न्यू यॉर्क : ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
6 Sep 2016 - 11:37 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

"१९० स्ट्रीट"चा बोगदा एकदम "प्लेन जेन", एकरंगी आणि साधा पण नेहमी स्वच्छ व नीटनेटका असे; तर "१९१ स्ट्रीट"चा बोगदा सुंदर रंगीबेरंगी ग्राफितीने भरलेल्या भिंती, त्यावर मधूनच कोणीतरी स्प्रे पेंटने काढलेले फराटे व नावे आणि बर्‍याचदा काहीसा अस्वच्छ असा असे. एकमेकापासून जेमतेम दोन-तीनशे मीटरवर असणार्‍या या सबवेच्या दोन बोगद्यांतील फरक न्यू यॉर्क शहरात एकत्र नांदणारी विविधता अधोरेखीत करताना दिसतो.

जगाची थोडीबहुत माहिती आहे पण न्यू यॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे नाव माहीत नाही असा माणूस विरळा असेल. केवळ अमेरिकेचाच नव्हे तर जागतिक अर्थकारणाचा मानबिंदू असलेल्या या संकुलातले मानाचे दोन टॉवर्स ११ सप्टेंबर २००१ रोजी अतिरेकी हल्ल्यामध्ये विमानांच्या आघातांनी जमीनदोस्त केले गेले. अगोदर माहीत असले नसले तरी या दुर्घटनेमुळे हे जुळे टॉवर्स जगातल्या बहुतेक लोकांना माहीत झाले. त्यानंतर त्या घटनेमुळे सुरू झालेल्या प्रतिक्षिप्त सामरिक व आर्थिक, कृती व घटनांच्या साखळीने सर्व जग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ढवळून निघाले आहे. अजूनही त्या परिणामांचे दीर्घकालीन धक्के अजूनही संपलेले नाहीत आणि नजिकच्या काळात संपतील असे वाटत नाही.

वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१)

या संकुलात एकूण सात महाकाय इमारती होत्या. मात्र, या संकुलाचे नाव जगभर प्रसिद्ध झाले ते ०४ एप्रिल १९७३ साली जनतेसाठी खुले केलेल्या जुळ्या टॉवर्समुळे. आजवरही बहुतेक सर्व जणांच्या मनात "वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणजे हे दोन जुळे टॉवर्स होते" हेच समीकरण कायम आहे. १वर्ल्ड ट्रेड सेंटर ४१७ मीटर व २वर्ल्ड ट्रेड सेंटर ४१५ मीटर उंच होते. हे जुळे टॉवर काही काळ जगातल्या उंचीने एक आणि दोन क्रमांकाच्या इमारती होत्या. थोड्या काळातच, मे १९७३ मध्ये, शिकागोतल्या ४४० मीटर उंच सिअर्स टॉवरने जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब पटकावला. तरीही, न्यू यॉर्क शहराचे वलय सभोवती असलेल्या या इमारतींचे पर्यटन नकाश्यावरचे महत्त्व अजिबात कमी झाले नाही. शिवाय, २०१० मध्ये दुबईमधील बुर्ज खलिफा ही इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत सर्वात जास्त ११० मजले असलेली इमारत म्हणून १ वर्ल्ड ट्रेड सेंटरचा विक्रम अबाधित होता. अर्थातच, न्यू यॉर्कला भेट देणार्‍या पर्यटकांचे वर्ल्ड ट्रेड सेंटर हे प्रथम क्रमांकाचे आकर्षण होते यात काहीच आश्चर्य नव्हते.


वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१) : ०१. जुळे टॉवर्स आणि परिसर (जालावरून साभार)

या संकुलातल्या मॅरिऑट World Trade Center (3 WTC), 4 WTC, 5 WTC, 6 WTC, आणि 7 WTC या इतर इमारती १९७५ ते १९८५ या कालखंडात बांधल्या गेल्या. न्यू यॉर्कच्या आर्थिक प्रभागात (फिनान्शियल डिस्ट्रिक्ट) असलेले हे संकुल बांधायला त्या वेळेस $४० कोटी (आजची किंमत $२३० कोटी) खर्च आला होता आणि त्यातील व्यापारी जागेचे एकूण क्षेत्रफळ १२ लाख ४० हजार चौ मीटर (१ कोटी ३४ लाख चौ फूट) होते.


वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१) : ०२. जुन्या संकुलाचा आराखडा (जालावरून साभार)

२ वर्ल्ड ट्रेड सेंटर वरच्या १०७ आणि ११० व्या मजल्यांवर असलेल्या ऑब्झर्वेशन डेकवरून दिसणार्‍या न्यू यॉर्क आणि विशेषतः मॅनहॅटनच्या नजार्‍याची स्पर्धा करणारी इतर इमारत या जगात खचितच नव्हती. १०७ व्या मजल्यावर काचेतून परिसर पाहायला मिळत असे, तर ११० मजल्यावर खुल्या आकाशाखाली उभे राहून (ओपन टू स्काय) न्यू यॉर्कचा परिसर न्याहाळण्याची मजा पर्यटक घेऊ शकत असत. उत्तम हवामान असेल तर ८० किमी पर्यंतचा परिसर स्वच्छ दिसत असे.


वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१) : ०३. एकशे दहाव्या मजल्यावरचे खुल्या आकाशाखालचे ऑब्झर्व्हेशन डेक
(जालावरून साभार)

९/११ च्या हल्ल्यात जुळे टॉवर्स जमीनदोस्त झाले. सात क्रमांकाची इमारत पूर्णपणे कोसळली, तर इतर चार इमारती धोकादायक झाल्याने त्यांना पाडणे भाग पडले. अर्थातच हा सर्व भाग नष्ट झाला.

वर्ल्ड ट्रेड सेंटर (सन १९८९)

१९८९ मध्ये झालेल्या अमेरिका फेरीमध्ये या संकुलाला भेट देऊन ११०व्या मजल्यावरील खुल्या आकाशाखालच्या ऑब्झर्व्हेशन डेकवरून न्यू यॉर्क आणि परिसर पाहण्याची संधी मला मिळाली होती. त्या वेळचे, आता तांबूस-धूसर होत असलेले, काही फोटो पाहून त्या काळाची थोडीशी कल्पना करता येईल...


वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ०१. जुळ्या टॉवर्सची धुक्यात हरवलेली शिखरे


वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ०२. पायथ्याजवळून टॉवरला कॅमेर्‍याच्या कवेत घेण्याचा प्रयत्न

 ...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ऑब्झर्व्हेशन डेकवरून दिसणारे न्यू यॉर्क :
०३. ब्रूकलीन पूल आणि परिसर व ०४. हडसन नदी आणि तिच्या काठावरच्या गगनचुंबी इमारतींच्यावर असलेले बगीचे

 ...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ऑब्झर्व्हेशन डेकवरून दिसणारे न्यू यॉर्क :
०५. जवळच्या गगनचुंबी इमारती व ०६. दूरवर पसरलेले मॅनहॅटन

वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आमच्या भेटीच्या दिवशी कर्मधर्मसंयोगाने फ्रेंच राज्यक्रांतीचा द्विशतकी सोहळा चालू होता. त्यानिमित्त रंगीत पाण्याचे फवारे उडवत चाललेल्या बोटींच्या संचलनाचे विहंगम दर्शन ऑब्झर्व्हेशन डेकवरून झाले...

 ...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ०७. बोटींच्या संचलनाचे दृश्य व ०८. स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचे विहंगम दर्शन

वर्ल्ड ट्रेड सेंटरचा नवा अध्याय (२००१ पासून पुढे)

या परिसराला ९/११ च्या विध्वंसातून बाहेर काढून त्याचा पुनर्विकास करण्यासाठी २००१ साली The Lower Manhattan Development Corporation (LMDC) ची स्थापना करण्यात आली. तिने एक स्पर्धा आयोजित केली व Daniel Libeskind याने बनविलेला विकास आराखडा निवडला. त्यात नंतर बरेच बदल केले गेले.

अनेक वर्षांचा विलंब आणि अनेक वादंग यांच्या पार्श्वभूमीवर १३ मार्च २००६ ला या जागेवरचा उरलेला राडारोडा काढायची सुरुवात झाली व २७ एप्रिल २००६ ला नवीन बांधकाम चालू झाले. ते अजूनही चालू आहे. या १६ एकर जागेवर, सद्या मान्य असलेल्या आराखड्याप्रमाणे ६ टॉवर्स; ९/११ स्मारक आणि संग्रहालय; एक मॉल; एक वाहतूक संकुल (transportation hub); एक गाडीतळ; एक बगिचा (लिबर्टी पार्क) आणि एक चर्च (St. Nicholas Greek Orthodox Church) बांधले जाईल. या सर्व विकास कामाचा जमिनी आराखडा (ग्राउंड प्लॅन) खालीलप्रमाणे आहे...


वर्ल्ड ट्रेड सेंटर (२००१ पासून पुढे) : ०१. नव्या संकुलाचा आराखडा. निळ्या रंगांचे चौकोन नष्ट झालेल्या जुळ्या टॉवर्सच्या पायांची जागा दाखवत आहेत. (जालावरून साभार)


वर्ल्ड ट्रेड सेंटर (२००१ पासून पुढे) : ०२. नवे संकुल पूर्ण झाल्यावर कसे दिसेल याचे एक कल्पनाचित्र (जालावरून साभार)

7WTC ही इमारत मे २००६ मध्ये सर्वप्रथम पूर्ण झाली. त्यानंतर ९/११ स्मारक (२०११) आणि संग्रहालय (२०१४); 4WTC (२०१३); 1WTC (२०१४) व लिबर्टी पार्क इतके काम पुरे झाले आहे. 3WTC आणि वाहतूक संकुलाचे काम २०१७/१८ मध्ये पुरे होणे अपेक्षित आहे. 2WTC मधील जागेला अजून पुरेसे खरेदीदार न मिळाल्याने तिचा आराखडा बदलत गेला आहे आणि ती बांधली जाईल की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे आहे. 5WTC च्या बांधकामाची जबाबदारी पाथ (Port Authority of New York and New Jersey) वर सोपविलेली आहे पण तिचे काम सुरू होण्याची तारीख अजून नक्की केलेली नाही. हुश्श ! मोठ्या प्रकल्पांतले घोळ ही केवळ भारताची खासियत नाही असेच दिसते ! :) असो.

वन वर्ल्ड ट्रेड सेंटर

वन वर्ल्ड ट्रेड सेंटर असे अधिकृत नाव असलेली ही इमारत फ्रीडम टॉवर, १ वर्ल्ड ट्रेड सेंटर, One WTC आणि 1 WTC अश्या अनेकविध नावांनी ओळखली जाते. ही पश्चिम गोलार्धातली सर्वात उंच इमारत केवळ वर्ल्ड ट्रेड सेंटर संकुलाचाच नव्हे तर संपूर्ण न्यू यॉर्क शहराचा शीर्षबिंदू आहे. अमेरिकन स्वातंत्र्याच्या घोषणेच्या इसवीसनाच्या आठवणीसाठी तिची उंची १७७६ फूट (५४१ मीटर) ठरवली आहे. १३ फूट ४ इंच उंचीचे १०४ मजले असलेल्या या इमारतीत ३५ लाख चौ फूट व्यापारी जागा आहे. या इमारतीच्या लॉबीची उंची ५० फूट आहे, तिच्यात ७३ लिफ्ट्स आणि एस्कॅलेटर्स आहेत. तिच्या बांधकामाला $३९० कोटी इतका खर्च आला आहे.

या इमारतीत ५० पेक्षा जास्त चित्रपट, टिव्ही सीरियल्स व टिव्ही कार्यक्रमांचे चित्रीकरण झाले आहे.

वन वर्ल्ड ऑब्झरवेटरी

चला तर मग वन वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या वन वर्ल्ड ऑबझर्व्हेटरीमधून न्यू यॉर्क शहर आणि परिसराचे विहंगम निरीक्षण करायला.

सर्वप्रथम A सबवे पकडून चेंबर्स स्ट्रीट गाठला आणि बाहेर पडून मॅनहॅटन डाऊनटाऊनच्या काँक्रिटच्या जंगलातून वाट काढत पाच एक मिनिटे चाललो...


मॅनहॅटन डाऊनटाऊन

आणि अचानक तो सामोरा आला...


वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०१

अजून पाच मिनिटे चालल्यावर इमारतीच्या पायथ्याशी पोहोचलो. या इमारतीचा बाहेरील पृष्ठभाग काचेच्या आठ त्रिकोणांनी बनलेला आहे. त्यामुळे दिवसाच्या बदलत्या प्रकाशात त्याचे रूप सतत बदलताना दिसते. या इमारतीचा दर्शनी भाग फारसा आकर्षक नाही. मात्र, पायथ्याशी उभे राहून वर पाहिले तर तिचे अणकुचिदार टोक ढगांत खुपसलेल्या सुरीसारखे दिसते...


वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०२

इमारतीत गेल्यावर, ऑब्झरवेटरीकडे नेणारा लिफ्टचा मार्ग आपल्याला ९/११ च्या दुर्घटनेची आठवण करून देतो. त्या खडबडीत भिंतींवर चलतचित्रांद्वारे ही इमारत बांधण्यात हातभार लावणार्‍या कर्मचार्‍यांच्या कथा आपल्याला सांगितल्या जातात...


वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०३

या इमारतीला खरे तर ९४ मजले आहेत. पण, सर्वात वरच्या मजल्याला १०४ क्रमांक दिलेला आहे. १०० ते १०२ क्रमांकाच्या तीन मजल्यांना मिळून ऑब्झर्वेशन डेक असे नाव असले तरी केवळ १०० वा मजला पर्यटकांना निरीक्षणासाठी ठेवलेला आहे. १०१ व्या मजल्यावर रेस्तराँ आहेत आणि १०२ मजला खास कार्यक्रमांसाठी राखीव ठेवलेला आहे.

वर जात असताना अतिजलद लिफ्टच्या चारी भिंतींवर जमिनीपासून-ते-छपरापर्यंत असलेल्या LED पडद्यावर आपल्याला गेल्या ५०० वर्षांत न्यू यॉर्क शहरात झालेली स्थित्यंतरे दिसतात; ती पाहताना १०२ वा मजला केव्हा आला ते कळतच नाही. १०२ व्या मजल्यावरच्या एका मोठ्या भिंतीसमोर असलेल्या पडद्यावर चलतचित्रांद्वारे न्यू यॉर्क शहराच्या वेगवेगळ्या रूपाचे आणि धावपळीच्या जीवनाचे दर्शन करविले जाते...


वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०४

या सादरीकरणाच्या शेवटी पडदा मिनिटभर वर जातो आणि त्याच्या मागच्या काचेच्या भिंतीतून मॅनहॅटनची एक झलक दिसते...


वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०५

...आणि पडदा लगेच खाली येतो ! यानंतर पुढे गेल्यावर, वाटेत "आपला ऑब्झरवेटरीचा अनुभव अत्युत्तम बनविण्यासाठी हे विकत घ्या, ते विकत घ्या" असे मार्केटिंग होते. पण तिकडे दुर्लक्ष करून आपण १०० वा निरिक्षणमजला गाठायचा असतो. या मजल्यावरून चहुबाजूच्या परिसराचे मनोहर विहंगम दर्शन होते. डाऊनटाऊनमधल्या गगनचुंबी इमारतींच्या डोक्यावरून त्यांच्याकडे पाहण्यात आणि ७०-८० किलोमीटर दूरवर पसरलेला परिसर पाहण्यात एक वेगळीच मजा आहे...


ऑब्झर्वेशन डेक वरून : ०१. डाऊनटाऊन, इस्ट नदी, ब्रूकलीन पूल आणि ब्रूकलीनचा काही भाग


ऑब्झर्वेशन डेक वरून : ०२. हडसन नदी, डाऊनटाऊन आणि दूरवर दिसणारी टोकदार शिखर असलेली एम्पायर स्टेट इमारत


ऑब्झर्वेशन डेक वरून : ०३. हडसन नदी आणि तिच्या पलीकडील जर्सी सिटी व तिथले डाऊनटाऊन


ऑब्झर्वेशन डेक वरून : ०४. हडसन नदी आणि तिच्या मुखाजवळील बेटावरील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा


ऑब्झर्वेशन डेक वरून : ०५. हडसन नदीकिनार्‍यावरील गगनचुंबी इमारतींवरील बगीचे


ऑब्झर्वेशन डेक वरून : ०६. मॅनहॅटनचे दक्षिण टोक आणि बॅटरी पार्क


ऑब्झर्वेशन डेक वरून : ०७. जुळ्या टॉवर्सपैकी एकाच्या पायाच्या जागेवर बांधलेले कारंजे

या मजल्याच्या एका भागात गोलाकारात बसवलेले दहा-अकरा टिव्ही वापरून न्यू यॉर्क आणि परिसरातल्या आकर्षणांची आणि खादाडीची माहिती दिली जाते...


ऑब्झर्वेशन डेक वरून : ०८. न्यू यॉर्क आणि परिसराची माहिती देणारे प्रात्यक्षिक


ऑब्झर्वेशन डेक वरून : ०९


ऑब्झर्वेशन डेक वरून : १०

इमारतीवरून खाली येऊन संकुलाच्या परिसरात फेरी मारताना दोन मोठे चौकोनी मानवनिर्मित खड्डे दिसतात. नष्ट झालेल्या जुळ्या टॉवर्सच्या पायथ्यांच्या जागी उरलेले खड्डे भरून न काढता त्यांना तसेच सुशोभित करून त्यांत सपाटीवर पाणी वाहणारी कारंजी बनवली आहेत. खड्ड्यांच्या कठड्यांवर ९/११ च्या दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांची नावे लिहिलेली आहेत..


वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नष्ट झालेल्या टॉवरच्या पायथ्यांच्या ठिकाणी बनवलेले कारंजे

संकुलाचे आवार झाडे व फुलझाडांच्या वाफ्यांनी सुशोभित केलेले आहे...


संकुलाचे आवार

या परिसरात, दीड दशकांपूर्वी, शांतताकाळातील जगातील सर्वात मोठा विध्वंस घडला होता यावर विश्वास बसणार नाही इतपत हा परिसर बदललेला आहे.

(क्रमश :)

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

6 Sep 2016 - 11:51 pm | राघवेंद्र

भौगलिक माहिती, नॉस्टॅल्जिक करून टाकणारे फोटोज, सुंदर माहिती सांगणारा हा भाग. खूप आवडला.

खटपट्या's picture

7 Sep 2016 - 12:13 am | खटपट्या

खूप छान झालाय हा भाग...

पिलीयन रायडर's picture

7 Sep 2016 - 12:30 am | पिलीयन रायडर

मी सुद्धा वर्ल्ड ट्रेड सेंटर मधुनच न्यु यॉर्क पाहिलं होतं. वर जाताना आधी एका गुहेतुन जावा लागतं

5

7

एक तर त्यांची लिफ्टच खतरनाक आहे. १४० मजले जाणारी लिफ्ट! लिफ्टच्या भिंतींएवजी अप्रतिम अ‍ॅनिमेशन दिसते. ज्यात ह्या शहराचा इतिहास दाखवतात. वर गेल्यावर समोर स्क्रिनवर एक लहानशी फिलम दिसते आणि मग त्या स्किन्स उचलल्या जाऊन संपुर्ण शहर दिसते. हा अनुभव अत्यंत खास होता. ती स्क्रिन वर जाते हे मला माहितीच नव्हतं. मी त्याचह व्हिडोयो बनवला होता पण नेमके आझे खुप फोटो डिलीट झाले चुकुन.. त्यात सगळंच गेलं :(

हे माझ्या कडचे फेसबुकवर टाकलेले काही फोटो..

1

2

बरोब्बर मध्यभागी एक प्लॅट्फॉर्म आहे. तिथे परत स्क्रिन्स आहेत आणी असं वाटतं की आपण रस्त्यावर काय आहे ते पाहु शकतोय..

3

जिथे ट्विन टॉवर्स आहेत तिथे आता हे मेमोरियल आहे

WTC

हे वाचुन फार वाईट वाटलं होतं..

wtc

नुकताच तिथे वेस्ट्फिल्ड वर्ल्ड ट्रेड सेंटर मॉल उघडला आहे. ह्याचे काही फोटो जालावरुन साभार!

5

1

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 1:05 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

सुंदर फोटोंची भर.

बहुगुणी's picture

7 Sep 2016 - 12:56 am | बहुगुणी

त्या दोन (उत्तर आणि दक्षिण) Reflecting Absence pools मध्ये २००१ सप्टेंबर ११ च्या हल्ल्यात मृतूमुखी पडलेल्या २९७७ बळींच्या स्मरणार्थ प्रत्येकी एक अशा २९७७ जलधारांच्या रूपाने पाणी सोडलं जातं. आणि दर दिवशी त्या त्या दिवशी ज्या व्यक्तिचा वाढदिवस असेल त्या व्यक्तींच्या नावाशेजारी प्रशासनाच्या वतीने १ पांढरा गुलाब खोचला जातो. मी परवा तिथे गेलो तेंव्हा असा एक गुलाब पाहिला. दोन्ही तळ्यांच्या कठड्यांवर वर लेखात लिहिल्याप्रमाणे जी नावं आहेत, ती वेगवेगळ्या क्रमांकाच्या टाईल्स (पॅनेल्स) वर आहेत. बाजूलाच एका भिंतीवर असलेल्या कंप्यूटर स्क्रीन्स वर कुटुंबियांना आपल्या आप्तांचं नाव कुठल्या पॅनेल वर आहे ते शोधता येतं. तिथे परवा एक भारतीय आजोबा आपल्या कुणा नातीचं नाव शोधत होते, ती वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये कुठल्याशा कार्यालयात त्या दिवशी कामानिमित्त गेली होती...

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 1:03 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

तुमची माहितीतली भर महत्वाची आहे.

पद्मावति's picture

7 Sep 2016 - 1:05 am | पद्मावति

हाही भाग खूप सुंदर.

पाटीलभाऊ's picture

7 Sep 2016 - 1:53 am | पाटीलभाऊ

मस्त फोटो आणि वर्णन

इन्दुसुता's picture

7 Sep 2016 - 2:02 am | इन्दुसुता

म्हात्रेसाहेब आपले लेख नेहमीच उत्कॄष्ट असतात. हा लेखही त्याला अपवाद नाही.
(आपले प्रतिसाददेखिल अतिशय संतुलित असतात, त्यामुळेच विचार करायला लावणारे. )
आपल्या लेखातले तपशील सहसा अचूक असतात. त्यामुळेच येथे एका लहानश्या तपशीलात जाणवलेली चूकीची नोंद आपल्या निदर्शनास आणून द्यावी म्हणून हा लेखन प्रपंच.... ( अन्यथा मी येथे वाचनमात्र आहे आणि इतर कुणाचा लेख असता तर हा अपवादही केला नसता). ९/११ भारतीय आणि अमेरिकन पद्धतीने वेगळे लिहीतात त्यामुळे हा घोळ झाला आहे ह्याची कल्पना तर आहेच. ते ९ नोव्हेंबर नसून ११ सप्टेंबर आहे हा बदल जर सासं कडून आपल्याला करून घेता आला तर लेखात कुठेच काही खोट राहणार नाही.
आपल्या भावना दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही, परंतु तश्या त्या दुखावल्या गेल्या असतिल तर आताच माफी मागते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

लेखात योग्य तो बदल केला आहे.

तुमच्या सूचनेत मला दुखावण्यासारखे अजिबात काहीच नाही. उलट, लिहिण्याच्या ओघात झालेली एक महत्वाची टंकनचूक तुम्ही ध्यानात आणून दिली आहे. त्यामुळे लेखातील मजकूर अधिक अचूक होण्यास मदत झाली आहे याचा आनंदच झाला आहे. त्यासाठी अनेक धन्यवाद !

यापुढेही कधी असे काही नजरेस आले तर बेलाशक तुमच्या प्रतिसादाने तिकडे लक्ष वेधा... सरतेशेवटी लेखन अचूक असणे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.

वाचतिये. फोटू नवे व जुने, वर्णन आवडलं.

तपशीलवार माहितिने भरलेला लेख.

ह्याच वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर फिलिप पेटिटने हाय वायर वॉक केला होता. ह्या सत्यघटनेवर मागच्या वर्षीच 'द वॉक' हा अप्रतिम चित्रपट आलाय. तो जरुर पाहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

फिलिप पेटिटच्या या आणि एकंदर जगभरच्या करामतींबद्दल वाचले होते. पण, त्यावर चित्रपट आला आहे हे माहीत नव्हते. जरूर बघेन तो.

अमेरिका कधी बघायलाच हवी लिस्टमध्ये नव्हती. पण आजचा भाग वाचून जायला पाहिजे हे बघायला वाटून गेले!

संदीप डांगे's picture

7 Sep 2016 - 8:21 am | संदीप डांगे

अगदी मनातलं बोललात!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 12:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

आता तर नुकतीच सुरुवात झाली आहे. अजून खूप भटकंती बाकी आहे :)

ही लेखमाला फक्त न्यू यॉर्क शहर आणि जवळचा परिसर इतपतच सीमीत आहे. पण, या खंडप्राय देशात खूप काही अनवट व बघण्या-अनुभवण्याजोगे आहे. तेव्हा, अमेरिका लिस्ट्मध्ये नाही असे अजिबात करू नका !

चौकटराजा's picture

7 Sep 2016 - 8:41 am | चौकटराजा

चित्रपटातून मॅनहटन शंभर वेळा पाहिले आहे पण ते केवळ एक बॅकड्रॉप म्हणून .त्यामुळे माहितीसह येणार्‍या या लेखाला एक उत्तम माहितीपटाचा दर्जा प्राप्त झालाय. त्याबरोबर बहुगुणी व पिरा यांची भर ही अमुल्य !

किरण कुमार's picture

7 Sep 2016 - 12:31 pm | किरण कुमार

छान माहिती

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Sep 2016 - 12:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

पण, या खंडप्राय देशात खूप काही अनवट व बघण्या-अनुभवण्याजोगे आहे. तेव्हा, अमेरिका लिस्ट्मध्ये नाही असे अजिबात करू नका !

अगदी अगदी!! मला आयुष्यात एकदा अमेरिकेला जायचे(च) आहे, फक्त अन फक्त डीसी मध्ये लिंकन मेमोरियलला भेट द्यायला, तिथे डोके टेकून यायला, अजब देश आहे साला, उदंड विचारी फाउंडिंग फादर्स अन त्यांच्या विचारांना परमोच्च ताकदीत कन्व्हर्ट करू शकलेला देश ___/\___

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

लिंकन मेमोरियलला जरूर भेट द्या. पण, त्याबरोबरच, त्याच्या जवळ असलेल्या पायी भेट देण्याजोग्या अनेक जागांनाही जरूर मान द्या !

इशा१२३'s picture

7 Sep 2016 - 2:59 pm | इशा१२३

लेख,फोटो आणि बाकीचे माहितीपुर्ण प्रतिसाद आवडले.

इशा१२३'s picture

7 Sep 2016 - 2:59 pm | इशा१२३

लेख,फोटो आणि बाकीचे माहितीपुर्ण प्रतिसाद आवडले.

एस's picture

7 Sep 2016 - 4:24 pm | एस

अतिशय सुंदर.

एस's picture

7 Sep 2016 - 4:24 pm | एस

अतिशय सुंदर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2016 - 6:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

पिलीयन रायडर's picture

11 Sep 2016 - 10:16 pm | पिलीयन रायडर

आज ९/११.. १५ वर्ष झाली...

अमेरिकेत ९११ ह्या नंबरचं महत्व बघता हा हल्ला मुद्दाम ९/११ लाच केला गेला असणार.. कधीही ही तारीख विसरु देणार नाही असा.. अमेरिकन्स सुद्धा "वी विल नेव्हर फरगेट" म्हणतात..

गेला एक आठवडा रात्री आकाशात दोन लाईट सोडलेले दिसत आहेत..

1

हा आंतरजालावरुन साभार

2

पिलीयन रायडर's picture

12 Sep 2016 - 8:44 am | पिलीयन रायडर

आज ९/११ असल्याने लाईट्स पहायचा शेवटचा दिवस. म्हणुन मेमोरियलला चक्कर मारुन आले. इथे जेवढे भारतीय दिसतात ते पहाता ह्या हल्ल्यात नक्कीच खुप भारतीयही जीवास मुकले असणार. विकीवर पहाता युके आणि डॉमेकन रिपब्लिक नंतर सर्वाधिक भारतीयच ह्यात मृत्युमुखी पडले आहेत. मी पहिल्यांदा इथे गेले होते तेव्हा पहिलेच नाव मराठी माणसाचे दिसले होते.. :(

1

2

3

मी वर जो वर्ल्ड ट्रेड सेंटर मॉलचा फोटो दिला आहे, त्याला ऑक्युलस म्हणतात. त्याची रचना तशीच असण्याचे कारणही तसेच आहे. त्यासंबंधीची माहिती देणारे फलक जागोजागी लावले आहेत. अजुन जाणुन घेण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्याखालचा व्हिडिओ नक्की पहा.

4