठरणार नाही" हे तुमच्या बाबतीत खरे असले आणि मुलाखत घेणार्या अधिकार्याला ते आपल्या बोलण्याने व कागदपत्रांनी पटवू शकलात तर अमेरिकनच काय पण कुठल्याच देशाच्या व्हिसाचा फार धसका घेण्याची गरज नाही. मात्र, "कोणतेही कारण न देता कोणालाही व्हिसा नाकारण्याचे अधिकार सर्वच देशांच्या वकिलातींना असतात", हे तत्त्व लक्षात ठेवून अनावश्यक अतीआत्मविश्वासही टाळणे जरूर आहे. असो.
व्हिसा हा महत्त्वाचा टप्पा पार केल्यावर तुलनेने सहजपणे होणार्या इतर गोष्टी पुर्या करणे आले. त्यातल्या मुख्य गोष्टी म्हणजे...
१. विमानाचे रिटर्न तिकीट : हे हल्ली घरबसल्या आंतरजालावरूनही मिळते. दोनतीन महिने अगोदर जालावर थोडे संशोधन केले तर आपल्या आवडीची विमान कंपनी व सोयीचा प्रवासाचा दिवस आणि तिकिटाची किंमत यांचे चांगले नियोजन करता येते. माझ्यासारखा सतत विमानाच्या खिडकीबाहेर डोकावयाचा नाद असला तर मोक्याची खिडकीजवळची जागाही पटकावता येते !
२. पर्यटन वैद्यकीय विमा : हा प्रत्येक परदेशी सहलीचा महत्त्वाचा भाग असतो. बहुतेक सर्व पाश्चिमात्य देशांत व्हिसासाठी अर्ज करताना पर्यटन वैद्यकीय विम्याची पॉलिसी जोडणे आवश्यक असते. अमेरिकन व्हिसासाठी असे करावे लागले नाही. तरीही, अमेरिकेतल्या वैद्यकीय सेवांचे गगनाला भिडणारे दर पाहिले तर अमेरिकेत वैद्यकीय विम्याविना जाणे हा वेडेपणा समजायला हरकत नाही.
३. परकीय चलन : आजकाल ही फार मोठी समस्या राहिलेली नाही. अनेक बँकांमध्ये आणि नॉन-बँकिंग संस्थांमध्ये परकीय चलन मिळू शकते. यासाठी "ट्रॅव्हल कार्ड" ची सोयही आहे. पाच-दहा डॉलर्सचाही व्यवहार कार्डाने होणार्या अमेरिकेसारख्या देशामध्ये असे कार्ड फार सोयीचे व सुरक्षिततेचे आहे. परदेशात फिरताना जालावर (ऑनलाईन) स्थानिक सहल, शोचे तिकिट, इ खरेदी करायची असेल तर मात्र असे कार्ड नीट चौकशी करून घ्यावे. सर्व कार्डे प्रत्यक्ष खरेदीच्या जागी (पॉइंट ऑफ सेल) स्वाईप करता येतात. परंतू, काही कार्डांची ऑनलाईन खरेदी करू शकू अश्या संस्थळांची यादी बरीच मर्यादित असते.
सर्वसाधारणपणे व्हिसा मिळाला की त्या देशातला प्रवेश गृहित धरायला हरकत नसते. मात्र पासपोर्टवरचा अमेरिकन व्हिसा ही केवळ "अमेरिकेच्या दिशेने प्रवास करण्याची परवानगी" असते. अमेरिकेच्या प्रवेशव्दारावर असलेल्या आगमन-निर्गमन अधिकार्याला (एंट्री पॉइंट इमिग्रेशन ऑफिसरला) प्रवाश्याची फेरतपासणी करून अमेरिकेत प्रवेश नाकारता येतो. या संदर्भात वरच्या तीन गोष्टी आपल्या बाजूने भरभक्कम असणे फायद्याचे ठरते.
सर्व तयारी झाली. या फेरीत, नेहमीच्या भटकंतीप्रमाणे सतत फिरत न राहता, फक्त न्यू यॉर्कमध्येच ठिय्या मारून राहायचे असल्याने इतर बर्याच गोष्टींचे महत्त्व तुलनेने कमी होते. आम्ही येतोय म्हणून लेकाने मॅनहॅटनमध्येच एक फ्लॅट भाड्याने घेतला अशी खबर दिली आणि सगळे टिक् मार्क्स पुरे झाले. आता निघण्याच्या दिवसाची वाट पाहणे सुरू झाले.
******
आला एकदाचा प्रवासाचा दिवस आणि आम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन क्रमांकाच्या स्थानकाककडे (टर्मिनल २) निघालो. मुंबईतील गर्दीचा सामना करत करत स्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर येताच हे स्थानक खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे याची चुणूक दिसायला सुरुवात झाली...
जसजसे पुढे गेलो तसतसे ती समजूत पक्की होत गेली...
या स्थानकाची माध्यमांत जी तारीफ केली गेली ती खरी असल्याचे दिसून आले आणि उड्डाण करण्याअगोदरच भारताच्या भूमीवरच विकसित देशातल्या व्यवस्थेचा अनुभव आल्याने उर अभिमानाने भरून आला...
विमानतळावरची व्यवस्था गेल्या चारपाच वर्षांत बरीच सुधारलयाचा अनुभव होताच. पण या नवीन स्थानकावरची व्यवस्था अजून चांगल्या प्रतीची असल्याचा अनुभव आला. त्यामुळे सगळे सोपस्कार संपवून शिवाय आरामात कॉफीपानाचा आनंद घेऊन बरोबर वेळेवर निर्गमनद्वाराजवळ पोहोचलो आणि काही वेळातच विमानात स्थानापन्न झालो. यावेळीही नेहमीप्रमाणेच खिडकीजवळची जागा राखून ठेवली होती हे सांगायला नकोच !...
खिडकीतून थोडेसे आजूबाजूचे निरीक्षण होते न होते तोच विमानाने बरोबर ठरलेल्या वेळी आकाशात झेप घेतली आणि आम्ही न्यू यॉर्कच्या दिशेने मार्गस्थ झालो. विमानाचा नकाश्यावरील मार्ग भारतातील महाराष्ट्र व गुजरातवरून उड्डाणाची सुरुवात करत नंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान-तुर्कमेनिस्तान-रशिया-स्वीडन-नॉर्वे असा उत्तरपश्चिमेकडे जात जात नॉर्वेजियन समुद्रावर पोहोचल्यावर दिशा बदलून बदलून दक्षिणपश्चिमेला वळून कॅनडा व नंतर अमेरिका असा होता...
रात्री ११:२० ला प्रवास सुरू होऊन दुसर्या दिवशी पहाटे ५:४० न्यू यॉर्कला पोहोचलो. या जवळ जवळ १६ तासांत विमान सूर्याच्या पुढे पुढे पळत राहिल्याने सतत अंधारातच प्रवास झाला. स्वीडनवरून उडताना मागच्या बाजूने थोडेसे झुंजूमुंजू झालेले दिसले...
पण जमिनीवरचे स्वच्छ दिसेल इतका उजेड नव्हता. त्यामुळे खिडकीजवळ बसूनही रशिया आणि स्कॅडेनेव्हिया यांच्या भूभागांचे हवाई सर्वेक्षण करण्याचा मनसुबा धुळीला मिळाला. शिवाय तेथे ढगांचे इतके दाट आवरण होते की बाल्टीक समुद्रातली काही अस्पष्ट बेटे...
आणि एका ठिकाणी नॉर्वेचा बर्फाळ भूभाग इतकेच काय ते दिसले...
कॅनडाचा सर्व भूभाग ढगांची जाड गोधडी पांघरून गाढ झोपी गेला होता. त्यामुळे त्याचेही दर्शन झाले नाही. बरेच दक्षिणेकडे येऊन विमान अमेरिकेवरून उडू लागले तेव्हा कोठे जमिनीवरचे लुकलुकते दिवे दिसू लागले...
न्यू यॉर्क जवळ आले, विमानाने उंची कमी केली आणि पहाटेच्या अंधुक उजेडात खालच्या शहरातल्या दिव्यांची रोषणाई पाहत असताना न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केव्हा उतरलो ते घ्यानातच आले नाही. हा विमानतळ न्यू यॉर्क राज्याला लागून असलेल्या न्यू जर्सी या राज्यात आहे. परंतु तो न्यू यॉर्क शहराच्या इतका जवळ आहे की न्यू यॉर्क शहरातले दोन (जे एफ के आणि ला ग्वार्दिया) व हा एक असे तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ दळणवळणाच्या दृष्टीने न्यू यॉर्कचेच विमानतळ गणले जातात ! या विमानतळाचे व्यवस्थापनही Port Authority of New York and New Jersey ही संस्था पाहते.
आगमनाचे सर्व सोपस्कार आटपून बाहेर पडेपर्यंत तासभर लागला. मुलगा विमानतळाबाहेर वाट पाहत असल्याचा फोन आला होताच. त्यामुळे बाहेर पडताच रुंद गुळगुळीत रस्त्यांवरून हिरवाईने भरलेल्या न्यू जर्सीतून प्रवास सुरू झाला...
मधूनच एखादी वस्ती लागत होती...
अर्ध्या एक तासात जॉर्ज वॉशिग्टन पूल ओलांडून आम्ही न्यू यॉर्क शहरातील मॅनहॅटन बेटावर पोहोचलो...
थोड्याच वेळात ब्रॉडवेवर आलो...
...आणि दहा एक मिनिटांत बेनेट अव्हेन्युवरच्या घरी पोहोचलो. पुढच्या तीन महिन्यांत न्यू यॉर्क शहर व परिसरांवर करायच्या चढायांसाठीची ही आमची मुख्य छावणी होती.
(क्रमश :)
===============================================================================
न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
१० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
१२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
१५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
१८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
२१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
२४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
२६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
२९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
===============================================================================
प्रतिक्रिया
24 Aug 2016 - 10:17 pm | पद्मावति
आहा....मस्तं! वाचतेय.
24 Aug 2016 - 10:17 pm | अभिजीत अवलिया
येऊ द्या पटापट पुढचे भाग. भटकंतीचे आम्ही खूप फॅन आहोत. मी पण ऑक्टोबर मध्ये 15 दिवस न्यू यॉर्कला असणार आहे. उपयोगी पडेल.
24 Aug 2016 - 10:17 pm | खटपट्या
छान सुरवात.
खीडकी शेजारची सीट घेतल्यामुळे बाहेरचे बघायला मिळते पण उठून विमानात कुठे जायचे असेल तर शेजारील प्रवाश्यांना उठवावे लागते...
24 Aug 2016 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
खिडकी शेजारची जागा घेतली नाही तर बाहेरचे दिसत तर नाहीच पण त्यात भर म्हणून खिडकी शेजारच्या प्रवाश्याला विमानात कुठे जायचे असल्यास तो आपल्याला उठवतो... म्हणजे दुप्पट तोटा नाही का ?! :) ;)
24 Aug 2016 - 10:31 pm | खटपट्या
हो तेही आहेच :)
24 Aug 2016 - 10:24 pm | कैलासवासी सोन्याबापु
वाह!! निव्वळ वाह!! म्हात्रे काका लेखन शिस्त शिकावी तर तुमच्याकडून, मुद्देसूद तरीही अतिशय जास्त पकड घेणारे, मी तुमच्यासोबत अन काकूंसोबत व्हीसाच्या लाईन मध्ये सुद्धा उभा होतो असे बरेच लोक म्हणतील पण तुमच्या अगोदर व्हिसा नामंजूर झालेल्या मुलीचा संवादही डोळ्यापुढे उभा राहिला एकदम.
व्हिसा बद्दल इतकं डिटेल तरी सुलभ आयुष्यात पहिल्यांदा वाचले आहे मी, मनात एकदम आले सालं एक दिवस असा आणू जेव्हा लोक भारतीय वकीलातीबाहेर अशीच रांग लावतील, कठीण आहे अशक्य नाहीये नाहीका?
पुढे मुंबई टर्मिनल पाहून आपण त्या दिवसाकडे पावले टाकतोय हळूहळू का होईना ह्याची खात्री पटली पुरी!
बाकी ते विमानाच्या मार्गाचे काही झेपले नाही बघा, सकाळी 0540 इंडियन टाईमला निघालात, अन अमेरिकन टाईम रात्री 1120ला पोचलात काय? वेळ ऍडजस्ट करून मग 16 तास होतात का प्रवासाचे? अन रूट असा बहिर्गोल वक्र का ठेवला गेला होता? म्हणजे पार स्कॅन्डिनेव्हिया कॅनडा करत वारी? तुमची एअरलाईन स्कॅन्डिनेव्हियन देशांपैकी एक होती का? की काही सिक्युरिटी रिझन्स होते?? पण मग चक्क पाकिस्तानी न अफगाण ऐरस्पेस मधून फ्लाईट??
24 Aug 2016 - 10:43 pm | प्रियान
तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हात्रे काका देतीलच, पण विमानांचे मार्ग ठरवण्यामागे "flight planning" हे एक फार मोठे शास्त्र आहे.
माझ्या अल्प माहिती नुसार त्यात fuel economy, air traffic congestion, no fly zones, आणि समुद्रा वरील प्रवासात radar surveillance, या आणि अश्या बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. बदलत्या ऋतू नुसार सुध्दा या सगळ्यात थोड्या फार प्रमाणात फरक पडतो.
24 Aug 2016 - 10:46 pm | आनन्दिता
बापुसाहेब, फ्लॅट नकाशावर बघताना हे अंतर जास्त वाटत असलं तरी पृथ्वीच्या गोलाईचा विचार केला तर हा सगळ्यात जवळचा रूट असतो.
"ग्रेट सर्कल रुट" का कायसं म्हणतात या प्रकाराला.
24 Aug 2016 - 11:20 pm | राघवेंद्र
बापू साहेब, रात्री ११:३० ला भा. प्र. वेळेनुसार निघायचे आणि सकाळी ५:३० ला न्यूयॉर्क प्रमाण (EST) वेळे नुसार उतरायचे. प्रवास ६ तासाचा वाटतो पण असतो १५-१६ तासाचा.
अमेरिकेतून येताना २४ तासाचा प्रवास वाटतो पण असतो १६ तासाचा.
24 Aug 2016 - 11:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
उड्डाणाचा काल :
विमान सुटण्याची व पोहोचण्याची वेळ उलट धरल्यामुळे तुमचा थोडासा गोंधळ झालाय.
भारतिय प्रमाण वेळेप्रमाणे रात्री ११:२० ला मुंबईहून प्रवास सुरू करून अमेरिकन पूर्व किनार्याच्या प्रमाण वेळेप्रमाने दुसर्या दिवशी पहाटे ५:४० न्यू यॉर्कला पोहोचलो. या दोन प्रमाण वेळांत ९ तास ३० मिनिटांचा फरक आहे... म्हणजे भारतिय वेळेप्रमाणे दुसर्या दिवशी दुपारी ३:१० ला पोहोचलो... म्हणजे उड्डाणाचा कालावधी १५ तास ५० मिनिटे (अंदाजे सोळा) तास होतो.
उड्डाणाचा वक्र मार्ग :
याचे सुलभपणे सांगण्याजोगे विश्लेषण नाही, त्यामुळे ते लेखात देणे टाळले होते.
उत्तर गोलार्धामध्ये, न थांबता अतीदूर अंतरावर उडणार्या (लाँग हाऊल) विमानांचा मार्ग उत्तर धृवाच्या दिशेन वाकलेल्या कंसाच्या स्वरूपात दिसतो. याला great-circle distance असे म्हणतात. याचे कारण, प्रवासाचा मार्ग गोल पृथ्वीच्या सपाट कागदावर काढलेल्या नकाशात जरा जास्त वक्र व जास्त लांब दिसतो.
याशिवाय, न थांबता लांब अंतरावर जाणारे विमान गंतव्यापर्यंत पोहोचेपर्यंत, पृथ्वीही तेवढ्याच वेळात स्वतःभोवती फिरत असल्याने, गंतव्याचे स्थान बदललेले असते. याला Coriolis effect असे म्हणतात. त्यामुळे, विमान जर सरळ रेषेत उडत राहीले तर चुकीच्या ठिकाणी पोहोचेल. हे ध्यानात घेऊन विमानांचा मार्ग वक्र करावा लागतो. या ठिकाणावरील अॅनिमेशन पाहिल्यास ते कसे हे समजू शकेल.
वर प्रियान यांनी म्हटल्याप्रमाणे, fuel economy, air traffic congestion, no fly zones, आणि समुद्रा वरील प्रवासात radar surveillance, बदलत्या ऋतू नुसार बदलत्या वार्यांच्या दिशा, इत्यादींच्यामुळेही फरक पडतो.
25 Aug 2016 - 12:12 am | डॉ सुहास म्हात्रे
विमानकंपनी अमेरिकन (युनायटेड एअरलाईन्स) होती. म्हणून ती भारतातून उडून, कोठेही थांबा न घेता, अमेरिकेत जाऊ शकली.
विमानाला आपल्या मायदेशाला ओलांडून जाताना तेथे एकतरी थांबा घेणे कायद्याने जरूर असते.
25 Aug 2016 - 3:15 am | टिवटिव
एअर इंडियाची दिल्ली ते जेएफके थेट सेवा आहे.
25 Aug 2016 - 3:44 am | पिलीयन रायडर
हेच म्हणते.
मुंबई ते नेवार्क अशीही डायरेक्ट सेवा आहे. १४ तासात अमेरिका. एकदाच काय ते छळ सहन करायचा.
ह्या वेळेस मी मुंबई-दिल्ली-जे.एफ.के अशी आले. तिकिटावर दिल्लीचा उल्लेखच नव्हता. आणि एअर ईंडीयाला कॉल केल्यावर विमान बदलावे लागणार नाही असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र विमान बदलावे लागले आणि परत सिक्युरिटी चेक करावा लागला. भयानक वैताग आला.
25 Aug 2016 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
युए आणि एई ची मुंबई/दिल्ली ते जे एफ के या सेवा भारतात सुरू होतात, भारतावरून विनाथांबा (म्हणजे भारताच्या पूर्वेकडील देशापासून पश्चिमेकडच्या देशाकडे) भरारी घेत नाहीत, म्हणूनच ते तडक उड्डाण शक्य आहे.
सद्या "मुंबई ते न्यू यॉर्क ही तडक सेवा" फक्त युनायडेड एअरलाईन्स आणि एअर इंडिया या दोनच कंपन्या देतात. दुर्दैवाने इंडीयाने अनेकदा मनस्ताप दिलेला असल्यामुळे तिचे कमी तिकीट व जास्त लगेज हे फायद्याचे मुद्दे असूनही युनायटेडला पसंती दिली.
25 Aug 2016 - 8:20 am | कैलासवासी सोन्याबापु
प्रियानजी, आनंदीताजी, राघवजी अन काका चौघांचेही आभार
24 Aug 2016 - 10:41 pm | सही रे सई
व्वा मस्त लिहिलं आहात काका. असं वाटलं जणू खिडकी जवळ्च्या तुमच्या सीट्च्या शेजारच्या सीट वर बसून आम्ही पण प्रवास करतो आहोत.
24 Aug 2016 - 10:54 pm | प्रियान
म्हात्रे काका, खूप छान लिहिताय. तुमची प्रवास वर्णनं नेहमीच आवडतात. (नॉर्वे - northern lights वरील लेख वाखु मध्ये साठवले आहेत. एकदा नक्की जाणार) :)
तसे न्यूयॉर्क माझे आवडते शहर. दर खेपेला नवीन काहीतरी दिसते ! आता तुमच्या नजरेतून सुद्धा पाहणार.
मीना प्रभूंचे न्यूयॉर्क न्यूयॉर्क पुस्तक वाचलेत का तुम्ही? नसेल तर नक्की वाचा.
पुलेशु !
25 Aug 2016 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
मीना प्रभूंचे पुस्तक अजून वाचले नाही. तुम्ही आग्रहाने लिहिले आहे म्हणजे ते उत्तमच असणार.
माझ्या डोळ्यातून पाहिलेले आणि अनुभवावर आधारलेले न्युयॉर्क लिहावे या हेतूने ही मालिका सुरू केली आहे. त्यानंतर ते पुस्तक जरूर वाचायचा प्रयत्न करेन.
24 Aug 2016 - 11:22 pm | पिलीयन रायडर
झालं.. गेला आमचा चान्स!! तुमी लिवा, आम्ही पुरवण्या जोडु!
25 Aug 2016 - 12:21 am | राघवेंद्र
तुम्ही लिहा लहानग्या सोबत १६ तासाचा प्रवास :)
25 Aug 2016 - 2:44 am | पिलीयन रायडर
त्याला एकच ओळ पुरे
"आssssssssssssssssssssssssssssssssssss" ती मनातल्या मनात किंचाळत होती....
=))
बाकी माझ्यापेक्षाही तुम्ही लिहीणं जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला खादाडी कुठे करावी ह्या जीवनावश्यक विषयाची सखोल माहिती आहे!
25 Aug 2016 - 12:45 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
न्यु यॉर्कवर शेकडो लोकांनी अगोदर लिहिले आहे. तरी आम्ही आमचे म्हणणे लिहायला कचरलो नाही. मग, तुमचा चान्स गेला असे कसे होईल ?? तुमच्या शब्दांत लिहिलेले तुमचे अनुभव वेगळेच असणार आणि ते वाचायला माझ्यासकट सर्व मिपाकरांना खूप आवडेल. तेव्हा सरसावा लेखणी आणि होऊन जाऊ द्या ! :)
25 Aug 2016 - 2:45 am | पिलीयन रायडर
काय काका!! तुम्ही लिहील्यावर आम्ही कशाला आणखीन विटा लावायच्या?
पण समजा एखादी जागा तुम्ही नसेल पाहिली तर मग मी त्यावर लिहेन. किंवा माझ्याकडे काही फोटो असतील तर तुमच्याच धाग्यात टाकेन. :)
25 Aug 2016 - 3:16 pm | मोदक
विटांच्या प्रतिक्षेत.
25 Aug 2016 - 12:12 am | प्रभाकर पेठकर
वा! सुंदर लेख. डॉक्टर साहेब आमचे पर्यटन गुरूच आहेत.
अमेरीकेची एक वारी केली आहेच आणि २०२१ पर्यंत व्हिसा जिवंत आहे. त्यामुळे पुन्हा एक दोन वेळा अमेरिका वारी होईलच.
अमेरीका हा खंडप्राय देश एक दोन भेटीत तपशिलात पाहता येत नाही. तो निवांतच पाहावा. माझी पहिली भेट ही शोकेस टूरच होती. त्यात अनेक शहरे पाहिली पण 'अनुभवली' नाही. त्यामुळे अमेरिका अजूनही पर्यटन यादीत वरच्या क्रमांकावरच आहे.
डॉक्टर साहेब, आम्ही वाचतो आहोतच तपशिलात लिहीत राहा.
25 Aug 2016 - 12:24 am | मिहिर
वाचतोय.
25 Aug 2016 - 12:51 am | आदूबाळ
बिजनेस कलास, एक्काकाका!
(स्क्रीनच्या रुंदीवरून केलेला अंदाज)
अर्थातच, पुभाप्र.
25 Aug 2016 - 1:02 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
नाय हो, बिजनेस क्लास आमच्या खिश्याला परवडत नाय :) नॉनस्टॉप लाँग हाउल प्रवास असल्याने B777 विमान होते. B777 आणि A380 मध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये इतर विमानांच्या मानाने सीट आणि स्क्रिन जरा मोठे असतात. बिजनेस क्लासमध्ये पार आडव्या करून झोपता येईल अशा सीट्स आणि जंबो स्क्रीन्स असतात.
25 Aug 2016 - 9:05 am | जॅक डनियल्स
मस्त वर्णन केले आहे.
मी स्क्रीन चा फोटो बघूनच हि united ची रातराणी येष्टी आहे हे ओळखले होते, या एस्टी ने ५ वेळा प्रवास केला आहे. शिकण्यासाठी टेनेसी ला आलो ते याच विमानामधून. तेच सगळ्यात स्वस्त डील नेहमी मिळायचे आणि वेळा पण चांगल्या आहेत. पण direct असल्यामुळे खूप गर्दी असते आणि air hostess वैतागलेल्या असतात असा अनुभव आहे.
न्यूयोर्क ला कधी जाणे झाले नाही पण गेलो की आत्ता या लेखमालेतून तुमच्या नजरेतून न्यूयोर्क बघीन.
पुलेशु !
25 Aug 2016 - 6:06 pm | हाडक्या
अरे वा. या निमित्ताने जेडी राव आले ऑनलाईन म्हणायचे. ;)
(स्वगत : नवीन सर्पमालिका कधी लिव्हनार ब्वा हे टाळकं)
26 Aug 2016 - 5:11 am | जॅक डनियल्स
हाड्क्या -- थिसिस मध्ये अडकल्याने लिखाण थांबले होते आत्ता चालू करीन परत..
25 Aug 2016 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
युनायटेडने जाण्यायेण्याचा माझा एकंदरीत अनुभव चांगला होता.
नंतर अजून जरा उत्खनन केले तर २ ते ४ तासांचा दुबईत एक स्टॉपओव्हर घेण्याची तयारी असेल तर एमिरेट्स हा उत्तम पर्याय सापडला. दुबईच्या विमानतळावर २-४ तास हा त्रासदायक नव्हेच तर मजेशीर अनुभव असतो; लाँग हऊल रूटवर एमेरीटस A380 विमाने ही आरामदायक विमाने वापरते; आणि मुंबई-न्यू यॉर्क रूटवर तिकीटाची किंमतही युनायटेड व एअर इंडीयापेक्षा कमी दिसली... सर्वात महत्वाचे म्हणजे, अनेक वेळा एमिरेटस ने प्रवास केला आहे आणि म्हणून खात्रीने म्हणू शकतो की तिच्या सेवेची प्रत जगातल्या पहिल्या तीनात आहे.
नॉनस्टॉप सेवा शोधण्याच्या नादात लावलेल्या गाळणीने एमेरिट्स माझ्या नजरेआड झाली :( :)
26 Aug 2016 - 12:43 am | रुपी
तिच्या सेवेची प्रत जगातल्या पहिल्या तीनात आहे. >> सहमत आहे. मुलेबाळे असणार्यांसाठी बहुतेक पहिलाच नंबर लागेल एमिरेट्सचा!
26 Aug 2016 - 1:34 am | अभिदेश
तिकीट असेल तर अजून एक फायदा म्हणजे , US Immigration हे अबुधाबी एयरपोर्ट वरच होते, त्यामुळे खूप वेळ वाचतो(US airport वर उतरल्यावर रांगेत उभे राहावे लागत नाही). मी नेहेमी हाच पर्याय वापरतो. पुणे/मुंबई वरून पहाटेचे विमान असल्यास त्याच दिवशी संध्याकाळी US ला आगमन होते.
26 Aug 2016 - 1:53 am | डॉ सुहास म्हात्रे
ही अमेरिकेतल्या प्रवेशासाठी "प्रीक्लिअरन्स" सेवा अबु धाबी सकट १५ ठिकाणी उपलब्ध मध्ये आहे. ती इतर काही ठिकाणी (?दुबई, मुंबई, इ) सुरू करण्यासाठी तयारी चालू आहे असे ऐकले आहे. अमेरिकेच्या सीमेवर पोहोचण्याआधीच प्रवेश पक्का झाल्याने प्रवाश्यांच्या मनावरचा खूपसा भार कमी होईल हे नक्की.
मात्र, अधिकार्याला संशय आला तर प्रीक्लिअरन्सच्या जागीही तेवढीच समस्या येऊ शकते. काही दिवसांपूर्वी अबू धाबी येथे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणार्या काही भारतिय विद्यार्थ्यांना समस्या येऊन भारतात परतावे लागल्याची बातमी पाहिली/वाचली असेलच.
जेएफकेचा जुना आणि न्यूअर्कचा नवीन असे माझे दोन्ही अनुभव चांगले होते. रांगेत १५-२० मिनिटे आणि अधिकार्याबरोबर २-३ मिनिटे इतकाच वेळ लागला व विचारलेले प्रश्नही जुजुबी होते.
26 Aug 2016 - 2:05 am | सही रे सई
जेएफकेचा जुना आणि न्यूअर्कचा नवीन असे माझे दोन्ही अनुभव चांगले होते. रांगेत १५-२० मिनिटे आणि अधिकार्याबरोबर २-३ मिनिटे इतकाच वेळ लागला व विचारलेले प्रश्नही जुजुबी होते.
अगदी अगदी.. मी पूर्वी LA ला इमिग्रेशनचा अनुभव घेतला होता.. लांबच लांब रांगा आणि आधिकार्यांचे प्रश्न..आधीच २२-२३ तासाचा प्रवास केल्यावर परत एक दिड तास तिष्ठत उभ राहाणं जिवावर येतं.
पण या वेळी JFK ला अगदी उलट अनुभव आला. १०-१२ लोकच होते रांगेत, आणि मुलाखत तर जणू झालीच नाही अशी. मला वाटल की मी संध्याकाळी पोचले ती वेळ कमी गर्दीची असेल म्हणून तसा अनुभव. पण तुम्ही पहाटे पोचलात तरी तीच परीस्थिती होती म्हणजे JFK ला असंच असतं असं दिसतय.
26 Aug 2016 - 11:03 am | प्रसन्न३००१
माझी जेव्हा २ वर्षांपूर्वी अमरिका वारी झाली तेव्हा, साधारण दुपारी १२ च्या दरम्यान जेएफके ला उतरलो त्याही वेळेला इमिग्रेशन साठी रांग न्हवती आणि १० मिनिटात रांग संपवून आणि इमिग्रेशन अधिकार्याच्या डेस्क वरून ५ मिनिटात मी बाहेर पडलो.... या उलट, एकदा लंडन हिथ्रो वर इमिग्रेशन च्या रांगेतून बाहेर पडायला ३.३० तास लागले होते.
26 Aug 2016 - 5:10 am | जॅक डनियल्स
अगदी बरोबर ! मी लिहायचे विसरलो पण united ला कंटाळून मी एमेरिट्स लाच आलो आहे. त्यांच्या वेब साईट वर मला डिसेंबर चे तिकीट $१४०० ला मिळाले होते, बाकीच्या कडे $२००० वर होती सगळी. आणि तुम्ही म्हणता तसे त्यांची ऐर बस विमाने म्हणजे सुख आहेत.
25 Aug 2016 - 9:49 pm | अजया
A380 बद्दल अत्यंत सहमत.केवळ त्या विमानासाठी मी इतिहादचे तिकिट काढते.अतिशय आरामदायी विमान आहे ते.इकाॅनाॅमी सिट्स पण बर्यापैकी कंफर्टेबल असतात.स्क्रिन्स पण छान मोठ्या , पिक्चर क्वालिटी आणि सिलेक्शन उत्तम असते.इतिहादचे जेवणही छान मिळाले आहे दरवेळेला.
या विमानाचा फर्स्ट आणि बिझनेस क्लास वरच्या मजल्यावर असतो.त्याने एकदा यायचय मला!
26 Aug 2016 - 2:00 am | डॉ सुहास म्हात्रे
स्टॉपओव्हर वेळ कधी कधी फार जास्त असते ही समस्या सोडली तर एतिहादची सेवा उत्तम आहे. जेवणाबाबत सहमत.
सर्वच कंपन्यांचा फर्स्ट / बिझनेस क्लास आणि त्याच्या किंमतीही एकदम फक्कड असतात ! :)
25 Aug 2016 - 12:56 am | अर्धवटराव
पण असं झकास प्रवासवर्णन काहि जमलं नाहि कधि. किंबहुना एखादी झकास ट्र्रीप करावी आणि घरी आल्या आल्या सर्व विसरुन जावं असच होतं :(
("इतकं फिरलो जगात" असं फक्त म्हणायचं असतं... अन्यथा जग ते केव्हढं आणि आमचं पाऊल ते काय)
25 Aug 2016 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
काही काळ गेला की प्रवासातले बारकावे, जागांची नावे, आपल्याला आलेली मजा घूसर होऊ लागतात. किमान त्यांची आठवण निवडक फोटोंसह बरोबर रहावी (सगळे फोटो परत परत पाहणे बहुदा शक्य होत नाही) आणि त्या क्षणांची मजा मिपाकारांबरोबर वाटून द्विगुणित करावी याच विचाराने मी माझी प्रवासवर्णने लिहायला सुरुवात केली होती. तुम्हीही तसा प्रयत्न करावा असे सुचवतो.
25 Aug 2016 - 1:32 am | रुपी
मस्त.. भारीच लिहिलं आहे.
बर्याच गोष्टींचा माहीत असल्या तरी शब्द न शब्द वाचला :)
तीन महिने न्यू यॉर्क अशी संधी आम्हांस केव्हा मिळावी? पूर्वेकडच्या दहा दिवसांच्या सहलीत तीन दिवस न्यूयॉर्कसाठी काढले तीच आमच्यासाठी मोठी कामगिरी :)
25 Aug 2016 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
अमेरिकेत म्हणतात ना की, "यू नेव्हर नो !" !
25 Aug 2016 - 2:32 am | अंतु बर्वा
छान सुरुवात! न्युयॉर्कला कित्येक वेळा जाणं झालय, पण तुमच्या नजरेतुन वाचायला वेगळीच मजा येइल :-)
25 Aug 2016 - 3:01 am | चित्रगुप्त
एवढं सगळं सविस्तर आणि मुद्देसूद लिहिण्याच्या तुमच्या चिकाटीला आणि उत्साहाला सलाम. सध्या आम्ही पण अमेरिक्त नुक्तीच वॉशिंगटन डीसी, स्मोकी माउंटन आणी फ्लोरिडाची भटकंती (-- डिस्ने मॅजिक किंगडमच्या बालिश करमणुकीत पैशांचा प्रचंड अपव्यय वगैरे) करून परतलोय. परंतु हे सर्व लिहिण्याचा उत्साह आणि चिकाटी अजिबात नाही. आताशा तर मी फोटो काढणेही सोडून दिले आहे..
पुढील भाग वाचण्याची उत्सुकता आहे. एलिस आयलंडवरील म्युझियम मधे सतराव्या शतकापासून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या जगभरातील लोकांचा जो ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे, त्याबद्दल अवश्य लिहावे, ही विनंती.
25 Aug 2016 - 9:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
थोडा वेळ काढून लिहाच तुमचे अनुभव. तुमची चित्रे आणि लेखनाचे माझ्यासकट अनेक मिपाकर चाहते आहेत.
25 Aug 2016 - 6:57 am | प्रचेतस
उत्कृष्ट लेखन.
तुमच्या नजरेतून न्यूयॉर्क बघण्याची मजा काही औरच.
25 Aug 2016 - 7:42 am | इल्यूमिनाटस
+१
25 Aug 2016 - 8:01 am | रेवती
सफरीची सुरुवात आवडली.
25 Aug 2016 - 9:08 am | अजया
तुमची आणि मधुराची मालिका वाचून नुकतंच आॅस्ट्रिया स्विस झालंय .तर आता तुम्ही अमेरिका काढली! तुमच्यामुळे किती खर्च होतो!! आता करुन द्या अमेरिकेचा व्हिसा आणि काढून द्या तिकिट;)
पु भा च्या अत्यंत प्रतीक्षेत.
25 Aug 2016 - 9:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
:)
25 Aug 2016 - 3:04 pm | शान्तिप्रिय
+१०००
25 Aug 2016 - 3:17 pm | मोदक
भारी लिखाण.. नेहमीप्रमाणेच.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
25 Aug 2016 - 3:44 pm | चौकटराजा
भटकंती अनेक जण करतात. माझे तर काही नातेवाईक या परिसरात रहातातही पण आमच्या उत्सुकतेला ते प्रतिसाद देत नाहीत कारण त्यांच्या उद्देश डॉलर मधे मिळणारा पगार हाच असतो.हिमालयाकडे पाहून यात किती किती आईसक्रीम पॉटस भरून जातील असा विचार करणारेही काही असतात.
आपण मात्र बुद्धीबरोबरच संवेदनाक्षमतेची, रसिकतेची जोड घेउन भटकंती करत असल्याने प्रवासाचा अगदी सर्वतोपरी आनंद घेत असता व तितक्याच तत्परतेने टंकाळा न करता देत ही असता. आपले हे असे बॉल बाय बॉल वर्णन येत रहावे. यात विजा वा विसा याचा जो अनुभव आपल्याला आला आहे त्यातील तीन तत्वे सर्वाना कळली तर धीर येण्यास हरकत नसावी.
अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज या कादंबरीच्या नायकाची फिलिअस फॉग ची आठवण झाली. त्यात त्याचा एक दिवसाच्या हिशेबाचा घोळ झालेला दाखविला आहे. मी तर आता सरसावून या मालिकेची वाट पहात आहे कारण कोण लिहित आहे हे ही फार महत्वाचे. बाकी १९७० पासून आजपावेतो हे शहर अनेक अंगाने चित्रपटात दिसले आहे. पण आपला माणूस पाहून
कथन करतो त्याची लज्जत वेगळीच.
25 Aug 2016 - 4:35 pm | संदीप डांगे
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले
25 Aug 2016 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
आपल्यासारख्या मिपाकरांमुळेच लिहिण्यासाठी धीर आणि मजा येते.
25 Aug 2016 - 4:02 pm | लोनली प्लॅनेट
तुमचे सगळेच लेख आवडतात भटकंती तर फारच
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे
25 Aug 2016 - 4:22 pm | संत घोडेकर
सुरुवात छान झाली, पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतोय
25 Aug 2016 - 5:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर साहेब, लेखन शैली नेहमीच आवडते. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
-दिलीप बिरुटे
25 Aug 2016 - 5:26 pm | इशा१२३
वा मस्तच!तुमचे भटकंती लेख नेहमीच आवडतात. पुभाप्र.
25 Aug 2016 - 5:26 pm | इशा१२३
वा मस्तच!तुमचे भटकंती लेख नेहमीच आवडतात. पुभाप्र.
25 Aug 2016 - 6:08 pm | Jack_Bauer
तुमचे UA49 हे विमान होते का ?
25 Aug 2016 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
हो जाताना UA49 आणि येताना UA48.
25 Aug 2016 - 8:21 pm | भाते
तुमची आणखी एक भटकंती म्हणजे आमच्यासाठी सहलचं! हा आणि यापुढचे सगळे धागे मी, अर्थातच वाचेन. पण कदाचित प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद द्यायला जमणार नाही.
तुमच्या या धाग्यावर बरेचसे रोमातले मिपाकर दिसले. यातल्या बऱ्याचश्या मिपाकरांना व्यनि करून 'कृपया आणखी लिखाण करा' अशी विनंती करायची वेळ आली आहे. संमं, जरा जागे करा त्यांना!
पिराताई, तुमच्या सविस्तर धाग्याची वाट पहातो आहे.
25 Aug 2016 - 9:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
"रोमातल्या मिपाकरांनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा" याच्याशी तीव्र सहमती... +१००० !
26 Aug 2016 - 1:53 am | सही रे सई
हे रोमातले मिपाकर म्हणजे कोण?अडाण्याला शहाण करून सोडाव म्हणते मी... :)
26 Aug 2016 - 1:57 am | संदीप डांगे
Read only mode
26 Aug 2016 - 10:49 pm | सही रे सई
धन्यवाद संदिपजी
25 Aug 2016 - 9:07 pm | जव्हेरगंज
व्वा!
भारी आहे हे!!
25 Aug 2016 - 9:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी अनेकानेक धन्यवाद ! सहलीत आपली सोबत अशीच चालू ठेवा.
25 Aug 2016 - 10:37 pm | आजानुकर्ण
युनायटेड U49/48 म्हणजे अत्यंत घाणेरडे जेवण आणि (त्या जेवणावर उपाय म्हणून घरुन डबे आणणारे) ठेपलाछाप गुजराती न्यूजर्सीकर सहप्रवासी. मात्र फ्लाईटच्या वेळा सोयीस्कर असल्याने ह्या गैरसोयी सहन करता येतात. प्रवासवर्णन आवडले.
26 Aug 2016 - 12:33 am | मुक्त विहारि
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
इस्ट ऑर वेस्ट, एमिरेट्स इज द बेस्ट.
26 Aug 2016 - 2:56 am | निशाचर
न्यूयॉर्कमध्ये तीन महिने भटकायची संधी म्हण्जे भारीच!
युएस आणि युके विसाच्या सुरस कहाण्या ऐकल्या आहेत. चांगला अनुभवही येऊ शकतो, हे तुमच्यामुळे कळलं. पुभाप्र.
26 Aug 2016 - 10:57 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
व्हिसाच्या सुरस कहाण्या नेहमीच सांगितल्या ऐकल्या जातात. माझ्या मते त्या तुलनेने फार कमी असतात, एका नाकारलेल्या व्हिसाच्या बरोबर हजारोंनी मिळालेले व्हिसा असतात. पण, सुखद घटनांपेक्षा धक्कदायक व दु:खद घटनांना जास्त प्रसिद्धीमुल्य असते म्हणून त्या सतत प्रचारात राहतात.
माझे पहिले अमेरिकन आणि युके व्हिसाज् किंचीत बाचाबाची होऊन अनुक्रमे ४५ मिनिटे आणि एक दिवसात ताब्यात मिळाले होते. त्याबाबत कधितरी लिहिले जाईलच :) ;)
26 Aug 2016 - 6:44 pm | निशाचर
अर्थात बॅड न्यूज सेल्स!
युएस आणि युकेचा अजून अनुभव नाही, पण ऑस्ट्रेलियाने तीन महिने लावले होते. (तेही दहाबारा वर्षांपूर्वी. सध्याची स्थिती माहित नाहि.) पण ते गोर्यांनाही तसंच वागवतात, त्याबाबतीत भेदभाव करत नाहीत हे कळल्यावर दु:ख कमी झालं होतं :)
26 Aug 2016 - 8:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
मलाही ऑस्ट्रेलियन एंबॅसीने सहा आठवडे लागतील असे सांगितले होते. पण, जरासा फॉलोअप व कागदपत्रे इमेल केल्यावर व्हिसा मिळाल्याचे पत्र दोन आठवड्यांत आणि ते ही शुक्रवारी (गल्फमधला आठवडी सुटीचा दिवस) पाठवले.
26 Aug 2016 - 10:32 pm | निशाचर
माझी विसाची कॅटेगरी थोडी विचित्र होती. त्यामुळे दर आठदहा दिवसांनी नवनवीन कागदपत्रे आणि पुराव्यांची मागणी अशी मजामजा होती. शेवटी विसा मिळाला तेव्हा ती एक्साइट्मेंट आणि चॅलेंजेस हिरावून घेतली, असं वाटलं होतं!
26 Aug 2016 - 8:42 am | सामान्य वाचक
वाखु साठवत आहे
26 Aug 2016 - 9:28 am | दिपस्वराज
+११११
+१
तुमची आणखी एक भटकंती म्हणजे आमच्यासाठी सहलचं!पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
26 Aug 2016 - 9:35 am | चतुरंग
म्हात्रे साहेबांच्या अभ्यासू नजरेतून न्यूयॉर्कची सफर म्हणजे पर्वणीच असणार.
अतिशय सुसंगत, नेटकं, माहितीपूर्ण आणि तरीही रंजक लेखन कसं असावं याचा वस्तुपाठ असतो डॉक्टरसाहेबांचे लेखन म्हणजे!
पुढील भागांची वाट बघतोय!
(तुमचा वीजाचा अनुभव वाचून चेन्नई, मुंबई आणि दिल्ली कौंसलावासला दिलेल्या भेटी आठवल्या!)
-रंगा
26 Aug 2016 - 10:00 am | सुबोध खरे
लेखन शिस्त शिकावी तर तुमच्याकडून, मुद्देसूद तरीही अतिशय जास्त पकड घेणारे एकहि शब्द अनावश्य्क नसलेला लेख
सुरेख
26 Aug 2016 - 10:17 am | राही
प्रवासारंभ वर्णन एक नंबर. अगदी स्टेप बाय स्टेप. तरीही रंजक.
न्यु यॉर्क म्हटले की मला मुंबईसारखेच वाटते. बेशिस्त, गोंधळ, आवाज आणि फेरीवाले सोडून. वॉल स्ट्रीटची मौनातली धावपळ, मुकाट बसलेला तो प्रसिद्ध पण प्रत्यक्ष पाहिल्यावर छोटासा वाटणारा 'बुल', चाय्नीज मार्केट, सगळं आपलं वाटतं.
पण सगळ्यात लक्ष्यात राहिला आहे तो बॅटरी पार्क येथे पायांखाली दणाणणारा अॅटलांटिक. न्यू पोर्ट येथे एक्स्चेंज प्लेसलाही असा स्टील फ्रेमवर समुद्राच्या (हड्सन नदीच्या) किंचित आत किनार्यावर बांधलेला लाकडी पॅटिओ आहे. जगात आणखी अनेक ठिकाणी कदाचित असतीलही. आपण त्या मजबूत लाकडी माळ्यावर असतो आणि खाली समुद्र घोंगावत, रोरावत, गाजत असतो. पायांनाही ती स्पंदने जाणवतात. शिवाय पोकळीमुळे आवाज वर्धित होतो. तो थरार वेगळाच. आणि आत कुठे तरी जाणवत राहातं की ह्याचंच एक टोक, आत्याच्या चुलत नणंदेचा मावसदीर इतक्या दूरच्या नात्याने अरबी समुद्राच्या रूपाने आपल्या उत्तर पश्चिम किनार्याशी जोडलेलं आहे.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
26 Aug 2016 - 11:09 am | समीरसूर
सुंदर लेख! आणि फोटोजदेखील!
न्यू यॉर्क मी एकदा पाहिलेले आहे. मला जबरदस्त आवडले. एकदा तिथे काम करण्याची, राहण्याची इच्छा आहे.
कुणाला काही संधी माहीत असल्यास कृपया सांगावी. :-)
26 Aug 2016 - 12:46 pm | सिरुसेरि
सुंदर लेख आणि फोटो
26 Aug 2016 - 2:27 pm | प्रमोद देर्देकर
काका नेहमी प्रमाणे सुंदर लेख आणि फोटो. एक आहे तुमच्या लेखा मुळे सगळे अनिवासी लिहते झाले आणि आम्हाला माहित झाले..
26 Aug 2016 - 2:45 pm | मंजूताई
शिस्तबध्द वर्णन आवडलं तसेच अत्यंत उपयुक्त! जुलैत प्रथम वारी करायचा मानस आहे ... मानस कारण व्हिसा ! पण त्याची धास्ती वाटण्याचे काही कारण नाही हे कळले. वाखु साठवली.
चित्रगुप्तजी तुमचेही वर्णन येऊ देत कारण लेकीकडे वॉडीसीला मुक्काम असणारे....
26 Aug 2016 - 3:30 pm | मानस्
व्वा! मस्त लेखन..अगदी तुमच्यासोबत न्यूयॉर्क सफारीला निघाल्यासारखे वाटत् आहे..पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतोय.
26 Aug 2016 - 4:53 pm | उल्का
मस्त वर्णन.
सुंदर फोटो.
26 Aug 2016 - 5:14 pm | सविता००१
लेख आणि फोटोज